शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

'संभाजी राजांबद्दल जास्त का लिहीलं गेलं नाही?'


नुकताच माझे मित्र श्री विनायक देसाई यांनी एक प्रश्न विचारलाय की, 'संभाजी राजांबद्दल जास्त का लिहीलं गेलं नाही?'

खरं तर तीच मोठी चुक झाली. जर राजांबद्दल अधिक लिहिलं गेलं असतं तर आज फक्त नावाचाच श्रीमंत कुक्कुटे, पुरुष नसलेला खेटरकर, फूसका महामुर्ख सांगलीकर, जीच्या नावातच अनिती आहे अशी अनिता पाटील आणी निचोत्तम मोहिते यांची इतिहास विकृत करायची हिम्मत झाली नसती.

पन या लोकांची एकंदर कुकर्म बघता उद्या महाराजांनी जरी सांगीतलं की. "आम्ही हिंदुच होतो आणी आम्हाला हिंदु असल्याचा अभिमान आहे".......... तरी हे लोक महाराजांना चुक ठरवत म्हनतील, "नाहि महाराज । तुम्हाला बुद्धीभ्रंश झालाय........ तुम्ही निधर्मीच होता ........... हिंदु नावाचा कोणता धर्मच अस्तित्वात नव्हता ।"

नुकतीच घडलेली एक घटना सांगतो. म्हनजे तुम्हाला कळेल की या लोकांचा ब्राम्हनद्वेष किती पराकोटिचा आहे आणी यांचं शिवप्रेम किती बेगडी आहे ते ।

काही दिवसांपुर्वी पुण्याच्या पाणीव्यवस्थेच्या संदर्भात एक कार्यक्रम झाला. त्यात असं मत मांडलं गेलं की. 'औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं न करता पुण्याचं नाव बदलावं जेणेकरुण पेशव्यांचे पुणे ही पुणे शहराची ओळख पुसली जाईल.'

....... म्हनजे शिवाजी महाराजांच्या नावाने एक नविन धर्म (?) स्थापन करणा-या पुरुषोत्तम (?) खेडेकराला शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांनी ज्या औरंगाबादेत आपले राजकारणातले दुसरे पाऊल टाकले त्या औरंगाबादेची ओळख संभाजी नगर अशी न झालेली चालेल. पण पुण्याची 'पेशव्यांचे पुणे' अशी ओळख मिटवायची आहे. म्हणजेच संभाजी राजांच्या नावाने संभाजी नगर असा एक शहर ओळखलं जावं यापेक्षा याना पेशव्यांचा द्वेष जास्त महत्वाचा वाटतो.

असो...कोळसा कितीही उगला तो कालच ...त्याचप्रमाणे या लोकांबद्दल कितीही बोला...शेवटी आपलेच शब्द विटाळनार...म्हणून मी जास्त बोलत नाही...सरळ विषयाला हात घालतो.......तर विषय होता कि संभाजी राजांबद्दल जास्त का लिहिलं गेलं नाही???

संभाजी राजांची कारकीर्द नऊ वर्षांची. त्यात १२० लढाया....खरं तर संभाजी राजांची कारकीर्द वयाच्या नवव्या वर्षीच सुरु झाली होती. जेव्हा ते क-हे पठारावर मिर्झा राजांच्या गोटात स्वराज्याचे जामीन म्हणून गेले होते. त्यानंतर मी जे वर उल्लेख केले ते राजकारणातले दुसरे पाउल म्हणजे औरंगाबादला शहजादा मुअज्जम याची भेट घ्यायला गेले ते दुसरे पाउल....

संभाजी राजे शिवाजी महाराजांच्या पश्चात गादीवर आले. सतत नऊ वर्ष लढाया चालू होत्या. चारी अंगानी शत्रू हल्ला करत होता. या सर्व आघाड्यांवर संभाजी राजांनी अगदी उत्तुंग विजय मिळवले. ....पण त्यानंतर संभाजी राजे फितुरीने पकडले गेले.

आज असा खोडसाळ प्रचार केला जातोय कि संभाजी राजांना मनुस्मृति नुसार शिक्षा देण्यात आली. खोटं आहे हे.

१. एक तर संभाजी राजे हे कोणी शुद्र नव्हते. त्यांची मुंज झाली होती. ते क्षत्रिय होते. आणि क्षत्रियाला वेदांचा अभ्यास करण्याचा हक्क मनुस्मृतिने दिला आहे.
२. शहाजी राजे आणि शिवाजी राजांचे बंधू थोरले संभाजी राजे हे सुद्धा संस्कृत अभ्यासक होते. थोरले संभाजी राजे हे कवी सुद्धा होते.
३.शिवाजी राजांची राजमुद्रा संस्कृत मध्ये आहे. अर्थ न जाणून घेता राजांनी ती बनवली असे तर नक्कीच नाही.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे...... स्वतः औरंगजेबाने आपल्या चरित्रात लिहून ठेवले आहे कि, "माझ्या वडिलांनी सर्वात मोठी चूक केली ती शहाजीना जिवंत सोडलं....जर शहाजी उरले नसते तर शिवाजी उभा राहिलाच नसता. दुसरी चूक मी केली ती म्हणजे हाती आलेल्या शिवाजीला माझ्या चुकीमुळे जिवंत जाऊ दिला. आता संभाजीला जिवंत ठेऊन मी तिसरी चूक करणार नाही. "...कोणी विद्रोही लेखक काय सांगतोय यापेक्षा औरंगजेब काय म्हणतो हे जास्त महत्वाचे आहे. नाही का???

तर मंडळी...संभाजी राजांच्या बलिदानानंतर २७ वर्ष मराठे लढत होते. औरंग्याला गाडे पर्यंत. या सत्तावीस वर्षात मराठ्यांची गादी नष्ट झालेली. खजिना नाही. दोन्ही छत्रपती गेलेले. या सत्तावीस वर्षात मराठ्यांनी अक्षरशः घरादारावर पाणी सोडलं होतं. गावच्या गाव बेचिराख होत होती. माणसं मारत होती.

.................. अश्यावेळी संभाजी राजांबद्दल लिहायला कोणाकडे हो सबूर असणार?? आणि संभाजी राजे जरी स्वतः हजार असते तरी ते सुद्धा म्हणाले असते कि "अरे चारी बाजूनी गनीम अंगावर आलाय आणि तुम्ही माझ्याबद्दल काय लिहिताय?? हातातली ती शहामृगाची पिसं टाका आणि तलवारी घ्या. गनिमाला सळो कि पळो करून सोडा."

राजसत्ता स्थिर असेल तर राज्यात कलेचा आदर होतो. ती भरभराटीस लागते. शिवाजी राजांच्या काळात राजसत्ता स्थिर होती. आग्र्याच्या सुतके नंतर शिवाजी राजांनी औरंगजेबाला पत्र लिहिल कि मी आता लढणार नाही. त्यामागच कारण मिर्झा राजाच्या स्वारीत स्वराज्याची नासाडी झाली होती. ती भरून काढायची होती. लढाया नसल्यामुळे राज्य स्थिर होते. कवी, लेखक पंडित यांना राजाश्रय मिळाला होता.

संभाजी राजांच्या बलिदानानंतर इथे सत्तावीस वर्ष मराठे एक-एकटे लढत होते. खजिना नाही. हातात एकही किल्ला कायमस्वरूपी नाही....हातात होती ती तलवार आणि हृदयात शिवाजी राजांनी दिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न. त्या स्वप्नापायी मराठे जीवाचे रान करत होते. तिथे कोणाला वेळ असणार हो संभाजी राजांबद्दल लिहायला???

औरंगजेब मेला आणि त्यानंतर काही काळाने मराठेशाहीला पुन्हा स्थिरता प्राप्त झाली. पण........ 'सत्तावीस वर्षापूर्वी संभाजी राजांचा पराक्रम बघितलेले किती जन उरले होते??'.... हा प्रश्न पडतो. जे काही मागची पिढी येणाऱ्या पिढीला सांगत होती तोच काय तो इतिहास..... यातूनच अनेक दंतकथा सुद्धा निर्माण झाल्या...

माझच उदाहरण सांगतो. चौथीला असताना मी संभाजी महाराजांबद्दल मत मांडलं होतं..माझ्या ताईकडे ...... कि संभाजी महाराजांमुळे शिवाजी महाराज वारले.......कारण आमच्या तिसरीच्या कि चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात असच लिहिलं होतं कि शिवाजी राजांच 1680 साली निधन झाल. त्यांना गुढघेदुखीचा त्रास होता. त्यात संभाजी राजे मुघल सरदार दिलेर खानाला जाऊन मिळाले. त्याचा त्यांना धक्का बसला होता. एवढं लिहून धडा संपवला होता. आज मला माझ्या त्या वक्तव्याची लाज वाटते. कि मी असही या धर्मवीराबद्दल बोललो होतो. आता मला सांगा कि हे पुस्तक कोणी छापलं होतं?? तर ...सरकारने!!

ती अर्धवट माहिती वाचून जर आजच्या युगात आपला गैरसमज होऊ शकतो तर त्याकाळी कुठलीच आधुनिक साधने नसलेला समाज किती अंधारात असेल??? ...

आज जे काही गोंधळाचं वातावरण आहे त्यात दोष कोणाचा?? काहीच माहित नसताना उगीच काही बाही लिहिण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी चुप्पी साधली त्यांचा कि आज स्वतः शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी येऊन सांगितल्याप्रमाणे काहीही लिहिणाऱ्या विद्रोही नावाच्या समाज कंटकांचा ???

विचार करा...मला जेवढा उमगलं तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला. आता तुम्ही विचार करा....काय करायचं ते???


आपला प्रसाद राउत



"औकात"


 Monday, November


आज जेव्हा ऑफिसला येत होतो तेव्हा नाहूर पुलावर इंदिरा गांधी यांना जन्मदिनानिमित्त  अभिवादन करणारा कॉंग्रेस पक्षातर्फे लावलेला बोर्ड दिसला. आणि सहज काही गोष्टी आठवून गेल्या. काश्मीर आणि पाकिस्तान याबाबत गांधी, नेहरू आणि परत गांधी घराण्याचे चुकलेले धोरण आठवले. 


                       खान अब्दुल गफार खान...... ज्यांना सरहद्द गांधी म्हटले जायचे....... त्यांनी पाकिस्तान निर्मिती नंतर खेदाने उद्गार काढले होते, "बापू,  तुम्ही आम्हाल लांडग्यांच्या पुढ्यात टाकले." आजही सिंध प्रांत आणि बलुचिस्तान प्रांतातले लोक गांधीना मानतात. पण स्वतः प्रतीगांधी यांनी काढलेले उद्गार गांधींच्या चुकीच्या धोरणाबद्दल जास्त समर्पकपणे भाष्य करतात. असो.


                     त्यानंतर जेव्हा काश्मीरसाठी लढाई चालू होती तेव्हा २/३ काश्मीर आपल्या सैन्याने  जिंकला असताना नेहरूंनी मोठेपणा करत हा प्रश्न युनो मध्ये नेला. आणि युद्ध बंद करत काश्मीर प्रश्न भिजत ठेवला. हि नेहरूंची चूक.


                     त्यानंतर परत आपल्या नशिबाने काश्मीरचा प्रश्न निकालात काढायची संधी दिली होती............ इंदिरा गांधीना. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे ७९,७०० सैनिक आणि १२,५०० नागरिक आपल्या हातात होते......... त्या बदल्यात काश्मीरचा १/३ भाग मागायचा अशी साधी वूहरचना होती......... आणि तशी तयारी सुद्धा झाली............ पण नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा नाजायाज बाप अमेरिकेने इंदिरा गांधीना युनोच्या अध्यक्ष्यपदाची पदाची लालूच दाखवून त्या ९०००० पकड्याना सोडवून घेतले. आणि आमच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या पकड्यांच्या हातात कुराण देऊन त्यांना सोडून दिले....... ठरल्याप्रमाणे अमेरिकेने इंदिरा गांधी यांना युनोचे अध्यक्ष्य बनवले. आणि एका महिन्या नंतर "YOU ARE NOT SUITABLE FOR THE POST OF UNO PRESIDENT." असं म्हणत पदावरून इंदिराजींची गच्छंती करवली. खरं तर काहीजण याला अमेरिकेचा दुटप्पीपणा म्हणतील.

                  'पण मी म्हणेन कि अमेरिकेने इंदिराजींना त्यांची "औकात" दाखवली.' कारण ज्या व्यक्तीला देशाच्या अतिमहत्वाच्या प्रश्नापेक्षा युनोचे अध्याक्ष्यपद महत्वाचे वाटले त्या व्यक्तीकडे युनोसारख्या शेकडो देशांच्या संघटनेच प्रतिनिधित्व देणं मूर्खपणा आहे. 



                 आता काही जन अस म्हणतील कि, "प्रसाद, त्या आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या.  त्यांच्या बद्दल आपणच असं बोललो तर परकीय लोक बोलणारच."


                   पण मित्रानो लक्षात ठेवा देशापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही.

                  संभाजी राजाना पुढे घालून जेव्हा दिलेरखान स्वराज्याच्या किल्ल्यावर चाल करून जात होता. तेव्हा शिवाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदारांना हुकुम धाडला होता कि, "स्वतः युवराज समोर दिसले तरी तोफा डागायला कमी करू नका."


                  आम्ही त्या शिवाजी राजांचे मावळे आहोत. चुकत असेल तर बोलणारच. मग तो आमचा बाप का असेना???


जयतु हिंदुराष्ट्राम !!!

सत्ता - एक वज्रदंड !!!


 Monday, November 28, 2011 


 हिंदुराष्ट्राचा संकल्प मनात ठेवुन कार्य करणारे तसंच ज्यांना या देशातली अराजकाची परिस्थिती बघुन वैषम्य वाटतं आणी ज्यांना आपल्या देशाची परिस्थिती बघुन सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असं वाटतं............ त्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना आज मी एक सत्यघटना सांगणार आहे..............


                जर आपन सर्वांनी ह्या घटनेचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवुन आचरण केलं तर मला नाही वाटत कोणाचा 'बा' आपल्या या भारत देशाला पुन्हा एकदा सुवर्णभुमी बनवु शक्ण्यापासून आपल्याला अडवू शकेल............... 
नमनालाच घडाभर तेल नको या न्यायाने ती घटना सांगतो.........................


                साधारण 80 च्या दशकात म्हनजे इंदिराजींच्या राजवटीत बिहारचा एक मुख्यमंत्री होता............. जगन्नाथ मिश्रा नावाचा............... दहा वर्षापुर्वी म्हनजे 70 च्या दशकात तो मूख्यमंत्री असताना बिहारमध्ये बेबी कांड केलं होतं त्याने............ ज्यात बेबी नावाच्या मंत्रालयात सर्वीस करना-या एका मूलीवर  काही मंत्र्यांनी मंत्रालयाच्या आवारात बलात्कार करुन तीला ठार मारुन मंत्रालयातच पुरलं............... 


                त्या बेबी चे दोन मानलेले भाऊ होते............... एक राजकुमार सिंग आणी दुसरे कूणाल सिंग............. या दोघांनी तेव्हा शपथ घेतली की या मिश्रा कडून आमच्या बहीणीवर झालेल्या अत्याचाराचा  सुड घेऊ................. आणि त्याचवेळी कसा बदला घ्यायचा याचेसुद्धा प्लॅनिंग केले.......... राजकूमार सिंग आय. ए. एस. ऑफीसर आणी कुणाल सिंग आय. पी. एस. ऑफिसर बनले............ 70 ते 80 च्या दरम्यानचा हा काळ हे दोघे केवळ आणी केवळ आपल्या ध्येयासाठी झटत होते.......


                माणसाची दुष्कृत्ये कशी त्याला फिरवून परत त्याच ठिकाणी आणतात ते बघा.....

               दहा वर्षांनी जेव्हा हे दोघे भाऊ पॉवर मध्ये आले.....म्हणजे एक आय.ए.एस ऑफिसर आणि दुसरा आय.पी.एस. ऑफिसर झाला....... तेव्हा फिरून दहा वर्षांनी जगन्नाथ मिश्राचे सरकार निवडून आले. आणि त्याच वेळी हे दोघे भाऊ बिहारच्या मुख्य पदावर आले. राजकुमार सिंग पटणा जिल्ह्याचे डीस्ट्रीक्ट मेजीस्ट्रेट बनले आणि त्यांनी पूर्ण नेटवर्क तयार करून ठेवले......ए. आर. किदवई हे त्यावेळी बिहारचे राज्यपाल होते............ त्यांच्याकडून त्यांनी जगन्नाथ मिश्राच्या अटकेसाठी वारेन्ट तयार करून घेतले....... आणि कुणाल सिंग सहा महिन्यांनी पटणाचे एस.पी बनून आले.....त्याचवेळी जगन्नाथ मिश्रा याने एक पार्टी ठेवली.............. कि दोन नवीन आणि तरुणांना मी पटणा जिल्ह्याच्या विकासासाठी आणले आहे............... या पार्टीत हे दोघे भाऊ गेले....कुणाल सिंग थोडे गरम डोक्याचे होते......त्यांनी त्याच पार्टीत जेव्हा जगन्नाथ मिश्राने त्यांना स्टेजवर बोलावले तेव्हा ... ....कुणालजीनी ...त्या जगन्नाथ मिश्रावर रीवोल्वर ताणले आणि म्हणाले.....( माफ करा पण त्या घटनेचं गांभीर्य आणि परिणाम कळावा म्हणून हि भाषा वापरावी लागत आहे...)........." मा******द मिश्रा...आज से आपने जिंदगी के उलटे दिन गीणना शुरू कर दे....!" ...मिश्राला असं काही होईल याची कल्पना नव्हती......तो पूर्ण बावचळून गेला.....कुणाल सिंग म्हणाले...." पेह्चाना?? हम उसी बेबी के भाई है..जिसे तुने मार दिया था....!!...चल अब पुलिस थाने!" .....लगेच कुणालजीनी आपल्या सहका-यांना आज्ञा दिली..."सभी फोन लाईने उखाड दो.....सभी गाडीयो के टायर पंक्चर कर दो.......!!"..............कोणीतरी म्हणाला कि, " अरेस्ट वारेन्ट कहा है??"........कुणालजीनी अरेस्ट वारेन्ट समोर केलं.....मग जगन्नाथ मिश्रा म्हणतो कि मी गाडीने जाईन...पण नंतर बघतो तर गाड्यांचे टायर पंक्चर केलेले.....शेवटी रस्त्यावरून धिंड काढली....कुणालजीना जगन्नाथ मिश्रा म्हणतो कि........ तू मला हात लाऊ शकत नाहीस.....ते म्हणाले कि, "मै तुम्हे हात नही लगाउंगा...........  मै सिर्फ ऑर्डर दुंगा..............."..........त्यांनी आपल्या सहका-यांना ऑर्डर दिली कि  "चालताना हा जरा जरी का-कु करताना दिसला कि............ याच्या पायावर फटके द्या....."............पाटण्याच्या रस्त्यावरून त्या बलात्कारी नेत्याची धिंड काढली कुणालजीनी.......आजही जगन्नाथ मिश्रा चालताना एका पायाने लंगडत चालतो.....नंतर इंदिराजींनी जगन्नाथ मिश्राचे सरकार बरखास्त केले आणि चंद्रशेखर यांना नवीन मुख्यमंत्री बनवले.....त्यांनी कुणालजींची बदली सी.बी.आय मध्ये केली...आणि राजकुमार सिंग यांची बदली दुसरीकडे केली......


                                        तर मित्रानो हि घटना आज सागायचा प्रयोजन म्हणजे.......... माझे काही मित्र म्हणतात कि आपण काही करू शकत नही......परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.....त्याचवेळी माझे काही मित्र विशाल हिंदू राष्ट्राचे स्वप्न मनात घेऊन कार्य करत आहेत.....पण मित्रानो सध्या जी काही देशात अराजकाची परिस्थिती आहे ती आपण बदलू शकतो......पण त्यासाठी गरज आहे ती आपण स्वतः पॉवर मध्ये यायची......देशाच्या कारभारात महत्वाचे असलेले प्रत्येक क्षेत्र आपण ताब्यात घेऊया...ताब्यात घेऊया म्हणजे कब्जा नाही करायचा तर त्या प्रत्येक क्षेत्रात आपली माणसे पाहिजेत...जी आपल्या देशातील हि परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नशील असतील...त्याचबरोबर त्या क्षेत्रारील सर्वोच्च व्यक्ती आपली असेल तर ती नक्कीच हि परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करेल...


                                  लक्षात ठेवा मित्रानो...सत्ता हातात असेल तर सर्व काही करता येते...शिवाजी राजांनी आधी गड किल्ले घेऊन आपली ताकद बळजोर केली....सर्व क्षेत्रातली माणसे गोळा केली...... आणि मग हिंदवी स्वराज्य उभे केले..........आज मा. श्री. नरेंद्र मोदीजी आणि मा. श्री. नितीश कुमारजी ...हे अनुक्रमे गुजरात आणि बिहार चा विकास करू शकले कारण सत्ता त्यांच्या हातात होती.....तेव्हा...फक्त घोषणाबाजी करण्यात वेळ वाया घालवू नका तर सत्तेत येऊया.....आणि मग गांधी घराण्याच हे काँग्रेसी पाप या देशातून निखंदून काढूया........................


गद्दार राज्यकर्त्यांच्या राज्यात उपेक्षित देशभक्त......


Tuesday, November 22, 2011


हा तर मित्रानो,

                      या रविवारी मी ज्या व्यक्तीला भेटलो आणि त्यानंतर मला माझ जीवन कृतकृत्य झाल्यासारख वाटलं ती व्यक्ती आहे.... संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील पहिली महिला मंजिरी पहावा  (बायजी). त्यांचे पती कै. मदनलाल पहावा हे गांधी वधाचे जे मानकरी होते त्यात वयाने सर्वात लहान होते. जे नंतर सुटले. 


                     तर रविवारी ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे मित्र भेटलो. आणि एकाने सांगितल कि आज आपण बायजीना भेटायला जात आहोत. आधी मला कळेचना........... कि कोण बायजी?? मग एकाने तिथेच बसलेल्या एका व्यक्तीची ओळख करून दिली. ती अशी कि "हे मदनलाल पहावा यांचे पुत्र." आणि मग मदनलाल कोण तेही सांगितले. त्या व्यक्तीने त्यात सुधारणा केली कि "मी त्यांचा मानसपुत्र आहे." त्यांच्याशी बोलल्या नंतर माझ्या ज्ञानात बरीच भर पडली. असो. 


                   मग आम्ही बायजींच्या घरी गेलो. एका चाळीत.... आत बाहेर ....अश्या दोन खोल्यांचा मंदिरच ते!!!! आम्ही आत गेलो. बायजींच्या पाया पडलो. त्यांच्या आशीर्वादाच्या हातांचा स्पर्श होताच जीवन धन्य झाल्यासारखं वाटलं. 


                 त्यांच्याशी बोलत बसलो. अनेक जुन्या आठवणी त्या सांगत होत्या. बायजींचे माहेर हे मराठी आणि त्यांचे वडील कट्टर सावरकरवादी!!!  कै. मदनलाल पहावा हे पंजाब प्रांतातील ......  जो आज पकड्यांच्या हातात आहे. 


                गांधी वधाच्या खटल्यातून निर्दोष सुटल्यावर त्यांचा जास्त संपर्क सावरकरांचे बंधू गोपाळराव सावरकर यांच्याशी होता. गोपाळराव सावरकर यांच्या पत्नी सिंधुताई यांना ते आपल्या मातेप्रमाणे मानायचे. सिंधू ताई यांनी  एकदा मदनलालजिना लग्न कधी करणार??? असं विचारलं........ तेव्हा त्यांनी उत्तर दिलं...... "ताई तुम्ही मुलगी शोधा..... मी तिच्याशी लग्न करेन."....... त्यावर सिंधू ताई म्हणाल्या.." आणि मी काळी मुलगी पसंद केली तर?? तू तर गोरा आहेस...." ....त्यावर मदनलालजी म्हणाले, ........." ताई तू माझी फक्त ताई नाहीस तर आई आहेस. आणि आई कधी आपल्या मुलाचा वाईट चिंतणार नाही. तू जे करशील ते माझ्या भल्यासाठीच करशील."  मदनलालजिना   मराठी मुलीशीच लग्न करायचं होतं. कारण विचारल्यावर ते म्हणाले कि, "महाराष्ट्रीयन मुली ह्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या असतात त्याचबरोबर काटकसरीने वागना-या आणि संसारी असतात." त्या नंतर सिंधू ताई यांनी बायजीना मदनलालजिंसाठी पसंद केलं. मदनलालजीनी कोणत्याही कॉंग्रेस नेत्यासारख कमावलं नाही हे त्यांच्या घरी गेल्यास आजही कळून येतं. 


                   मध्यंतरी एका वाहिनीची प्रतिनिधी त्यांना भेटायला आली होती. तिला वाटले होते कि मदनलालजी एखाद्या मोठ्या बंगल्यात राहत असतील.......... पण जेव्हा ती त्यांच्या घरी गेली आणि तिने त्यांना बघितलं, चर्चा केली...आणि तिने आपल्या वाहिनीवरून लोकांना सांगितला कि मदनलालजी सारख्या सच्च्या देशभक्ताने काही कमावलं नाही. कारण मी त्यांच्या घरी जाऊन आले आहे. 



                  तर असे हे मदनलाल पहावा !! फाळणीची झळ त्यांनासुद्धा बसली होती. बायजीना त्यांनी जे अनुभव सांगितले होते ते अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारेच होते. ते सर्व अनुभव मला सांगायचे होते.......पण ह्या मंचावरची मर्यादा पाळून  एकच अनुभव सांगतो......... म्हणजे आपल्याला कळेल कि नथुरामजी गांधी यांचा वध का केला ?????? ज्यावेळी फाळणी झाली आणि जगाच्या पाठीवर कधीहि झाले नसेल असे स्थलांतर सुरु झाले ...तेव्हा दोन्ही बाजूंचे लोक परस्परांत ठराविक अन्तर ठेऊन प्रवास करत होते........ पण चुकून एखादा हिंदू एकटा सापडला कि मुसलमान लांडग्यासारखे   त्यावर तुटून पडत होते. त्यावेळी जीवाच्या भीतीने जेव्हा लहान मुलांना तहान लागायची  तेव्हा त्यांना मूत्र पाजले जायचे.............. विचित्र आणि किळसवाना प्रकार वाटेल आपल्याला .....पण हे सत्य आहे.......


                    त्या यातना त्यावेळच्या कॉंग्रेसच्या  कोणत्या नेत्याला कळल्या नसतील त्या नथूरामजीना आणि या त्यांच्या कै. मदनलालजिं सारख्या वीरांना कळल्या. आणि त्यांनी "राष्ट्राय स्वाहा इदं न मम!!" म्हणत भारताच्या पाठीवरचं गांधी नामक हे कुबड कायमचं नष्ट केलं. आजही जर भारताच्या   स्वातंत्र्य युद्धाचा अभ्यास बारकाईने केला तर गांधीजींना एक वेळच काय १०० वेळा भारतीय दंड साविधना अंतर्गत फाशी देता येईल. 


१) सुभाषबाबू जर जिवंत सापडले तर त्यांना इंग्रजांच्या हवाली करण्याचा देशद्रोही करार गांधी यांनी केला आहे. 


२) जनतेचा पैसा असताना आणि कोणतेही संविधानिक अधिकारपद स्वतःकडे नसताना गांधीनी कोणत्या अधिकाराने ५५ कोटी पाकिस्तानला कर्जाऊ म्हणून दिले???


३) सर्वात मोठा विश्वासघात भारतीय जनतेशी गांधी यांनी केला आहे. १९४७ साली जे स्वातंत्र्य मिळाल म्हणून जो डंका वाजवला गेला......... ते वसाहती स्वातंत्र्य होतं आणि या वसाहती स्वातंत्र्याला गांधी मान्यता देणार हे शहीद भगत सिंघ यानाही माहित होतं. म्हणून त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. जर खोट वाटत असेल तर एक गोष्ट सांगतो....आजही भारताची राणी विक्टोरिया राणी आहे......ती आजही भारताची नागरिक आहे. 


                   या आणि अश्या बऱ्याच गोष्टी आहेत. गांधींच आंधळ समर्थन करताना जे लोक म्हणतात कि, "नथूरामजीना गांधी कळलेच नाहीत..." .... तर मी म्हणेन तसं म्हणणारा जगाच्या पाठीवरील सर्वात मोठा मूर्खशिरोमणी असला पाहिजे. कारण नथुरामजी हे गांधीजींचे पहिले सहाय्यक (assistant) होते. असो.


                   अश्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा विषय आज मांडायचं  प्रयोजन असं कि आज त्या मातेला (बायजिना)  ........त्यांचे नातेवाईक  म्हणण्यापेक्षा.......आपलेच काही लोक स्वतःच्या क्षुद्र स्वार्थासाठी त्रास देत आहेत. आणि यात भर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ज्यांची जबाबदारी आहे ती व्यक्ती या सर्व प्रकारात स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा प्रयत्न करत आहे............


                 मित्रानो कोणत्या राष्ट्रात आहोत आपण?? आज चोरांचे वंशज राज्य करत आहेत आणि सच्च्या देशभक्ताला लोक त्रास देत आहेत........जयंत्या सजा-या करता ते चांगले आहे...पण त्यापेक्षा या आणि अश्या सच्च्या देशभक्त व्यक्तीचे विचार आणि गुण आपल्यात उतरवायचा प्रयत्न करा........तरच आपण हे जे विशाल हिंदूराष्ट्राचा स्वप्न आहे ते पूर्ण करू शकू.....



जयतु हिंदुराष्ट्राम !!!



शिवाजी राजांना संकुचित वृत्तीने बघणे सोडून द्या.


November 24, 2011


महावीर सांगलीकर यांचा 'शिवाजी राजे हिंदू होते काय?' हा लेख वाचला. आणि काही प्रश्न मनात उभे राहिले ते असे.......................


१.) त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजी राजांच्या काळात हिंदू हा धर्मच अस्तित्वात नव्हता. शिवाजी राजे शैव धर्मीय होते. वारकरी, शैव, वैदिक आणि मुस्लीम हे दक्खानेतील त्याकाळी अस्तित्वात असलेले धर्म होते. 


नुकतंच कोर्टाने दिलेल्या निकालानुसार प्रत्येक धर्माला एक संस्थापक असतो. हिंदू ह्या धर्माचा कोणी संस्थापक नाही. हिंदू एक जीवनपद्धती आहे. त्यामुळे तो धर्म होऊ शकत नाही. 


पण - तसा बघायला गेला तर इस्लाम सोडला तर कोणत्याच धर्माला संस्थापक नाही. कारण ख्रिश्चन धर्म हा येशू ख्रिस्ताच्या निर्वाणा नंतर त्याच्या नावाने अस्तित्वात आला. तसा उल्लेख कोठेही सापडत नाही कि येशू ख्रिस्ताच्या काळात ख्रिश्चन धर्म अस्तित्वात होता. तीच गत बुद्ध धर्माची सुद्धा. मग हे धर्म सुद्धा धर्म नाहीत असे म्हणायचे का?? कारण यांच्या धर्माचे संस्थापक नाहीत. ज्यांना संस्थापक म्हटले जाते त्यांनी आपला एक वेगळा विचारप्रवाह बनवला. आणि त्याचेच आचरण इतरांनी केले. त्यांनी हा बुद्ध धर्म आहे किवा ख्रिस्चन धर्म आहे असे म्हटले नाही. किवा मी या धर्माचा संस्थापक आहे असे म्हटलेच नाही.  त्यामुळे ते संस्थापक होऊच शकत नाही. 


हिंदू हि आचरण पद्धती आहे. त्यामुळेती धर्म होऊ शकत नाही. पण मला हे कळत नाही  कि एखाद्या प्रेषिताचे वाक्य प्रमाण मानणे म्हणजे धर्म आहे का?? मग आज काही बुद्धिवादी म्हणतात कि माणुसकी हाच खरा धर्म आहे. मग माणुसकी या धर्माचा संस्थापक कोण??? 


मुळात धर्म म्हणजे काय??? तर ती एक आचरण पद्धतीच असते. धारयति सः धर्म ! धारणेनुसार जो बदलत जातो तो धर्म! धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय प्यावे, काय खावे, काय नेसावे, कसे वागावे, कसे वागू नये ह्या गोष्टी धर्म शिकवतो. म्हणजे हि एक प्रकारची आचारसंहिताच असते. 


इस्लाम धर्मियांचेच घ्या ना?? टोपी घालावी, दाढी ठेवावी, गुढग्यावर बसून ईश्वराची प्रार्थना करावी, ईद आणि मोहरम हे सन साजरे करावेत ह्या गोष्टी आचरनाचाच भाग आहेत ना?? बौद्ध धम्मात सांगितले जाते कि प्राण्यावर दया करावी, हिंसा करू नये, दारू पिऊ नये, शिवीगाळ करू नये.... हे सगळे आचारविषयक नियमच आहेत ना?? मग जर ह्या गोष्टी सांगणारे विचारप्रवाह धर्म असू शकतात तर हिंदू हि आचरण पद्धती आहे हे मान्य असताना ती आचरण पद्धती धर्म का असू शकत नाही?? 


२) दुसरी गोष्ट कायद्याने हिंदू या शब्दाची व्याख्या अशी केली आहे कि जैन, शीख, बुद्ध आणि वैदिक मत मानणारे आणि त्यानुसार आचरण करणारे हिंदू आहेत. म्हणजेच ह्या सर्वांचा मिळून एक हिंदू धर्म म्हणा किवा आचरण पद्धती म्हणा..... ह्या सर्व धर्मांना समान मानणारा आणि त्यांना अभय देणारा एक शिवाजी राजा होऊन गेला............. तर तो शिवाजी राजा सर्व धर्माचा ( भारताच्या मातीतील धर्म) असताना त्याला एका शैव धर्माचा राजा म्हणणे हे योग्य कि या सर्व धर्मांसाठी मिळून एक हिंदू हा शब्द योजून त्या हिंदू धर्माचा राजा - शिवाजी राजा म्हणणं जास्त योग्य??? शिवाजी राजांना ते हिंदू राजे होते असे न म्हणता त्यांना ते शैव धर्मीय होते असे म्हणत एका विशिष्ट समाजापुरते त्यांना मर्यादित ठेवणे हे  संकुचित मनाचे लक्षण नाही का??

आज आपण समतापूर्ण भाव मनात ठेऊन विश्व जिंकण्याची उर्मी असलेल्या एका विशाल समाजाकडे वाटचाल करत आहोत कि आपापसात फुटलेल्या आणि एका नवीन जातीव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या समाजाची मुहूर्तमेढ रोवत आहोत याचा विचार या लोकांनी अवश्य करावा. 



( वरील लेखातील शेवटच्या मुद्द्यातील युक्तिवाद हा शिवाजी राजे शैव धर्मीय होते असे मानून केला आहे. ते हिंदू होते याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. )



प्रसाद म. राऊत. 


शिवाजी सोडून पुजती गांधीला । मराठे असे कसे भुलले षंढतेला ??

Monday, December 12, 2011


काल दादर येथे पूजनीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी खूप उत्कृष्ठ असे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातले सगळेच मुद्दे खूप उपयुक्त आणि विचार करण्यास लावणारे होते...पण त्यातले दोन मुद्दे खरच आपल्या सर्वाना विचार करायला लावणारे आहेत.


पहिला मुद्दा आहे लॉर्ड एल्फिन्स्टनचा. इंग्रजांचा भारतात एकछत्री अंमल सुरु झाल्या नंतर जे अनेक इंग्रज प्रशासकीय अधिकारी भारतात आले त्यापैकी एक होता लॉर्ड एल्फिन्स्टन. त्याने भारतात इंग्रज राज्याची मुहूर्तमेढ रोवण्याच जे काम यशस्वी केलं त्याबद्दल जेव्हा त्याला मायदेशातून अभिनंदनपर पत्रे येऊ लागली तेव्हा त्याने जे उत्तर दिल ते आजही आपणास लागू होत आहे. तो म्हणाला कि, "या देशाला आपण जिंकू शकलो कारण आपण श्रेष्ठ होतो अशातला भाग नाहीये तर या देशावर ज्यांचा एकछत्री अंमल होता ते मराठे स्वतःमधील शिवाजी आणि संभाजीला विसरले. म्हणून आपण या लोकांना जिंकू शकलो. नाहीतर या देशाला ज्यांच्याकडे शिवाजी आणि संभाजी यांचा वारसा आहे त्यांना जिंकन आपल्याला कदापि शक्य नव्हतं.



आजही आपण तेच करत आहोत. आज रणाविना स्वातंत्र्य कोण मिळाले?? या शौर्याचं वर्णन करणा-या वाक्याचा उपयोग आपण गांधीसाठी करत आहोत?? कि रणाविण स्वातंत्र्य कोण मिळाले असे असताना कोणतीही लढाई न लढता गांधीनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिल...अरे काय बापाची पेंढ लागून गेली आहे काय?? ज्या इंग्रजांनी कित्येक क्रांतीकारकाना निर्दयपणे ठार मारलं....त्या इंग्रजांना गांधीला चीरडन शक्य नव्हतं काय?? पण कधी ऐकली का कि गांधींजींवर इंग्रजांनी एक काठी तरी उगारली म्हणून......कधीच ऐकायला मिळणार नाही...कारण गांधीने कधी ब्रीटीशांना अंगावर घेतलाच नाही. कारण त्यासाठी मर्दाचा रक्त लागता. मी म्हणत नाही कि हिंसा हाच श्रेष्ठ मार्ग आहे. पण पूर्ण अहिंसा सुद्धा कधी योग्य नव्हे. अहिंसा सिंहाला शोभा देते...कारण तो सामर्थ्यवान आहे. सशाची अहिंसा हि अहिंसा नाही तर तो भेकडपणा आहे. आज आपण कोणाचे वारस आहोत हे विसरलो आहोत.


सिंह माने नेता सशाला ।
वाघ माने नेता अजाला ।
शिवाजी सोडून पुजती गांधीला ।
मराठे असे कसे भुलले षंढतेला ??


ढाल आणि तलवार ज्यांची कुलदैवतं...आणि जे गर्वाने सांगायचे कि आईच्या गर्भात असतानाच आमचं तलवारीशी लग्न लागतं.... ते मराठे आज आधारासाठी काठी घेऊन चालना-या गांधीच्या चरणी वंदन करतात??? राजांसमोर आणि रणचंडी भवानी समोर वाकणारी मान आज गांधीसमोर वाकते??? जगाच्या पाठीवर जर स्वत्व हरवून बसलेला समाज कोणता असेल तर तो महाराष्ट्रातला मराठा समाज आहे.


दुसरा मुद्दा असा कि, मराठ्यांची सेना........ जिला जिंकल्यावरच इंग्रजांना भारतात राज्य करता आलं........ ती सेना लढताना आपल्या खांद्यावर भगवा झेंडा घेऊन लढली....आणि दुर्भाग्यवश हरली....पण स्वातंत्र्य मिळाल्यावर जो भगवा ध्वज खांद्यावर घेऊन आम्ही शेवटची लढाई लढलो आणि त्यात हरलो....... तो भगवा ध्वज आज आम्ही जेव्हा परत जिंकलो आणि स्वातंत्र्य परत मिळवलं तेव्हा आमच्या खांद्यावर असू नये??? त्याजागी ज्याला कधीच काही किंमत नव्हती तो चरखा असेलेला ध्वज आमच्या खांद्यावर द्यावा ??? आणि आम्ही काहीच बोलू नये??? राजांच्यासमोर आम्हाला उभं केलं आणि राजांनी विचारलं कि, "माझा प्राणप्रिय भगवा ध्वज कुठे आहे??" तर आम्ही काय सांगावे?? तो ध्वज आम्ही फक्त आमच्या मंदिराच्या शिखरावर लावतो???


कारण आम्हाला आमच्या भगव्या ध्वजाची किंमत कळलेलीच नाही.....या भगव्या ध्वजासाठी खळद बेलसरच्या लढाईत अवघ्या सोळा-अठरा वर्षाच्या बाजी जेधे उर्फ सर्जेराव जेधे याने प्राण धोक्यात घातले.....याच भगव्या ध्वजासाठी कित्येक मावळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर खर्ची पडले...जो भगवा ध्वज रघुनाथ दादाने अटकेपार फडकवला.....ज्या भगव्या ध्वजाला बघताच मुस्लिमच काय कोणताही परकीय शत्रू ......ला पाय लाऊन पाळायचा ...तो भगवा ध्वज आज कुठे आहे??? आणि तो सोडून आम्ही आमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेला तिरंगा खांद्यावर घेऊन नाचतो??? माझा तिरंग्याला विरोध नाहीये...पण आमचा भगवा ध्वज कुठे आहे??? जरा विचार करा.....


उद्या काही झालं तर मुस्लिमांसाठी जगभरात अनेक राष्ट्रे आहेत...ख्रिश्चनांसाठी अनेक राष्ट्रे आहेत.....पण हिंदुसाठी या जगाच्या पाठीवर दुसरं राष्ट्र नाही आहे.....आणि गांधीच्या षंढ विचारांना कुरवाळत बसलात तर हे एकमेव हिंदूराष्ट्रहि गमावून बसाल.....


( वरील दोन्ही मुद्द्यातले मूळ मुद्धेच फक्त भिडे गुरुजींचे आहेत...बाकी सारा माझा लेख प्रपंच आहे. आणि हे स्पष्टीकरण काही खास कारण मनात ठेऊन मी देत आहे.)


शिवप्रताप साप्ताह - माझा राजा- शिवाजी राजा !!!! ( ७वा दिवस )


                                                                                                       !! श्री !!

November 17, 2011

मित्रानो


                    आज शिवप्रताप सप्ताहाचा शेवटचा दिवस. माझी एक मैत्रीण  मला म्हणाली होती कि मी  आणखी काही दिवस असेच लेख लिहावे. राजांबद्दल नेहमी ऐकत रहावस वाटत...आणि खरं आहे मित्रानो...राजांबद्दल कितीही ऐका...कमीच वाटत ते......आजही आपण शिवाजी राजांबद्दल बोलताना "माझा राजा"....असंच बोलतो...............येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांचा लाडका राजा असा एकमेव शिवाजी राजाच होऊन गेला या जगात.....जनमानसाच इतकं प्रेम ज्याला मिळाल किवा जनमानसात ज्याला अढळ स्थान मिळालं असा शिवाजी राजांसारखा राजा जगाच्या पाठीवर कोणी झालाच नाही..........

शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांनी शिव छत्रपतींच अगदी सार्थ वर्णन प्रश्नार्थक रुपात ज्या कवितेत केलं आहे...ती कविता अशी...

 कोण तूं रे, कोण तूं ?

कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ?
जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ?

खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ?
वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ?

भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ?
मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ?

अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ?
कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ?

वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ?
शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ?

की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ?
शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ?

की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ?
कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ?

चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ?
तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ?

मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ?
द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ?

गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं !
संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं !


(महाराज या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रंथातून साभार :-)


                    शिवाजी राजे कोण होते??? ते इतिहासाच्या कच्च्या दुव्यांवरून आपल्याला उमगणं कठीण आहे....पण एक नक्की कि त्यांचं स्थान आपल्या सर्वांच्या मनात ध्रुव ता-यासारखं अढळ आहे........


                   शिवाजी राजे आपल्या सर्वांच्याच मनात किती घर करून बसलेत ते मी माझ्याच एका अनुभवावरून सांगतो.....एस. वाय. बी.कॉम. ला असताना मी कोलेजच्या कल्चरल कमिटीचा सदस्य होतो....कोलेजच्या वार्षिक उत्सवाला ज्या अनेक स्पर्धा झाल्या होत्या त्यात टाकाऊ पासून टिकाऊ अशीहि एक स्पर्धा झाली होती...त्यात माझ्या एका मैत्रिणीने रेश्मा जिचं नाव...तिने टाकाऊ लाकडांपासून एक फ्रेम बनवून त्यात शिवाजी राजांचा फोटो लावला होता...तिला पहिला क्रमांक मिळाला......कार्यक्रम संपताच मी तिथे गेलो आणि कल्चरल्च्या बाकी सदस्यांशी पुढच्या स्पर्धेची चर्चा करत  असताना अचानक रेश्माच्या काही मित्रांनी जय भवानी ! अशी घोषणा दिली...मला आठवत नाही कि नेमकं त्यावेळी काय झालं मला........  पण अचानक मी प्रतिसाद म्हणून जय शिवाजी!! अशी घोषणा देऊन मोकळा झालो....माझे इतर सदस्य मित्र माझ्याकडे बघतच राहिले....मग मला कळलं कि ती एक उत्स्फूर्त घोषणा होती....इतके शिवाजी राजे आपल्या मनामनात घर करून बसलेत......अहो साधा उदाहरण घ्या ना ...शिवाजी राजांबद्दल व्याख्यानं.....  त्यांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकताना आपलं मन कसं तल्लीन होऊन जातं.....जणू ब्रम्हानंदी टाळी लागते ......सर्व सामान्यांना सुद्धा ज्याच्या पराक्रमाचे गुणगान गाताना.... ऐकताना...समाधी अवस्था प्राप्त होते असा हा एकमेव श्रीमान योगी....शिवाजी राजा....


पण.....


पण मित्रानो ,


                      सहस्त्र रश्मी सूर्य  जसा हजार हातानी देतो तसंच या हिंदू प्रतापसुर्याने आपल्याला हजार हातानी खूप काही दिलं..........पण...पण...आपण त्यातून काय घेतलं???? काल माझे मित्र प्रणव शिंदे यांनी हाच विषय माझ्या "शिवाजी राजांनी आम्हाला काय दिले??" या लेखावर मांडला...मी मुद्दाम हा विषय शेवटी ठेवला...कारण आपण शिवाजी राजांबद्दल ऐकतो, बोलतो...पण कृतीत.... आचरणात आणत नाही..... 


क्रियेवीण वाचाळता व्यर्थ सारे आहे !


                         आपण फक्त शिवाजी राजाचं नाव घेणार....जय भवानी !! जय शिवाजी !! जय जिजाऊ !! अश्या आणखी ब-याच घोषणा देणार...पण आपलं आचरण मात्र शून्य....


                        याचा विचार करा.....मी आधीच म्हटल्या प्रमाणे सूर्याकडे उघड्या डोळ्याने बघन शक्य नसतं...पण त्याने दाखवलेल्या प्रकशात मार्गक्रमण करणं आपल्या हातात असतं.....तेच आपल्याला करायचं आहे...आणि हा १२० कोटींचा देश सुजलाम सुफलाम करून दाखवायचा आहे...तरच आपण शिवाजी राजाचं नाव घेण्यास लायक आहोत.....



जय भवानी !! जाऊ शिवाजी !!


शिवप्रताप साप्ताह - "शिवाजी राजांनी आम्हाला काय दिलं ???" ( दिवस ६ वा )


                                                                                           !! श्री !!

                                                                                                                                                                                      November 16, 2011


मित्रानो,

आजचा आपला विषय आहे "शिवाजी राजांनी आम्हाला काय दिलं ???"


होय ! शिवाजी राजांनी आम्हाला काय दिलं??

                  खर तर या विषयाला कसा हात घालू तेच कळत नाहीये...राजांनी आम्हाला काय दिलं हे विचारणं म्हणजे मातेने आपल्या मुलाला काय दिलं?? पित्याने आपल्या मुलाला काय दिलं?? या सर्वाहून या धरीत्रीने आम्हाला काय दिलं?? या आकाशाने आम्हाला काय दिलं?? असंच विचारण्यासारख  नाही का??

                शिवाजी राजांनी अन्याया विरुद्ध लढण्याची प्रेरणा आम्हाला दिली....त्यांनी आम्हाला हिंदवी स्वराज्याचा स्वप्न दिलं....शिवाजी राजांनी आम्हाला या सर्वात पुढे जाऊन ध्येय निष्ठा शिकवली....ज्या ध्येय निष्ठेसाठी छत्रपती संभाजी राजांनी बलिदान केलं....मराठ्यांच्या येणा-या कित्येक पिढ्या या ध्येय निष्ठेवर ....लढत राहिल्या....झुंजत राहिल्या...जिंकत राहिल्या....आणि शेवटी या एका ध्येयनिष्ठेसाठी रणांगणावर कोसळत राहिल्या.....

               शिवाजी राजे निवर्तल्या नंतर औरंगजेबास वाटले कि आता तो दक्षिण देश जिंकून घेईल...पण तो जिंकू शकला का??.... नाही !!!!.....राजांच्या निर्वाणानंतर २७ वर्ष या मातीत झुंजत ठेवला मराठ्यांनी त्याला....आणि शेवटी याच मातीत त्याच थडग बांधलं.... हे कशाच्या बळावर??.... राजांनी दिलेल्या प्रेरणेच्या बळावर...........खरं महाराजांच्या निर्वाणा नंतर २७ वर्षे ज्या त-हेने मराठे औरंगजेबाशी लढले...तसे तर जगाच्या इतिहासात कोणतंही सैन्य लढलं नाही.....मराठ्यांनी या सत्तावीस वर्षात एक नवीन युद्ध तंत्र विकसित केलं होतं...किल्ला लढव लढव लढवायचा....शेवटी खाली किल्ल्याला वेढा  देऊन बसलेला मुघल सरदार वैतागायचा...आणि जेव्हा किल्लेदाराच्या लक्षात यायचं कि आता किल्ला लढवणं शक्य नाही तेव्हा खाली मुघल सरदाराला एक पत्र पाठवायचे कि किल्ला खाली करून देतो..अमुक अमुक एवढी खंडणी दे आणि माझ्या माणसाना सुरक्षित जाऊ दे...मोघल सरदार आधीच वैतागलेला असायचा....औरंगजेब त्याच्या मागे लागलेला असायचा कि,  "रिपोर्ट दे नाही तर तुझा सी. आर. खराब करतो...." शेवटी वैतागून तो सरदार मान्यता द्यायचा...किल्लेदार किल्ला खाली करून द्यायचा...परत काही दिवसांनी नवीन माणसं आणि रसद जमा करून किल्ला ताब्यात घ्यायचा.....हे तंत्र जरी राजांच्या मागे विकसित झालं असलं तरी या मागे प्रेरणा राजांचीच होती...राजांच्या एका पत्रात असा उल्लेख आहे कि आपल्याकडे ३५० च्या वर किल्ले आहेत.... एक किल्ला जरी वर्षभर लढवला तरी ३५० वर्ष लागतील सर्व हिंदवी स्वराज्य जिंकायला !!!!!....

                राजांनी आम्हाला शौर्य दिलं.......धैर्य दिलं....आणि त्याला योग्य असा चातुर्यसुद्धा दिलं...या आधी आमच्या सैन्याला शतका नु शतके सवय होती कि नेता पडला कि आमचं सैन्य पळून जायचं....शिवाजी राजांनी जगातलं पाहिलं खड सैन्य निर्माण केलं....नेता पडला कि पळून न जाता दुसर्याने त्याची जागा घेणे...सेकंड इन कमांड ...इंग्लिश शब्द वापरला म्हणून दचकून जाऊ नका....पण सेकंड इन कमांड ची उदाहरणे मराठ्यांच्या अनेक लढायांत दिसतील....कोंढाण्यावर तानाजी चाल करून घेतला...किती मावळे होते?? .......६०० !! फक्त सहाशे.!! आणि कोंढाण्या वर मुघल सैन्य होतं १५००....तरीही गेले ते चाल करून........... जिंकला कोंढाणा.......... या लढाईत तानाजी पडला... म्हणून मराठा सैन्य पळू लागलं.....त्यांना आडवा गेला कोण?? .....सूर्याजी !!!...काय काळीज असेल हो त्याचं???..... ज्या वेळच्या समाजव्यवस्थेत मोठा भाऊ वडिलांच्या जागी......तो मोठा भाऊ पडलाय....आणि हा सूर्याजी पळणाऱ्या मराठ्यांना आडवा जातोय ... त्यांना खड्सावातोय ..." अरे ! तुमचा बाप इथे  मरुन पडलाय आणि पळून कुठे चाललात?? मागे फिरा...दोर केव्हाच कापून टाकलेत..."......मग मराठे फिरून चाल करून गेले....आणि कोंढाणा जिंकला....सेकंड इन कमांड...नेता पडला म्हणून पळ काढायचा नसतो....

                    शिवाजी राजांनी आम्हाला शौर्य बरोबर धैर्य दिलं....मुरारबाजी पडले..पण म्हणून पुरंदर पडला का?? ….नाही !!!!....तिथे आत लढणारे मावळे आणि किल्लेदाराने मिळून राजांना पत्र लिहिला...त्या पत्राच आधुनिक मराठी भाषांतर असं आहे.... "एक मुरारबाजी पडिले म्हणून काय जाहले??....आम्ही तैसेच आहोत.... हिम्मत धरून लढतो....." आणि मित्रानो...हे किल्लेदार आणि आत लढणारे शिपाई कोण होते ?? तर जातीने महार...पण हिंदवी स्वराज्य त्यांना आपलं वाटत होतं......कारण आमचे राजे....आणि त्यांनी दिलेली ध्येयनिष्ठा...........एके काळी हाच महार समाज गावकुसात गाडला जात होता...आज तोच महार समाज हिंदवी स्वराज्यासाठी लढताना स्वतःला किल्ल्याच्या बुरुजांत गाडून घ्यायला तयार होतोय........कारण राजांनी दिलेले स्वप्न...ध्येय..हिंदवी स्वराज्याच....त्या स्वप्नासाठी ...त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी राजांनी दिलेला धैर्य..शौर्य....आणि ध्येयनिष्ठा..........!!

शिवाजी राजांनी आम्हाला काय दिला ????

                      शिवाजी राजांनी आम्हाला शौर्य,  धैर्य आणि त्याला साजेस चातुर्य दिलं....पन्हाळा परत जिंकून घ्यायचा होता...कोंडाजी फर्जंद म्हणाला मी जिंकतो....आणि त्याने जिंकला....किती मावळे घेऊन ??? .....फक्त ६०....आणि पन्हाळा परत जिंकला…. एकही मावळा न गमावता !!! ....त्याने एकच केलं...गपचूप किल्ल्यात आपल्या मावळ्यांना घेऊन घुसला...एका ठिकाणी मोठा जाळ पेटवला...आणि लढाईचा बिगुल वाजवू लागला....गस्तीवर बाबूलाल म्हणून शिपाई होता...तो ओरडला..".कोण वहा सिंग फुक रहा है??" …….कोंडाजिनी हूल उठवली "मराठे आले....पळा !" ...मुघल सैन्य पळून गेल....आणि पन्हाळा ताब्यात घेतला...

                    मित्रानो मी सांगितलेल्या घटनांत एक गोष्ठ बारकाईने बघण्यासारखी आहे ती म्हणजे आमचे मावळे कितीच्या संख्येने या लढाया जिंकले??.... तर मुठभर !!……..या आधीची परिस्थिती वेगळी होती....येणारे मुठभर परकीय आक्रमक आमच्या परातभर सैन्याला हरवत असत....आणि आता आमचे मुठभर मावळे परातभर सैन्याला हरवत होते.....ह्यासाठी लागतं...ते शौर्य........धैर्य...आणि चातुर्य..........हे सगळं राजांनी आम्हाला दिलं....

                    शिवाजी राजे निवर्तल्या नंतर अवघ्या एका तपा नंतर स्वराज्याची अवस्था काय झाली होती?? मराठ्यांचे दोन्ही छत्रपती गेलेले....गादी नाही...राजधानी नाही......खजिना नाही......ज्याने तिसरा छत्रपती  व्हायचा तो राजाराम जिंजीला निघून गेला....पण जाताना त्याने आपल्या एका मुक्कामात आपल्या सरदाराना आदेश दिला होता कि थोरल्या महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्याच स्वप्न दिलं आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे...........त्यासाठी राजारामाने सरदाराना सांगितलं कि तुम्ही जो भाग जिंकाल तो तुमचा....त्या मुक्कामातच त्याने सरदारांनी काय काय जिंकून घ्यायचं हेहि सांगितलं होतं...........म्हटलं तर हास्यास्पद पण म्हटलं तर खूप विलक्षण आहे कि राजारामाने या मुक्कामात संपूर्ण भारताची वाटणी केली होती.... पराभवाच्या छायेत सुद्धा मराठ्यांची जिद्द या आदेशातून दिसून येते............हि जिद्द शिवाजी राजांनी निर्माण केली....प्रत्येक मराठा मनात तिचं जागरण केलं....ते आमच्या  राजांनी..............


शिवाजी राजांनी आम्हाला काय दिलं...??????

एक बलशाली, सुसंघटीत, शिस्तबद्ध समाज घडण्यासाठी जे जे लागता ते ते राजांनी आम्हाला दिलं....


                ....अरे आमच्या राजांनी आम्हाला काय दिलं??? ……म्हणून आम्हाला काय विचारता?? विचारा ते उत्तुंग रायगडला...विचारा ते पावन खिंडीला...विचारा ते कोयना आणि भीमेला....विचारा ते अरबी समुद्राला..... विचारा त्याच्या खवळलेल्या लाटांना.........विचारा इथल्या लाल मातीला...विचारा तिच्या कणाकणाला........हे सगळे हजार जीव्हानी ओरडून संगतील,
.................राजांनी आम्हाला धैर्य दिलं....राजांनी आम्हाला शौर्य दिलं....राजांनी आम्हाला चातुर्य दिलं......राजांनी आम्हाला एखाद्या विधायक कार्यासाठी लागणारी चिकाटी आणि अथक परिश्रम करण्याची वृत्ती दिली....राजांनी आम्हाला आम्हाला सहिष्णुता दिली....संतांसमोर झुकणार विनम्र मन आणि दुर्जानांसमोर न वाकता त्यांना आमच्यासमोर वाकवणारी ताठ स्वाभिमानी मान दिली......राजांनी आम्हाला हिंदवी स्वराज्याचा स्वप्न दिलं....ते पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्ध आणि ध्येयनिष्ठा दिली....

.... राजांनी आम्हाला काय नाही दिलं.??....आज या महाराष्ट्राच्या पावन भूमीत जे जे म्हणून काही आहे ते राजांनीच आम्हाला दिलं....

राजांनी आम्हाला हिंदवी स्वराज्य दिलं.....!!!


 जय भवानी !! जय शिवाजी !!