शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

शिवप्रताप साप्ताह - "शिवाजी राजांनी आम्हाला काय दिलं ???" ( दिवस ६ वा )


                                                                                           !! श्री !!

                                                                                                                                                                                      November 16, 2011


मित्रानो,

आजचा आपला विषय आहे "शिवाजी राजांनी आम्हाला काय दिलं ???"


होय ! शिवाजी राजांनी आम्हाला काय दिलं??

                  खर तर या विषयाला कसा हात घालू तेच कळत नाहीये...राजांनी आम्हाला काय दिलं हे विचारणं म्हणजे मातेने आपल्या मुलाला काय दिलं?? पित्याने आपल्या मुलाला काय दिलं?? या सर्वाहून या धरीत्रीने आम्हाला काय दिलं?? या आकाशाने आम्हाला काय दिलं?? असंच विचारण्यासारख  नाही का??

                शिवाजी राजांनी अन्याया विरुद्ध लढण्याची प्रेरणा आम्हाला दिली....त्यांनी आम्हाला हिंदवी स्वराज्याचा स्वप्न दिलं....शिवाजी राजांनी आम्हाला या सर्वात पुढे जाऊन ध्येय निष्ठा शिकवली....ज्या ध्येय निष्ठेसाठी छत्रपती संभाजी राजांनी बलिदान केलं....मराठ्यांच्या येणा-या कित्येक पिढ्या या ध्येय निष्ठेवर ....लढत राहिल्या....झुंजत राहिल्या...जिंकत राहिल्या....आणि शेवटी या एका ध्येयनिष्ठेसाठी रणांगणावर कोसळत राहिल्या.....

               शिवाजी राजे निवर्तल्या नंतर औरंगजेबास वाटले कि आता तो दक्षिण देश जिंकून घेईल...पण तो जिंकू शकला का??.... नाही !!!!.....राजांच्या निर्वाणानंतर २७ वर्ष या मातीत झुंजत ठेवला मराठ्यांनी त्याला....आणि शेवटी याच मातीत त्याच थडग बांधलं.... हे कशाच्या बळावर??.... राजांनी दिलेल्या प्रेरणेच्या बळावर...........खरं महाराजांच्या निर्वाणा नंतर २७ वर्षे ज्या त-हेने मराठे औरंगजेबाशी लढले...तसे तर जगाच्या इतिहासात कोणतंही सैन्य लढलं नाही.....मराठ्यांनी या सत्तावीस वर्षात एक नवीन युद्ध तंत्र विकसित केलं होतं...किल्ला लढव लढव लढवायचा....शेवटी खाली किल्ल्याला वेढा  देऊन बसलेला मुघल सरदार वैतागायचा...आणि जेव्हा किल्लेदाराच्या लक्षात यायचं कि आता किल्ला लढवणं शक्य नाही तेव्हा खाली मुघल सरदाराला एक पत्र पाठवायचे कि किल्ला खाली करून देतो..अमुक अमुक एवढी खंडणी दे आणि माझ्या माणसाना सुरक्षित जाऊ दे...मोघल सरदार आधीच वैतागलेला असायचा....औरंगजेब त्याच्या मागे लागलेला असायचा कि,  "रिपोर्ट दे नाही तर तुझा सी. आर. खराब करतो...." शेवटी वैतागून तो सरदार मान्यता द्यायचा...किल्लेदार किल्ला खाली करून द्यायचा...परत काही दिवसांनी नवीन माणसं आणि रसद जमा करून किल्ला ताब्यात घ्यायचा.....हे तंत्र जरी राजांच्या मागे विकसित झालं असलं तरी या मागे प्रेरणा राजांचीच होती...राजांच्या एका पत्रात असा उल्लेख आहे कि आपल्याकडे ३५० च्या वर किल्ले आहेत.... एक किल्ला जरी वर्षभर लढवला तरी ३५० वर्ष लागतील सर्व हिंदवी स्वराज्य जिंकायला !!!!!....

                राजांनी आम्हाला शौर्य दिलं.......धैर्य दिलं....आणि त्याला योग्य असा चातुर्यसुद्धा दिलं...या आधी आमच्या सैन्याला शतका नु शतके सवय होती कि नेता पडला कि आमचं सैन्य पळून जायचं....शिवाजी राजांनी जगातलं पाहिलं खड सैन्य निर्माण केलं....नेता पडला कि पळून न जाता दुसर्याने त्याची जागा घेणे...सेकंड इन कमांड ...इंग्लिश शब्द वापरला म्हणून दचकून जाऊ नका....पण सेकंड इन कमांड ची उदाहरणे मराठ्यांच्या अनेक लढायांत दिसतील....कोंढाण्यावर तानाजी चाल करून घेतला...किती मावळे होते?? .......६०० !! फक्त सहाशे.!! आणि कोंढाण्या वर मुघल सैन्य होतं १५००....तरीही गेले ते चाल करून........... जिंकला कोंढाणा.......... या लढाईत तानाजी पडला... म्हणून मराठा सैन्य पळू लागलं.....त्यांना आडवा गेला कोण?? .....सूर्याजी !!!...काय काळीज असेल हो त्याचं???..... ज्या वेळच्या समाजव्यवस्थेत मोठा भाऊ वडिलांच्या जागी......तो मोठा भाऊ पडलाय....आणि हा सूर्याजी पळणाऱ्या मराठ्यांना आडवा जातोय ... त्यांना खड्सावातोय ..." अरे ! तुमचा बाप इथे  मरुन पडलाय आणि पळून कुठे चाललात?? मागे फिरा...दोर केव्हाच कापून टाकलेत..."......मग मराठे फिरून चाल करून गेले....आणि कोंढाणा जिंकला....सेकंड इन कमांड...नेता पडला म्हणून पळ काढायचा नसतो....

                    शिवाजी राजांनी आम्हाला शौर्य बरोबर धैर्य दिलं....मुरारबाजी पडले..पण म्हणून पुरंदर पडला का?? ….नाही !!!!....तिथे आत लढणारे मावळे आणि किल्लेदाराने मिळून राजांना पत्र लिहिला...त्या पत्राच आधुनिक मराठी भाषांतर असं आहे.... "एक मुरारबाजी पडिले म्हणून काय जाहले??....आम्ही तैसेच आहोत.... हिम्मत धरून लढतो....." आणि मित्रानो...हे किल्लेदार आणि आत लढणारे शिपाई कोण होते ?? तर जातीने महार...पण हिंदवी स्वराज्य त्यांना आपलं वाटत होतं......कारण आमचे राजे....आणि त्यांनी दिलेली ध्येयनिष्ठा...........एके काळी हाच महार समाज गावकुसात गाडला जात होता...आज तोच महार समाज हिंदवी स्वराज्यासाठी लढताना स्वतःला किल्ल्याच्या बुरुजांत गाडून घ्यायला तयार होतोय........कारण राजांनी दिलेले स्वप्न...ध्येय..हिंदवी स्वराज्याच....त्या स्वप्नासाठी ...त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी राजांनी दिलेला धैर्य..शौर्य....आणि ध्येयनिष्ठा..........!!

शिवाजी राजांनी आम्हाला काय दिला ????

                      शिवाजी राजांनी आम्हाला शौर्य,  धैर्य आणि त्याला साजेस चातुर्य दिलं....पन्हाळा परत जिंकून घ्यायचा होता...कोंडाजी फर्जंद म्हणाला मी जिंकतो....आणि त्याने जिंकला....किती मावळे घेऊन ??? .....फक्त ६०....आणि पन्हाळा परत जिंकला…. एकही मावळा न गमावता !!! ....त्याने एकच केलं...गपचूप किल्ल्यात आपल्या मावळ्यांना घेऊन घुसला...एका ठिकाणी मोठा जाळ पेटवला...आणि लढाईचा बिगुल वाजवू लागला....गस्तीवर बाबूलाल म्हणून शिपाई होता...तो ओरडला..".कोण वहा सिंग फुक रहा है??" …….कोंडाजिनी हूल उठवली "मराठे आले....पळा !" ...मुघल सैन्य पळून गेल....आणि पन्हाळा ताब्यात घेतला...

                    मित्रानो मी सांगितलेल्या घटनांत एक गोष्ठ बारकाईने बघण्यासारखी आहे ती म्हणजे आमचे मावळे कितीच्या संख्येने या लढाया जिंकले??.... तर मुठभर !!……..या आधीची परिस्थिती वेगळी होती....येणारे मुठभर परकीय आक्रमक आमच्या परातभर सैन्याला हरवत असत....आणि आता आमचे मुठभर मावळे परातभर सैन्याला हरवत होते.....ह्यासाठी लागतं...ते शौर्य........धैर्य...आणि चातुर्य..........हे सगळं राजांनी आम्हाला दिलं....

                    शिवाजी राजे निवर्तल्या नंतर अवघ्या एका तपा नंतर स्वराज्याची अवस्था काय झाली होती?? मराठ्यांचे दोन्ही छत्रपती गेलेले....गादी नाही...राजधानी नाही......खजिना नाही......ज्याने तिसरा छत्रपती  व्हायचा तो राजाराम जिंजीला निघून गेला....पण जाताना त्याने आपल्या एका मुक्कामात आपल्या सरदाराना आदेश दिला होता कि थोरल्या महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्याच स्वप्न दिलं आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे...........त्यासाठी राजारामाने सरदाराना सांगितलं कि तुम्ही जो भाग जिंकाल तो तुमचा....त्या मुक्कामातच त्याने सरदारांनी काय काय जिंकून घ्यायचं हेहि सांगितलं होतं...........म्हटलं तर हास्यास्पद पण म्हटलं तर खूप विलक्षण आहे कि राजारामाने या मुक्कामात संपूर्ण भारताची वाटणी केली होती.... पराभवाच्या छायेत सुद्धा मराठ्यांची जिद्द या आदेशातून दिसून येते............हि जिद्द शिवाजी राजांनी निर्माण केली....प्रत्येक मराठा मनात तिचं जागरण केलं....ते आमच्या  राजांनी..............


शिवाजी राजांनी आम्हाला काय दिलं...??????

एक बलशाली, सुसंघटीत, शिस्तबद्ध समाज घडण्यासाठी जे जे लागता ते ते राजांनी आम्हाला दिलं....


                ....अरे आमच्या राजांनी आम्हाला काय दिलं??? ……म्हणून आम्हाला काय विचारता?? विचारा ते उत्तुंग रायगडला...विचारा ते पावन खिंडीला...विचारा ते कोयना आणि भीमेला....विचारा ते अरबी समुद्राला..... विचारा त्याच्या खवळलेल्या लाटांना.........विचारा इथल्या लाल मातीला...विचारा तिच्या कणाकणाला........हे सगळे हजार जीव्हानी ओरडून संगतील,
.................राजांनी आम्हाला धैर्य दिलं....राजांनी आम्हाला शौर्य दिलं....राजांनी आम्हाला चातुर्य दिलं......राजांनी आम्हाला एखाद्या विधायक कार्यासाठी लागणारी चिकाटी आणि अथक परिश्रम करण्याची वृत्ती दिली....राजांनी आम्हाला आम्हाला सहिष्णुता दिली....संतांसमोर झुकणार विनम्र मन आणि दुर्जानांसमोर न वाकता त्यांना आमच्यासमोर वाकवणारी ताठ स्वाभिमानी मान दिली......राजांनी आम्हाला हिंदवी स्वराज्याचा स्वप्न दिलं....ते पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्ध आणि ध्येयनिष्ठा दिली....

.... राजांनी आम्हाला काय नाही दिलं.??....आज या महाराष्ट्राच्या पावन भूमीत जे जे म्हणून काही आहे ते राजांनीच आम्हाला दिलं....

राजांनी आम्हाला हिंदवी स्वराज्य दिलं.....!!!


 जय भवानी !! जय शिवाजी !!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा