समर्थ रामदास स्वामी शिवथर (मौजे पारमाची कोड
नलवडा) येथे रहावयास आले. त्यांनी रामनगर पेठ वसवण्याची आज्ञा केली व १२ वर्षे दिवाणास
हासील माफ म्हणून कौल दिला. त्याबरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७६ मध्ये
उदमी, व्यापारी मंडळींना रामनगर पेठ वसविण्यासंदर्भात व या ठिकाणी १२ वर्षे दिवाणास
हासील माफ म्हणुन कौल दिल्याचे पत्र.
!!शिवरायांची
अष्ठकोणी राजमुद्रा!!
१५९७
भाद्रपद व. ८
श्रीरामदास
कौलनामा अजरख्तखाने राजश्री शिवाजी राजे साहेब दामदौलतहू ता। मोकदमानी उदमीयानी व बाजे लोकानी पेठ रामनगर दरवास कोड नलवडा मौजे पारमाची ता। सिवतर सुहुरा सन सीत सबैन व अलफ बादे कौलनामा ऐसा जे कोडमजकुरी श्री येउनु राहीलियाउपरी पेठ
वसवयाची आज्ञा केली आणि बारा वर्षे
पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून कौल
देवीला त्यावरून तुम्हास कौल दिधला
असे हरकोण्ही मानेल ते पेठे मजकुरास येउनु राहणे व आमदरफ्त करीत जाणे उदीम वेवसाउ
सौदागरी जे करणे असेली ते करीत जाणे दिवानास हासील बारा वरसे इ॥ सालमजकुरा पासूनु होत
तोवरी माफ असे काही घेणार नाही व आजार व तसवीस लागणार नाही बारा वर्षाउपरी दिवान हासील
देत जाणे कौल असे परवानगी हुजुर मोर्तब सुद.
मर्यादेयं विराजते
ही समाप्ती मुद्रा
तेरीख २१ एकविसावा
माहे जमादिलाखर
जमादिलाखर सुरु
सुद बार