Monday, November 28, 2011
हिंदुराष्ट्राचा संकल्प मनात ठेवुन कार्य करणारे तसंच ज्यांना या देशातली अराजकाची परिस्थिती बघुन वैषम्य वाटतं आणी ज्यांना आपल्या देशाची परिस्थिती बघुन सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असं वाटतं............ त्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना आज मी एक सत्यघटना सांगणार आहे..............
जर आपन सर्वांनी ह्या घटनेचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवुन आचरण केलं तर मला नाही वाटत कोणाचा 'बा' आपल्या या भारत देशाला पुन्हा एकदा सुवर्णभुमी बनवु शक्ण्यापासून आपल्याला अडवू शकेल...............
नमनालाच घडाभर तेल नको या न्यायाने ती घटना सांगतो.........................
साधारण 80 च्या दशकात म्हनजे इंदिराजींच्या राजवटीत बिहारचा एक मुख्यमंत्री होता............. जगन्नाथ मिश्रा नावाचा............... दहा वर्षापुर्वी म्हनजे 70 च्या दशकात तो मूख्यमंत्री असताना बिहारमध्ये बेबी कांड केलं होतं त्याने............ ज्यात बेबी नावाच्या मंत्रालयात सर्वीस करना-या एका मूलीवर काही मंत्र्यांनी मंत्रालयाच्या आवारात बलात्कार करुन तीला ठार मारुन मंत्रालयातच पुरलं...............
त्या बेबी चे दोन मानलेले भाऊ होते............... एक राजकुमार सिंग आणी दुसरे कूणाल सिंग............. या दोघांनी तेव्हा शपथ घेतली की या मिश्रा कडून आमच्या बहीणीवर झालेल्या अत्याचाराचा सुड घेऊ................. आणि त्याचवेळी कसा बदला घ्यायचा याचेसुद्धा प्लॅनिंग केले.......... राजकूमार सिंग आय. ए. एस. ऑफीसर आणी कुणाल सिंग आय. पी. एस. ऑफिसर बनले............ 70 ते 80 च्या दरम्यानचा हा काळ हे दोघे केवळ आणी केवळ आपल्या ध्येयासाठी झटत होते.......
माणसाची दुष्कृत्ये कशी त्याला फिरवून परत त्याच ठिकाणी आणतात ते बघा.....
दहा वर्षांनी जेव्हा हे दोघे भाऊ पॉवर मध्ये आले.....म्हणजे एक आय.ए.एस ऑफिसर आणि दुसरा आय.पी.एस. ऑफिसर झाला....... तेव्हा फिरून दहा वर्षांनी जगन्नाथ मिश्राचे सरकार निवडून आले. आणि त्याच वेळी हे दोघे भाऊ बिहारच्या मुख्य पदावर आले. राजकुमार सिंग पटणा जिल्ह्याचे डीस्ट्रीक्ट मेजीस्ट्रेट बनले आणि त्यांनी पूर्ण नेटवर्क तयार करून ठेवले......ए. आर. किदवई हे त्यावेळी बिहारचे राज्यपाल होते............ त्यांच्याकडून त्यांनी जगन्नाथ मिश्राच्या अटकेसाठी वारेन्ट तयार करून घेतले....... आणि कुणाल सिंग सहा महिन्यांनी पटणाचे एस.पी बनून आले.....त्याचवेळी जगन्नाथ मिश्रा याने एक पार्टी ठेवली.............. कि दोन नवीन आणि तरुणांना मी पटणा जिल्ह्याच्या विकासासाठी आणले आहे............... या पार्टीत हे दोघे भाऊ गेले....कुणाल सिंग थोडे गरम डोक्याचे होते......त्यांनी त्याच पार्टीत जेव्हा जगन्नाथ मिश्राने त्यांना स्टेजवर बोलावले तेव्हा ... ....कुणालजीनी ...त्या जगन्नाथ मिश्रावर रीवोल्वर ताणले आणि म्हणाले.....( माफ करा पण त्या घटनेचं गांभीर्य आणि परिणाम कळावा म्हणून हि भाषा वापरावी लागत आहे...)........." मा******द मिश्रा...आज से आपने जिंदगी के उलटे दिन गीणना शुरू कर दे....!" ...मिश्राला असं काही होईल याची कल्पना नव्हती......तो पूर्ण बावचळून गेला.....कुणाल सिंग म्हणाले...." पेह्चाना?? हम उसी बेबी के भाई है..जिसे तुने मार दिया था....!!...चल अब पुलिस थाने!" .....लगेच कुणालजीनी आपल्या सहका-यांना आज्ञा दिली..."सभी फोन लाईने उखाड दो.....सभी गाडीयो के टायर पंक्चर कर दो.......!!"..............कोणीतरी म्हणाला कि, " अरेस्ट वारेन्ट कहा है??"........कुणालजीनी अरेस्ट वारेन्ट समोर केलं.....मग जगन्नाथ मिश्रा म्हणतो कि मी गाडीने जाईन...पण नंतर बघतो तर गाड्यांचे टायर पंक्चर केलेले.....शेवटी रस्त्यावरून धिंड काढली....कुणालजीना जगन्नाथ मिश्रा म्हणतो कि........ तू मला हात लाऊ शकत नाहीस.....ते म्हणाले कि, "मै तुम्हे हात नही लगाउंगा........... मै सिर्फ ऑर्डर दुंगा..............."..........त्यांनी आपल्या सहका-यांना ऑर्डर दिली कि "चालताना हा जरा जरी का-कु करताना दिसला कि............ याच्या पायावर फटके द्या....."............पाटण्याच्या रस्त्यावरून त्या बलात्कारी नेत्याची धिंड काढली कुणालजीनी.......आजही जगन्नाथ मिश्रा चालताना एका पायाने लंगडत चालतो.....नंतर इंदिराजींनी जगन्नाथ मिश्राचे सरकार बरखास्त केले आणि चंद्रशेखर यांना नवीन मुख्यमंत्री बनवले.....त्यांनी कुणालजींची बदली सी.बी.आय मध्ये केली...आणि राजकुमार सिंग यांची बदली दुसरीकडे केली......
तर मित्रानो हि घटना आज सागायचा प्रयोजन म्हणजे.......... माझे काही मित्र म्हणतात कि आपण काही करू शकत नही......परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.....त्याचवेळी माझे काही मित्र विशाल हिंदू राष्ट्राचे स्वप्न मनात घेऊन कार्य करत आहेत.....पण मित्रानो सध्या जी काही देशात अराजकाची परिस्थिती आहे ती आपण बदलू शकतो......पण त्यासाठी गरज आहे ती आपण स्वतः पॉवर मध्ये यायची......देशाच्या कारभारात महत्वाचे असलेले प्रत्येक क्षेत्र आपण ताब्यात घेऊया...ताब्यात घेऊया म्हणजे कब्जा नाही करायचा तर त्या प्रत्येक क्षेत्रात आपली माणसे पाहिजेत...जी आपल्या देशातील हि परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नशील असतील...त्याचबरोबर त्या क्षेत्रारील सर्वोच्च व्यक्ती आपली असेल तर ती नक्कीच हि परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करेल...
लक्षात ठेवा मित्रानो...सत्ता हातात असेल तर सर्व काही करता येते...शिवाजी राजांनी आधी गड किल्ले घेऊन आपली ताकद बळजोर केली....सर्व क्षेत्रातली माणसे गोळा केली...... आणि मग हिंदवी स्वराज्य उभे केले..........आज मा. श्री. नरेंद्र मोदीजी आणि मा. श्री. नितीश कुमारजी ...हे अनुक्रमे गुजरात आणि बिहार चा विकास करू शकले कारण सत्ता त्यांच्या हातात होती.....तेव्हा...फक्त घोषणाबाजी करण्यात वेळ वाया घालवू नका तर सत्तेत येऊया.....आणि मग गांधी घराण्याच हे काँग्रेसी पाप या देशातून निखंदून काढूया........................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा