सामाजिक लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १४ जून, २०१३

अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! ( खोटा इतिहास कोण लिहित आहे?? भाग 5)

दोन भिन्न जातीचे असूनही  या दोन संतांचे अंतर्यामी एकच असलेले विचार आपण मागच्या लेखात पहिले. लोकांच्या उद्धारासाठी झटत ईश्वरप्राप्ती साधणारे हे दोन्ही संत होते. परंतु सध्या काही लोक या दोन संताना ब्राम्हण आणि मराठा या दोन जातीपुरता मर्यादित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी संत तुकाराम ब्राम्हणद्वेष्ठे आणि रामदास स्वामी कर्मठ ब्राम्हण म्हणून प्रोजेक्ट केले जात आहेत. या विकृतीकरणात बामसेफ आणि संभाजी बिग्रेड या संघटना अग्रेसर आहेत. “हे असे का?” याचा मी मला जमेल तसा उलगडा या लेखमालेच्या शेवटी करणार आहे. तत्पूर्वी या लोकांच्या या खोट्या प्रयत्नांचे पुरावे पाहू. यावरूनच वाचकांना कल्पना येईल कि  स्वतःचा शुल्लक स्वार्थ साधण्यासाठी या संघटना संताना कसे विकृत स्वरुपात समाजासमोर सादर करत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या भक्तीपर अभंगांना देखील हे लोक ब्राम्हण द्वेषाची पुटे चढवून ब्राम्हण द्वेषाची शिकवण बहुजन समाजाला आणि त्यातही तरुण वर्गाला देत आहेत हे खालील काही उदाहरनांवरून आपल्या लक्षात येईल.


पुढे सरकण्यापुर्वी मी येथे  स्पष्ठ करतो कि  तुकाराम महाराजांच्या अभंगांचा ज्या गाथा आहेत - त्यात देहू येथील प्रत मी संदर्भ म्हणून येथे वापरत आहे. कारण तीच प्रत अनेक जन प्रमाण मानतात.


तर तुकोबारायांच्या एका अभंगाचा अभंगाचा अर्धाच चरण - त्यातही त्याच्या अर्थाचा विपर्यास करून लोकांना कसा विकृत स्वरुपात सांगितला जातो याचे हा अभंग एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. बिग्रेडचे अनेक कार्यकर्ते वादविवाद करताना खालील श्लोकाचा उल्लेख करून तुकोबाराय ब्राम्हणांना कसे शिव्या द्यायचे हे सांगत असतात. पण संत म्हणजे समभाव. मग ते फक्त एकाच समाजाला शिव्या देतील असे होईल का?? या अशा वागण्याला विचारी संत समभाव म्हणतील का? याचा विचार या बिग्रेडी कार्यकर्त्यांनी करायला हवा होता. पण या कार्यकर्त्यांच्या मनात बिग्रेडने ब्राम्हणद्वेष इतका कि भिनवला आहे कि, ब्राम्हणांच्या विरोधात काहीही आधारहीन सांगितले तरी हे कार्यकर्ते डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवतात.

तुकोबारायांच्या ज्या अभंगाचा हे बिग्रेडी ब्राम्हण विरोधी म्हणून वापर करतात त्या  १३१४  अभंगाचा पहिला चरण असा आहे.


अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!१!!
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!

या पहिल्या चरणातील "अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!" या पदाचा अर्थ सांगताना  बिग्रेडी सांगतात कि, "तुकाराम महाराज ब्राम्हणांचे तोंड जळो असे सांगत आहेत. त्याच्याकडून वेश्या सुद्धा गर्भवती होऊ शकत नाही असे सांगून तुकाराम महाराज सुद्धा ब्राम्हण नपुंसक असल्याचे सांगत आहेत. "
तुकाराम महाराजांच्या भक्तीचा महिमा सांगणा-या या अभंगाचा असा विकृत अर्थ फक्त बिग्रेडीच सांगू शकतात. मुळात जर तुकाराम महाराजांच्या मनात ब्राम्हणांना शिव्याच द्यायच्या असत्या तर त्यांनी "जळो ब्राम्हणाचे तोंड" असेही लिहिले असते. तसे लिहिण्यास ते कोणाला भिणारे नव्हते.  त्यांनी  'ब्राम्हणाचे तोंड जळो" असे म्हटले हे जरी मानले तरी ते "कोणत्या ब्राम्हणाचे तोंड जळो?" हा प्रश्न येतोच. कारण कोणत्याही कारणाशिवाय तुकाराम महाराज असे कोणाबद्दल काही बोलणार नाहीत. सर्वाभूती ईश्वर पाहणारे संत कोणत्याही समाजाला किवा व्यक्तीला कारणाशिवाय दुषणे देणार नाहीत.
तर या प्रश्नाचे उत्तर स्वतः तुकाराम महाराजांनीच चरणाच्या सुरुवातीलाच "अभक्त ब्राम्हण" हे सांगुन दिले आहे.  कारण हा अभंग भक्तीचा महिमा वर्णन करणारा आहे. काय त्यासी रांड प्रसविली, चा अर्थ असा अभक्त रांडेच्या पोटी जन्माला आला काय? असं प्रश्नार्थक आहे...


तुकाराम महाराजांच्या मनात येथे ब्राम्हणांना शिव्या देण्याचा हेतू नाही तर भक्तीचा महिमा सांगायचा आहे. कारण या अभंगाच्या आधी १२२९ क्रमांकाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज ब्राम्हण कसा असावा ते सांगतात,

ब्राम्हण तो  नव्हे ऐसी ज्यासी बुद्धि ! पाहा श्रुतीमधी विचारुनी !! ध्रु!!
जयासी नावडे हरीनामकिर्तन ! आणीक नृत्य वैष्णवांचे !! १!!

याचा स्पष्ठ अर्थ हा आहे कि, तुकाराम महाराज जो ब्राम्हण हरिभक्त नाही त्याचे तोंड जळो असे म्हनत आहेत. कारण त्याच्यापुढच्याच पदात महाराज सांगतात कि,”

वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!

येथेही त्यांनी चांभाराची माता धन्य म्हटली आहे. पन कोणत्या चांभाराची तेही सुरुवातीलाच सांगुन ठेवले आहे. जो चांभार वैष्णव आहे त्याची माता धन्य आहे. कारण तिचा पुत्र हरिभक्त म्हणजेच वैष्णव आहे. आणि त्याच्या हरीभक्तीमुळेच त्याचे कुळ आणि जात उभयता धन्य होतात. हा अभंग शुद्ध हरीभक्तीचा महिमा वर्णन करनारा आहे. हरीभक्तीचा महिमा वर्णावा तेवढा कमीच आहे.  असो. सद्या तरी तो आपला विषय नव्हे.

तर हे बिग्रेडी कार्यकर्ते आणि लेखक उपरोक्त अभंगातील वर अर्थ सांगीतलेली  दोनच पदे सांगुन बहुजन तरुनांची फसवणुक करत आहेत. पुर्ण अभंग बिग्रेडची लेखक आपल्या कार्यकर्त्यांना कधीच सांगत नाहीत. कारण पुढची दोन पदे सांगीतली तर बिग्रेडी लेखकांचा आणखी एक मुद्दा खोटा पडेल याची या धुर्त लेखक व अधिकारी यांना पुर्ण जानीव आहे. कारण पुढचा चरण आहे तो असा,

ऐसा हा निवाडा जालासे पुराणी ! नव्हे माझी वाणी पदरीची !!२!!
तुका म्हणे आगी लागो थोरपण ! दृष्ठी त्या दुर्जना न पडो माझी !!३!!

या चरणात तुकाराम महाराज स्पष्ठ करतात कि, हा निवाडा ( अभक्त ब्राम्हणापेक्षा वैष्णव चांभार श्रेष्ट असल्याचा ) पुराणातच सांगीतलेला असुन मी माझ्या पदरीचे काही सांगत नाही. त्यापुढे जावुन तुकाराम महाराज  सांगतात कि, भक्तीचा गंध नसलेल्या केवळ जन्मामुळे असलेल्या थोरपनाला आग  लागो. अशा दुर्जनावर माझी दृष्टी सुद्धा पडु नये.

पहील्या  चरणाचा  मोडुन तोडुन विपर्यास करुन आपला स्वार्थ  साधन्यासाठी आवश्यक  तेवढाच  अर्थ आपल्या कार्यकर्त्याना  सांगने बिग्रेडच्या नेत्यांना शक्या आहे. पन तिस-या ओळीचा अर्थ बदलने त्यांना शक्य  नाही. जे त्यांच्यासाठी पंचाइत ठरु शकते. कारण इथे तुकाराम   महाराज  स्वताः  आपले म्हाणने हे पुराणांत  जे सांगीतले आहे तेच आहे असे सांगत आहेत. याऊलट बिग्रेडचे नेते “पुराणे ब्रांम्हणांनी इतरांवर गुलामी लादन्यासाठी व पोटापान्याचा धंदा म्हणुन निर्माण केली आहेत.” असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत. जर पुराणे ब्राम्हणांनी पोटापाण्यासाठी  निर्माण केली आहेत तर ब्रांम्हाणांचे शत्रु असलेले तुकाराम महाराज ब्राम्हणांनीच रचलेल्या ग्रंथामधले  पुरावे का देतील?? असा प्रश्न  सहज बिग्रेडी  कार्यकत्यांच्या  मनात येवु शकतो.  तो प्रश्न येवुच नये म्हणन बिग्रेडचे  नेते  कधीही हा पुर्ण अभंग  आपल्या  सांगनार नाहीत. पुढच्या एका अभंगावर  भाष्य करण्यापुर्वी  पुन्हा एकदा तो पुर्ण  अभंग  नजरेखालुन  घालुया.

अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!१!!
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी ! नव्हे माझी वाणी पदरीची !!२!!
तुका म्हणे आगी लागो थोरपण ! दृष्ठी त्या दुर्जना न पडो माझी !!३!!

अर्थाचा अनर्थ करुन बिग्रेड कशाप्रकारे संत तुकाराम महाराजांच्या  अभंगाचा स्वताःचा स्वार्थ साधण्यासाठी वापर करत आहे हे आपण  वर पाहीले. आता अशाच आणखी एका कुटील प्रयत्नाचा आपन समाचार घेवुया. संत रामदास स्वामी यांना कर्मठ ब्राम्हण ठरवण्यासाठी बिग्रेड कुठच्या खालच्या थराला उतरु शकते याचा प्रत्यय येथे येतो.
जरी तो ब्राम्हण झाला कर्मभ्रष्ट ! तरी तिन्ही लोकी श्रेष्ट !! .

उपरोक्त  श्लोक रामदास स्वामींचा  आहे असे सांगत रामदास स्वामींना जातीयवादी ब्राम्हण असे ठरवण्याचा बिग्रेडचा प्रयत्न आहे. आम्हीहि सुरुवातीला हा श्लोक रामदास स्वांमींचाच समजत होतो.परंतु मध्यंतरी आमचे एक मित्र श्री. मधुसुदन चेरेकर यांनी हा श्लोक नसुन  तुकाराम महाराजांचा अभंग असल्याचे सांगीतले. त्यांनी या अभंगाचा क्रमांक देखिल सांगीतला. आम्ही तो तपासला असता चेरेकरांचे म्हणने खरे असल्याचे कळले. तो अभंग खाली देत आहे.
अभंग क्र.३०४०,तुकाराम गाथा:-

दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥1॥ 
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥ 
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥2॥ 
जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥ 

तर असे आहे हे बिग्रेडी विकृतीकरण !

शनिवार, १८ मे, २०१३

साधु दिसती वेगळाले | परी ते स्वरूपी मिळाले | (खोटा इतिहास कोण लिहित आहे?? भाग ४ )


माझ्या मागच्या लेखात मे म्हटल्याप्रमाणे सध्या काही संघटना संतांची जातींच्या खंदकांमध्ये विभागनी करु पाहत आहेत. या संघटणांनी संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची परस्पर मराठा आणि ब्राम्हण जातीत विभगनी करुन ठेवली आहे. काय विरोधाभास आहे बघा,

संत तुकाराम महाराजांनी जातीव्यवस्थेवर हल्ला केला असे सांगणा-या संघटनाच संत तुकाराम महाराजांना मराठा या एका जातीत बंदिस्त करु पाहत आहेत.. याउलट

वडील गेले ग्रामणी करुन ! आम्हा भोवते ! “

अर्थात आमचे पुर्वजांनी केलेल्या चुका आम्ही भोगतो आहोत असे म्हणत ब्राम्हणांचे काण टोचनारे रामदास कर्मठ ब्राम्हन म्हनुन हिनवले गेले. दोन्ही संतांचा हा केवढा अनादर??

प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्यारामदास प्रतिमा आणि प्रबोधया पुस्तकाच्या पप्रस्तावनेत प्राचार्य श्री. शिवाजीराव भोसले म्हणतात, “ या महाराष्ट्रात समर्थांना भक्ता बरेच भेटले. पन सारासार विचार करनारे अभ्यासक फार्ससे भेटले नाहीत

याउलट संत तुकाराम महाराजांना १९ व्या शतकापासुन अभ्यासक फार भेटले. पन त्यांनी स्वताःला हवे तेवढेच तुकाराम डोक्यावर घेतले. या दोन्ही संतांची व्यापक मानव्याची शिकवणूक नजरेआड केली गेली.
एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रउभारणीच्या काळात इतिहास मिमांसकांना रामदास राष्ट्रनिर्माणाचे धडे देनारे गॉडफादर वाटले…… तर समाजसुधारकांना तुकाराम त्यांच्या काही कठोर अभंगांमुळे थोर समाजसुधारक वाटले. पन एका अनादि अनंत तत्वाशी एकरुप होऊ पाहना-या या संतांना एका विशिष्ठ कार्यापुरता मर्यादित करुन ठेवने कितपत योग्य / अयोग्य होते याचे उत्तर आज काही संघटनांनी  या उभय संतांची परस्पर दोन जातींत विभगनी करुन दाखवुन दिले आहे!

पुढे सरकण्यापुर्वी संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांच्या विचारांतील सांम्य एकदा पाहुन घेउ.    

उभय संत ऐहिक दृष्ट्या दोन दिसत असले तरी अनंत  परमेश्वरापाशी दोघेही लीन असल्यामुळे त्यांच्यात वैचारिक भेद असा जाणवत नाही, हे खालील काही संदर्भांवरून आपल्या लक्षात येईल,

नरदेह महती आणि मनुष्य जीवनाचे साध्य सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय ! पुर्वपुण्ये होय लाभ याचा !!!!
अनंत जन्मीचा शेवट पाहता ! नरदेह हाता आला तुझ्या !!!!
करील ते जोडी येईल कार्यासी ! ध्यावे विठ्ठलासी सुखालागी !!!!
सांचलिया धन होईल ठेवणे ! तैसी नारायण जोडी करा !!!!
करा हरिभक्ती परलोकी कामा ! सोडवील यमापासोनिया !!!!
तुका म्हणे करा आयुष्याचे मोल ! नका वेचू बोल नामाविण !!!!
सार्थ तुकारामाची गाथा - अभंग 3०२४

दासबोधात अगदी हेच रामदास सुद्धा सांगताना दिसतात,

धन्य  धन्य  हा  नरदेहो  |  येथील  अपूर्वता पाहो |
जो जो कीजे परमार्थलाहो | तो तो पावे सिद्धीतें |||| दशक : समास १०: श्लोक
देह परमार्थीं लाविलें | तरीच याचें सार्थक जालें |
नाहीं तरी हें वेर्थचि गेलें | नाना आघातें मृत्यपंथें ||६१|| दशक : समास १०: श्लोक ६१
बहुतां जन्मांचा सेवट | नरदेह सांपडे अवचट |
येथें  वर्तावें चोखट | नितिन्यायें |||| दशक ११: समास : श्लोक

परमार्थ आणि प्रपंच यांची सागड कशी घालावी हे सांगताना ह्या दोन्ही संतांच्या विचारात कमालीचे साम्य आढळून येते
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ! उदास विचार तेच करी !!!!
उत्तमचि गती तो एक पावेल ! उत्तम भोगील जीव खाणी !!!!
परउपकारी नेणे परनिंदा ! परस्त्रिया सदा बहिणी माया !!!!
भूतदया गाई पशुंचे पालन ! तान्हेल्या जीवन वनमाजी !!!!
शांतीरुपे नव्हे कोणाचा वाईट ! वाढावी महत्व वडिलांचे !!!!
तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ ! परम पद वैराग्याचे !!
( सार्थ तुकाराम गाथा २०८५)

आधीं  प्रपंच  करावा  नेटका | मग  घ्यावें परमार्थविवेका |
येथें आळस करूं नका | विवेकी हो ||||
 दशक बारावा : समास पहिला  : श्लोक  

नाना वेश नाना आश्रम | सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम |
जेथें पावती विश्राम |त्रैलोक्यवासी ||||
दशक चौदावा : समास सातवा : श्लोक  


नम्रपणा म्हणजे कमजोर पण नव्हे. समाजात वावरताना चांगल्या आणि वाईट दोन्ही वृत्तींशी गाठ पडणार हे अटळ असते.  समाजात वीरवृत्ती वीरवृत्ती निर्माण व्हावी ह्यासाठी कसे वागणे असावे हे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात,

मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ! कठीण वज्रास भेदु ऐसे !!!!
मेले जीत असे निजोनिया जागे ! जो जो जे जे मागे ते ते देऊ !!!!
भले तर देऊ कासेची लंगोटी ! नाठाळ्याचे काठी देऊ माथां !!!!
मायाबापाहुनी बहु मायावंत ! करू घातपात शत्रुहुनी !!!!
अमृत ते गोड काय आम्हा पुढे ! विष ते बापुडे कडू किती !!!!
तुका म्हणे आम्ही अवघेची गोड ! जया पुरे कोड त्याचे परी !!!!

सार्थ तुकाराम गाथा ५८६ 
अगदी हेच समर्थ त्यांच्या दासबोधात सांगताना दिसतात,
हुंब्यास  हुंबा  लाऊन  द्यावा  |  टोणप्यास  टोणपा
आणावा | लौंदास पुढें उभा करावा | दुसरा लौंद ||२९||
धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी  खटनट  |  अगत्य  करी  ||३०||
जैशास तैसा जेव्हां भेटे | तेव्हां मज्यालसी थाटे |
इतुकें होतें परी धनी कोठें | दृष्टीस पडे  ||३१ ||


अडीअडचणीत एकमेकांना मदत करावी. त्यांच्या संकटाच्या वेळी निरपेक्ष वृत्तीने मदत करणे म्हणजे परोपकार हे दोन्ही संतांचे सांगणे आहे,

जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले !!!!
तोचि साधू वोळखावादेव तेथेचि जाणावा !!!!
मृदू सबाह्य नवनीत ! तैसे साज्जनाचे चित्त !!!!
ज्यासी अपंगिता नाही ! त्यासी धरी जो हृदयी !!!!


दया करणे जे पुत्रांसी ! तेचि दासां आणि दासी !!!!
तुका म्हणे सांगू किती ! त्याची भगवंताची मूर्ती !!!!

सार्थ तुकाराम गाथा - अभंग २०१ 
 
समर्थ रामदास हेच आपल्या श्लोकात सांगताना नाही दिसत का???

दशक एकोणिसावा : समास नववा ! श्लोक २९ ते ३१ 
शरीर परोपकारीं लावावें | बहुतांच्या कार्यास यावें |
उणें पडों नेदावें | कोणियेकाचें ||||
आडले जाकसलें जाणावें | यथान्शक्ति कामास यावें |
मृदवचनें बोलत जावें | कोणीयेकासी ||||
दुसऱ्याच्या दुःखें दुःखवावें | परसंतोषें सुखी व्हावें |
प्राणीमात्रास मेळऊन घ्यावें | बऱ्या शब्दें |||
दशक १२ : समास १० : श्लोक ते

परोपकार सांडूं नये | परपीडा करूं नये |
विकल्प पडों देऊं नये | कोणीयेकासी ||४४||

दशक  १४ : समास : श्लोक ४४ 

समाज म्हटला कि त्यात नाना विचारधारांचे लोक असतात. समाजात जशी श्रद्धावान माणसे असतात तशीच अंधश्रद्धाळू माणसे देखील असतात. देवाच्या नावाखाली परंपरेने जोपासलेल्या अडाणी समजुती समाजात ठाण मांडून असतात. संताना ईश्वर काय आहे हे नेमके समजलेले असल्याने ते अशा अडाणी समजुतीवर हल्ला चढवताना दिसतात. समर्थ रामदास आणि संत तुकाराम महाराज हे असेच समाज प्रबोधन करणारे संत असल्याने त्यांच्या लेखनात आपल्याला अशा अंधश्रद्धांवर हल्ला चढवलेला दिसतो.   


वैद्य वाचविता जीवा ! तरी कोण ध्याते देवा !!!!
काय जाणो कैसी परी ! प्रारब्ध जे ठेवी उरी !!!!
अंगी दैवत संचरे ! मग तेथे काय उरे !!!!
नवसे कन्या पुत्र होती ! तरी का करणे लागे पती !!!!
जनी हा विचार ! स्वामी तुकयाचा दातार !!
(
सार्थ तुकाराम गाथा - अभंग १८७)

दुश्चिन्हें अथवा अपशकुन | मिथ्या वार्तेनें भंगे मन |
वचके पदार्थ देखोन | या नांव भ्रम ||२०||
मेलें मनुष्य स्वप्नीं आलें | तेणें कांहीं मागितलें |
मनीं  अखंड  बैसलें  |  या  नांव  भ्रम  ||२६||
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं | आणी वाचून जाते सटी |
ऐशा  प्रकारीच्या  गोष्टी | या  नांव भ्रम ||३४||

दशक १० : समास  

 
जसे मी म्हटले कि, " समाज म्हटला कि त्यात नाना विचारधारांचे लोक असतात" समाजात त्याकाळी जशा अनेक अंधश्रद्धा होत्या तसेच अनेक भेदाभेद सुद्धा होते. जातिभेद हा तर पराकोटीला पोहोचलेला होता. पण संत हे चराचरत व्यापून राहिलेल्या परमेश्वरासी एकरूप झालेले असल्याने त्यांच्याठाई कसलाही भेद उरत नाही. समस्त मानव हे त्यांना आपलेच वाटू लागतात. त्यांचा विरोध असतो मानवामधील बु-या - वाईट वृत्तीना. जातीभेदाबद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात,

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ !!!!
आईकाजी तुम्ही भक्त भागवत ! कराल ते हित सत्य करा !!!!
कोणाही जीवाचा घडावा मत्सर ! वर्म सर्वेश्वर पूजनाचे !!!!
तुका म्हणे एका देहाचे अवयव ! सुखदुःख जीव भोगे !!!!
(
सार्थ तुकाराम गाथा - अभंग २१)

तर समर्थ रामदास म्हणतात,
ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोवळें | शूद्राचें ब्रह्म तें वोवळें |
ऐसें  वेगळें  आगळें  |  तेथें  असेचिना ||२५||
दशक : समास : श्लोक २५ 

यावरून आपल्याला कळले असेलच कि संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास हे दोघे सकृतदर्शनी वेगवेगळ्या देवतांचे उपासना करीत असले तरी त्यांचे अंतरंग एकाच प्रकारच्या विचारांनी भरलेले होते. शेवटी समर्थ रामदास म्हणतात तेच खरे,

साधु दिसती वेगळाले | परी ते स्वरूपी मिळाले |
अवघे मिळोन येकचि जाले | देहातीत वस्तु ||३१|
दशक : समास : श्लोक ३१