बुधवार, ११ जानेवारी, २०१२

आज मासाहेब जिजाऊ यांची जयंती.....

12.01.2012

मित्रानो,

संकल्प हा नेमीच मानवी जीवनाला नवीन वळण देत आला आहे. शहाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा, हिंदूपदपादशाहीचा जो संकल्प मनी धरला....... तो संकल्प अर्धांगिनी या नात्याने मासाहेब जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांच्या रूपाने जतन केला....वाढवला....

आज मासाहेब जिजाऊ यांची जयंती.....

मागे एका ग्रुपवर एकाने म्हटल्याप्रमाणे शिवाजी राजांची आई होणे हे कार्य फक्त जिजाऊ मासाहेबच करू शकत होत्या. कारण राजे उभे आयुष्य मृत्यूला पुढे घालून चालत राहिले. प्रत्येक वेळी नवीन संकट.....एका संकटातून बाहेर पडतात न पडतात तोच दुसरे संकट समोर उभे राही. राजे प्रत्येकवेळी संकटात असताना मासाहेबांना प्रसूती वेदनेपेक्षा कमी वेदना झाल्या असतील का??? दुःख आणि सुख यांचा संमिश्र अनुभव मासाहेब संपूर्ण आयुष्यभर घेत आल्या होत्या. त्यांच्या या वेदना मी शब्दांत मांडू शकत नाही..............मासाहेबांबद्दल बोलणे म्हणजे माझ्या मते या अथांग आकाशगंगेला शब्दांची बंधने लावण्यासारखे आहे. ते माझ्याच्याने शक्य नाही.....

हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान असलेल्या मासाहेब जिजाऊ यांना मनाचा त्रिवार मुजरा....................


स्वामी विवेकानंदांची आज 150वी जयंती.....माझे कोटी कोटी प्रणाम हिंदूभूमीच्या या थोर सुपुत्राला....

12.01.2012



एक तरुण तीर्थक्षेत्रांची वारी करत होता. अश्याच एका शहरात पायी प्रवास करताना काही माकडांचा तांडा त्याच्या मागे लागला....भीतीने पळत असताना एक साधू त्याच्या समोर आला आणि तो म्हणाला, "अरे पळतोस काय?? पलटून त्या माकडांना समोर जा...." तो....तरुण तसाच मागे वळला...आणि ठामपणे त्या माकडांच्या तांड्या समोर उभा राहिला....त्या तरुणाचा तो बदललेला आवेश पाहून माकडे आली त्याच वाटेने पसार झाली......संकटाना न घाबरता....ठामपणे त्यांना सामोरे गेल्यास ती पळून जातात हा अनुभव त्या तरुणास त्या दिवशी आला.....

तोच तरुण एकदा बोटीवरून भारताबाहेर जात होता...बाजूला दोन इंग्रज बसले होते.....त्यावेळी भारत गुलामगिरीच्या जोखडाखाली होता...साहजिकच त्या ब्रीटीशांच्या मनात जो भारतीयांबद्दल दुजाभाव होता तो त्यांच्या बोलण्यात येत होता....भारताबद्दल ते नको नको त्या गोष्टी त्या तरुणाला ऐकू जातील अशाप्रकारे इंग्लिशमध्ये बोलत होते...... त्या तरुणाने ते ऐकले आणि तो त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याच भाषेत त्यांना ठणकावत म्हणाला...." खबरदार .....परत जर माझ्या मायभूमी बद्दल एक वाकडा शब्द बोललात तर........... उचलून या समुद्रात फेकून देईन....." त्या तरुणाचा तो आवेश आणि त्याची एकंदर मजबूत शरीरयष्टी बघून गोरी माकडे गप्प झाली......

याच तरुणाने शिकागोच्या धर्मपरीषदेत हिंदू आणि इतर धर्मीयांबद्दल एका ठिकाणी म्हटले...." जर एखाद्या ठिकाणी एखाद्या रस्त्यावर एक खड्डा आहे आणि एक माणूस त्यात पडला आहे तर एक हिंदू त्या माणसाला आपले धर्मकर्तव्य म्हणून बाहेर काढेल.....एक मुस्लीम स्वतःला अल्लाच्या नजरेत नेक बंदा साबित करायला त्या खड्ड्यात पडलेल्या माणसाला बाहेर काढेल....पण एक ख्रिश्चन आधी जाऊन खड्डा खोदेल...त्यात त्या माणसाला ढकलेल .... आणि मग स्वतःला ईश्वराच्या नजरेत नेक बंदा साबित करण्यासाठी त्या माणसाला बाहेर काढेल...."

हा तरुण होता......'माझ्या बंधुनो आणि माझ्या भगिनीनो' म्हणत अखिल मानवजातीला बंधुत्वाची साद घालणारे आणि वसुधैव कुटुम्बकम हि हिंदू परंपरा जगाला समजावून देणारे ....स्वामी विवेकानंद ........



अश्या या स्वामी विवेकानंदांची आज 150वी जयंती.....माझे कोटी कोटी प्रणाम हिंदूभूमीच्या या थोर सुपुत्राला....