Tuesday, November 22, 2011
हा तर मित्रानो,
या रविवारी मी ज्या व्यक्तीला भेटलो आणि त्यानंतर मला माझ जीवन कृतकृत्य झाल्यासारख वाटलं ती व्यक्ती आहे.... संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील पहिली महिला मंजिरी पहावा (बायजी). त्यांचे पती कै. मदनलाल पहावा हे गांधी वधाचे जे मानकरी होते त्यात वयाने सर्वात लहान होते. जे नंतर सुटले.
तर रविवारी ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे मित्र भेटलो. आणि एकाने सांगितल कि आज आपण बायजीना भेटायला जात आहोत. आधी मला कळेचना........... कि कोण बायजी?? मग एकाने तिथेच बसलेल्या एका व्यक्तीची ओळख करून दिली. ती अशी कि "हे मदनलाल पहावा यांचे पुत्र." आणि मग मदनलाल कोण तेही सांगितले. त्या व्यक्तीने त्यात सुधारणा केली कि "मी त्यांचा मानसपुत्र आहे." त्यांच्याशी बोलल्या नंतर माझ्या ज्ञानात बरीच भर पडली. असो.
मग आम्ही बायजींच्या घरी गेलो. एका चाळीत.... आत बाहेर ....अश्या दोन खोल्यांचा मंदिरच ते!!!! आम्ही आत गेलो. बायजींच्या पाया पडलो. त्यांच्या आशीर्वादाच्या हातांचा स्पर्श होताच जीवन धन्य झाल्यासारखं वाटलं.
त्यांच्याशी बोलत बसलो. अनेक जुन्या आठवणी त्या सांगत होत्या. बायजींचे माहेर हे मराठी आणि त्यांचे वडील कट्टर सावरकरवादी!!! कै. मदनलाल पहावा हे पंजाब प्रांतातील ...... जो आज पकड्यांच्या हातात आहे.
गांधी वधाच्या खटल्यातून निर्दोष सुटल्यावर त्यांचा जास्त संपर्क सावरकरांचे बंधू गोपाळराव सावरकर यांच्याशी होता. गोपाळराव सावरकर यांच्या पत्नी सिंधुताई यांना ते आपल्या मातेप्रमाणे मानायचे. सिंधू ताई यांनी एकदा मदनलालजिना लग्न कधी करणार??? असं विचारलं........ तेव्हा त्यांनी उत्तर दिलं...... "ताई तुम्ही मुलगी शोधा..... मी तिच्याशी लग्न करेन."....... त्यावर सिंधू ताई म्हणाल्या.." आणि मी काळी मुलगी पसंद केली तर?? तू तर गोरा आहेस...." ....त्यावर मदनलालजी म्हणाले, ........." ताई तू माझी फक्त ताई नाहीस तर आई आहेस. आणि आई कधी आपल्या मुलाचा वाईट चिंतणार नाही. तू जे करशील ते माझ्या भल्यासाठीच करशील." मदनलालजिना मराठी मुलीशीच लग्न करायचं होतं. कारण विचारल्यावर ते म्हणाले कि, "महाराष्ट्रीयन मुली ह्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या असतात त्याचबरोबर काटकसरीने वागना-या आणि संसारी असतात." त्या नंतर सिंधू ताई यांनी बायजीना मदनलालजिंसाठी पसंद केलं. मदनलालजीनी कोणत्याही कॉंग्रेस नेत्यासारख कमावलं नाही हे त्यांच्या घरी गेल्यास आजही कळून येतं.
मध्यंतरी एका वाहिनीची प्रतिनिधी त्यांना भेटायला आली होती. तिला वाटले होते कि मदनलालजी एखाद्या मोठ्या बंगल्यात राहत असतील.......... पण जेव्हा ती त्यांच्या घरी गेली आणि तिने त्यांना बघितलं, चर्चा केली...आणि तिने आपल्या वाहिनीवरून लोकांना सांगितला कि मदनलालजी सारख्या सच्च्या देशभक्ताने काही कमावलं नाही. कारण मी त्यांच्या घरी जाऊन आले आहे.
तर असे हे मदनलाल पहावा !! फाळणीची झळ त्यांनासुद्धा बसली होती. बायजीना त्यांनी जे अनुभव सांगितले होते ते अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारेच होते. ते सर्व अनुभव मला सांगायचे होते.......पण ह्या मंचावरची मर्यादा पाळून एकच अनुभव सांगतो......... म्हणजे आपल्याला कळेल कि नथुरामजी गांधी यांचा वध का केला ?????? ज्यावेळी फाळणी झाली आणि जगाच्या पाठीवर कधीहि झाले नसेल असे स्थलांतर सुरु झाले ...तेव्हा दोन्ही बाजूंचे लोक परस्परांत ठराविक अन्तर ठेऊन प्रवास करत होते........ पण चुकून एखादा हिंदू एकटा सापडला कि मुसलमान लांडग्यासारखे त्यावर तुटून पडत होते. त्यावेळी जीवाच्या भीतीने जेव्हा लहान मुलांना तहान लागायची तेव्हा त्यांना मूत्र पाजले जायचे.............. विचित्र आणि किळसवाना प्रकार वाटेल आपल्याला .....पण हे सत्य आहे.......
त्या यातना त्यावेळच्या कॉंग्रेसच्या कोणत्या नेत्याला कळल्या नसतील त्या नथूरामजीना आणि या त्यांच्या कै. मदनलालजिं सारख्या वीरांना कळल्या. आणि त्यांनी "राष्ट्राय स्वाहा इदं न मम!!" म्हणत भारताच्या पाठीवरचं गांधी नामक हे कुबड कायमचं नष्ट केलं. आजही जर भारताच्या स्वातंत्र्य युद्धाचा अभ्यास बारकाईने केला तर गांधीजींना एक वेळच काय १०० वेळा भारतीय दंड साविधना अंतर्गत फाशी देता येईल.
१) सुभाषबाबू जर जिवंत सापडले तर त्यांना इंग्रजांच्या हवाली करण्याचा देशद्रोही करार गांधी यांनी केला आहे.
२) जनतेचा पैसा असताना आणि कोणतेही संविधानिक अधिकारपद स्वतःकडे नसताना गांधीनी कोणत्या अधिकाराने ५५ कोटी पाकिस्तानला कर्जाऊ म्हणून दिले???
३) सर्वात मोठा विश्वासघात भारतीय जनतेशी गांधी यांनी केला आहे. १९४७ साली जे स्वातंत्र्य मिळाल म्हणून जो डंका वाजवला गेला......... ते वसाहती स्वातंत्र्य होतं आणि या वसाहती स्वातंत्र्याला गांधी मान्यता देणार हे शहीद भगत सिंघ यानाही माहित होतं. म्हणून त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. जर खोट वाटत असेल तर एक गोष्ट सांगतो....आजही भारताची राणी विक्टोरिया राणी आहे......ती आजही भारताची नागरिक आहे.
या आणि अश्या बऱ्याच गोष्टी आहेत. गांधींच आंधळ समर्थन करताना जे लोक म्हणतात कि, "नथूरामजीना गांधी कळलेच नाहीत..." .... तर मी म्हणेन तसं म्हणणारा जगाच्या पाठीवरील सर्वात मोठा मूर्खशिरोमणी असला पाहिजे. कारण नथुरामजी हे गांधीजींचे पहिले सहाय्यक (assistant) होते. असो.
अश्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा विषय आज मांडायचं प्रयोजन असं कि आज त्या मातेला (बायजिना) ........त्यांचे नातेवाईक म्हणण्यापेक्षा.......आपलेच काही लोक स्वतःच्या क्षुद्र स्वार्थासाठी त्रास देत आहेत. आणि यात भर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ज्यांची जबाबदारी आहे ती व्यक्ती या सर्व प्रकारात स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा प्रयत्न करत आहे............
मित्रानो कोणत्या राष्ट्रात आहोत आपण?? आज चोरांचे वंशज राज्य करत आहेत आणि सच्च्या देशभक्ताला लोक त्रास देत आहेत........जयंत्या सजा-या करता ते चांगले आहे...पण त्यापेक्षा या आणि अश्या सच्च्या देशभक्त व्यक्तीचे विचार आणि गुण आपल्यात उतरवायचा प्रयत्न करा........तरच आपण हे जे विशाल हिंदूराष्ट्राचा स्वप्न आहे ते पूर्ण करू शकू.....
जयतु हिंदुराष्ट्राम !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा