बुधवार, २३ मे, २०१२

संभाजी बिग्रेड आणि बामसेफ - एक चिंतेचा विषय !!!


मागे एकदा सहा महिन्यांपूर्वी काही समविचारी मित्रांना भेटायला गेलो होतो. तिथे एक सरकारी अधिकारी श्री. मयेकर सर बसले होते. त्यांनी एक सत्यघटना सांगितली. ती ऐकून आम्हा सर्वांचेच काळीज हलले. ते सांगत होते - त्यांचा एक मित्र नुकताच काश्मीर मध्ये जाऊन आला. तिथे दाल सरोवर बघत असताना एक भारतीय सैनिक तिथे आला. मयेकर सरांच्या मित्राला भूक होण्याची सवय. तो त्या सैनिकाला जाऊन भेटला. हस्तांदोलन करायला गेला. तर त्या सैनिकाने लगेच स्वतःचा हात त्याच्या हातातून काढून घेतला. तो सैनिक त्याच्याशी बोलायला तयार नव्हता. पण तो मात्र बोलत होताच.- "साहेब तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. तुम्ही जीवाची बाजी लाऊन आपल्या देशाचा रक्षण करता. तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे. इति. इति." हे सगळा तो बोलत असताना एक स्थानिक मुस्लीम रिक्षावाला तिथे येऊन उभा राहिला. आणि मस्त सिगारेट पीत त्यांचं बोलणं ऐकू लागला. त्या सैनिकाला दम धरवेना. शेवटी वैतागून तो त्याला म्हणाला कि "तुम्ही इथून जा नाहीतर मी तरी इथून जातो." आणि वैतागून(?) शेवटी तो तिथून निघून गेला. तो जाताच तो मुस्लीम रिक्षावाला त्या मयेकर सरांच्या मित्राला म्हणाला, " ये झा**** हमारी क्या उखाडेगा??" त्यांना काही कळलेच नाही. ते त्याच्याकडे बघत राहिले. तो परत म्हणाला..." आप को यकीन नाही होता?? तो ये देखो..." असं म्हणत त्याने खिशातून मोबाईल काढला आणि त्यातला एक शूट केलेला व्हीडीओ त्यांना दाखवला. तो व्हीडीओ बघताच त्यांना त्या सैनिकाच्या विचित्र वागण्याचा उलगडा झाला. त्या व्हीडीओत एक जखमी सैनिक हातात स्टेनगण असूनही कुत्र्यासारखा पळत होता. आणि त्याच्या मागे ४०-५० जणांचा जमाव लागला होता. शेवटी विरुद्ध दिशेने येणा-या दुस-या जमावाने त्याला पकडलेच. आणि त्याला बेदम मारला. त्याच्या शरीरातून वाहणारे रक्त सुद्धा त्या व्हीडीओ मध्ये स्पष्ठ दिसत होतं. मयेकर सरांचा तो मित्र सुन्न होऊन परत आला. त्याने आणखी काही अनुभव सांगितले.... काही ठिकाणी भारतीय पर्यटकांच्या बस मध्ये शिरून स्थानिक लोक त्यांच्या तोंडासमोर पाकिस्तानचा झेंडा नाचवत होते.

कश्मीर मधले सैन्य ओमर अब्दुल्ला याच्या सांगण्यावरून सरकारने काढून घेतले. जे सैनिक आहेत ते एकमेकांपासून इतक्या लांब अंतरावर आहेत कि एखाद्या जमावाने एखाद्या सैनिकाला मारायचे ठरवले तर ते सहज मारू शकतात. मुंबईतल्या लोकांना याचा अंदाज यावा म्हणून दोन सैनिकांमधलं अंतर किती असेल ते सांगतो. एक सैनिक दादरला तर दुसरा सैनिक माहीमला अश्या अंतराने सैनिकांचा विकेंद्रीकरण केलं आहे. at the same time चीन भारत पाकिस्तानच्या सीमेवर बंकर्स खोदत आहे. त्यांना विचारलं तर सांगतात कि आम्ही इथे बांधकामासाठी आलो आहोत. मग बांधकामासाठी आले आहेत तर बंकर्स कशासाठी खोदत आहेत?? मध्यंतरी स्टार माझा या न्यूजचेनेल वर ईशान्य भारतातील भारत चीन सीमेवरील एका गावक-यांची मुलाखत दाखवली. त्यात त्या गावक-यांनी स्पष्ठ सांगितले कि 'जर युद्ध सुरु झाले तर चीनचे सैन्य त्यांच्या राजधानी पासून या सीमेवरील गावात अर्ध्या तासात पोहोचेल अशी दळण वळण व्यवस्था उभारली आहे.' हे सगळे धोके सरकारला माहित नाहीत अशातला भाग नाही. आणि सरकार यावर काही ठोस पावले उचलत असेलही. सुरक्षेच्या कारणास्तव ती ठोस पावले जाहीर केली जात नसतील अशी आशा आहे.

आता तुम्ही म्हणाल या सगळ्याचा आणि बामसेफ आणि संभाजी बिग्रेड चा संबंध काय?? तर संबंध सरळ आहे. आज महाराष्ट्रात सरळ सरळ छातीठोकपणे संभाजी बिग्रेड आणि बामसेफवाले सांगतात कि " दहशतवाद हि या देशासमोरील समस्या नसून ब्राम्हनवाद हि या देशासमोरील समस्या आहे." जरी वरकरणी वाचायला आणि ऐकायला हे छान वाटत असले तरी यातच सर्वनाशाची बीजे रोवली आहेत.

लहानपणी एक गोष्ठ ऐकली होती. एका राज्यात एक राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. लोक गुण्या गोविंदाने एकमेकांशी वागत असत. कसलीही भांडणे नाही कि काही नाही. त्यामुळे जनतेची एकी भक्कम होती. आणि पर्यायाने हे राज्य अजिंक्य होते. राज्यात मधेच एखाद्या वेळेस लढाईची वाद्ये वाजवली जात. ती वाजताच लोक आपापली कामे सोडून हातात हत्यारे घेऊन आपल्या राज्याच्याचे रक्षण करण्यसाठी सज्ज होत. हि गोष्ठ लोक सावधान आहेत कि नाही हे पाहण्यासाठी केली जात असे. त्या राजाच्या शत्रू राजाला हे राज्य जिंकायचे होते. त्यासाठी त्याने आपल्या प्रधानाचा सल्ला घेतला आणि कात शिजवला. प्रधानाला स्वतःच्या राज्यातून राजाने हाकलून दिले. तो त्या गुण्या गोविंदाने नांदणा-या राज्यात गेला. तिथल्या लोकांनी त्याचा स्वीकार केला. त्याला एका सरकारी अधिका-याची नोकरी मिळाली. हळूहळू आपल्या कौशल्याने तो राज्याच्या प्रधान बनला. पान हे सगळे करत असताना त्याने राज्यात भांडणे लाऊन द्यायला सुरुवात केली. प्रधान झाल्यावर त्याने एके दिवशी ती रणवाद्ये वाजवण्याची आज्ञा दिली. ठरल्यानुसार रणवाध्ये वाजवली गेली. पण आपापसात भांड्ल्यामुळे दुहीची बीजे पेरली गेली होती. त्यामुळे कोणीही राज्याच्या रक्षणासाठी तयार होऊन बाहेर आले नाही. प्रधानाने हि गोष्ठ हेरली आणि आपल्या मूळ मालकास युद्धाची तयारी करून चालून येण्यास सांगितले. तो राजा चालून आला. पण आपापसात फुटलेला समाज फार काळ प्रतिकार शकला नाही आणि एकेकाळी अजिंक्य असलेले ते राज्य कायमचे पारतंत्र्यात गेले. हे शहर होते पाटलीपुत्र कि वैशाली!!!

आज आपल्यासमोर ब्राम्हनवादाचा बागुलबुवा उभा करून ठेवला जात आहे तो जाणीवपूर्वक असेल किवा अजाणतेपणी असेल. पण याच्यात आपल्या एकसंध समाजाच्या दुहीची बीजे आहेत. महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राम्हण असा संघर्ष पेटवला जात आहे. उत्तरेत सवर्ण विरुद्ध दलित असा संघर्ष पेटवला जात आहे. आसाम मध्ये धनिक विरुद्ध गरीब असा संघर्ष पेटवला जात आहे. ईशान्य भारतात उर्वरित भारत विरुद्ध ईशान्य भारत असा संघर्ष पेटवला जात आहे. हे सगळे या एकसंध भारतीय समाजाला आपसात भांडणे लाऊन फोडण्यासाठी हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. संघावर रागही याच कारणासाठी आहे कारण संघ पहिल्यापासून एकसंध भारतीय समाजासाठी प्रयत्नशील आहे.

असो. मी एक अज्ञानी बालक आहे, माझ्या अल्पबुद्धीला जेवढा जाणवला तेवढा सांगितला. विचार तुमच्या हातात आहे. आपल्याच भावंडांचे गळे कापून परक्यांना या देशावर राज्य करू द्यायचे कि एकमेकांना समजून घेऊन परक्यांच्या नरडीला नख लावायचे ते.............

जय हिंद !! जय भारत !!


माझ्या नजरेतून हिंदू धर्म - एक अनादी अनंत विचारधारा !!!


आत्ताच माझे एक मित्र श्री. ऋषिकेश मोरे यांनी माझी धर्माची व्याख्या काय आहे असे विचारले. माझी धर्माची व्याख्या सरळ आहे. धर्म हा शब्द 'धृ' या धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ होतो 'धारण करणे'. धारण करण्यास जो योग्य आहे आणि धारणेनुसार जो बदलत जातो तो धर्म. हेच कारण आहे कि आपल्या धर्मग्रंथात हिंदू धर्म नावाचा वेगळा धर्म आहे असे कधी सांगितले नाही. कारण मानवी जीवनातली प्रत्येक गोष्ठ धर्माशी निगडीत असते. काय खावे, कसे खावे, काय प्यावे, काय नेसावे या सगळ्या गोष्ठी धर्मांतर्गत येतात. थोडक्यात माणसाचे आचरण कसे असावे हे सांगतो तो धर्म - मग यात पतीधर्म, पत्नीधर्म, पुत्रधर्म, शेजारधर्म, राष्ट्रधर्म हे सगळे धर्म आले. आणि या सगळ्या गोष्ठी ज्यात एकत्रित होतात ती संस्कृती असते. त्यामुळे हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे. आणि ह्याच कारणामुळे आपल्या त्रुशीमुनींनी, साधू संतानी धर्म म्हणून हिंदू धर्माचा कधी उल्लेख केला नसावा. आणि हेच कारण आहे कि या संस्कृतीचा कोणताही एक विशिष्ठ असा धर्मग्रंथ नाही. मध्यंतरी माझे आणखी एक मित्र श्री. सतीश पवार यांनी म्हटले होते कि भगवान श्रीकृष्ण हे बंडखोर प्रवृत्तीचे होते. आणि त्यांचे म्हणणे काही अंशी खरेही आहे. मुळात संपूर्ण हिंदू संस्कृती हि बंडखोर वृत्तीचे प्रतिक आणि पर्यायाने प्रगतीशील विचारांची आहे असे मला वाटते. कारण यात तुम्हाला कोणत्याही दोन पानांच्या आत बंदिस्त केले जात नाही. तुम्हाला जी विचारधारा पटेल ती तुम्ही स्वीकारू शकता आणि गरज पडल्यास एखादी नवीन विचारधारा रुजवूहि शकता. असो. हिंदू संस्कृती इतकी व्यापक आहे कि मी तिच्याबद्दल बोलणे म्हणजे अंधारात चमकणा-या परप्रकाशित काजव्याने सूर्याचे पोवाडे गाण्यासारखे आहे. ज्याला जसा हवा तसा माझा धर्म दिसतो.

हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत. प्रत्येक देवाची उपासना करणारे वेगवेगळे पंथ आहेत. ज्याला ज्या देवतेची उपासना करायची आहे ती तो करू शकतो. ज्याला देवाचे अस्तित्वच मान्य नाही तो देखील त्याला हवे तसे समाजात वावरू शकतो. हे अशाप्रकारचे व्यक्तीस्वातंत्र्य इतर कोणत्याही धर्मात आढळणार नाही. कारण तिथे एक धर्मग्रंथ आणि एक देव जो त्या धर्मग्रंथात सांगितला आहे..बस!! या पलीकडे काही नाही. त्या धर्मग्रंथाच्या दोन कव्हर पेज मध्ये तुमचे धार्मिक आयुष्य कैद असते. हिंदू धर्मात असे नाही. मी स्वतः फारसा देवळात जात नाही. कारण देखल्या देवा दंडवत असा प्रकार मला मान्य नाही. परमेश्वर माझ्या हृदयात आहे हे तत्वज्ञान मला मान्य आहे.

मुळात हिंदू धर्मात अनेक प्रकारचे (३३ कोटी) देव आहेत यावरून काहीजण वाद घालतात. कि एक ईश्वर संपूर्ण चराचर व्यापून आहे असे असताना ३३ कोटी देव हिंदू धर्मात कसे आले?? ते ३३ कोटी देव कोणते हे माझे मित्र श्री. विक्रम एडके यांनी मागे दाखवून दिलेच आहे. परंतु त्यामागचे तत्वज्ञान मी परत एकदा सांगत आहे. हिंदूंमध्ये अनेक देवता आहेत परंतु शेवटी एकच असे निरामय आणि अनादी असे तत्व आहे हे त्या अनेक देवतांची भक्ती करणा-या व्यक्तीला सहज समजून येते. कसे ते पहा. एखादी व्यक्ती समजा आधी भवानी मातेची उपासना करत असेल तर कालांतराने जशी त्याची भक्तिमार्गात प्रगती होत जाते तसे त्याला अनुभूती येत जाते कि भवानीमाता, कालीमाता, अंबाबाई या सगळ्या त्या आदिमायेचेच रूप आहेत. मग तो त्या आदिमायेची भक्ती करू लागतो. हळूहळू त्याला जाणवू लागते कि ज्या आदिमायेची उपासना करतो आहे ती शिवाच्या अर्ध्या शरीरातून निर्माण झाली आहे. मग तो शिवाची भक्ती करू लागतो. त्यानंतर त्याला जाणवू लागते कि शिवाच्या पलीकडेही एक परात्पर शक्ती आहे जी संपूर्ण विश्व व्यापून उरली आहे. मग तो त्या परात्पर शक्तीची उपासना करू लागतो. ज्याप्रमाणे १-१० असा आपला शाळेचा अभ्यासक्रम आहे तसाच हा भक्ती मार्गाचा प्रवास आहे. सामान्य जणांना तो पचेल आणि रुचेल आणि पेलेल अश्या स्वरुपात तो आपल्या त्रुशी मुनींनी आपल्याला सांगितला आहे. मी जर चुकत नसेन तर येशू ख्रीस्तानी एके ठिकाणी स्वर्गात राहणारा आमचा पिता असा उल्लेख केला आणि दुसरीकडे ते ईश्वराचे राज्य तुमच्या हृदयातच आहे असे म्हणतात. असे का?? या दोन विधानांची सांगड कशी लावता येईल हे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. कि सामान्याजानांशी बोलताना त्यांनी स्वर्गातला पिता असा उल्लेख केला आहे. कारण बहुजन समाजाला समजेल अशाच भाषेत त्यांना अध्यात्माचे धडे द्यावे लागतात. तर ईश्वराचे राज्य तुमच्या हृदयातच आहे असा उल्लेख त्यांनी अध्यात्माच्या जाणकारांसाठी केला आहे.

हिंदू धर्माबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. कारण हि नित्यनूतन अशी विचार धारा आहे. तिला कशाचे बंधन नाही. ती अनादी अनंत आहे.



"कोई मादर****** बटन दबा के ये डिसाइड नही करेगा कि मुझे कब मरना है???".


काल रात्री स्टारप्रवाह या वाहिनीवर लक्ष्य हि शोधमालिका चालू होती....मध्येच जाहिराती दरम्यान स्टारप्रवाह वाहिनीच्याच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत पुढील भागात काय होणार हे दाखवत होते...त्यात नायक श्रेयस पाटकर याचा भाऊ त्याला विचारतो कि, "बाबा कुठे आहेत??" आणि तो म्हणतो कि, "बाबा बोंब स्फोटात गेले..."...एक सर्वसामान्य समजूत आहे कि टीवीवरील मालिकांमध्ये जे दाखवले जाते ते समाज मनाचा आरसा असते...समाजात काय घडते हे त्या मालिकांमध्ये दाखवले जाते....ज्या गोष्ठी समाजात नित्याच्या झाल्या आहेत त्या दाखवल्या जातात....जर असे असेल तर बॉम्बस्फोट होणे हि नित्याची गोष्ठ झाली आहे असे मानायचे का??

मित्रानो,

आता विचार करण्याची वेळ निघून गेली आहे

बॉम्बस्फोट होणे हि गोष्ठ आता आपल्या अंगवळणी पडल्याचे जाणवत आहे...

बराच राग आहे या मनात...या विषयावर आतड्या पिळवटून निघतील इतके बोलायचेय......... पण काहीच सुचत नाहीये.....

काही अतिरेकी येतात...आमची माणसे मारतात आणि आम्ही???............ फक्त बघत राहतो...षंढ झालो आहोत का आपण??? कालपरवा पर्यंत केवळ काश्मीरपुरता मर्यादित असणारा दहशत वाद आज आमच्या उंब-यापर्यंत आला ....तरी आम्ही शांतच.........२६.११ च्या हल्ल्यातील पकडला गेलेला एकमेव अतिरेकी तो आज मस्त सरकारी पाहुणचार झोड्तोय...आणि आम्ही सरकारला दोष देत बसलोय....सरकार काहीतरी करेल...या भाबड्या आशेवर....

सरकारला काही करायचे असते तर १९९३ लाच काहीतरी केले असते...इतकी वर्षे वाट बघितली नसती.... अफझल गुरूला फाशी दिली असती...पण सरकारला काही करायचेच नाही आहे..... कारण अतिरेकी ज्या समाजातून आहेत तो समाज त्यांची वोट बेंक आहे....आता काहीजण म्हणतील कि दहशतवादाला आणि अतिरेक्यांना धर्म नसतो...आणि जर तुम्ही ह्याला मुस्लीम दहशतवाद म्हणत असाल तर त्याच न्यायाने मालेगावच्या स्फोटातील अतिरेकी हिंदू आहेत.....मग हा भगवा दहशतवाद झाला...

अहो...पण तुम्ही ज्यांची तळी उचलून धरताय त्यांना जाऊन विचारा...त्यांनी हे कृत्य कशासाठी केले??? ते काय उत्तर देतील ते ऐका....मग तुमची हि तत्वज्ञानाची पिचकारी मारा....कालपरवा पर्यंत जेव्हा मुस्लीम तरुण अतिरेकी म्हणून सापडत होते तेव्हा यांच्या मते दहशत वादाला धर्म, रंग नव्हता...मग आज अचानक हिंदू दहशतवाद कुठून आला??? अचानक या दहशतवादाला धर्म आणि रंग कसा लागला???....

मध्यंतरी वाचले कि अफझल गुरूच्या मुलाला घेऊन अफझल गुरूची फाशी रद्द करावी यासाठी प्रयत्नशील असणारे काही समाजधुरंधर राष्ट्रपतींकडे गेले...आणि त्यांना सांगितले कि हा अफझल गुरूचा मुलगा स्वतःला फाशी लावून घेत होता.......... कारण त्याला बघायचे होते कि, त्याच्या वडिलांना फाशी देताना किती त्रास होईल ते?? मग मला प्रश्न हा पडलाय कि, त्याच्या मुलाने हा विचार का नाही केला कि त्याच्या बापाने जे अतिरेकी कृत्य केले त्यात मारल्या गेलेल्या वीरांना मरतेसमयी किती त्रास झाला असेल??

सरकारला खरच अशा अतिरेकी कारवायांना प्रतिबंध घालायची इच्छा आहे का?? जर तुम्हाला वाटत असेल कि सरकार तशा प्रयत्नात आहे तर खालील माहिती वाचा...

कसाब आणि अफझल गुरु यांच्या फाशी च्या निर्णयाबाबत एका पत्रकाराने माहितीच्या अधिकारात काढलेली हि माहिती ,ही माहिती अत्यंत विदारक आहे .माहिती अशी :"अफझल गुरु आणी कसाब यांच्या फाशी बाबत ची फाईल राष्ट्रपतींकडे आलेली नसून ती अजून गृह मंत्रालयातच आहे" ._________________________________________________________________________

आता जरा खालील माहिती वाचा :

नाव _____________धर्म ____फाशीचा निर्णय प्रक्रिया कालावधी.

नथूराम गोडसे ______हिंदू ____125 दिवस

धनंजय कुमार_______हिंदू ____34 दिवस

रंगा और बिल्ला______हिंदू____28 दिवस

जिंदा आणि सुच्चा____शीख____76 दिवस

बेअंत सिंह__________शीख___87 दिवस

केहर सिंह__________शीख____87 दिवस

अफजल गुरु_____ मुसलमान_____5,967 दिवस

हि माहिती वाचून तुम्हाला वाटते का कि सरकारला या अतिरेक्यांवर कारवाई करायची इच्छा आहे???

अर्थातच कोणीही सुजाण नागरिक हे म्हणणार नाही.....कारण सरकारला या प्रश्नावर काहीच करायचे नही.....त्यांची ती इच्छाच नाही मुळी...

आज या देशाला गरज आहे ती मोसाद सारख्या एका सक्षम संघटनेची....ज्यावेळी पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाले त्याच वेळी मोसाद्चे १४ ऑफिसर्स वेगवेगळ्या देशांचे बनावट पासपोर्ट घेऊन दुबई मध्ये एका आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले....त्याच विमानतळावरील एका हॉटेल मध्ये हमास या पेलेस्टाइनी अतिरेकी संघटनेचा कमांडर उतरला होता...या १४ ओफिसर्सनी त्याच्या रूम मध्ये जाऊन त्याची लाय डीटेक्टिंग टेस्ट घेऊन त्याला विजेचे शोक दिले.....शेवटी विष पाजून ठार मारले आणि आले तसेच पुढच्या मोहिमेसाठी निघूनहि गेले....या १४ जनांत एक महिला सुद्धा होती....

.काही दशकांपूर्वी पेलेस्टाइन पुरस्कृत दहशतवाद्यांनी इस्राइलच्या एका फुटबॉल टीमला ओलीस ठेवले होते....बदल्यात इस्राइलने पकडलेल्या त्यांच्या काही अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली...इस्राइलने त्या अतिरेक्यांना सोडले नाहीच...परंतु पुढची दहा वर्षे देवाची इच्छा या नावाची मोहीम चालवली आणि त्या ओलीसनाट्यात सामील असलेल्या हर एक माणसाला जगाच्या पाठीवर जाऊन ठार केले....आज चहुबाजूनी मुस्लीम राष्ट्रांनी वेढलेला असूनही इस्राईल त्या सर्व राष्ट्रांना भारी पडत आहे त्याचे कारण हे आहे....काहीजण सांगतात कि आज मोसादमुळे इस्राईलच्या सीमेवरील गावे सुरक्षित नाहीत....सतत बॉम्बवर्षाव होत असतो...तिथले लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत...

मान्य....

पण आम्ही आजपर्यंत अशी कडक पाऊले उचलली नाहीत त्याचे काय फळ मिळाले?? जो दहशतवाद कधीकाळी केवळ काश्मीरपर्यंत मर्यादित होता तो आज देशाच्या बहुतांशी भागात पसरला आहे...त्याचे काय???..त्यामानाने त्यांची आतली गावे सुरक्षित आहेत....त्यांची राजधानी सुरक्षित आहे....

आज मुंग्या माराव्यात तशी आमचे देशबांधव मारले जात आहेत....... त्याचे काय?? आज घरातून निघालेल्या प्रत्येक माणसाला माहित नसते कि तो संध्याकाळी घरी येईल कि नाही...........त्याचे काय??? आज शहिदांच्या कुटुंबाना कोणी विचारत नाही.......... परंतु त्या अजमल कसाबची सरकारी जावयासारखी बडदास्त ठेवली जात आहे...त्याचे काय??? उद्या त्याचे लग्नही सरकार करून देईल......शेवटी म्हातारा होऊन आणखी काही दहशतवादी जन्माला घालून तो मरेल....आणि आम्ही इतिहासाच्या पुस्तकात अजमल कसाब हा कसा पराक्रमी होता हे वाचू...जसे आज बाबर आणि हुमायुनच्या कथा वाचतो.............

आम्ही काही मित्र या विषयावर जेव्हा बोलतो तेव्हा एक उदाहरण नेहमी दिले जाते....कि आणखी काही वर्षांनी चार हिंदुत्ववादी मित्र रात्री शतपावली घालायला गेले असताना एक मेकांना भेटतील....आणि त्यांच्यात जो संवाद रंगेल तो काहीसा असेल....

पहिला..- काय रे?? दिसला नाहीस गेला एक आठवडा???

दुसरा- अरे गेल्या आठवड्यात तो ब्लास्ट झाला ना....त्यात माझे काका गेले रे....त्यामुळे कुठे जाता आलं नाही....

तिसरा- अरे तो एक महिन्यापूर्वी ट्रेन मध्ये ब्लास्ट झाला ना त्यात माझे पन मामा होते रे....

चौथा- यार.... हे ब्लास्टचे नेहमीचेच झाले आहे... ते आपण पान खातो ना त्याचा भाऊ पण गेल्या आठवड्यातल्या ब्लास्ट मध्ये गेला...चल जाऊ दे....सकाळी ऑफिसला जायचे आहे....मी येतो...जय श्री राम ! जयतु हिंदूराष्ट्रम !

केवळ गप्पा आणि तोंडफुशारकी पुरता आपलं हिंदुत्व मर्यादित आहे का?? वेळ निघून चालली आहे.....सरकार काही करेल...एखादा हिंदुत्व वादी नेता काही करेल या आशेवर राहिलात तर संपलात.....आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल....या गोष्ठी समाजाच्या अंगवळणी पद्याच्या आधी पाऊले उचलावे लागतील.....

वेड्नसडे या सिनेमातले एक वाक्य लक्षात ठेवा...... "कोई मादर****** बटन दबा के ये डिसाइड नही करेगा कि मुझे कब मरना है???"....

आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे आहे ते???.........खूप उपासना केलीत शांती देवतेची............... आता त्रिशूल हाती घेतलेल्या आणि रुद्रावतार धारण करून तांडव करणा-या शिवाची उपासना करणे गरजेचे आहे....




जाता जाता एक घोषणा द्यावीशी वाटतेय मित्रानो,

"जिस हिंदू का खून ना खौले...खून नही वो पानी है !"

कृष्णाजी भास्कर.............दोन्ही बाजूनी पिचलेला एक भट !!


कृष्णाजी भास्कर...शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक दुर्लक्षित पामर.....इतिहासकारांनी त्यास महत्व द्यावे इतका मोठा नव्हताच कधी......त्याने शिवाजी महाराजांवर वार केला...अर्थात त्याबद्दल मतभेद आहेतच..कोणी म्हणत कि तो वार अफझलखानाने केला...आणि त्यास तलवार दिली ती कृष्ण्या भास्करने...तर काहीजण म्हणतात कि त्यानेच वार केला....असो....दोघेही शत्रूच...महाराजांवर चाल करून येणारा तो शत्रूच.....मग तो स्वकीय असो व परकीय.......

पण त्या कृष्ण्या भास्कराचे निमित्त करून काही जन महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला हि गोष्ठ हिंदुनी विसरून जावी अश्या प्रकारे प्रयत्न करत आहेत...त्याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नुकतेच एका बी-ग्रेडी थेराने केलेले विधान...तो म्हणे....'अफझल खानाने दगा केलाच नाही....दगा केला तो कृष्णा भास्कराने ...कारण अफझल तर शत्रूच....मग तो वार करणारच.....दगा कृष्णाजी भास्कराने केला'.....हे जर मान्य केले तर एक प्रश्न उरतोच....राजकारणात नेहमी शत्रूचा मित्र तो आपला शत्रूच असतो...मग अझल खानासारख्या शत्रूचा वकील तो मित्र कसा होईल??? तोही शत्रूच...त्याने वर केला ते त्याच्या शत्रू बुद्धीला स्मरूनच.....म्हणजे एकंदरीत या लोकांचा ब्राम्हण द्वेष इतका पराकोटीस गेला आहे कि त्यांना आता शत्रू कोण आणि मित्र कोण हे देखील समजेनासे झाले आहे..................

दुसरा एक युक्तिवाद असाही केला जातो....कि 'शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारला नसता...पण त्याने दगा केला म्हणून त्याला मारला'....जसा अफझल काही महाराजाबरोबर बुद्धिबळ खेळायला आला होता...आणि स्वेच्छा भोजन घेऊन परत जाणार होता...........अहो त्याने दगा केला नसता तरी राजांनी त्याला मारलाच असता.....तसं नसतं तर त्याला जावळीच्या दुर्गम प्रदेशात... प्रताप गडावर बोलावून घेण्याचे प्रयोजनच नव्हते.......मुसलमानांशी असलेलं वर्तमान काळातलं शत्रुत्व वाढू नये म्हणून आपल्याच पूर्वजांचा पराक्रम नाकारण्यात कसला आलाय मोठेपणा???........

आता अफझल खानच्या स्वारीबद्दल बोलू....अफझल खान हा विजापूरचा मातब्बर सरदार...प्रचंड ताकद आणि भल्याबू-या मार्गाने आपले इप्सित साध्य करण्यात माहीर.......असे म्हणतात कि जेव्हा तो त्याच्या गुरूपुढे गेला तेव्हा त्याचा गुरु म्हणाला होता, " इसका सर कहा है???".....असा हा अफझल म्हणजे दुधाचा धुतलेला नव्हताच.....शहाजी महाराजांवर रात्री बेसावध स्थितीत हल्ला करणारा आणि त्यांना कैद करून भर विजापुरात त्यांची धिंड काढणारा हा अफझलखान.....शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांना कनकगीरीच्या वेढ्यात फसवून मारणारा सुद्धा अफझलखान......एका वेढ्यातून औरंगजेबाला जाऊ दिला म्हणून एका बड्या मुस्लीम सरदाराचा दरबारात येताना खून करणारा सुद्धा अफझल खान......असा हा अफझल खान...स्वराज्यावर चालून आला......येताच त्याने वाटेतील मराठा सरदारांना त्याच्या पक्षास येऊन मिळण्यासाठी पत्र आणि धमक्या देण्यास सुरु केले.....काही गद्दार गेले तिकडे....निष्ठावंत मराठे भगव्याखाली एकत्र आले.....

अफझल स्वराज्यात येताच त्याने चहूकडे धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली...महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांना त्रास देण्यास सुरुवात केली.....महाराजांची कुलदैवत भवानी आई जात्यात भरडली......हेतू हा कि शिवाजी जो प्रताप गडावर बसला आहे तो चवताळून बाहेर यावा....परंतु महाराज हा त्याचा हेतू जाणून होते....शत्रूस सोयीस्कर भागात लढाईस जावू नयेच तर उलट त्याला आपल्याला सोयीस्कर अश्या मैदानात आणावे आणि त्याचा फडशा उडवावा हा महाराजांचा युद्धामंत्र !!!!

शेवटी महाराजांनी खानाशी बोलणी चालू केली....त्यावेळी त्याचा वकील कृष्णा भास्कर हा भेटीसाठी येत होता.....मराठा इतिहासकार 'मा. श्री. रणजीत देसाई' यांनी त्यांच्या 'लक्षवेध' या ग्रंथात सप्रमाण सांगितले आहे कि एकदा महाराज आणि कृष्णाजी भास्कराची भेट झाली आणि महाराजांनी त्याच्या हातात बेल्फुल देऊन त्यास विचारले कि, " तुम्ही ब्राम्हण आहात...खरे ते सांगा.....अफझलच्या गोटात काय नेमके शिजत आहे???'....कृष्णाजी म्हणाला.." महाराज मी वकील आहे...त्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही...कारण माझी बायका पोर तिकडे आदिलशाहीत आहेत.....परंतु...अफझल खानाने विडाच असा उचलला आहे कि 'चढ्या घोड्यानिशी शिवाजीला जिंदा किवा मुर्दा आदिलशाही दरबारात हजर करतो....".....

अश्याप्रकारे आपण पाहू शकता कि अफझल खान हा शिवाजी महाराजांना कैद करायलाच आला होता.....पण त्याच्याच नशिबाचे फासे फिरले होते हे कोणासही ठाऊक नव्हते.....ठरल्याप्रमाणे महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला .....महाराजांनी आपल्या पित्याच्या अपमानाचा आणि भावाच्या मृत्यूचा सूड घेतला होता......या ठिकाणी आपण एक गोष्ठ विसरतो....आज शिवाजी महाराजांवर वार करणारा एक कृष्णाजी भास्कर म्हणून समस्त ब्राम्हण समाजास वेठीस धरले जात आहे...मग असे असताना शिवाजी महाराजांवर वार करणारे दोघे मुसलमान होते...एक अफझल खान आणि दुसरा सय्यद बंडा....मग त्यांच्या धर्माबद्दल आणि त्यांच्या कपटी काव्याबद्दल का कोणी (हे कोणी..कोण आहेत ते तुम्हा सगळ्यांना चांगलेच माहित आहे) एक चकार शब्द तोंडातून काढत नाहीत???

परंतु या फक्त ऐतिहासिकच नव्हे पिढ्या नि पिढ्यांना मार्गदर्शक ठरणा-या या पराक्रमानंतर सुरु झाले एक नाट्य....रामायणातल्या एका प्रसंगाशी साम्य दाखवणारे....रामायणात माता सीतेला पळवून नेण्याची योजना जेव्हा रावणाने आखली...तेव्हा मदत लागेल म्हणून तो मारीच या राक्षसाकडे गेला......मारीच हा पूर्वाश्रमीचा राक्षस होता...परंतु नंतर तो एक त्रुशी म्हणून ईश्वर साधनेत रममाण होऊ लागला होता.....परंतु रावणाने त्यास माता सीतेला पळवून नेण्याचे कमी मदत करण्यास सांगितली....त्याने ती सुरुवातीस नाकारली.....मग रावणाने त्यास सांगितले कि जर तू मला या कमी साहाय्य केले नाहीस तर आत्ताच तुझी मान उडवतो...मारीचाने विचार केला...ह्याचा हातून मरण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या हातून मारू...त्याने निदान मोक्ष तरी मिळेल.....

आता एक क्षण असा विचार करू कि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अंगावर एका ओरखडाही न घेता परत आदिलशाहीत गेला असता तर काय झाले असते???...आदिलशाही म्हणजे काय आहे याचा अनुभव शिवाजी महाराजांच्या घराण्याला चांगलाच होता.....शहाजीराजांविरुद्ध आघाडी उघडणारी सुद्धा आदिलशाहीच होती.........शहाजी महाराजांचे स्वराज्याचे मनसुबे हाणून पाडणा-या मुरार जगदेवाचा खून केला तोहि आदिलशहानेच....

जर अश्यावेळी कृष्णाजी भास्कर परत गेला असता तर ...काय झाले असते??...शेवटी कृष्णाजी भास्कर जरी त्यांच्या सेवेत असला तरी त्यांच्यासाठी तो काफरच....अफझल खानच्या सैन्यातले कोणी वाचले नाही....त्याचा जवळ असणा-यांपैकी तर कोणीहि परत आले....मग हा कसा परत आला??? याचाच अर्थ कृष्णाजी भास्कर बंडखोर शिवाजीला मिळालेला आहे.....मग करा या काफाराचे हाल.....आणि शिक्षा काय झाली असती???? तर कृष्णाजी भास्कराच्या बायकांना भर बाजारात बेअब्रू केले असते...त्याच्या लहान मुलांना ठार केले असते आणि शेवटी सर्वांसहित कृष्णाजी भास्करालाही ठार केले असते......आणि ह्या गोष्ठीची जाणीव कृष्णा भास्कारालाही होतीच....

अश्यावेळी कृष्णाजी भास्कराने एक चाल खेळली असण्याची शक्यता आहे...शेवटी ब्राम्हणी डोके आणि त्यात वकील........त्याला माहित होतेच कि जे शिवाजी राजे अफझल सारख्या बलाढ्य शत्रूला मारू शकतात त्याचाच अर्थ ते मलाही मारू शकतात.....मग आदिलशाहीत जिवंत जाऊन कुत्र्याच्या मौतीने मरण्यापेक्षा इथेच या देवपुरुषाच्या हातून का मरू नये???...तिथे आदिलशाहीत मेलो तर कुत्रे सुद्धा ओळखणार नाही.....आणि माझे कुटुंब तेही विनाकारण मारले जाईल...त्यापेक्षा मी इथे या पराक्रमी राजाच्या हातून मेलो तर ...... मी लढलो होतो हे सिद्ध होईल आणि त्यायोगे माझे कुटुंब तरी वाचेल......म्हणून कृष्णाजी भास्कराने महाराजांवर चाल केली असण्याची शक्यता आहे........नव्हे मी तर म्हणेन कि त्याने यासाठीच चाल केली....

अर्थात .शेवटी कितीही झाला तरी तो शत्रूच होता.....त्यामुळे त्याने जे केले ते योग्यच होते असे मी तरी म्हणणार नाही....परंतु या गोष्टीचा या बाजूने विचार होणेही गरजेचे आहे... ..
आणि मी इथे नमूद करेन कि हा विचार आणि त्यादृष्ठीने योग्य ते निपक्षःपाती संशोधन मराठ्यांनी करावे...........कारण 'आपला तो बहुजन आणि दुस-याचा बामन' हि सवय आता मराठ्यांमध्ये सुद्धा रुजत चालली आहे.......

जय भवानी !! जय शिवाजी !!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विशेष आभार- मयेकर सर...
ह्या लेखाचा शब्दप्रपंच माझा असला तरी मूळ मुद्दा हा माझे एक मित्र मयेकर यांचा आहे....