माझ्या मागच्या लेखात मे म्हटल्याप्रमाणे सध्या काही संघटना संतांची जातींच्या खंदकांमध्ये विभागनी करु पाहत आहेत. या संघटणांनी संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची परस्पर मराठा आणि ब्राम्हण जातीत विभगनी करुन ठेवली आहे. काय विरोधाभास आहे बघा,
संत तुकाराम महाराजांनी जातीव्यवस्थेवर हल्ला केला असे सांगणा-या संघटनाच संत तुकाराम महाराजांना मराठा या एका जातीत बंदिस्त करु पाहत आहेत.. याउलट
“वडील गेले ग्रामणी करुन ! आम्हा भोवते ! “
अर्थात आमचे पुर्वजांनी केलेल्या चुका आम्ही भोगतो आहोत असे म्हणत ब्राम्हणांचे काण टोचनारे रामदास कर्मठ ब्राम्हन म्हनुन हिनवले गेले. दोन्ही संतांचा हा केवढा अनादर??
प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या ‘रामदास प्रतिमा आणि प्रबोध’ या पुस्तकाच्या पप्रस्तावनेत प्राचार्य श्री. शिवाजीराव भोसले
म्हणतात, “ या महाराष्ट्रात समर्थांना भक्ता
बरेच भेटले.
पन सारासार
विचार करनारे
अभ्यासक फार्ससे
भेटले नाहीत.
याउलट संत तुकाराम
महाराजांना १९ व्या शतकापासुन अभ्यासक
फार भेटले.
पन त्यांनी
स्वताःला हवे
तेवढेच तुकाराम
डोक्यावर घेतले.
या दोन्ही
संतांची व्यापक
मानव्याची शिकवणूक नजरेआड केली गेली.
एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रउभारणीच्या
काळात इतिहास
मिमांसकांना रामदास राष्ट्रनिर्माणाचे
धडे देनारे
गॉडफादर वाटले……
तर समाजसुधारकांना
तुकाराम त्यांच्या
काही कठोर
अभंगांमुळे थोर समाजसुधारक वाटले. पन
एका अनादि
अनंत तत्वाशी
एकरुप होऊ
पाहना-या या संतांना एका विशिष्ठ कार्यापुरता मर्यादित करुन ठेवने कितपत योग्य / अयोग्य होते याचे उत्तर आज काही संघटनांनी या उभय संतांची परस्पर दोन जातींत विभगनी करुन दाखवुन दिले आहे!
पुढे सरकण्यापुर्वी संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांच्या विचारांतील सांम्य एकदा पाहुन घेउ.
उभय संत ऐहिक दृष्ट्या दोन दिसत असले तरी अनंत परमेश्वरापाशी दोघेही लीन असल्यामुळे त्यांच्यात वैचारिक भेद असा जाणवत नाही, हे खालील काही संदर्भांवरून आपल्या लक्षात येईल,
नरदेह महती आणि मनुष्य जीवनाचे साध्य सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय ! पुर्वपुण्ये होय लाभ याचा !!१!!
अनंत जन्मीचा शेवट पाहता ! नरदेह हाता आला तुझ्या !!२!!
करील ते जोडी येईल कार्यासी ! ध्यावे विठ्ठलासी सुखालागी !!३!!
सांचलिया धन होईल ठेवणे ! तैसी नारायण जोडी करा !!४!!
करा हरिभक्ती परलोकी कामा ! सोडवील यमापासोनिया !!५!!
तुका म्हणे करा आयुष्याचे मोल ! नका वेचू बोल नामाविण !!६!!
सार्थ तुकारामाची गाथा - अभंग 3०२४
दासबोधात अगदी हेच रामदास सुद्धा सांगताना दिसतात,
धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |
जो जो कीजे परमार्थलाहो | तो तो पावे सिद्धीतें ||१|| दशक १: समास १०: श्लोक १
देह परमार्थीं लाविलें | तरीच याचें सार्थक जालें |
नाहीं तरी हें वेर्थचि गेलें | नाना आघातें मृत्यपंथें ||६१|| दशक १: समास १०: श्लोक ६१
बहुतां जन्मांचा सेवट | नरदेह सांपडे अवचट |
येथें वर्तावें चोखट | नितिन्यायें ||१|| दशक ११: समास ३: श्लोक १

परमार्थ आणि प्रपंच यांची सागड कशी घालावी हे सांगताना ह्या दोन्ही संतांच्या विचारात कमालीचे साम्य आढळून येते.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ! उदास विचार तेच करी !!१!!
उत्तमचि गती तो एक पावेल ! उत्तम भोगील जीव खाणी !!२!!
परउपकारी नेणे परनिंदा ! परस्त्रिया सदा बहिणी माया !!३!!
भूतदया गाई पशुंचे पालन ! तान्हेल्या जीवन वनमाजी !!४!!
शांतीरुपे नव्हे कोणाचा वाईट ! वाढावी महत्व वडिलांचे !!५!!
तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ ! परम पद वैराग्याचे !!

( सार्थ तुकाराम गाथा २०८५)
आधीं प्रपंच करावा नेटका |
मग
घ्यावें परमार्थविवेका |
येथें आळस करूं नका |
विवेकी हो ||१||
दशक बारावा : समास पहिला : श्लोक १
नाना वेश नाना आश्रम |
सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम |
जेथें पावती विश्राम |त्रैलोक्यवासी ||१||
जेथें पावती विश्राम |त्रैलोक्यवासी ||१||
दशक चौदावा : समास सातवा : श्लोक १
नम्रपणा म्हणजे कमजोर पण नव्हे. समाजात वावरताना चांगल्या आणि वाईट दोन्ही वृत्तींशी गाठ पडणार हे अटळ असते. समाजात वीरवृत्ती वीरवृत्ती निर्माण व्हावी ह्यासाठी कसे वागणे असावे हे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात,
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ! कठीण वज्रास भेदु ऐसे !!१!!
मेले जीत असे निजोनिया जागे ! जो जो जे जे मागे ते ते देऊ !!२!!
भले तर देऊ कासेची लंगोटी ! नाठाळ्याचे काठी देऊ माथां !!३!!
मायाबापाहुनी बहु मायावंत ! करू घातपात शत्रुहुनी !!४!!
अमृत ते गोड काय आम्हा पुढे ! विष ते बापुडे कडू किती !!५!!
तुका म्हणे आम्ही अवघेची गोड ! जया पुरे कोड त्याचे परी !!६!!
सार्थ तुकाराम गाथा ५८६

अगदी हेच समर्थ त्यांच्या दासबोधात सांगताना दिसतात,
हुंब्यास हुंबा लाऊन द्यावा | टोणप्यास टोणपा
आणावा | लौंदास पुढें उभा करावा | दुसरा लौंद ||२९||
धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट | अगत्य करी ||३०||
जैशास तैसा जेव्हां भेटे | तेव्हां मज्यालसी थाटे |
इतुकें होतें परी धनी कोठें | दृष्टीस न पडे ||३१ ||
जैशास तैसा जेव्हां भेटे | तेव्हां मज्यालसी थाटे |
इतुकें होतें परी धनी कोठें | दृष्टीस न पडे ||३१ ||
अडीअडचणीत एकमेकांना मदत करावी. त्यांच्या संकटाच्या वेळी निरपेक्ष वृत्तीने मदत करणे म्हणजे परोपकार हे दोन्ही संतांचे सांगणे आहे,
जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले !!१!!
तोचि साधू वोळखावा ! देव तेथेचि जाणावा !!२!!
मृदू सबाह्य नवनीत ! तैसे साज्जनाचे चित्त !!३!!
ज्यासी अपंगिता नाही ! त्यासी धरी जो हृदयी !!४!!
जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले !!१!!
तोचि साधू वोळखावा ! देव तेथेचि जाणावा !!२!!
मृदू सबाह्य नवनीत ! तैसे साज्जनाचे चित्त !!३!!
ज्यासी अपंगिता नाही ! त्यासी धरी जो हृदयी !!४!!
दया करणे जे पुत्रांसी ! तेचि दासां आणि दासी !!५!!
तुका म्हणे सांगू किती ! त्याची भगवंताची मूर्ती !!६!!
सार्थ तुकाराम गाथा - अभंग २०१
तुका म्हणे सांगू किती ! त्याची भगवंताची मूर्ती !!६!!
सार्थ तुकाराम गाथा - अभंग २०१
समर्थ रामदास हेच आपल्या श्लोकात सांगताना नाही दिसत का???
दशक एकोणिसावा : समास नववा ! श्लोक २९ ते ३१
शरीर परोपकारीं लावावें | बहुतांच्या कार्यास यावें |
उणें पडों नेदावें | कोणियेकाचें ||५||
आडले जाकसलें जाणावें | यथान्शक्ति कामास यावें |
मृदवचनें बोलत जावें | कोणीयेकासी ||६||
दुसऱ्याच्या दुःखें दुःखवावें | परसंतोषें सुखी व्हावें |
प्राणीमात्रास मेळऊन घ्यावें | बऱ्या शब्दें ||७|
दशक १२ : समास १० : श्लोक ५ ते ७
परोपकार सांडूं नये | परपीडा करूं नये |
दशक १२ : समास १० : श्लोक ५ ते ७
परोपकार सांडूं नये | परपीडा करूं नये |
विकल्प पडों देऊं नये | कोणीयेकासी ||४४||
दशक १४ : समास १: श्लोक ४४
दशक १४ : समास १: श्लोक ४४
समाज म्हटला कि त्यात नाना विचारधारांचे लोक असतात. समाजात जशी श्रद्धावान माणसे असतात तशीच अंधश्रद्धाळू माणसे देखील असतात. देवाच्या नावाखाली परंपरेने जोपासलेल्या अडाणी समजुती समाजात ठाण मांडून असतात. संताना ईश्वर काय आहे हे नेमके समजलेले असल्याने ते अशा अडाणी समजुतीवर हल्ला चढवताना दिसतात. समर्थ रामदास आणि संत तुकाराम महाराज हे असेच समाज प्रबोधन करणारे संत असल्याने त्यांच्या लेखनात आपल्याला अशा अंधश्रद्धांवर हल्ला चढवलेला दिसतो.
वैद्य वाचविता जीवा ! तरी कोण ध्याते देवा !!१!!
काय जाणो कैसी परी ! प्रारब्ध जे ठेवी उरी !!२!!
अंगी दैवत संचरे ! मग तेथे काय उरे !!३!!
नवसे कन्या पुत्र होती ! तरी का करणे लागे पती !!४!!
जनी हा विचार ! स्वामी तुकयाचा दातार !!
(सार्थ तुकाराम गाथा - अभंग १८७)

दुश्चिन्हें अथवा अपशकुन | मिथ्या वार्तेनें भंगे मन |
वचके पदार्थ देखोन | या नांव भ्रम ||२०||
वचके पदार्थ देखोन | या नांव भ्रम ||२०||
मेलें मनुष्य स्वप्नीं आलें | तेणें कांहीं मागितलें |
मनीं अखंड बैसलें | या नांव भ्रम ||२६||
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं | आणी वाचून जाते सटी |
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं | आणी वाचून जाते सटी |
ऐशा प्रकारीच्या गोष्टी | या नांव भ्रम ||३४||
दशक १० : समास ६
दशक १० : समास ६
जसे मी म्हटले कि, " समाज म्हटला कि त्यात नाना विचारधारांचे लोक असतात" समाजात त्याकाळी जशा अनेक अंधश्रद्धा होत्या तसेच अनेक भेदाभेद सुद्धा होते. जातिभेद हा तर पराकोटीला पोहोचलेला होता. पण संत हे चराचरत व्यापून राहिलेल्या परमेश्वरासी एकरूप झालेले असल्याने त्यांच्याठाई कसलाही भेद उरत नाही. समस्त मानव हे त्यांना आपलेच वाटू लागतात. त्यांचा विरोध असतो मानवामधील बु-या - वाईट वृत्तीना. जातीभेदाबद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ !!१!!
आईकाजी तुम्ही भक्त भागवत ! कराल ते हित सत्य करा !!२!!
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर ! वर्म सर्वेश्वर पूजनाचे !!३!!
तुका म्हणे एका देहाचे अवयव ! सुखदुःख जीव भोगे !!४!!
(सार्थ तुकाराम गाथा - अभंग २१)

तर समर्थ रामदास म्हणतात,
ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोवळें | शूद्राचें ब्रह्म तें वोवळें |
ऐसें वेगळें आगळें | तेथें असेचिना ||२५||
दशक ७ : समास २ : श्लोक २५
दशक ७ : समास २ : श्लोक २५
यावरून आपल्याला कळले असेलच कि संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास हे दोघे सकृतदर्शनी वेगवेगळ्या देवतांचे उपासना करीत असले तरी त्यांचे अंतरंग एकाच प्रकारच्या विचारांनी भरलेले होते. शेवटी समर्थ रामदास म्हणतात तेच खरे,
साधु दिसती वेगळाले | परी ते स्वरूपी मिळाले |
साधु दिसती वेगळाले | परी ते स्वरूपी मिळाले |
अवघे मिळोन येकचि जाले | देहातीत वस्तु ||३१|
दशक ७ : समास २ : श्लोक ३१
ज्यानी संसारच केला नाही तेच सांगतात संसार करावा नेटका.
उत्तर द्याहटवाखरंय! शिक्षक जिल्हाधिकारी नसतो. काही फक्त मुलांच्या शाळा असतात काही मुलींच्या तर काही शाळांमध्ये मुले मुली दोन्ही असतात. तरिही अभ्यासक्रम एकच. सर्व संत एकच अभ्यासक्रम शिकवतात. व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्याच वेगळ्या स्वीकृती म्हणून संतांच्या वेगवेगळ्या कृती.
हटवाखालील ओव्या वाचल्यावर समर्थांना काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.. आणि समर्थांचा प्रपंच खूप मोठा होता याची सर्व सामान्य माणसाला कल्पना येणार नाही.. त्यांनी अनेक मठ उभारले, अनेक लोकांना नामाला लावले महाराष्ट्र भर फिरले.. यवनी आक्रमणा मुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा दिला.. जे त्यांच्या म्हणण्या प्रमाणे वागले ते लोक शिष्य म्हणजे त्यांचा परिवारच होता आणि तोच त्यांचा प्रपंच होता.. फक्त लग्न करण म्हणजे प्रपंच असं नाहीये.. त्यांनी लग्न केलं नाही पण रामाच्या नावाने खूप मोठा प्रपंच केला.. ते स्वतः निर्भेळ आनंद मिळवून राहिले व लोकांना पण त्याचा मार्ग प्रपंचा मध्ये राहून कसा मिळवता येईल याची विद्या दिली..
हटवाआधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।
येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥
प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥
प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।
मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥
परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगिसी ।
अंतीं परम कष्टी होसी । येमयातना भोगितां ॥ ४ ॥
साहेबकामास नाहीं गेला । गृहींच सुरवडोन बैसला ।
तरी साहेब कुटील तयाला । पाहाती लोक ॥ ५ ॥
तेव्हां महत्वचि गेलें । दुर्जनाचें हासें जालें ।
दुःख उदंड भोगिलें । आपुल्या जीवें ॥ ६ ॥
तैसेचि होणार अंतीं । म्हणोन भजावें भगवंतीं ।
परमार्थाची प्रचिती । रोकडी घ्यावी ॥ ७ ॥
संसारीं असतां मुक्त । तोचि जाणावा संयुक्त ।
अखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ॥ ८ ॥
प्रपंची तो सावधान । तो परमार्थ करील जाण ।
प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थीं खोटा ॥ ९ ॥
म्हणौन सावधपणें । प्रपंच परमार्थ चालवणें ।
ऐसें न करिता भोगणें । नाना दुःखें ॥ १० ॥
॥ श्रीमत् दासबोध ॥
दशक बारावा : विवेकवैराग्य
समास पहिला : विमळ लक्षण
अप्रतिम लेख 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा