सोमवार, २८ मे, २०१२

हिंदू शब्दाचा उगम !!


सध्या काही संघटना आणि त्यांच्या तर्फे खरेदी केलेल्या व्यक्ती ह्या हिंदू धर्मावर सतत आरोप करत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे कि "हिंदू हा शब्द मुस्लिमांनी कुत्रा, नीच, गुलाम या अर्थी वापरला." त्या मूर्ख लोकांना उत्तर देण्यासाठी हा माझा आजचा लेख नसून माझ्या हिंदू बंधूना 'हिंदू' या शब्दाचा उगम कोठे आहे हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे. कारण कोणी कितीही सांगितले तरी हे लोक हि गोष्ठ मान्य करणार नाहीत कारण त्यांचे पोट हिंदू द्वेषावर अवलंबून आहे. आणि आपण हिंदू एखादवेळेस एखाद्याच्या पाठीवर मारू पण पोटावर नाही. त्यामुळे माझे म्हणणे त्यांनी मान्य करावे हि माझी इच्छा नाही आणि ते मान्य करतील अशी अपेक्षा सुद्धा नाही. कारण वर दिलेच आहे. असो.

तर 'हिंदू' या शब्दाबद्दल आपल्या धर्मग्रंथात कोणते पुरावे मिळतात ते प्रथम पाहू.

शब्द कल्पद्रुम" जो दुसर्या शतकात रचला आहे,त्यात एक मंत्र आहे..

||"हीनं दुष्यति इतिहिंदू जाती विशेष:"||अर्थात हीन कामाचा त्याग करणार्याला हिंदू म्हणतात.

असाच"अदभुत कोष" मध्ये एक मंत्र येतो .........................

||"हिंदू: हिन्दुश्च प्रसिद्धौ दुशतानाम च विघर्षने"|| अर्थात हिंदू चा अर्थ दृष्टांचा नाश करणारा असा होतो..

"वृद्ध स्म्रति (सहावी शतक)" मध्ये एक मंत्र आहे ,........................... ||हिंसया दूयते यश्च सदाचरण तत्पर: वेद्.........हिंदु मुख शब्द भाक् ||

अर्थात जो सदाचारी वैदिक मार्गावरून चालतो, हिंसे मुळे ज्याला दुख होते, तो हिंदू आहे..

"ब्रहस्पति आगम"(हा कधीच आहे माहित नाही)

||"हिमालय समारभ्य यवाद इंदु सरोवं। तं देव निर्वितं देशम हिंदुस्थानम प्रच्क्षेत ||म्हणजे हिमालय पर्वतापासून इंदू(हिंद) महासागर पर्यंत जो प्रदेश देव-पुरुष ह्यांनी तयार केला त्याला हिंदुस्तान म्हणतात.

अर्थात हे पुरावे आपल्या धर्मग्रंथात आहेत. त्यामुळे ते विशिष्ठ समाजद्वेशी मंडळी हा पुरावा मान्य करतील अशी तिळमात्र आशा नाही. म्हणून त्यांचे जे म्हणणे आहे कि 'हिंदू हा शब्द मुस्लीम आक्रमकांनी येथील लोकांसाठी तुच्छ म्हणून वापरला आहे.' तर मुस्लीम ज्या पर्शिया मधून भारतात आले तेथे हिंदू हा शब्द कधीपासून वापरात होता आणि तो कशासाठी म्हणून वापरला जात होता हे सांगण्याचा हा प्रयत्न.

प्राचीन काळी म्हणजे वेदांच्या निर्मितीच्या काळी भारतात आर्य आणि अनार्य असे राहत होते. आर्य भारतातलेच कि भारताबाहेरचे ह्या वादात मला पडायचे नाही. कारण जागतिक पातळीवरील विद्वान जे या प्रश्नावर संशोधन करत आहेत ते अजूनहि या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर शोधू शकले नाहीत. आणि या प्रश्नावर अनेक आतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे झाली असून त्यातूनही विद्वान या प्रश्नांचे उत्तर शोधू शकले नाहीत. काहींच्या मते आर्य भारतातूनच बाहेर गेलेत. तर काहींच्या मते आर्य भारतात बाहेरून आलेत. आणि या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्वान हमरीतुमरीवर आलेले आहेत. आणि सरतेशेवटी असे ठरले आहे कि " काही निर्णायक पुरावा मिळेपर्यंत आर्यांचा प्रश्न बासनात गुंडाळून ठेवावा."

तर आर्यांच्या या अशा यक्षप्रश्नात जिथे मोठेमोठे विद्वान काही निर्णायक उत्तर शोधू शकले नाहीत तिथे तुमच्या माझ्यासारख्या अल्पमती माणसाने आपले शहाणपण न दाखवलेलेच बरे!!

तर दास, पणी आणि दस्यू हे अनार्य होते आणि त्यांचे वास्तव्य वायव्य सरहद्द प्रांतात होते. आर्यांचे आणि त्यांचे वैर पुरातन काळापासून होते. ते अश्रद्ध, लिंगपूजक, यज्ञ न करणारे होते. परंतु विशेष म्हणजे दास हे विश्वामित्राचे वंशज असल्याचे सांगितले आहे. यदु आणि तुर्वश यांचाही काहीवेळा दास म्हणून उल्लेख येतो. या संदर्भात दिवोदास, सुदास, त्रसदस्यु या नावातील 'दास' हे उपन्त्यापद लक्षणीय आहे. यदु आणि तुर्वश हि जमात भारतात बाहेरून आल्याचा उल्लेख त्रुग्वेदात आहे. दास, दस्यू आणि आर्य यांच्यात सदैव वैर होते अशातला भाग नाही. किवा आर्य आणि अनार्य हे वेगवेगळे होते अशातला भाग नाही. एखादेवेळेस आर्य आणि दास यांना समान शत्रू मिळाला कि यांची एकी होत असे. काहीवेळा दास आर्यांच्या देवता पूजित असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.(८.५.३१.) इंद्र हा आर्यांचा आणि दासांचाही देव होता. ( भरतांबरोबर इंद्राने यमुना पार केली).ते सुवास्तु (हल्लीची स्वात) नदीच्या खो-यात राहत असत. इंद्राने दासांची ९९ पुरे फोडली म्हणून त्याला पुरंदर हे पद मिळाले. दास आणि आर्यांच्या शत्रुत्वाचे कारण नंतर एक सविस्तर लेख लिहून मांडेन.

काहीकाळाने प्रतिकूल पर्यावरणामुळे दासानी भारतातून स्थलांतर केले. हे दास म्हणजे इराणमधील दाह आणि ग्रीकमधील दाहे हे आता पुरातत्व संशोधक मान्य करू लागले आहेत. आणि यांची संस्कृती हि प्राचीन पर्शिया आणि सध्याच्या इराणमधील झोरोऑस्ट्रियन संस्कृती होय. आणि हे झोरोऑस्ट्रियन म्हणजे सध्याचे भारतातील पारसी होत. तर दासांचा प्रमुख अहुरा माझदा (वैदिक असुर - 'स' चा उच्चार इराणमध्ये 'ह' असा केला जातो. ) याने आपल्या जमातीला घेऊन इराणमध्ये स्थलांतर केले. एकंदर या स्थलांतरात त्यांनी सोळा भागात वास्तव्य केले. ते सोळा भाग झोरोऑस्ट्रियन लीकांच्या झेंड अवेस्ता या धर्मग्रंथात सांगितले आहेत. झेंड अवेस्ता हा ग्रंथ भाषेच्या दृष्ठीने त्रुग्वेदाला अगदी जवळचा ग्रंथ मानला जातो. तो त्यांचा वेदच म्हणावा लागेल. त्याचा काळ इ.पु.१००० असा आहे. परंतु काही संशोधक तो इ.पु. १४०० असा मागे नेतात. कसेही असले तरी तो त्रुग्वेदानंतरचा आहे यात दुमत नाही. त्यांच्या आणि आर्यांच्या धार्मिक समजुतीत खूपच फरक आहे. त्यांची दैवते असुर असून ते देवांना दैत्य मानीत. परंतु ज्याप्रमाणे हिंदूमध्ये ३३ कोटी देव हि संकल्पना आहे तसेच त्यांच्या ग्रंथात ३३ देवांचे एक मिथक आढळते. अवेस्ताचे वेदीदांद आणि विस्पराद व यास्न हे दोन मुख्य भाग आहेत. वेदिदांद मध्ये त्यांच्या धार्मिक समजुती आणि मिथकांची माहिती आहे. याशिवाय त्यात आहुर माझदा याने इंडो-इराणी(झोरोऑस्ट्रियन) लोकांच्या नेत्याने त्यांना घेऊन जी स्थलांतरे केली त्यांची माहिती दिली आहे. (फरगर्द-१-१). प्रतिकूल पर्यावरणामुळे त्यांना ती करावी लागली होती. ती सोळा स्थाने खालील प्रमाणे आहेत.

क्रमांक अवेस्तामधील नाव ग्रीक नाव हल्लीचे नाव

१. ऐर्यानाम वेजो -- अफगाणिस्तानातील अरीयाना

२. सुग्धा सोग्डीयाना समरकंद

३ मौरू मार्गीयाना मेरू

४. बखडी (संस्कृत - वाल्हीक) बेकट्रीया बाल्ख

५. बिसाया न्यासा ---

६. हरोयू (संस्कृत - शरयू) ऐरीया हेरत

७. वेकरेता -- काबुल

८. उर्व -- काबुल

९. ख्नेता हिरकांनीया कंदाहार

१०. हरैवती (संस्कृत - सरस्वती) अराकोसिया हरुत

११. हेतुमंत एतुमेंद्रोस हेलमंड

१२. रघा रगै राय

१३. चाखारा (संस्कृत - चक्र) --- खोरासान(?)

१४. वरेन (संस्कृत - वरून) -- --

१५. हप्तहिंदू (संस्कृत - सप्तसिंधू) इंदोई पंजाब

१६. रंघा -- केस्पियान समुद्राच्या आसपासचा प्रदेश

यावरून आपण पाहू शकता कि हिंदू शब्द हा इस्लामपूर्व काळापासून वापरत होता. एवढेच नव्हे तर तो भूभाग म्हणून वापरत होता. मोहम्मद पैगंबरांची एक शिष्य तिचे नावही हिंद असे होते आणि ती पूर्वाश्रमी एक मूर्तिपूजक होती आणि इस्लामची कट्टर विरोधकही होती. नंतरचत मोहम्मद पैगाम्बारशी एका भेटीच्या वेळी तिचे मतपरिवर्तन झाले. आणि तिने इस्लाम स्वीकारला.

हिंदू हा शब्द हा साप्तसिंधुंच्या भूभागास दिलेले नाव होते. नंतरच्या काळात या भागात राहणारे लोक हे हिंदू म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि मुस्लिमांनी हे नाव आम्हास दिले नसून आमचेच एक बांधव जे त्यांचे पूर्वज होते त्यांनीच हे ह्या भूभागाला दिले आहे. आणि त्यांच्या वंशजांनी हेच नाव पुढेही वापरले.

हिंदू हा धर्म नाही..तर ती एक संस्कृती आहे. वेगवेगळे विचारप्रवाह आणि धर्ममत असणारे तरी एकाच भूभागात गुण्या गोविंदाने नांदणारी हि एक संस्कृती आहे.

जय हिंदुराष्ट्र !!



शिवरायांच्या नावाआडून विद्वेषाची पेरणी - रवींद्र गोळे (आधारित - साप्ताहिक विवेक - ३ जुलै,२०११ )


महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक चळवळीची नोंद आजवर झालेली आहे. पण इतिहास बदलण्यासाठीच ज्यांनी चळवळ चालवली आणि त्यासाठी छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा विपर्यास केला, स्वतच्यिा डोक्यात निर्माण झालेला वैचारिक गुंता ज्यांनी इतिहास म्हणून मराठा तरुणाच्या माथी मारत सामाजिक दहशतवाद उत्प करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आता न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे."शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकावर पुण्यात खटला दाखल झाला आहे. या पुस्तकात खेडेकरांनी नेहमीप्रमाणे द्वेषांची बीजे पेरली असून मराठा समाजालाही लाज वाटावी, असे नवे संशोधन मांडले आहे. या नव्या संशोधनाविरुद्ध पुण्यात खटला दाखल झाला आहे.

गेली काही वर्षे महाराष्ट्राचे सामाजिक जीवन अशांतता आणि विद्वेषाने ग्रासलेले आहे. सतत या ना त्या कारणाने ही अशांतता सतत धगधगत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि यासाठी "जात' हे आयुध वापरले जात आहे. महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा आहे, या परंपरेत अनेक वाद गाजले. महात्मा फुलेंपासून प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत अनेकांनी आपल्या लेखणी आणि वाणीने सामाजिक विषतमेवर आसूड ओढले. या महापुरुषांच्या प्रेरणेतूनच ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाने उभा महाराष्ट्र ढवळून निघाला होता, वैचारिक पातळीवरची ही सामाजिक लढाई त्यावेळी खूपच गाजली होती. या वैचारिक घुसळणीतून समाजाला नवा आकार प्राप्त झाला. अनेक दशके स्मरणात राहिलेली ही वैचारिक लढाई एका विशिष्ट पातळीवरून लढवली गेली. त्याला हिंसेचे गालबोट लागले नाही किंवा कुणी हिंसेला प्रोत्साहन दिले नव्हते. या वैचारिक रणांगणात जातीचा आधार घेऊनही दुसरी जात नामशेष करण्याची चिथावणी कोणी दिली नव्हती. हा इतिहास आता आपण विसरून गेलो पाहिजे. कारण सामाजिक, राजकीय पातळीवर जातीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले. "पाहिजे जातीचे' या जगत्‌गुरू तुकोबारायांच्या वचनाचा गर्भित अर्थ गळून पडला आणि केवळ शब्दार्थाचे प्रस्थ माजले.जातीच्या आधाराचे समाजसंघटन करायचे तर अस्मितांचा शोध घ्यावा लागतो. महापुरुषांच्या जाती शोधाव्या लागतात. आपल्या जातीचा महापुरुष शोधला जातो, त्याला जातिबद्ध केले जाते आणि मग आपल्या जातीच्या अस्मिता जागवताना दुसऱ्या समाजाला टीकेचे लक्ष्य केले जाते. आपल्या जातीवर शतकानुशतके या जातीने अन्याय अत्याचार केले आहेत, त्यामुळे त्यांचा बदला घेतलाच पाहिजे अशी सामाजिक मानसिकता जाणीवपूर्वक निर्माण केली गेली. अशा प्रकारची कार्यपद्धती असणाऱ्या संस्था महाराष्ट्रात गेल्या दशकात उदयास आल्या. त्यापैकी मराठा सेवा संघ ही एक संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक आहेत पुरुषोत्तम खेडेकर. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून संस्थेचे कार्य सुरू झाले. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संस्था मराठा सेवा संघाची अपत्यं आहेत.मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपला विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. या लेखनयात्रेतीलच एक पुस्तक "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या नावाने 13 नोव्हेंबर 2010 रोजी प्रकाशित झाले आणि या पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेऊन पुण्यात शाम सातपुते, मधुकर रामटेके, प्रा. हरी नरके, भूपाल पटवर्धन, संजय सोनवणी यांनी संयुक्तपणे 18 मे 2011 रोजी पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम खेडेकर व प्रकाशक-मुद्रक किशोर कडू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की "आम्ही पुणे शहरातील शांतता व राष्ट्रप्रेमी नागरिक सदर पुस्तकाची प्रत सादर करून यातील पृष्ठ 33 ते 36 व 54 ते 55 वरील मजकुरामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याची तक्रार करीत आहोत. सदर पुस्तकातील मजकूर प्रक्षोभक, चिथावणीखोर असून वांशिक व जातीय, धार्मिक दंगलीचा पुरस्कार करणारा आहे.' पोलिसांनी या पुस्तकांच्या आठ हजार प्रती जप्त केल्या असून 15 हजार रुपयांच्या जामिनावर न्यायालयाने खेडेकर,कडू यांची मुक्तता केली आहे. पुण्यात दाखल झालेली ही फिर्याद म्हटले तर खूप मोठी घटना आहे आणि म्हटले तर तिची किंमत कवडीइतकीही नाही. पण गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात जी घुसळण चालू होती, तिला आता वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण एका बाजूने सातत्याने होणारे विखारी हल्ले तर दुसऱ्या बाजूने त्याला दिले जाणारे क्षीण उत्तर अशी काहीशी स्थिती अनुभवण्यास मिळत होती; पण या प्रकरणात खऱ्या अर्थाने प्रतिकाराची पावले उचलली गेली आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केलेल्या घटनात्मक हक्कांच्या आधारानेच पुरुषोत्तम खेडेकर यांना न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. आपला विरोध रस्त्यावर येऊन प्रकट करण्याऐवजी पुण्यातील या मंडळींनी संसदीय मार्गाचा अंवलब केला, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे."शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' हे पुस्तक पुरुषोत्तम खेडेकर यांनी ए.आर. अंतुले, कै. प्रभाकर पाटील, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, सुनील तटकरे यांना अर्पण केले आहे. याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी लोकसभा अध्यक्ष मा. मनोहर जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""मुळात या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत माझे नाव आहे हे मला आपल्याकडूनच समजत आहे. अशा प्रकारच्या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या लिखाणाशी मी कधीही सहमत होणार नाही. मी गेली 44 वर्षे मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. आमचा पक्ष हा मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी काम करतो आहे. आमच्या कार्यपद्धतीत ब"ाह्मण-ब"ाह्मणेतर, मराठा-मराठेतर अशा वादांना स्थान नाही. आपण सारे हिंदू आहोत, सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि अशा प्रकारचा सामाजिक विद्वेष निर्माण करणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे.''

देशी जेम्स लेन

गेल्या दशकात शिवरायांची बदनामी करणारे विदेशी लेखक जेम्स लेन यांचे पुस्तक प्रकाशित झाले. जनमताचा विरोध लक्षात घेऊन प्रकाशकाने पुस्तक मागे घेतले, पण त्यातील बदनामी करणारा मजकूर झेरॉक्स करून घरोघर वाटण्याचे काम कुणी केले होते? पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांचे सहकारी या कामात आघाडीवर होते. जेम्स लेनचे लिखाण वाचणारा वाचक गट मर्यादित होता, पण खेडेकरांनी तो विषय तळागाळापर्यंत पोहोचवून समाजात जागृती केली. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री व मु"यमंत्री यांनी जेम्स लेनच्या मुसक्या बांधण्याचा निर्धारही व्यक्त केला. कदाचित तेव्हा शासनाने योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले असते तर आज महाराष्ट्रात "देशी जेम्स लेन' निर्माण झाले नसते. जेम्स लेन प्रकरणात वातावरण निर्माण करणाऱ्या खेडेकरांनी आपल्या "शिवरायांची बदनामीची केंद्रे' या पुस्तकात लेनच्याही पुढचे पाऊल टाकल्याचे लक्षात येते. आपले प्रतिपाद्य विषय मांडताना त्यांनी अनेक विदेशी संशोधकाचा हवाला दिला आहे. यामध्ये शरीररचना शास्त्र, मनोरचना इत्यादींचा समावेश आहे, पण हा हवाला देताना ते कोणत्याही संशोधकाचे नाव जाहीर करत नाहीत. खेडेकरांनी आपल्या पुस्तकात मराठा समाज आणि शिवरायांची बदनामी करणाऱ्याचा खरपूस समाचार घेतल्याचा आव आणला असला तरी त्यांनी आपले लेखन "विद्वेषाची बिजे' पेरण्यासाठीच कारणी लावले आहे. या पुस्तकात "ब"ाह्मण हाच एकमेव शत्रू व तो नेस्तनाबूत करणेे हाच आमचा संकल्प' (पान 55) या सूत्राशी एकनिष्ठ राहून खेडेकरांचे लेखन झाले आहे.शिवरायांचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या खेडेकरांनी आपल्या पुस्तकातून अगदी खालच्या पातळीवर जाऊन महिलांविषयी (ब"ाह्मण महिला) लिखाण केले आहे. गलिच्छ लैंगिक वर्णन आणि मानहानीकारक लेखन करून खेडेकरांनी शिवरायांच्या आदर्शाला काळीमा फासला आहे. विकृत भाषेतील हे लिखाण केवळ ब"ाह्मण समाजावर चिखलफेक करण्यासाठी लिहून खेडेकर देशी जेम्स लेन ठरले आहेत. केवळ ब"ाह्मण समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी अशा प्रकारचे विकृत, मानहानीकारक लिखाण खेडेकरांनी प्रसवले आहे.

खेडेकरांचा मार्ग नक्की आहे

आपल्या राज्यघटनेने आपल्या काही मूलभूत अधिकार बहाल केले आहेत. अभिव्यक्तीचा अधिकार हा त्यापैकीच एक आहे. प्रत्येक नागरिकाला आपले विचार प्रकट करण्यास मुभा असली तरीही समाजस्वास्थ्याला हानी पोहोचवणारे विचार, लेखन यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यात स्थान नाही. खेडेकर आपल्या विचारातून, लेखनातून समाजात तेढ निर्माण करतात आणि छातीठोकपणे सांगतात, "जागतिक तापमानामुळे पिघळणाऱ्या हिमालयाच्या प्रश्नापेक्षा ब"ाह्मणांपुढे पिघळणारा हा शहाणा मराठा मुक्त करणे मराठा समाजासाठी जास्त गरजेचे आहे.'(पान-47) अशाप्रकारे ते मराठामुक्तीची दंवडी पिटत आहेत. प्रश्न असा आहे की आपला देश स्वतंत्र होऊन साठ वर्षे झाली. तरीही मराठा समाज आजही बंधनात आहे किंवा कुणा ब"ाह्मणाच्या हातचे खेळणे आहे, हे कशाच्या आधारे खेडेकर सांगतात आणि हे म्हणणे खरे असेल तर त्यांची जबाबदारी कोणाची? गेल्या शतकात तुलनेने लहान असलेल्या समाजातही जाणीव-जागृती झाली तेव्हा मराठा समाजाचे नेतृत्व काय करत होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर काही दशके मराठा अस्मिता जागवल्या जात नव्हत्या. 1990 च्या दशकानंतर मात्र असे काम सुरू झाले. त्यातून ज्या संस्थांचा उदय झाला, त्यात मराठा सेवा संघ आहे. याच संस्थेचे अपत्य असलेल्या संभाजी बि"गेडबाबत खेडेकर म्हणतात, ""5 जानेवारी 2004 रोजी संभाजी बि"गेडने भांडारकर संस्थेवर किरकोळ हल्ला करून आजच्या शिवाजीला कोणते गड उद्‌ध्वस्त करायचेत याची स्पष्ट जाणीव करून दिली आहे. त्यातून मराठा-बहुजन समाजाची सांस्कृतिक अस्मिता जागृत होऊन हा सर्वच समाज पुन्हा एकदा एकमय व्हावा.''(पान-47) पुरुषोत्तम खेडेकरांना यातून काय संदेश द्यायचा आहे? ते आपल्या लेखनातून अशा प्रकारची भाषा वापरतात. सामाजिक विद्वेष, मानहानी, चरित्रहनन यांच्या आधाराने पुढे जाणारा मार्ग खेडेकरांनी निश्चित केला आहे आणि मार्ग अधिक प्रशस्त करण्यासाठी अशा प्रकारचे लिखाण ते करत आहेत.

राजकीय बाप कोण?

पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या संघटनांनी महाराष्ट्रातील मराठा तरुणांना संमोहित केले आहे, असे म्हणायला वाव आहे. कारण भांडारकर संस्थेवर हल्ला करण्यासाठी मराठवाड्यातील तरुण सहभागी झाले. त्यातील 72 जणांवर सध्या खटला चालू आहे. आपण पुण्यात जाऊन काय करणार आहोत? असा साधा प्रश्नही या तरुणांना पडला नाही. इतकी भुरळ खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केली आहे. भांडारकर हल्ल्यानंतर सोलापूरचे शिवस्मारक व काही दैनिकांवर हल्ला झाला. महाराष्ट्र शासनाने ही प्रकरणे कशा प्रकारे हाताळली? किंवा दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने नवेनवे वाद निर्माण करून सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या संघटनांबाबत शासनाने काय भूमिका घेतली? "फोडून टाकू', "नष्ट करू', "ब्राह्मणांचा र्निवंश करू', अशा धमक्या देणाऱ्यांना कोणते शासन करण्यात आले? हा विषय एवढाच नाही तर "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकात विद्यमान गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा उल्लेख ते "पोपटलाल' असा करतात. संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेवर हल्ला केला आणि साळसूदपणाचा आव आणत पुण्यातील काही इतिहास संशोधकांविरुद्ध तक्रार केली. ही तक्रार आर.आर. पाटील यांनी विनाचौकशी दप्तरदाखल करण्याचे आदेश काढले व तेथील संशोधकांना संरक्षण दिले. खेडेकरांचा या गोष्टीला आक्षेप आहे. त्यामुळे आर.आर. पाटलांचा उल्लेख ते पोपटलाल असा करतात. एवढे सारे होत असताना शासन गप्प का? पुण्यात कलम 153 व 155 (अ) अन्वये दाखल झालेल्या तक्रारीबाबत आता कोणती पावले उचलली जाणार आहेत? आर.आर. पाटील यांचा लौकिक हे धाडसी व कर्तव्यदक्ष मंत्री असा असताना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व खेडेेकर यांच्या विषयात ते तोंडात वेलची धरून का बसतात? आपल्या खात्यांतर्गत ते कारवाईचा बडगा का उगारत नाहीत? यामागे आर.आर. पाटलांपेक्षाही कोणती मोठी राजकीय शक्ती पाठराखण करते आहे का? आर.आर. पाटलांच्या पक्षातील एक सहकारी विनायक मेटे "मराठ्यांना आरक्षण द्या' म्हणून जोगवा मागत आहेत, तर खेडेकरांची संभाजी ब्रिगेड मराठ्यांना ओबीसीना आरक्षण द्या म्हणून उपोषण करते आहे. केवळ हाच एक समान धागा नव्हे. असे असंख्य विषय समान पातळीवरून चालू आहेत. आर.आर. पाटलांचा पक्ष मराठाकेंद्री आहे. बहुसंख्य मराठा आणि तोंडी लावायला दुय्यम समाज अशी या पक्षाची स्थिती आहे. खेडेकरांनीही उघडपणे "मराठा' अस्मिता जागरणाची मोहीम चालवली आहे. या कारवायांना पाठीशी घालणारा राजकीय बाप कोण आहे? कोणते राजकीय पाठबळ खेडेकरांना अदृश्य राहून मदत करत आहे? यांचा यानिमित्ताने विचार करायला हवा.

आमचा कोणता वारसा?

पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांचे सहकारी आज महाराष्ट्रात वैचारिक दहशतवाद निर्माण करत आहेत. त्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष आणि लेखणीचा आधार घेत आहेत. स्वतः पुरुषोत्तम खेडेकरांनी जवळजवळ साठ पुस्तकांचे लेखन केले आहे. असे लिखाण करणारे फक्त खेडेकरच आहेत असे नाही. अनेक प्राध्यापक आणि तज्ज्ञांनी आपली लेखणी खेडेकरांचा विचार विकसित करण्यासाठी झिजवली आहे. खेडेकरांच्या मते, ते जे लिहितात तोच खरा इतिहास आहे आणि तोच इतिहास त्यांना समाजमनात रुजवायचा आहे. "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकातून खेडेकरांनी जो मराठ्यांचा सामाजिक पुरुषार्थ सांगितला आहे, तो मराठा समाजाला गौरव देणारा आहे का? खेडेकर सांगतात तशा प्रकारचे जिणं जर आमचे पूर्वज जगले असतील तर त्यांचा अभिमानाचा वारसा कशासाठी आणि का बाळगावा? खेडेकरांच्या "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकातील पान 33 ते36 यावरील मजकुरांचा अर्थ मराठा समाजाने "पुरुष वेश्या' म्हणून शतकानुशतके काम केले असा होतो. असे असेल तर तो वारसा पुढच्या पिढीने कशासाठी आपल्या खांद्यावर घ्यावा? आणि हाच खरा वारसा व इतिहास आहे असे सांगणाऱ्या खेडेकरांनाही कशासाठी स्वीकारावे?मराठा एकत्रीकरणाचा प्रयत्न करताना जे जे मार्ग हाताळावे लागतील आणि ज्या ज्या मार्गांनी समाजातील तरुणांची माथी भडकवता येतील ते ते सारे करायचे, हे खेडेकर आणि कंपनीने ठरवले आहे. मराठा समाज एका छत्राखाली आणून सर्वंकष सत्तेचा अंमल प्रस्थापित करू पहाणाऱ्या राजकीय शक्ती व राजकीय पक्षाचे नेते यांचा खेडेकरांच्या या कारवायांना छुपा पाठिंबा आहे, हे वेगळे सांगायला नको. काही क्षणांसाठी या प्रकरणातील राजकारणाचा विषय बाजूला ठेवून विचार केला, तरी असे लक्षात येते की मराठा सेवा संघ आणि त्याच्या सहयोगी संस्था या छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करत सामाजिक विद्वेषाची पेरणी करत आहेत आणि पेरणीची फळे मराठ्यांच्या उद्याच्या पिढीला भोगावी लागतील. तेव्हा खेडेकर, आजच सावध व्हा... खरा शिवाजी समाजासमोर आम्हाला सर्व समाजाला सोबत घेऊन नव्या युगाकडे वाटचाल करणारा राजा शिवाजी हवा आहे, रयतेचे आणि आयाबायांचे अब्रूरक्षण करणारा शिवाजी समाजाला हवा आहे.

समाजात विद्वेष वाढवणारे लिखाण - भूपाल पटवर्धन

हिटलरने आपल्या "माईन काम्फ'(माझा लढा) या पुस्तकात ज्यू समाजाशी त्याने कशा प्रकारे व्यवहार केला, याचे वर्णन केले आहे. याला "आर्यन सुप्रिमसी' असेही म्हटले जाते. सध्या अशाच प्रकारची "मराठा सुप्रिमसी' पुरुषोत्तम खेडेकर राबवत आहेत. आपल्या लिखाणातून गेली दहा-बारा वर्षे सामाजिक तेढ वाढवत आहेत. एका विशिष्ट समाजाविषयी सातत्याने घृणास्पद लेखन पुरुषोत्तम खेडेकर करत आहेत. "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकातही असेच लेखन प्रकाशित झाले आहे. इतरांपेक्षा आम्ही (मराठा) कसे श्रेष्ठ आहोत हे सांगताना पुरुषोत्तम खेडेकरांनी ब्राह्मण समाज व स्त्रियांविषयी अतिशय हीन पातळीवरचे लेखन केले आहे. अशा प्रकारच्या लिखाणामुळे सामाजिक जीवनात कलह निर्माण होतो आहे. म्हणून आम्ही तक्रार दाखल केली आहे. आमचा विरोध हा व्यक्तिकेंद्री नाही, तर समाजात विद्वेष माजवणाऱ्या प्रवृत्तीला आहे. असे घृणास्पद लेखन करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसावा व सामाजिक दरी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसावा म्हणून आम्ही ही तक"ार दाखल केली आहे. खेडेकरांनी जरी ब"ाह्मणांऐवजी अन्य दुसऱ्या समाजाबद्दल असे लिखाण केले असते तरीही आमची हीच भूमिका राहिली असती. आम्ही दाखल केलेल्च तक"ारीनुसार पोलिसांनी 153, 155(अ) ही कलमे लावली आहेत. या कलमानुसार कारवाई करण्यासाठी गृहमंंत्रालयाची परवानगी लागते, आता आम्ही पुढील कारवाईची वाट पहात आहोत

.(सामाजिक कार्यकर्ते)ही प्रवृत्ती चळवळीस मारक -संजय सोनवणी

महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राह्मणेतरवादाला जवळजवळ सव्वाशे वर्षांची परंपरा आहे, पण ज्या पद्धतीने पुरुषोत्तम खेडेकर चळवळ चालवत आहेत, इतकी हीन पातळी या वादाने कधीही गाठली नव्हती. 1990 सालाच्या आसपास जागतिकीकरणाच्या रेट्यात जातभावना वेगाने लयास जात असल्याचे लक्षात येत होते. याच काळात काही संघटना जातीच्या आधारावर समाजकारण-राजकारण करण्यासाठी पुढे आल्या. प्रत्येक व्यक्तीचा, संघटनेचा स्वतंत्र दृष्टिकोन असू शकतो, पण आपल्या दृष्टिकोनानुसार कोणाला इतिहास बदलता येत नाही. पुरुषोत्तम खेडेकर त्यांच्या सोईचा इतिहास तयार करत आहेत. त्यासाठी विकृत भूमिका घेऊन ते लिखाण करत आहेत. प्रत्येक समाजाला आपला विकास करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. समतेची प्रस्थापना होत नाही तोपर्यंत अशी चळवळ चालवण्याचा हक्क आहे, पण अशी चळवळ चालवताना त्याचा आधार विद्वेष असता कामा नये. समाजव्यवस्था समजून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास जरूर करावा पण त्यांचा आजच्या जगण्याशी संदर्भ किती आहे हेही तरतम्‌भावाने तपासणे आवश्यक आहे. इतिहासातील घटनांचा प्रतिवाद वैचारिक पातळीवरून करावा. त्यासाठी खेडेकरांनी स्वीकारलेला मार्ग योग्य नाही. खेडेकरांच्या लिखाणाने व चळवळीने मराठा समाज बदनाम झाला आहे. "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रा'वर हल्ला करण्यात सहभागी झालेल्या तरुणांची आज काय अवस्था आहे? या तरुणांच्या आयुष्यांची माती कोणी केली? याचे उत्तर कधी तरी खेडेकरांना द्यावे लागेल. सतत ब"ाह्मणांविरुद्ध विकृत लिखाण करून खेडेकर चळवळीला बदनाम करत आहेत. त्यांना आपला निषेध नोंदवण्याचा हक्क नक्कीच आहे पण त्यांना संसदीय मार्गाचा अवलंब करावा लागेल.साहित्यिक व (परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक)