दोन भिन्न जातीचे असूनही या दोन संतांचे अंतर्यामी एकच असलेले विचार आपण मागच्या लेखात पहिले. लोकांच्या उद्धारासाठी झटत ईश्वरप्राप्ती साधणारे हे दोन्ही संत होते. परंतु सध्या काही लोक या दोन संताना ब्राम्हण आणि मराठा या दोन जातीपुरता मर्यादित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी संत तुकाराम ब्राम्हणद्वेष्ठे आणि रामदास स्वामी कर्मठ ब्राम्हण म्हणून प्रोजेक्ट केले जात आहेत. या विकृतीकरणात बामसेफ आणि संभाजी बिग्रेड या संघटना अग्रेसर आहेत. “हे असे का?” याचा मी मला जमेल तसा उलगडा या लेखमालेच्या शेवटी करणार आहे. तत्पूर्वी या लोकांच्या या खोट्या प्रयत्नांचे पुरावे पाहू. यावरूनच वाचकांना कल्पना येईल कि स्वतःचा शुल्लक स्वार्थ साधण्यासाठी या संघटना संताना कसे विकृत स्वरुपात समाजासमोर सादर करत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या भक्तीपर अभंगांना देखील हे लोक ब्राम्हण द्वेषाची पुटे चढवून ब्राम्हण द्वेषाची शिकवण बहुजन समाजाला आणि त्यातही तरुण वर्गाला देत आहेत हे खालील काही उदाहरनांवरून आपल्या लक्षात येईल.
पुढे सरकण्यापुर्वी मी येथे स्पष्ठ करतो कि तुकाराम महाराजांच्या अभंगांचा ज्या गाथा आहेत - त्यात देहू येथील प्रत मी संदर्भ म्हणून येथे वापरत आहे. कारण तीच प्रत अनेक जन प्रमाण मानतात.
तर तुकोबारायांच्या एका अभंगाचा अभंगाचा अर्धाच चरण - त्यातही त्याच्या अर्थाचा विपर्यास करून लोकांना कसा विकृत स्वरुपात सांगितला जातो याचे हा अभंग एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. बिग्रेडचे अनेक कार्यकर्ते वादविवाद करताना खालील श्लोकाचा उल्लेख करून तुकोबाराय ब्राम्हणांना कसे शिव्या द्यायचे हे सांगत असतात. पण संत म्हणजे समभाव. मग ते फक्त एकाच समाजाला शिव्या देतील असे होईल का?? या अशा वागण्याला विचारी संत समभाव म्हणतील का? याचा विचार या बिग्रेडी कार्यकर्त्यांनी करायला हवा होता. पण या कार्यकर्त्यांच्या मनात बिग्रेडने ब्राम्हणद्वेष इतका कि भिनवला आहे कि, ब्राम्हणांच्या विरोधात काहीही आधारहीन सांगितले तरी हे कार्यकर्ते डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवतात.
तुकोबारायांच्या ज्या अभंगाचा हे बिग्रेडी ब्राम्हण विरोधी म्हणून वापर करतात त्या १३१४ अभंगाचा पहिला चरण असा आहे.
अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!१!!
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!
या पहिल्या चरणातील "अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!" या पदाचा अर्थ सांगताना बिग्रेडी सांगतात कि, "तुकाराम महाराज ब्राम्हणांचे तोंड जळो असे सांगत आहेत. त्याच्याकडून वेश्या सुद्धा गर्भवती होऊ शकत नाही असे सांगून तुकाराम महाराज सुद्धा ब्राम्हण नपुंसक असल्याचे सांगत आहेत. "
तुकाराम महाराजांच्या भक्तीचा महिमा सांगणा-या या अभंगाचा असा विकृत अर्थ फक्त बिग्रेडीच सांगू शकतात. मुळात जर तुकाराम महाराजांच्या मनात ब्राम्हणांना शिव्याच द्यायच्या असत्या तर त्यांनी "जळो ब्राम्हणाचे तोंड" असेही लिहिले असते. तसे लिहिण्यास ते कोणाला भिणारे नव्हते. त्यांनी 'ब्राम्हणाचे तोंड जळो" असे म्हटले हे जरी मानले तरी ते "कोणत्या ब्राम्हणाचे तोंड जळो?" हा प्रश्न येतोच. कारण कोणत्याही कारणाशिवाय तुकाराम महाराज असे कोणाबद्दल काही बोलणार नाहीत. सर्वाभूती ईश्वर पाहणारे संत कोणत्याही समाजाला किवा व्यक्तीला कारणाशिवाय दुषणे देणार नाहीत.
तर या प्रश्नाचे उत्तर स्वतः तुकाराम महाराजांनीच चरणाच्या सुरुवातीलाच "अभक्त ब्राम्हण" हे सांगुन दिले आहे. कारण हा अभंग भक्तीचा महिमा वर्णन करणारा आहे. काय त्यासी रांड प्रसविली, चा अर्थ असा अभक्त रांडेच्या पोटी जन्माला आला काय? असं प्रश्नार्थक आहे...
तुकाराम महाराजांच्या मनात येथे ब्राम्हणांना शिव्या देण्याचा हेतू नाही तर भक्तीचा महिमा सांगायचा आहे. कारण या अभंगाच्या आधी १२२९ क्रमांकाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज ब्राम्हण कसा असावा ते सांगतात,
ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धि ! पाहा श्रुतीमधी विचारुनी !! ध्रु!!
जयासी नावडे हरीनामकिर्तन ! आणीक नृत्य वैष्णवांचे !! १!!
याचा स्पष्ठ अर्थ हा आहे कि, तुकाराम महाराज जो ब्राम्हण हरिभक्त नाही त्याचे तोंड जळो असे म्हनत आहेत. कारण त्याच्यापुढच्याच पदात महाराज सांगतात कि,”

येथेही त्यांनी चांभाराची माता धन्य म्हटली आहे. पन कोणत्या चांभाराची तेही सुरुवातीलाच सांगुन ठेवले आहे. जो चांभार वैष्णव आहे त्याची माता धन्य आहे. कारण तिचा पुत्र हरिभक्त म्हणजेच वैष्णव आहे. आणि त्याच्या हरीभक्तीमुळेच त्याचे कुळ आणि जात उभयता धन्य होतात. हा अभंग शुद्ध हरीभक्तीचा महिमा वर्णन करनारा आहे. हरीभक्तीचा महिमा वर्णावा तेवढा कमीच आहे. असो. सद्या तरी तो आपला विषय नव्हे.
तर हे बिग्रेडी कार्यकर्ते आणि लेखक उपरोक्त अभंगातील वर अर्थ सांगीतलेली दोनच पदे सांगुन बहुजन तरुनांची फसवणुक करत आहेत. पुर्ण अभंग बिग्रेडची लेखक आपल्या कार्यकर्त्यांना कधीच सांगत नाहीत. कारण पुढची दोन पदे सांगीतली तर बिग्रेडी लेखकांचा आणखी एक मुद्दा खोटा पडेल याची या धुर्त लेखक व अधिकारी यांना पुर्ण जानीव आहे. कारण पुढचा चरण आहे तो असा,
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी ! नव्हे माझी वाणी पदरीची !!२!!
तुका म्हणे आगी लागो थोरपण ! दृष्ठी त्या दुर्जना न पडो माझी !!३!!
या चरणात तुकाराम महाराज स्पष्ठ करतात कि, हा निवाडा ( अभक्त ब्राम्हणापेक्षा वैष्णव चांभार श्रेष्ट असल्याचा ) पुराणातच सांगीतलेला असुन मी माझ्या पदरीचे काही सांगत नाही. त्यापुढे जावुन तुकाराम महाराज सांगतात कि, भक्तीचा गंध नसलेल्या केवळ जन्मामुळे असलेल्या थोरपनाला आग लागो. अशा दुर्जनावर माझी दृष्टी सुद्धा पडु नये.
पहील्या चरणाचा मोडुन तोडुन विपर्यास करुन आपला स्वार्थ साधन्यासाठी आवश्यक तेवढाच अर्थ आपल्या कार्यकर्त्याना सांगने बिग्रेडच्या नेत्यांना शक्या आहे. पन तिस-या ओळीचा अर्थ बदलने त्यांना शक्य नाही. जे त्यांच्यासाठी पंचाइत ठरु शकते. कारण इथे तुकाराम महाराज स्वताः आपले म्हाणने हे पुराणांत जे सांगीतले आहे तेच आहे असे सांगत आहेत. याऊलट बिग्रेडचे नेते “पुराणे ब्रांम्हणांनी इतरांवर गुलामी लादन्यासाठी व पोटापान्याचा धंदा म्हणुन निर्माण केली आहेत.” असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत. जर पुराणे ब्राम्हणांनी पोटापाण्यासाठी निर्माण केली आहेत तर ब्रांम्हाणांचे शत्रु असलेले तुकाराम महाराज ब्राम्हणांनीच रचलेल्या ग्रंथामधले पुरावे का देतील?? असा प्रश्न सहज बिग्रेडी कार्यकत्यांच्या मनात येवु शकतो. तो प्रश्न येवुच नये म्हणन बिग्रेडचे नेते कधीही हा पुर्ण अभंग आपल्या सांगनार नाहीत. पुढच्या एका अभंगावर भाष्य करण्यापुर्वी पुन्हा एकदा तो पुर्ण अभंग नजरेखालुन घालुया.

अर्थाचा अनर्थ करुन बिग्रेड कशाप्रकारे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा स्वताःचा स्वार्थ साधण्यासाठी वापर करत आहे हे आपण वर पाहीले. आता अशाच आणखी एका कुटील प्रयत्नाचा आपन समाचार घेवुया. संत रामदास स्वामी यांना कर्मठ ब्राम्हण ठरवण्यासाठी बिग्रेड कुठच्या खालच्या थराला उतरु शकते याचा प्रत्यय येथे येतो.
जरी तो ब्राम्हण झाला कर्मभ्रष्ट ! तरी तिन्ही लोकी श्रेष्ट !! .
उपरोक्त श्लोक रामदास स्वामींचा आहे असे सांगत रामदास स्वामींना जातीयवादी ब्राम्हण असे ठरवण्याचा बिग्रेडचा प्रयत्न आहे. आम्हीहि सुरुवातीला हा श्लोक रामदास स्वांमींचाच समजत होतो.परंतु मध्यंतरी आमचे एक मित्र श्री. मधुसुदन चेरेकर यांनी हा श्लोक नसुन तुकाराम महाराजांचा अभंग असल्याचे सांगीतले. त्यांनी या अभंगाचा क्रमांक देखिल सांगीतला. आम्ही तो तपासला असता चेरेकरांचे म्हणने खरे असल्याचे कळले. तो अभंग खाली देत आहे.
अभंग क्र.३०४०,तुकाराम गाथा:-
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥1॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥2॥
जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥
तर असे आहे हे बिग्रेडी विकृतीकरण !