बुधवार, २३ मे, २०१२

कृष्णाजी भास्कर.............दोन्ही बाजूनी पिचलेला एक भट !!


कृष्णाजी भास्कर...शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक दुर्लक्षित पामर.....इतिहासकारांनी त्यास महत्व द्यावे इतका मोठा नव्हताच कधी......त्याने शिवाजी महाराजांवर वार केला...अर्थात त्याबद्दल मतभेद आहेतच..कोणी म्हणत कि तो वार अफझलखानाने केला...आणि त्यास तलवार दिली ती कृष्ण्या भास्करने...तर काहीजण म्हणतात कि त्यानेच वार केला....असो....दोघेही शत्रूच...महाराजांवर चाल करून येणारा तो शत्रूच.....मग तो स्वकीय असो व परकीय.......

पण त्या कृष्ण्या भास्कराचे निमित्त करून काही जन महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला हि गोष्ठ हिंदुनी विसरून जावी अश्या प्रकारे प्रयत्न करत आहेत...त्याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नुकतेच एका बी-ग्रेडी थेराने केलेले विधान...तो म्हणे....'अफझल खानाने दगा केलाच नाही....दगा केला तो कृष्णा भास्कराने ...कारण अफझल तर शत्रूच....मग तो वार करणारच.....दगा कृष्णाजी भास्कराने केला'.....हे जर मान्य केले तर एक प्रश्न उरतोच....राजकारणात नेहमी शत्रूचा मित्र तो आपला शत्रूच असतो...मग अझल खानासारख्या शत्रूचा वकील तो मित्र कसा होईल??? तोही शत्रूच...त्याने वर केला ते त्याच्या शत्रू बुद्धीला स्मरूनच.....म्हणजे एकंदरीत या लोकांचा ब्राम्हण द्वेष इतका पराकोटीस गेला आहे कि त्यांना आता शत्रू कोण आणि मित्र कोण हे देखील समजेनासे झाले आहे..................

दुसरा एक युक्तिवाद असाही केला जातो....कि 'शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारला नसता...पण त्याने दगा केला म्हणून त्याला मारला'....जसा अफझल काही महाराजाबरोबर बुद्धिबळ खेळायला आला होता...आणि स्वेच्छा भोजन घेऊन परत जाणार होता...........अहो त्याने दगा केला नसता तरी राजांनी त्याला मारलाच असता.....तसं नसतं तर त्याला जावळीच्या दुर्गम प्रदेशात... प्रताप गडावर बोलावून घेण्याचे प्रयोजनच नव्हते.......मुसलमानांशी असलेलं वर्तमान काळातलं शत्रुत्व वाढू नये म्हणून आपल्याच पूर्वजांचा पराक्रम नाकारण्यात कसला आलाय मोठेपणा???........

आता अफझल खानच्या स्वारीबद्दल बोलू....अफझल खान हा विजापूरचा मातब्बर सरदार...प्रचंड ताकद आणि भल्याबू-या मार्गाने आपले इप्सित साध्य करण्यात माहीर.......असे म्हणतात कि जेव्हा तो त्याच्या गुरूपुढे गेला तेव्हा त्याचा गुरु म्हणाला होता, " इसका सर कहा है???".....असा हा अफझल म्हणजे दुधाचा धुतलेला नव्हताच.....शहाजी महाराजांवर रात्री बेसावध स्थितीत हल्ला करणारा आणि त्यांना कैद करून भर विजापुरात त्यांची धिंड काढणारा हा अफझलखान.....शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांना कनकगीरीच्या वेढ्यात फसवून मारणारा सुद्धा अफझलखान......एका वेढ्यातून औरंगजेबाला जाऊ दिला म्हणून एका बड्या मुस्लीम सरदाराचा दरबारात येताना खून करणारा सुद्धा अफझल खान......असा हा अफझल खान...स्वराज्यावर चालून आला......येताच त्याने वाटेतील मराठा सरदारांना त्याच्या पक्षास येऊन मिळण्यासाठी पत्र आणि धमक्या देण्यास सुरु केले.....काही गद्दार गेले तिकडे....निष्ठावंत मराठे भगव्याखाली एकत्र आले.....

अफझल स्वराज्यात येताच त्याने चहूकडे धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली...महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांना त्रास देण्यास सुरुवात केली.....महाराजांची कुलदैवत भवानी आई जात्यात भरडली......हेतू हा कि शिवाजी जो प्रताप गडावर बसला आहे तो चवताळून बाहेर यावा....परंतु महाराज हा त्याचा हेतू जाणून होते....शत्रूस सोयीस्कर भागात लढाईस जावू नयेच तर उलट त्याला आपल्याला सोयीस्कर अश्या मैदानात आणावे आणि त्याचा फडशा उडवावा हा महाराजांचा युद्धामंत्र !!!!

शेवटी महाराजांनी खानाशी बोलणी चालू केली....त्यावेळी त्याचा वकील कृष्णा भास्कर हा भेटीसाठी येत होता.....मराठा इतिहासकार 'मा. श्री. रणजीत देसाई' यांनी त्यांच्या 'लक्षवेध' या ग्रंथात सप्रमाण सांगितले आहे कि एकदा महाराज आणि कृष्णाजी भास्कराची भेट झाली आणि महाराजांनी त्याच्या हातात बेल्फुल देऊन त्यास विचारले कि, " तुम्ही ब्राम्हण आहात...खरे ते सांगा.....अफझलच्या गोटात काय नेमके शिजत आहे???'....कृष्णाजी म्हणाला.." महाराज मी वकील आहे...त्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही...कारण माझी बायका पोर तिकडे आदिलशाहीत आहेत.....परंतु...अफझल खानाने विडाच असा उचलला आहे कि 'चढ्या घोड्यानिशी शिवाजीला जिंदा किवा मुर्दा आदिलशाही दरबारात हजर करतो....".....

अश्याप्रकारे आपण पाहू शकता कि अफझल खान हा शिवाजी महाराजांना कैद करायलाच आला होता.....पण त्याच्याच नशिबाचे फासे फिरले होते हे कोणासही ठाऊक नव्हते.....ठरल्याप्रमाणे महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला .....महाराजांनी आपल्या पित्याच्या अपमानाचा आणि भावाच्या मृत्यूचा सूड घेतला होता......या ठिकाणी आपण एक गोष्ठ विसरतो....आज शिवाजी महाराजांवर वार करणारा एक कृष्णाजी भास्कर म्हणून समस्त ब्राम्हण समाजास वेठीस धरले जात आहे...मग असे असताना शिवाजी महाराजांवर वार करणारे दोघे मुसलमान होते...एक अफझल खान आणि दुसरा सय्यद बंडा....मग त्यांच्या धर्माबद्दल आणि त्यांच्या कपटी काव्याबद्दल का कोणी (हे कोणी..कोण आहेत ते तुम्हा सगळ्यांना चांगलेच माहित आहे) एक चकार शब्द तोंडातून काढत नाहीत???

परंतु या फक्त ऐतिहासिकच नव्हे पिढ्या नि पिढ्यांना मार्गदर्शक ठरणा-या या पराक्रमानंतर सुरु झाले एक नाट्य....रामायणातल्या एका प्रसंगाशी साम्य दाखवणारे....रामायणात माता सीतेला पळवून नेण्याची योजना जेव्हा रावणाने आखली...तेव्हा मदत लागेल म्हणून तो मारीच या राक्षसाकडे गेला......मारीच हा पूर्वाश्रमीचा राक्षस होता...परंतु नंतर तो एक त्रुशी म्हणून ईश्वर साधनेत रममाण होऊ लागला होता.....परंतु रावणाने त्यास माता सीतेला पळवून नेण्याचे कमी मदत करण्यास सांगितली....त्याने ती सुरुवातीस नाकारली.....मग रावणाने त्यास सांगितले कि जर तू मला या कमी साहाय्य केले नाहीस तर आत्ताच तुझी मान उडवतो...मारीचाने विचार केला...ह्याचा हातून मरण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या हातून मारू...त्याने निदान मोक्ष तरी मिळेल.....

आता एक क्षण असा विचार करू कि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अंगावर एका ओरखडाही न घेता परत आदिलशाहीत गेला असता तर काय झाले असते???...आदिलशाही म्हणजे काय आहे याचा अनुभव शिवाजी महाराजांच्या घराण्याला चांगलाच होता.....शहाजीराजांविरुद्ध आघाडी उघडणारी सुद्धा आदिलशाहीच होती.........शहाजी महाराजांचे स्वराज्याचे मनसुबे हाणून पाडणा-या मुरार जगदेवाचा खून केला तोहि आदिलशहानेच....

जर अश्यावेळी कृष्णाजी भास्कर परत गेला असता तर ...काय झाले असते??...शेवटी कृष्णाजी भास्कर जरी त्यांच्या सेवेत असला तरी त्यांच्यासाठी तो काफरच....अफझल खानच्या सैन्यातले कोणी वाचले नाही....त्याचा जवळ असणा-यांपैकी तर कोणीहि परत आले....मग हा कसा परत आला??? याचाच अर्थ कृष्णाजी भास्कर बंडखोर शिवाजीला मिळालेला आहे.....मग करा या काफाराचे हाल.....आणि शिक्षा काय झाली असती???? तर कृष्णाजी भास्कराच्या बायकांना भर बाजारात बेअब्रू केले असते...त्याच्या लहान मुलांना ठार केले असते आणि शेवटी सर्वांसहित कृष्णाजी भास्करालाही ठार केले असते......आणि ह्या गोष्ठीची जाणीव कृष्णा भास्कारालाही होतीच....

अश्यावेळी कृष्णाजी भास्कराने एक चाल खेळली असण्याची शक्यता आहे...शेवटी ब्राम्हणी डोके आणि त्यात वकील........त्याला माहित होतेच कि जे शिवाजी राजे अफझल सारख्या बलाढ्य शत्रूला मारू शकतात त्याचाच अर्थ ते मलाही मारू शकतात.....मग आदिलशाहीत जिवंत जाऊन कुत्र्याच्या मौतीने मरण्यापेक्षा इथेच या देवपुरुषाच्या हातून का मरू नये???...तिथे आदिलशाहीत मेलो तर कुत्रे सुद्धा ओळखणार नाही.....आणि माझे कुटुंब तेही विनाकारण मारले जाईल...त्यापेक्षा मी इथे या पराक्रमी राजाच्या हातून मेलो तर ...... मी लढलो होतो हे सिद्ध होईल आणि त्यायोगे माझे कुटुंब तरी वाचेल......म्हणून कृष्णाजी भास्कराने महाराजांवर चाल केली असण्याची शक्यता आहे........नव्हे मी तर म्हणेन कि त्याने यासाठीच चाल केली....

अर्थात .शेवटी कितीही झाला तरी तो शत्रूच होता.....त्यामुळे त्याने जे केले ते योग्यच होते असे मी तरी म्हणणार नाही....परंतु या गोष्टीचा या बाजूने विचार होणेही गरजेचे आहे... ..
आणि मी इथे नमूद करेन कि हा विचार आणि त्यादृष्ठीने योग्य ते निपक्षःपाती संशोधन मराठ्यांनी करावे...........कारण 'आपला तो बहुजन आणि दुस-याचा बामन' हि सवय आता मराठ्यांमध्ये सुद्धा रुजत चालली आहे.......

जय भवानी !! जय शिवाजी !!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विशेष आभार- मयेकर सर...
ह्या लेखाचा शब्दप्रपंच माझा असला तरी मूळ मुद्दा हा माझे एक मित्र मयेकर यांचा आहे....


१८ टिप्पण्या:

  1. Hya purn itihasat ajun ek janun bujun durlakshit keli geleli ahe Thorlya Maharajani dekhil Vakil mhahun ek Brahman Sonopant Dabir hyanch pathavle hote, je Krisha Kulkarnyani kele to ek kalank ahe pan mhanun Thorle Maharaj Brahmana viruddh hote ase mhanane purna chukiche ahe

    उत्तर द्याहटवा
  2. gopinath pant bokil he vakil hote, sonopant nahi..
    aani krishnaji bhaskar la shivaji raje yani marle ase thos purave nahit, ulat tyala swarajya chya sevet getale karan tyane afjal khanacha gupt mansuba sangital hota.

    उत्तर द्याहटवा
  3. सोनोपंत डबीर हे पहिल्यापासून स्वराज्य सेवेत असलेले ज्येष्ठ मुत्सद्दी होते. त्यांच्या अखेरच्या काळात महाराजांनी त्यांची सुवर्णतुला केल्याचा उल्लेख आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. अश्यावेळी कृष्णाजी भास्कराने एक चाल खेळली असण्याची शक्यता आहे...शेवटी ब्राम्हणी डोके आणि त्यात वकील........त्याला माहित होतेच कि जे शिवाजी राजे अफझल सारख्या बलाढ्य शत्रूला मारू शकतात त्याचाच अर्थ ते मलाही मारू शकतात.....मग आदिलशाहीत जिवंत जाऊन कुत्र्याच्या मौतीने मरण्यापेक्षा इथेच या देवपुरुषाच्या हातून का मरू नये???...तिथे आदिलशाहीत मेलो तर कुत्रे सुद्धा ओळखणार नाही.....आणि माझे कुटुंब तेही विनाकारण मारले जाईल...त्यापेक्षा मी इथे या पराक्रमी राजाच्या हातून मेलो तर ...... मी लढलो होतो हे सिद्ध होईल आणि त्यायोगे माझे कुटुंब तरी वाचेल......म्हणून कृष्णाजी भास्कराने महाराजांवर चाल केली असण्याची शक्यता आहे........नव्हे मी तर म्हणेन कि त्याने यासाठीच चाल केली.... >>>

    तुम्ही ब्रिगेड ला शिव्या देता पण तुम्ही तरी कोठे खरे आहात काय हा मुर्खपणा हिंदुत्ववाद्यांचा ???? म्हणे देवपुरुषाच्या हातून का मरू नये??? शिवराय जे नक्कीच देवपुरुष आहेत..पण सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.
    अरे मुर्खांनो जर असेच विचार केला असता त्याने तर त्या हरामी बामनाने अंगावर कोठेही वार केला असता पण नाही वार हा डोक्यावरच का केला ...शेवटी बामन धुर्त त्याला माहीत होतं की राजे चिलखत परिधान करून आले असनार त्यामूळे डोक्यावर मारले तरच राजे मरतील, आणि त्याने वार बरोबर डोक्यावर केला.झालं शिवरायांच्या कपाळावर खोक पडली आणि बघता बघता लाखो लोकांचा पोशिंदा बहुजन प्रतिपालक रक्ताने न्हाऊन निघाला.
    पुर्ण आयुष्यभर शिवरायांनी मोठ - मोठ्या लढाया केल्या, अदिलशाही, निजामशाही, मोघल , सिद्धी यांच्याशी वेळोवेळी दोन हात केले पण शिवरायांना कधी खरचटलं सुद्धा नाही.पण एका क्षुद्र ब्राह्मणांने मात्र शिवरायांना जखमी केलं.यावरून समजते की शत्रु कोण होते स्वराज्याचे.
    कुष्णा कुलकर्णी ने शिवरायांना मारण्याची हरामखोरी का केली ? कारण हिंदूंच्या धर्मग्रंथाप्रमाणे "ब्रह्महत्या पाप आहे" असा नियम भिकारड्या ब्राह्मणांनी बनवून ठेवला होता.कुलकर्ण्याला वाटले परशुरामाने २१ वेळा प्रुथ्वी नि:क्षत्रिय केली.आपनही परशुरामाचा आदर्श घेऊन क्षत्रियांचा कुलभुषण असलेल्या शिवाजीला ठार करू पण घडले उलटेच शिवरायांनी "ब्रह्महत्या पाप आहे" हे कलम मुळासकट उखडून टाकून क्रुष्णा कुलकर्णीला टरा टरा फ़ाडला

    शिवरायांनी एक ब्राह्मण कापताना दाखविला तर भटांची लाही लाही होते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. शिवाजी महाराज क्षत्रिय कुलभूषण नसून बहुजन कुलभूषण आहेत अणि शिवाजी महाराज क्षत्रिय नव्हते शुद्र होते म्हणून शिवाजी महाराज यांच्या राजअभिषेक करण्यात महाराष्ट्र म्हधुन एक ब्राह्मण आला नाही म्हणून उत्तर प्रदेश म्हणधुन वाराणसी आणावा लागला त्याचे नाव गागा भट होते आणि त्याने पण फार नाटक केले आणि डाख्या पायांनी राजअभिखेक केले

      हटवा
    2. Krushnaji Bhaskar he vait hote yaat dumat nahi. Pan yacha aarth saglech brahman Maharajanchya virodhat hote asa hot nahi. Ek manus virodhat hota mhanun sagla samaj virodhat hota asa niyam lavayacha zala tar Khandoji Khopade, Suryaji Pisal, Ghorpade yanni pan Chatapati Shivaji Maharajanna virodh kela mhanun sagle Marathe Maharajanchya virodhat hote ani Afzalkhan ani Shahista khan Maharajanvar chalun aale mhanun sagle musalman Maharajanchya virodhat hote ase mhanayache kai . Ani mag Maharajani Swarajya sthapale konachya pathbala var. Jara vichar kara. Koni tari kahi tari boltat ani aapan vichar na karta man dolavto ase hovu devu naka..
      .

      हटवा
    3. @ढोले इतिहास नीट अभ्यासा.गागाभट्ट हा अष्ट प्रधान मंडळातील एका ब्राह्मणच नातेवाईक होता त्याचे मूळ गाव कोकणातील आहे.कृष्णाजी भास्कर हासुद्धा गोपीनाथ पंत वकील चा साडू होता ह्याला त्याकाळातील पत्र पुरावा आहेत.अरे ब्रह्मन एवढे नलयक असते तर शिवाजी महाराजांनी त्यांना पदरी ठेवले असते का? काहीतरी खोटं बोलून हिंदू समाजात दुही पेरणार्या लोकांपासून सावध राहा.

      हटवा
  5. are kaay itihas sangata mhanaje tumhala jasa soyicha vatala tase sangata kaa krushanjila swarajyat konate sthan dile hote he rahul yani spasht karave aani apan je itihas samikshan karata naa te jara brahmani sahityachya adharech karu naka shivarayancha itihas baryach lokani lihala ahe yachi kalpna asu dya

    उत्तर द्याहटवा
  6. अफजल चा कोथळा बाहेर काढला । कृष्णा कुलकर्णी उभा फाडला ।
    होता जीव म्हणून वाचला शिवा ।

    उत्तर द्याहटवा
  7. कृष्ण कुलकर्णी ब्राह्मण होता आणि वकील च डोकं त्याला वाटलं की शिवाजी महाराज यांनी अफजलखान ला मारले।
    इतक्या मोठया लढवय्या शिवाजी महाराज यांना जर मी मारले तर मी अफजल खान पेक्शा हि मोठा लढवय्या ठरेल
    आणि आदिल शाह हि मला मोठा इनाम देईल। दुसरी कडे क्षत्रिय यांचा राज्य थापन होईल। या ब्राह्मण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अपमान केला आहे। संत तुकाराम महाराज यांच्या अपमान केला आहे।संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा बुडवली। ब्राह्मण समाजानी हमेशा obc समाजाचा अपमान केला आहे। ओबीच समाज शुद्र मंध्ये येते इतिहास जाणून घेतल्या वर

    उत्तर द्याहटवा
  8. Ho. Krushnaji ne swarajyashi pramanik rahayla pahije hote. To vakil asla mhanun Kay zale...shevti manus hota..kutrayche maran aale ki te jast chavtalte..asa prakar krushnaji barobar zala..mhanun tyane shivrayanvar halla kela..he saf chukiche aahe..tyane thoda vichar karayla hava..to Maha nich hota...ulat shudra Lok bare..tyanich sambhaji raje yancha antim sanskar kela...bramhan dekhil khup changle aahet. Kavi kulesh...khare brahman...tya krushnaji la kaviraj kulesh yancha pramane pramanik rahta yet nhavta Kay...to mulatach Maha nich hota..aso.

    उत्तर द्याहटवा
  9. हे वाईच्या कुळकर्ण्यांपैकीं एक. शिवाजीमहाराजांच्या नौकरीस होता. महाराजांनीं १६५७ त थेट अहमदनगरपर्यंत चाल करून मोंगलांचा पराभव केला व विजापुरकरांस सहाय्य केलें. त्यानंतर उभयतांत तह झाला. त्यावेळीं (१६५८) औरंगझेबाकडे महाराजांनीं जो वकील पाठविला तो हाच कृष्णाजीपंत. पुढें कदाचित् यांनीं महाराजांची नौकरी सोडली असावी. कारण अफजल प्रकरणांत यालाच खानानें आपला वकील म्हणून दौत्य करण्यास महाराजांकडे पाठविलें होतें. खान हा वाईचा सुभा (सात आठ वर्षे) असल्यानें, या दोघांची दाट ओळख होती. महाराजांकडे पंत पूर्वी नौकर असल्यानें व त्यांनीं त्याला गौरवल्यामुळें त्यानें खानाचा खरा हेतु त्यांनां कळविला. पुढें खानाचा वध झाला. यानंतर कृष्णाजीपंत हे महाराजांचे पदरी राहिले असावेत. कारण औरंगझेब गादीवर बसला असतां महाराजांनीं त्यावेळीं (१६५९) जो वकील दिल्लीस पाठविला तो हाच कृष्णाजीपंत होता. राजाराम महाराजांच्या वेळीं हा जिवंत असावेसें दिसतें. रामचंद्रपंत अमात्य यांनीं सावंतावर ज्या सरदारास पाठविलें त्याचें नांव कृष्णाजी भास्कर असेंच आहे. सारांश हे शूर, मुत्सद्दी व शिवशाहीचे पहिले मदतगार होते

    उत्तर द्याहटवा
  10. शिवाजी महाराज सोडा हो, बाराव्या शतकातल्या ज्ञानोबा पासून तर कालच्या दाभोळकर पर्यंत या जातीयवाद्यांनी कुणालाच नाही सोडले.
    इतिहासात ज्याने मानवतेची साथ देण्याचा प्रयत्न केला, मग तो ब्राह्मण का असेना, त्याला जातीबाहेर काढून शासन करणारे हे देवाचे तथाकथित दलाल. इतर बहुजन यांच्या दृष्टीने अत्यंत तुच्छच.
    मला अत्यंत वाईट अनुभव आहे या लोकांचा, मतलबासाठी (वेळ पडल्यास क्षरशः कंबरेचं काढून) आपल्याच ताटात जेवणारे हे लोकं मतलब संपल्यावर मात्र त्याच ताटात घाण करायला मागेपुढे पाहत नाहीत. वरून शिरजोरी करत आपल्यालाच नीती शिकवतात.
    खूप वाईट अनुभव आहे माझ्या पाठीशी यांचा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अहो उंकनौन स्वतःचे अनुभवा वरून इतिहासाचे अंदाज बांधायचे नसतात. घडला तो इतिहास, हवा तो इतिहास नाही.

      हटवा
  11. Kahi donhi bajune pichlela vagere nahi
    Krushnaji bhaskar atishay kapati vruticcha vakil hota.
    Swatacha swartha sathi Chatrapati Shivaji Maharajan var vaar krnyas ala
    Ani swatacha karmane ch mela.
    Jaisi karni vaisi bharni

    उत्तर द्याहटवा