शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

'संभाजी राजांबद्दल जास्त का लिहीलं गेलं नाही?'


नुकताच माझे मित्र श्री विनायक देसाई यांनी एक प्रश्न विचारलाय की, 'संभाजी राजांबद्दल जास्त का लिहीलं गेलं नाही?'

खरं तर तीच मोठी चुक झाली. जर राजांबद्दल अधिक लिहिलं गेलं असतं तर आज फक्त नावाचाच श्रीमंत कुक्कुटे, पुरुष नसलेला खेटरकर, फूसका महामुर्ख सांगलीकर, जीच्या नावातच अनिती आहे अशी अनिता पाटील आणी निचोत्तम मोहिते यांची इतिहास विकृत करायची हिम्मत झाली नसती.

पन या लोकांची एकंदर कुकर्म बघता उद्या महाराजांनी जरी सांगीतलं की. "आम्ही हिंदुच होतो आणी आम्हाला हिंदु असल्याचा अभिमान आहे".......... तरी हे लोक महाराजांना चुक ठरवत म्हनतील, "नाहि महाराज । तुम्हाला बुद्धीभ्रंश झालाय........ तुम्ही निधर्मीच होता ........... हिंदु नावाचा कोणता धर्मच अस्तित्वात नव्हता ।"

नुकतीच घडलेली एक घटना सांगतो. म्हनजे तुम्हाला कळेल की या लोकांचा ब्राम्हनद्वेष किती पराकोटिचा आहे आणी यांचं शिवप्रेम किती बेगडी आहे ते ।

काही दिवसांपुर्वी पुण्याच्या पाणीव्यवस्थेच्या संदर्भात एक कार्यक्रम झाला. त्यात असं मत मांडलं गेलं की. 'औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं न करता पुण्याचं नाव बदलावं जेणेकरुण पेशव्यांचे पुणे ही पुणे शहराची ओळख पुसली जाईल.'

....... म्हनजे शिवाजी महाराजांच्या नावाने एक नविन धर्म (?) स्थापन करणा-या पुरुषोत्तम (?) खेडेकराला शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांनी ज्या औरंगाबादेत आपले राजकारणातले दुसरे पाऊल टाकले त्या औरंगाबादेची ओळख संभाजी नगर अशी न झालेली चालेल. पण पुण्याची 'पेशव्यांचे पुणे' अशी ओळख मिटवायची आहे. म्हणजेच संभाजी राजांच्या नावाने संभाजी नगर असा एक शहर ओळखलं जावं यापेक्षा याना पेशव्यांचा द्वेष जास्त महत्वाचा वाटतो.

असो...कोळसा कितीही उगला तो कालच ...त्याचप्रमाणे या लोकांबद्दल कितीही बोला...शेवटी आपलेच शब्द विटाळनार...म्हणून मी जास्त बोलत नाही...सरळ विषयाला हात घालतो.......तर विषय होता कि संभाजी राजांबद्दल जास्त का लिहिलं गेलं नाही???

संभाजी राजांची कारकीर्द नऊ वर्षांची. त्यात १२० लढाया....खरं तर संभाजी राजांची कारकीर्द वयाच्या नवव्या वर्षीच सुरु झाली होती. जेव्हा ते क-हे पठारावर मिर्झा राजांच्या गोटात स्वराज्याचे जामीन म्हणून गेले होते. त्यानंतर मी जे वर उल्लेख केले ते राजकारणातले दुसरे पाउल म्हणजे औरंगाबादला शहजादा मुअज्जम याची भेट घ्यायला गेले ते दुसरे पाउल....

संभाजी राजे शिवाजी महाराजांच्या पश्चात गादीवर आले. सतत नऊ वर्ष लढाया चालू होत्या. चारी अंगानी शत्रू हल्ला करत होता. या सर्व आघाड्यांवर संभाजी राजांनी अगदी उत्तुंग विजय मिळवले. ....पण त्यानंतर संभाजी राजे फितुरीने पकडले गेले.

आज असा खोडसाळ प्रचार केला जातोय कि संभाजी राजांना मनुस्मृति नुसार शिक्षा देण्यात आली. खोटं आहे हे.

१. एक तर संभाजी राजे हे कोणी शुद्र नव्हते. त्यांची मुंज झाली होती. ते क्षत्रिय होते. आणि क्षत्रियाला वेदांचा अभ्यास करण्याचा हक्क मनुस्मृतिने दिला आहे.
२. शहाजी राजे आणि शिवाजी राजांचे बंधू थोरले संभाजी राजे हे सुद्धा संस्कृत अभ्यासक होते. थोरले संभाजी राजे हे कवी सुद्धा होते.
३.शिवाजी राजांची राजमुद्रा संस्कृत मध्ये आहे. अर्थ न जाणून घेता राजांनी ती बनवली असे तर नक्कीच नाही.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे...... स्वतः औरंगजेबाने आपल्या चरित्रात लिहून ठेवले आहे कि, "माझ्या वडिलांनी सर्वात मोठी चूक केली ती शहाजीना जिवंत सोडलं....जर शहाजी उरले नसते तर शिवाजी उभा राहिलाच नसता. दुसरी चूक मी केली ती म्हणजे हाती आलेल्या शिवाजीला माझ्या चुकीमुळे जिवंत जाऊ दिला. आता संभाजीला जिवंत ठेऊन मी तिसरी चूक करणार नाही. "...कोणी विद्रोही लेखक काय सांगतोय यापेक्षा औरंगजेब काय म्हणतो हे जास्त महत्वाचे आहे. नाही का???

तर मंडळी...संभाजी राजांच्या बलिदानानंतर २७ वर्ष मराठे लढत होते. औरंग्याला गाडे पर्यंत. या सत्तावीस वर्षात मराठ्यांची गादी नष्ट झालेली. खजिना नाही. दोन्ही छत्रपती गेलेले. या सत्तावीस वर्षात मराठ्यांनी अक्षरशः घरादारावर पाणी सोडलं होतं. गावच्या गाव बेचिराख होत होती. माणसं मारत होती.

.................. अश्यावेळी संभाजी राजांबद्दल लिहायला कोणाकडे हो सबूर असणार?? आणि संभाजी राजे जरी स्वतः हजार असते तरी ते सुद्धा म्हणाले असते कि "अरे चारी बाजूनी गनीम अंगावर आलाय आणि तुम्ही माझ्याबद्दल काय लिहिताय?? हातातली ती शहामृगाची पिसं टाका आणि तलवारी घ्या. गनिमाला सळो कि पळो करून सोडा."

राजसत्ता स्थिर असेल तर राज्यात कलेचा आदर होतो. ती भरभराटीस लागते. शिवाजी राजांच्या काळात राजसत्ता स्थिर होती. आग्र्याच्या सुतके नंतर शिवाजी राजांनी औरंगजेबाला पत्र लिहिल कि मी आता लढणार नाही. त्यामागच कारण मिर्झा राजाच्या स्वारीत स्वराज्याची नासाडी झाली होती. ती भरून काढायची होती. लढाया नसल्यामुळे राज्य स्थिर होते. कवी, लेखक पंडित यांना राजाश्रय मिळाला होता.

संभाजी राजांच्या बलिदानानंतर इथे सत्तावीस वर्ष मराठे एक-एकटे लढत होते. खजिना नाही. हातात एकही किल्ला कायमस्वरूपी नाही....हातात होती ती तलवार आणि हृदयात शिवाजी राजांनी दिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न. त्या स्वप्नापायी मराठे जीवाचे रान करत होते. तिथे कोणाला वेळ असणार हो संभाजी राजांबद्दल लिहायला???

औरंगजेब मेला आणि त्यानंतर काही काळाने मराठेशाहीला पुन्हा स्थिरता प्राप्त झाली. पण........ 'सत्तावीस वर्षापूर्वी संभाजी राजांचा पराक्रम बघितलेले किती जन उरले होते??'.... हा प्रश्न पडतो. जे काही मागची पिढी येणाऱ्या पिढीला सांगत होती तोच काय तो इतिहास..... यातूनच अनेक दंतकथा सुद्धा निर्माण झाल्या...

माझच उदाहरण सांगतो. चौथीला असताना मी संभाजी महाराजांबद्दल मत मांडलं होतं..माझ्या ताईकडे ...... कि संभाजी महाराजांमुळे शिवाजी महाराज वारले.......कारण आमच्या तिसरीच्या कि चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात असच लिहिलं होतं कि शिवाजी राजांच 1680 साली निधन झाल. त्यांना गुढघेदुखीचा त्रास होता. त्यात संभाजी राजे मुघल सरदार दिलेर खानाला जाऊन मिळाले. त्याचा त्यांना धक्का बसला होता. एवढं लिहून धडा संपवला होता. आज मला माझ्या त्या वक्तव्याची लाज वाटते. कि मी असही या धर्मवीराबद्दल बोललो होतो. आता मला सांगा कि हे पुस्तक कोणी छापलं होतं?? तर ...सरकारने!!

ती अर्धवट माहिती वाचून जर आजच्या युगात आपला गैरसमज होऊ शकतो तर त्याकाळी कुठलीच आधुनिक साधने नसलेला समाज किती अंधारात असेल??? ...

आज जे काही गोंधळाचं वातावरण आहे त्यात दोष कोणाचा?? काहीच माहित नसताना उगीच काही बाही लिहिण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी चुप्पी साधली त्यांचा कि आज स्वतः शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी येऊन सांगितल्याप्रमाणे काहीही लिहिणाऱ्या विद्रोही नावाच्या समाज कंटकांचा ???

विचार करा...मला जेवढा उमगलं तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला. आता तुम्ही विचार करा....काय करायचं ते???


आपला प्रसाद राउत



४ टिप्पण्या:

  1. मित्रा मनु स्मृतीच्या नावाखाली ब्राम्हणांनी काय काय लिहिलंय हे मी नव्याने सांगायची गरज नाही..
    क्षत्रियांनी वेद पठण करू नये यासाठी ब्राम्हण कायम कार्यशील होते...ई त्यामुळे त्यांचा शंभू राजांवर जास्त राग होता...
    राहिला प्रश्न हिंदू धर्माचा,,,तर याच धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे ब्राम्हण कधीच स्वतःची जात हिंदू-ब्राम्हण लावत नाहीत..ते कायम वैदिक ब्राम्हण का लावतात हे सांगाल का..

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ...

    आपण मनुस्मृती वाचली आहे का??

    मनुस्मृतीने क्षत्रियांना वेदांच्या अध्ययनाचा अधिकार दिला नव्हता हे साफ खोटे आहे. खालील श्लोक मनुस्मृतीतील पहिल्या अध्यायातील आहेत.

    अध्यापनमध्ययनं यजनं याजनं तथा ।
    दानं प्रतिग्रहं चैव ब्राह्यणानामकल्पयत् ।।90।।

    प्रथम अध्याय
    श्लोक क्रमांक 90
    मनुस्मृति

    मराठी अर्थ : त्यांनी ब्राम्हणासाठी जी सहा कर्तव्ये निर्धारित केली आहेत ती अशाप्रकारे - वेदांचे अध्यन करने तथा अध्यापन करने, यज्ञ करने तसेच करवुन घेने, दान देने व दान घेने. ब्राम्हणाने या कर्तव्यांचे पालन करने हे त्याचे मर्म तसेच त्याचा परम धर्म आहे.

    हिंदी अर्थ : उन्होंने ब्राह्यणों के लिए जो छः कर्तव्य निर्धारित किए वे है - वेदों को पढ़ना एवं पढाना, यज्ञ करना एवं कराना और दान देना तथा लेना । ब्राह्यण के लिए इन कर्तव्यों का पालन करना उसका मर्म भी है और परम धर्म भी ।
    प्रजानां रक्षणं दानमिज्याध्ययनमेव च ।
    विषयेष्वप्रसक्तिश्च क्षत्रियस्य समादिशतः ।।91।।

    प्रथम अध्याय
    श्लोक क्रमांक 91
    मनुस्मृति

    मराठि अर्थ : त्यांनी क्षत्रियांनी आचरणात आणावयाचे छे योग्य धर्म सांगीतले आहेत ते असे आहेत, - प्रजेचे रक्षण करने, वेदांचे अध्ययन करने, यज्ञ करने आणी विषय भोगांत लिप्त न राहणे.

    हिंदि अर्थ : उन्होने क्षत्रियों के लिए आचरण में लाने योग्य जो धर्म बताए, वे हैं - प्रजा की रक्षा करना, वेद पढना, दान देना, यज्ञ करना और विषय भोगों में लिप्त न रहना ।

    पशुनां रक्षणं दानमिज्याध्यनमेव च ।
    वाणिक्पथं कुसीदं च वैशस्य कृषिमेव च ।।92।।

    प्रथम अध्याय
    श्लोक क्रमांक 92
    मनुस्मृती

    मराठी अर्थ: त्यांनी वैश्य या वर्णासाठी जी कर्मे निश्चित केली आहेत ती अशी - व्यापार करणे, व्याज घेणे ( सावकारी करणे), शेती करणे, पशुंचे पालनपोषण आणि क्रय-विक्रय करणे, दान देने आणि वेदांचा अभ्यास करणे.

    हिंदी अर्थ: उन्होने वैश्य के लिये जो कर्म निर्धारित किये है वे इस प्रकार है, - व्यापार करणा, ब्याज लेना, कृषी एवं पशुओ का पोषण और क्रय-विक्रय करणा, दान देणा और वेद पढना !
    एकमेव तु शुद्रस्य प्रभुः कर्म समादिशत् ।
    एतेषामेव वर्णानां शुश्रूषामनसृयया ।।93।।

    प्रथम अध्याय
    श्लोक क्रमांक 93
    मनुस्मृती

    मराठी अर्थ : ब्रह्याजींनी शुद्र वर्णासाठी एकच कर्तव्य सांगीतले आहे. ते कर्तव्य आहे - ईर्ष्या तथा द्वेष न बाळगता इतर तीन्ही वर्णांची सेवा करने.

    हिंदी अर्थ : ब्रह्याजी ने शुद्र वर्ण के लिए एक हि कर्तव्य बताया है । यह कर्तव्य है - ईर्ष्या तथा द्वेष से परे रहते हुए तीनों वर्णों की सेवा करना ।

    आणि हे मी कुठूनही कोपी पेस्ट केलेले नसून स्वतः मनुस्मृती वाचली आहे. म्हणून सांगू शकतो.

    उत्तर द्याहटवा
  3. संभाजीराजे क्षत्रिय होते,असे आपण म्हणालात.परंतु,छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शुद्र आहे म्हणून नाकारला गेला.शुद्र आहे म्हणून त्यांचे वंशज,कोल्हापूरचे छत्रपति शाहू महाराज यांच्या सर्व पूजा-अर्चा वेदोक्त न होता पुराणोक्त होत होत्या.हे खरे नाही का?

    उत्तर द्याहटवा
  4. संभाजीराजे क्षत्रिय होते,असे आपण म्हणालात.परंतु,छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शुद्र आहे म्हणून नाकारला गेला .
    ===================================================
    गागाभट्टांनी राज्याभिषेक क्षत्रिय छत्रपती म्हणूनच केला याची नोंद घ्यावी छत्रपती या टायटल बद्दल राजे व इतर महत्त्वाच्या कारभार्‍यांशी चर्चा केली याची नोंद घ्यावी . राज्याभिषेकविधीबद्दलचा गागाभटांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे .

    कोल्हापूरचे छत्रपति शाहू महाराज यांच्या सर्व पूजा-अर्चा वेदोक्त न होता पुराणोक्त होत होत्या .
    ============================================================
    एक येडझवा भट होता त्याने तसे अकलेचे तारे तोडले होते ही घटना उघडकीस शाहू निष्ठ ब्राम्हणानेच आणली हे माहीत आहे ना ?

    नंतर हे प्रकरण झाल्यावर छत्रपती शाहूंच्या सर्व पूजा या वेदोक्तानुसारच होत होत्या हे आपणास माहीत आहे का ?

    उत्तर द्याहटवा