महामूर्ख सांगलीकर याचा शिवाजी राजे हिंदू होते काय?? हा लेख वाचला...वरवर त्यांनी जरी या लेखात मोठ्या धर्मावेत्त्याचा आव आणला असला तरी त्यांची धर्माबद्दलची अजाण बुद्धी लगेच कळून येते. या व्यक्तीची अशी समजूत आहे कि मनुस्मृती म्हणजे हिंदू किवा ते म्हणतात तसे विषमतावादी वर्णाश्रम धर्म आहे.
वेद हे हिंदूंचे मुल ग्रंथ आहेत. बाकी सर्व श्रुती, स्मृती, पुराणे हे नंतरच्या काळात लिहिले गेलेले ग्रंथ आहेत हेही या व्यक्तीला माहित नाही.
या व्यतिरिक्त सर्व गोष्टीना मनुस्मृती प्रमाण आहे असे मनुस्मृतीत कोठेही सांगितलेले नाही. मनुस्मृती मध्ये द्वितीय अधायायात श्लोक क्रमांक ८ पासून श्लोक क्रमांक १६ पर्यंत, मनुस्मृतीमध्ये सांगितलेले आचरणविषयक नियम हे जर संदिग्ध वाटले तर कोणत्या कोणत्या गोष्टींचा आधार घ्यावा हेही सांगितले आहे. अर्थात हे ह्यासाठी सांगितले आहे कि जर नंतर कोणी मानुम्सृती मध्ये काही स्वताची भर घातली तर विद्वानांनी ती वेदांच्या कसोटीवर पारखून घ्यावी. यासाठी चार पर्याय दिले आहेत. वेद, श्रुती आणि स्मृती, महर्षी आणि सज्जनांचे आचरण आणि चौथा पर्याय म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून जे योग्य वाटते ते करावे. म्हणजेच मनुस्मृती हा पहिला आणि शेवटचा ग्रंथ नाही.
आज परिस्थिती अशी आहे कि ब-याच हिंदुना मनुस्मृती काय तेही माहित नाही. तरीही या (सांगलीकर सारख्या) लोकांना प्रत्येक गोष्टीत मनुवाद कोठून दिसतो तेच कळत नाही.
असो..... तर त्यांनी शिवाजी महाराज हे हिंदू नव्हते यासाठी जे मुद्दे दिले आहेत ते मुद्दे आणि त्यांचा फोलपणा खाली देत आहे.
१. शिवाजी महाराजांनी शुद्र आणि अतिशूद्र यांच्या हाती शास्त्रे दिली.
- शुद्र आणि अतिशूद्र ह्यांना शस्त्रशिक्षण घ्यायचा हक्क होता. पण ते त्यांच्या कर्माची रुची यावर अवलंबून होते.
कर्ण - जरी तो राजकुमारीचा पुत्र असला तरी समाज त्याला एका सारथ्याचा पुत्र म्हणूनच ओळखत होता. त्याच्या बरोबरीने त्याचा भाऊ म्हणजे एक सराठीच असलेला शोनहि शास्त्रांचे प्रशिक्षण घेत होता.
आणि हे सगळे केव्हा?? तर ज्याकाळी वर्णाश्रम व्यवस्था अस्तित्वात होती तेव्हा.
भगवान श्रीकृष्ण - जोपर्यंत सेनापती अक्रूर भगवंताना आणायला गोकुळात गेले नव्हते तोपर्यंत सर्व समाज हेच समजत होता कि भगवान श्रीकृष्ण हे गवळ्यांचे प्रमुख नंद महाराजांचे पुत्र आहेत. शिशुपालही त्यांना गवळीच मानत होता. तरीही श्रीकृष्णांचे शस्त्राभ्यासाचे शिक्षण झाले होते.
यावरूनच हे सिद्ध होते कि वर्णाश्रम व्यवस्था कालोघात जातीव्यवस्था बनत गेली. अशी अनेक उदाहरणे मिळतील. ब्राम्हण असून रावण क्षत्रिय बनून राज्य करू लागला. वाल्या कोळी नंतर वाल्मिकी त्रुषी बनले. दासी पुत्र असून महात्मा विदुर मंत्री म्हणजेच ब्राम्हण बनले. ह्या गोष्टी काय सूचित करतात???
२. महाराजांनी स्वतःचे आरमार उभे केले व अनेकदा स्वतः आरमारी मोहिमांत भाग घेतला.
- वैदिक धर्मात समुद्रोलंघन निषिद्ध नव्हते. तसे असते तर पहिला अवैदिक किवा अहिंदू महाबली हनुमान असते. कारण ते समुद्र ओलांडून लंकेत गेले होते. दुसऱ्यावेळी प्रभू श्रीराम यांनी समुद्र ओलांडला.
समुद्र गमन करणे निषिद्ध नंतरच्या काळात झाले. त्यासही अपवाद होते. कारण १४ व्या शतकापर्यंत सेतुबंधमचा वापर दक्षिण भारतीय लोक श्रीलंकेत पायी जाण्यासाठी करत होते. अर्थात तेही समुद्र गमनच होते. समाजाची धर्मान्तारापासून रक्षा करावी या हेतूने हा नियम लागू झाला असावा, असे मला तरी वाटते.
३. महाराजांनी जिजाऊ माता यांना शहाजी महारांच्या मागे सती जाऊ दिले नाही.
- माणसाला आपण किती खोटं बोलत असलो तरी सत्य काय ते माहित असते आणि ते त्यांच्या वक्तव्यातून कुठे न कुठे व्यक्त होतेच.....
'जिजाऊ माता शहाजी महाराजांच्या मागे सती जात होत्या. त्यांना शिवाजी महाराजांनी सती जाऊ दिले नाही'.... यातच महावीर सांगलीकर उघडे पडलेत. कारण शिवाजी महाराज हिंदू नसतील तर राजमाता जिजाऊ सुद्धा हिंदू नसणार.....पण जर जिजाऊ माता सती जात होत्या याचाच अर्थ त्या हिंदू होत्या. कारण त्या जर हिंदू नसत्या तर त्यांनी सती जाण्याचा प्रश्नच येत नाही.
४. महाराजांनी अनेक ब्रम्हहत्या केल्या. हिंदू धर्मात ब्रम्हा हत्या हे पाप आहे.
- हिंदू धर्मात ब्रम्हहत्या हे जरी पाप असले तरी त्यास अपवाद आहेत. जर हाच निकष लावायचा झाला तर प्रभू श्री रामचंद्रानी रावणाचा वध केला... तो रावण ब्राम्हनच होता....गुरु द्रोणाचार्यांचा वध द्रुपदाचा मुलगा दृष्ठद्युम्न याने केला. मग हे सुद्धा अहिंदू झाले काय??
५. महाराजांनी म्लेंच्छ लोकांशी मैत्री केली. त्यांनी आपल्या सैन्यात मुस्लिमांना मोठ्या संख्येने प्रवेश दिला.
- अगदीच फुसका असा हा युक्तिवाद आहे. महाराजांनी मुस्लिमांना आपल्या सैन्यात प्रवेश दिला म्हणून ते हिंदू असणार नसतील तर औरंगजेबाच्या सैन्यात सर्वात जास्त हिंदू होते. मग औरंगजेब हिंदू झाला का???
६. महाराजांनी नेताजी पालकर व मुस्लीम झालेल्या अनेक जणांना परत शैव धर्मात आणले. (हिंदू धर्मात हा हक्क फक्त ब्राम्हनानाच आहे. )
- नेताजी पालकर यांना शैव धर्मात घेतले असे म्हणताना त्या शुद्धीकरणाचा सगळा व्याप प्रभाकर भट यांनी सांभाळला हे मात्र सांगितले नाही. शैव धर्मियांच्या विधींमध्ये वैदिक ब्राम्हण कसे पौरोहित्य करू शकतो हे मला पडलेले कोडे आहे.
७. महाराजांनी आपल्या दुस-या राज्याभिषेकासाठी एका दलित स्त्रीशी लग्न केले.
- मला तरी असा संदर्भ अजून सापडला नाही. कोणास माहित असल्यास तो कोणत्या ग्रंथात आहे ते कळवावे. मुळात स्त्रीला मातृ रुपी मानणारे राजे केवळ राज्याभिषेकासाठी एका दलित असेना का कोणीही असेना, स्त्रीशी लग्न करतील हा युक्तिवाद पटत नाही. तरी या बाबतीत अधिक मार्गदर्शन करावे.
कळावे
आपला प्रसाद राऊत.