Monday, December 12, 2011
काल दादर येथे पूजनीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी खूप उत्कृष्ठ असे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातले सगळेच मुद्दे खूप उपयुक्त आणि विचार करण्यास लावणारे होते...पण त्यातले दोन मुद्दे खरच आपल्या सर्वाना विचार करायला लावणारे आहेत.
पहिला मुद्दा आहे लॉर्ड एल्फिन्स्टनचा. इंग्रजांचा भारतात एकछत्री अंमल सुरु झाल्या नंतर जे अनेक इंग्रज प्रशासकीय अधिकारी भारतात आले त्यापैकी एक होता लॉर्ड एल्फिन्स्टन. त्याने भारतात इंग्रज राज्याची मुहूर्तमेढ रोवण्याच जे काम यशस्वी केलं त्याबद्दल जेव्हा त्याला मायदेशातून अभिनंदनपर पत्रे येऊ लागली तेव्हा त्याने जे उत्तर दिल ते आजही आपणास लागू होत आहे. तो म्हणाला कि, "या देशाला आपण जिंकू शकलो कारण आपण श्रेष्ठ होतो अशातला भाग नाहीये तर या देशावर ज्यांचा एकछत्री अंमल होता ते मराठे स्वतःमधील शिवाजी आणि संभाजीला विसरले. म्हणून आपण या लोकांना जिंकू शकलो. नाहीतर या देशाला ज्यांच्याकडे शिवाजी आणि संभाजी यांचा वारसा आहे त्यांना जिंकन आपल्याला कदापि शक्य नव्हतं.
आजही आपण तेच करत आहोत. आज रणाविना स्वातंत्र्य कोण मिळाले?? या शौर्याचं वर्णन करणा-या वाक्याचा उपयोग आपण गांधीसाठी करत आहोत?? कि रणाविण स्वातंत्र्य कोण मिळाले असे असताना कोणतीही लढाई न लढता गांधीनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिल...अरे काय बापाची पेंढ लागून गेली आहे काय?? ज्या इंग्रजांनी कित्येक क्रांतीकारकाना निर्दयपणे ठार मारलं....त्या इंग्रजांना गांधीला चीरडन शक्य नव्हतं काय?? पण कधी ऐकली का कि गांधींजींवर इंग्रजांनी एक काठी तरी उगारली म्हणून......कधीच ऐकायला मिळणार नाही...कारण गांधीने कधी ब्रीटीशांना अंगावर घेतलाच नाही. कारण त्यासाठी मर्दाचा रक्त लागता. मी म्हणत नाही कि हिंसा हाच श्रेष्ठ मार्ग आहे. पण पूर्ण अहिंसा सुद्धा कधी योग्य नव्हे. अहिंसा सिंहाला शोभा देते...कारण तो सामर्थ्यवान आहे. सशाची अहिंसा हि अहिंसा नाही तर तो भेकडपणा आहे. आज आपण कोणाचे वारस आहोत हे विसरलो आहोत.
सिंह माने नेता सशाला ।
वाघ माने नेता अजाला ।
शिवाजी सोडून पुजती गांधीला ।
मराठे असे कसे भुलले षंढतेला ??
ढाल आणि तलवार ज्यांची कुलदैवतं...आणि जे गर्वाने सांगायचे कि आईच्या गर्भात असतानाच आमचं तलवारीशी लग्न लागतं.... ते मराठे आज आधारासाठी काठी घेऊन चालना-या गांधीच्या चरणी वंदन करतात??? राजांसमोर आणि रणचंडी भवानी समोर वाकणारी मान आज गांधीसमोर वाकते??? जगाच्या पाठीवर जर स्वत्व हरवून बसलेला समाज कोणता असेल तर तो महाराष्ट्रातला मराठा समाज आहे.
दुसरा मुद्दा असा कि, मराठ्यांची सेना........ जिला जिंकल्यावरच इंग्रजांना भारतात राज्य करता आलं........ ती सेना लढताना आपल्या खांद्यावर भगवा झेंडा घेऊन लढली....आणि दुर्भाग्यवश हरली....पण स्वातंत्र्य मिळाल्यावर जो भगवा ध्वज खांद्यावर घेऊन आम्ही शेवटची लढाई लढलो आणि त्यात हरलो....... तो भगवा ध्वज आज आम्ही जेव्हा परत जिंकलो आणि स्वातंत्र्य परत मिळवलं तेव्हा आमच्या खांद्यावर असू नये??? त्याजागी ज्याला कधीच काही किंमत नव्हती तो चरखा असेलेला ध्वज आमच्या खांद्यावर द्यावा ??? आणि आम्ही काहीच बोलू नये??? राजांच्यासमोर आम्हाला उभं केलं आणि राजांनी विचारलं कि, "माझा प्राणप्रिय भगवा ध्वज कुठे आहे??" तर आम्ही काय सांगावे?? तो ध्वज आम्ही फक्त आमच्या मंदिराच्या शिखरावर लावतो???
कारण आम्हाला आमच्या भगव्या ध्वजाची किंमत कळलेलीच नाही.....या भगव्या ध्वजासाठी खळद बेलसरच्या लढाईत अवघ्या सोळा-अठरा वर्षाच्या बाजी जेधे उर्फ सर्जेराव जेधे याने प्राण धोक्यात घातले.....याच भगव्या ध्वजासाठी कित्येक मावळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर खर्ची पडले...जो भगवा ध्वज रघुनाथ दादाने अटकेपार फडकवला.....ज्या भगव्या ध्वजाला बघताच मुस्लिमच काय कोणताही परकीय शत्रू ......ला पाय लाऊन पाळायचा ...तो भगवा ध्वज आज कुठे आहे??? आणि तो सोडून आम्ही आमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेला तिरंगा खांद्यावर घेऊन नाचतो??? माझा तिरंग्याला विरोध नाहीये...पण आमचा भगवा ध्वज कुठे आहे??? जरा विचार करा.....
उद्या काही झालं तर मुस्लिमांसाठी जगभरात अनेक राष्ट्रे आहेत...ख्रिश्चनांसाठी अनेक राष्ट्रे आहेत.....पण हिंदुसाठी या जगाच्या पाठीवर दुसरं राष्ट्र नाही आहे.....आणि गांधीच्या षंढ विचारांना कुरवाळत बसलात तर हे एकमेव हिंदूराष्ट्रहि गमावून बसाल.....
( वरील दोन्ही मुद्द्यातले मूळ मुद्धेच फक्त भिडे गुरुजींचे आहेत...बाकी सारा माझा लेख प्रपंच आहे. आणि हे स्पष्टीकरण काही खास कारण मनात ठेऊन मी देत आहे.)
कोणते खास कारण आपण मनात ठेऊन आहात,कृपया सांगावे.
उत्तर द्याहटवाअनामित... आपण जे कारण मनात ठेवून आहात त्या पेक्षा तरी नक्कीच चांगले असेल यात काही शंका नाही
उत्तर द्याहटवा-अजुन एक अनामित