दोन भिन्न जातीचे असूनही या दोन संतांचे अंतर्यामी एकच असलेले विचार आपण मागच्या लेखात पहिले. लोकांच्या उद्धारासाठी झटत ईश्वरप्राप्ती साधणारे हे दोन्ही संत होते. परंतु सध्या काही लोक या दोन संताना ब्राम्हण आणि मराठा या दोन जातीपुरता मर्यादित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी संत तुकाराम ब्राम्हणद्वेष्ठे आणि रामदास स्वामी कर्मठ ब्राम्हण म्हणून प्रोजेक्ट केले जात आहेत. या विकृतीकरणात बामसेफ आणि संभाजी बिग्रेड या संघटना अग्रेसर आहेत. “हे असे का?” याचा मी मला जमेल तसा उलगडा या लेखमालेच्या शेवटी करणार आहे. तत्पूर्वी या लोकांच्या या खोट्या प्रयत्नांचे पुरावे पाहू. यावरूनच वाचकांना कल्पना येईल कि स्वतःचा शुल्लक स्वार्थ साधण्यासाठी या संघटना संताना कसे विकृत स्वरुपात समाजासमोर सादर करत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या भक्तीपर अभंगांना देखील हे लोक ब्राम्हण द्वेषाची पुटे चढवून ब्राम्हण द्वेषाची शिकवण बहुजन समाजाला आणि त्यातही तरुण वर्गाला देत आहेत हे खालील काही उदाहरनांवरून आपल्या लक्षात येईल.
पुढे सरकण्यापुर्वी मी येथे स्पष्ठ करतो कि तुकाराम महाराजांच्या अभंगांचा ज्या गाथा आहेत - त्यात देहू येथील प्रत मी संदर्भ म्हणून येथे वापरत आहे. कारण तीच प्रत अनेक जन प्रमाण मानतात.
तर तुकोबारायांच्या एका अभंगाचा अभंगाचा अर्धाच चरण - त्यातही त्याच्या अर्थाचा विपर्यास करून लोकांना कसा विकृत स्वरुपात सांगितला जातो याचे हा अभंग एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. बिग्रेडचे अनेक कार्यकर्ते वादविवाद करताना खालील श्लोकाचा उल्लेख करून तुकोबाराय ब्राम्हणांना कसे शिव्या द्यायचे हे सांगत असतात. पण संत म्हणजे समभाव. मग ते फक्त एकाच समाजाला शिव्या देतील असे होईल का?? या अशा वागण्याला विचारी संत समभाव म्हणतील का? याचा विचार या बिग्रेडी कार्यकर्त्यांनी करायला हवा होता. पण या कार्यकर्त्यांच्या मनात बिग्रेडने ब्राम्हणद्वेष इतका कि भिनवला आहे कि, ब्राम्हणांच्या विरोधात काहीही आधारहीन सांगितले तरी हे कार्यकर्ते डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवतात.
तुकोबारायांच्या ज्या अभंगाचा हे बिग्रेडी ब्राम्हण विरोधी म्हणून वापर करतात त्या १३१४ अभंगाचा पहिला चरण असा आहे.
अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!१!!
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!
या पहिल्या चरणातील "अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!" या पदाचा अर्थ सांगताना बिग्रेडी सांगतात कि, "तुकाराम महाराज ब्राम्हणांचे तोंड जळो असे सांगत आहेत. त्याच्याकडून वेश्या सुद्धा गर्भवती होऊ शकत नाही असे सांगून तुकाराम महाराज सुद्धा ब्राम्हण नपुंसक असल्याचे सांगत आहेत. "
तुकाराम महाराजांच्या भक्तीचा महिमा सांगणा-या या अभंगाचा असा विकृत अर्थ फक्त बिग्रेडीच सांगू शकतात. मुळात जर तुकाराम महाराजांच्या मनात ब्राम्हणांना शिव्याच द्यायच्या असत्या तर त्यांनी "जळो ब्राम्हणाचे तोंड" असेही लिहिले असते. तसे लिहिण्यास ते कोणाला भिणारे नव्हते. त्यांनी 'ब्राम्हणाचे तोंड जळो" असे म्हटले हे जरी मानले तरी ते "कोणत्या ब्राम्हणाचे तोंड जळो?" हा प्रश्न येतोच. कारण कोणत्याही कारणाशिवाय तुकाराम महाराज असे कोणाबद्दल काही बोलणार नाहीत. सर्वाभूती ईश्वर पाहणारे संत कोणत्याही समाजाला किवा व्यक्तीला कारणाशिवाय दुषणे देणार नाहीत.
तर या प्रश्नाचे उत्तर स्वतः तुकाराम महाराजांनीच चरणाच्या सुरुवातीलाच "अभक्त ब्राम्हण" हे सांगुन दिले आहे. कारण हा अभंग भक्तीचा महिमा वर्णन करणारा आहे. काय त्यासी रांड प्रसविली, चा अर्थ असा अभक्त रांडेच्या पोटी जन्माला आला काय? असं प्रश्नार्थक आहे...
तुकाराम महाराजांच्या मनात येथे ब्राम्हणांना शिव्या देण्याचा हेतू नाही तर भक्तीचा महिमा सांगायचा आहे. कारण या अभंगाच्या आधी १२२९ क्रमांकाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज ब्राम्हण कसा असावा ते सांगतात,
ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धि ! पाहा श्रुतीमधी विचारुनी !! ध्रु!!
जयासी नावडे हरीनामकिर्तन ! आणीक नृत्य वैष्णवांचे !! १!!
याचा स्पष्ठ अर्थ हा आहे कि, तुकाराम महाराज जो ब्राम्हण हरिभक्त नाही त्याचे तोंड जळो असे म्हनत आहेत. कारण त्याच्यापुढच्याच पदात महाराज सांगतात कि,”
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!
येथेही त्यांनी चांभाराची माता धन्य म्हटली आहे. पन कोणत्या चांभाराची तेही सुरुवातीलाच सांगुन ठेवले आहे. जो चांभार वैष्णव आहे त्याची माता धन्य आहे. कारण तिचा पुत्र हरिभक्त म्हणजेच वैष्णव आहे. आणि त्याच्या हरीभक्तीमुळेच त्याचे कुळ आणि जात उभयता धन्य होतात. हा अभंग शुद्ध हरीभक्तीचा महिमा वर्णन करनारा आहे. हरीभक्तीचा महिमा वर्णावा तेवढा कमीच आहे. असो. सद्या तरी तो आपला विषय नव्हे.
तर हे बिग्रेडी कार्यकर्ते आणि लेखक उपरोक्त अभंगातील वर अर्थ सांगीतलेली दोनच पदे सांगुन बहुजन तरुनांची फसवणुक करत आहेत. पुर्ण अभंग बिग्रेडची लेखक आपल्या कार्यकर्त्यांना कधीच सांगत नाहीत. कारण पुढची दोन पदे सांगीतली तर बिग्रेडी लेखकांचा आणखी एक मुद्दा खोटा पडेल याची या धुर्त लेखक व अधिकारी यांना पुर्ण जानीव आहे. कारण पुढचा चरण आहे तो असा,
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी ! नव्हे माझी वाणी पदरीची !!२!!
तुका म्हणे आगी लागो थोरपण ! दृष्ठी त्या दुर्जना न पडो माझी !!३!!
या चरणात तुकाराम महाराज स्पष्ठ करतात कि, हा निवाडा ( अभक्त ब्राम्हणापेक्षा वैष्णव चांभार श्रेष्ट असल्याचा ) पुराणातच सांगीतलेला असुन मी माझ्या पदरीचे काही सांगत नाही. त्यापुढे जावुन तुकाराम महाराज सांगतात कि, भक्तीचा गंध नसलेल्या केवळ जन्मामुळे असलेल्या थोरपनाला आग लागो. अशा दुर्जनावर माझी दृष्टी सुद्धा पडु नये.
पहील्या चरणाचा मोडुन तोडुन विपर्यास करुन आपला स्वार्थ साधन्यासाठी आवश्यक तेवढाच अर्थ आपल्या कार्यकर्त्याना सांगने बिग्रेडच्या नेत्यांना शक्या आहे. पन तिस-या ओळीचा अर्थ बदलने त्यांना शक्य नाही. जे त्यांच्यासाठी पंचाइत ठरु शकते. कारण इथे तुकाराम महाराज स्वताः आपले म्हाणने हे पुराणांत जे सांगीतले आहे तेच आहे असे सांगत आहेत. याऊलट बिग्रेडचे नेते “पुराणे ब्रांम्हणांनी इतरांवर गुलामी लादन्यासाठी व पोटापान्याचा धंदा म्हणुन निर्माण केली आहेत.” असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत. जर पुराणे ब्राम्हणांनी पोटापाण्यासाठी निर्माण केली आहेत तर ब्रांम्हाणांचे शत्रु असलेले तुकाराम महाराज ब्राम्हणांनीच रचलेल्या ग्रंथामधले पुरावे का देतील?? असा प्रश्न सहज बिग्रेडी कार्यकत्यांच्या मनात येवु शकतो. तो प्रश्न येवुच नये म्हणन बिग्रेडचे नेते कधीही हा पुर्ण अभंग आपल्या सांगनार नाहीत. पुढच्या एका अभंगावर भाष्य करण्यापुर्वी पुन्हा एकदा तो पुर्ण अभंग नजरेखालुन घालुया.

अर्थाचा अनर्थ करुन बिग्रेड कशाप्रकारे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा स्वताःचा स्वार्थ साधण्यासाठी वापर करत आहे हे आपण वर पाहीले. आता अशाच आणखी एका कुटील प्रयत्नाचा आपन समाचार घेवुया. संत रामदास स्वामी यांना कर्मठ ब्राम्हण ठरवण्यासाठी बिग्रेड कुठच्या खालच्या थराला उतरु शकते याचा प्रत्यय येथे येतो.
जरी तो ब्राम्हण झाला कर्मभ्रष्ट ! तरी तिन्ही लोकी श्रेष्ट !! .
उपरोक्त श्लोक रामदास स्वामींचा आहे असे सांगत रामदास स्वामींना जातीयवादी ब्राम्हण असे ठरवण्याचा बिग्रेडचा प्रयत्न आहे. आम्हीहि सुरुवातीला हा श्लोक रामदास स्वांमींचाच समजत होतो.परंतु मध्यंतरी आमचे एक मित्र श्री. मधुसुदन चेरेकर यांनी हा श्लोक नसुन तुकाराम महाराजांचा अभंग असल्याचे सांगीतले. त्यांनी या अभंगाचा क्रमांक देखिल सांगीतला. आम्ही तो तपासला असता चेरेकरांचे म्हणने खरे असल्याचे कळले. तो अभंग खाली देत आहे.
अभंग क्र.३०४०,तुकाराम गाथा:-
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥1॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥2॥
जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥
तर असे आहे हे बिग्रेडी विकृतीकरण !

Manya aahe Sant Tukaram aani sant Ramdassawmi he mahan hote tyani samaj probhodhnache kaam kele pan mala aase manyche aahe ki hayt brhaman aani bhujan ha vaad ka?
उत्तर द्याहटवाsarv dharmik vaidik kame brhaman kartat mag bhaujanai ka karoo nayet? Rahila prashna Tukaram maharanjacha, bhautek janana mahit aahe ki mamanji bhaat aani Rameshwershastri yani kay kele aahe he sangavyas nako, gatha kuni budavli? Tukaram maharajancha kadhi janma zala he mahit aahe. mag mrutu kadi zala? bar taychi nond kuthe zali? kahi jan mahnata ki taynche vaikunthgaman zale. He shakay aahe ka?
vaad phakt Brigedi aani brahman haynt nahi aahe. kuni kahi mahno Brhaman lokani nehmi bhujanavar aanaya kela aahe.
आपल्या प्रश्नांची उत्तरे
उत्तर द्याहटवा१. ब्राम्हण आणि बहुजन हा वाद का?? तर हा वाद आम्ही कधीच निर्माण केला नाही. कारण संत हे आपल्याला वेगवेगळे असले तरी ते अंतर्यामी एकच आहेत हे आम्ही हिंदू मानतो पण ज्यांना स्वजातीचा टेंभा मिरवायचा असतो ते संताना देखील जातीच्या खंदकात उभे करून ब्राम्हण-बहुजन वादासारखे अनेक वाद निर्माण करतात.
२. एक काळ असा होता सर्व धार्मिक विधी ब्राम्हण करीत होते. पण आज अनेक ठिकाणी बहुजन समाजातले तरुण देखील धार्मिक विधी करतात. गुजरात मध्ये मैला वाहून नेणा-या कामगारांना मंदिरातले पुरोहिताचे काम दिले गेले आहे. त्यासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम शंकराचार्यांकडून पारित करून घेण्यात आला आहे.
३. तुकोबारायाना त्रास देणारे जे ब्राम्हण होते त्यापैकी रामेश्वरशास्त्री नंतर त्याचेच शिष्य झाल्याचे मी वाचले होते.
४. तुकोबारायाचा मृत्यू हा शब्द फक्त अध्यात्मातील अडाणी व्यक्ती वापरू शकतो. कारण तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांचा मृत्यू झाला असे कोणी म्हणणार नाही. कारण मृत्यू हा जरी व्यावहारिक शब्द असला तरी भक्तांच्या दुनियेत ती परमेश्वराची भेट असते. त्यामुळे संतांच्या देह्त्यागाबद्दल नेहमी समाधी, परमेश्वराशी मिलन, पंच तत्वात विलीन होने असे शब्दप्रयोग वापरतो. कारण मृत्यू हि संज्ञा सामान्य माणसाला त्याच्या शरीराच्या योगाने लागू होते. संत हे शरीराच्या पलीकडे केव्हाच गेलेले असल्याने त्यांच्या मृत्यूचा प्रश्नच येत नाही. कारण शरीर हे शरीर म्हणून उरलेलेच नसते. ते केवळ बाह्य जगासाठी असते. तरी तुम्हाला तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा पुरावा हवा असेल तर हा उल्लेख वाचा. "श्री तुकोबा गोसावी सत्पुरुष हे मौजे देहू ता. हवेली , जि. पुणे येथे भागवत कथा करीत असता अदृश्य झाले हे गोष्ट विख्यात आहे.रा.तुकोबा गोसावी हे बहुत थोर सत्पुरुष होते." इ.स.1704 च्या देहूगावची सनद. सनद रामचंद्र नीळकंठ अमात्यांचे हातची आहे.रामचंद्र पंत छत्रपती शिवाजी राजे यांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदावरील एक प्रधान होते.
आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते.त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो.याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजा सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही,म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय.असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ?
हटवाजरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥ >>
ही वळवळ कोणाची आहे माहीत नाहि पण हा अभंग तुकोबांचा नाही.यावर मी लेख लिहित आहे तुम्हाला नक्की कळवेन कारण तुमचं प्रबोधन करण जरुरीचे आहे.
आद्य शंकराचार्य त्यांच्या परंपरेतील अनेक साधू संन्यासी सदेहच निर्वाणी पोचले होते. उदाहरणार्थ शृंगेरी चे विद्यातीर्थ महास्वामी.. मीराबाई पण सदेहच गुप्त झालेल्यात. अशी असंख्य उदाहरणे आहेत. यासाठी आध्यात्मिक होऊन वावरावं लागतं. इथे जातीवाद आणि समाजकारण चालत नाही.
हटवारामदासी बैठक - मानसिक गुलाम बनवण्याची फॅक्टरी...
उत्तर द्याहटवा# दिलीप बाईत
आज कोकण पट्ट्यातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात 'बैठक' नावाच्या प्रकाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. बहुतांश कुणबी बांधव या बैठकीत जातो. बैठक म्हणजे मानसिक गुलाम करण्याचे कटकारस्थान आहे. आधीच भोळा-भाबडा कुणबी बांधव तर्क करत नाही आणि मग त्याला अशाप्रकारे नादी लावून त्याची गुलामी दृढ केली जाते. ज्या कुणबी कुळात जगतगुरू संत तुकाराम महाराजांसारखे विद्रोही संत जन्माला आले त्या तुकाराम महाराजांची गाथा वाचण्याऐवजी आमचा बांधव भटोबा रामदासाचा दासबोध वाचून गुलामीचा आनंद घेताना दिसत आहे. ज्या रामदासांनी लग्नाच्या बोहल्यावरून पळ काढला तेच रामदास सांगतात संसार करावा नेटका म्हणजे अजबच म्हणावे लागेल.
कुणबी बांधवांनी रामदासांना वाचून गुलाम बनण्यापेक्षा तुकाराम महाराज वाचावेत. संत तुकाराम महाराजांचे आंदोलन लक्षात घ्यायला हवे. संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून तुकाराम महाराज त्याचे कळस झाले आहेत. ‘नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस’! तुकाराम महाराज म्हणतात, ‘अभ्रद तो ब्राम्हण, जळो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली’. ज्या तुकाराम महाराजांनी ब्राम्हण हा अभ्रद आहे व त्याचे तोंडही पाहू नये असे सांगितले, म्हणजे एका कुणबी कुळात जन्मलेल्या संताने सांगूनही आमचे कुणबी बांधव ब्राम्हण-भटोबा रामदासांचे पारायण करत आहेत. दासबोध म्हणजे दासचा अर्थ नोकर, गुलाम, चाकर असा आहे. बोध म्हणजे गुलामांसाठी केलेले मार्गदर्शन. अर्थात मार्गदर्शन म्हणणेही चुकीचे आहे.
या दासांच्या माथी रामदासाची पोथी मारून लोकांना गंडवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. रेवदंडामध्ये कुडमुड्या जोतीषाचे काम करणार्या नारायण धर्माधिकारी या ब्राम्हणाने बैठक नावाचा प्रकार सुरू करून लोकांना नादी लावले. एवढेच नव्हे तर दासबोध पुस्तक, लाल गंधक, फोटो, जपमाळ दासांच्या माथी मारून त्यांच्याकडून आर्थिक लुबाडणूक सुरू केली आहे. म्हणजेच रामदासी बैठक हे आर्थिक लुटीचे केंद्र आहे. मानसिक गुलाम बनवण्याची ती फॅक्टरी आहे. परंतु आमच्या कुणबी बांधवांच्या लक्षात येत नाही.
कुणबी बांधवांमधील प्रतिष्ठित लोक यामध्ये जातात. ज्यांची आर्थिक क्षमता चांगली त्यांना मानसिक गुलाम बनवण्यात आले आहे. आमच्या मंडणगडमध्ये तर शिक्षक जास्त दास झाले आहेत. त्यांना दास म्हणवून घ्यायला आनंद वाटतो. म्हणजे एकप्रकारे गुलामी एन्जॉय करत आहेत. बरं बाल बैठकीच्या नावाखाली छोट्या मुलांनाही बिघडवण्याचा प्रकार सुरू आहे. छोट्या मुलांवर जसे संस्कार कराल तसे ते बनते. आता बालवयातच रामदासाच्या दासबोधाचे (कु) बोध पाजल्याने ते बालक पुढे अस्सल दर्जाचा मोठा गुलाम म्हणून पुढे येण्याची मोठी भीती आहे. कारण मन, मेंदू, मनगटावर ताबा मिळवून त्याला गुलाम बनवले जाते.
मला तर काही लोकांची किव करावीशी वाटते की ज्या बापानं स्वत:ची पदरमोड करून मोठी केली, शिकवले त्या बापाचं फोटो घरात लावत नाहीत, परंतु धर्माधिकारी फॅमिलीचे सारे फोटो घराच्या देव्हार्यात ठेवलेले असतात. अर्थातच ते फोटो विकत घेऊन लावलेले आहेत. एवढेच नव्हे तर रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेटच झालेली नाही, असे असताना ज्या ब्राम्हणांनी शिवाजी महाराजांचा गुरू रामदास म्हणून दाखवला, त्या खोट्या गुरूचे फोटो लावलेले आहेत. एकदा शिवाजी महाराजांच्या दरबारात जाऊन रामदास रडायला लागले, काय महाराज, तुमच्या परगण्यात आम्ही येऊन १५ दिवस झाले आहेत तरी तुमचे आमच्याकडे लक्ष नाही. तुमच्यासारख्या राजाने आम्हांला सोन्याच्या मोहरा देऊन मदत करावी अशी याचना रामदासांनी केली. यावर शिवाजी महाराज म्हणाले, 'हे रयतेचे राज्य असून रयतेसाठी आहे तुमच्यासारख्या गोसावड्यांसाठी नाही.’ ‘याच्यावर लक्ष ठेवा आणि याची कफनी काढून घ्या’ असा आदेश शिवाजी महाराजांनी आपल्या पहारेकर्यांना दिला. खरंच रामदास शिवाजी महाराजांचे गुरू असते तर अशाप्रकारे शब्दप्रयोग केला असता का? याचे उत्तर नकारार्थी आहे. म्हणजेच रामदास हे शिवाजी महाराजांचे खोटे गुरू आहेत. शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ, शहाजी राजे यांनी मार्गदर्शन केले आहे. म्हणूनच ते रयतेचे राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले.
बैठकीच्या नावाखाली धर्माधिकारी फॅमिलीने स्वत:ची आर्थिक उन्नती केलीच त्याचबरोबर अनेक पिढ्यांना संपणार नाही एवढी अमाप संपत्ती गोळा केली. कोणाच्या जीवावर तर कुणबी बांधवांच्या. म्हणजे कुणबी बांधवाने ब्राम्हणाला मोठे करण्यात आयुष्य झिजवले मग ते रामदास असो किंवा धर्माधिकारी. दोघेही ब्राम्हणच. म्हणजेच ब्राम्हण नावाचे जे ग्रहण कुणबी बांधवाला लागले आहे ते सुटायचे नाव घेत नाही. हजारो वर्षे ते ग्रहण सुटत नाही. त्यामुळे कुणबी बांधव आजही चाचपडताना दिसत आहे. काही कुणबी बांधवांना राग येईल परखड लिहल्याबद्दल. परंतु कुणीतरी लिह
मस्त जळतेय तुमच्या शाहू फुले आंबेडकर वाद्यांची. मस्त अशीच बुडाला आग लागली पाहिजे.
हटवाब्राम्हण तुकोबांवर का चवताळले त्याचे कारण खालील अभंग.
उत्तर द्याहटवाब्राम्हण तुकोबांवर का चवताळले त्याचे कारण खालील अभंग.
तुकोबांच्या गाथ्यात ब्राह्मण कोणाला म्हणायचे याचा न्यायनिवाडा करणारे असंख्य अभंग आहेत. त्यातील मोजके अभंग खाली देत आहोत. सोबत सुलभ अर्थही दिला आहे. हे अभंग देहू संस्थानाने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. प्रत्येक अभंगाच्या शेवटी संबंधित अभंगाचा गाथेतील अनुक्रमांक दिला आहे.
# ब्राह्मण तो याती अंतेज असता ।
मानावा तत्वता निश्चयेसी ।।१।।
रामकृष्ण नाम उच्चारी सरळे ।
आठवी सांवळे रूप मनी ।।ध्रु।।
शांति क्षमा दया अलंकार अंगी ।
अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।२।।
तुका म्हणे गेल्या शडउर्मी अंगे ।
सांडुनिया मग ब्रह्म चि तो ।।३।।
(अभंग क्रमांक : १२३०)
अर्थ- रामकृष्ण हे साधे सोपे सरळ नाम जो उच्चारतो, तसेच सावळ्या विठ्ठलाचे रूप मनात आठवतो, तो अंत्यज जातीत जन्मला असला तरी ब्राह्मणच आहे. ज्याच्या अंगी शांती, क्षमा आणि दया हे अलंकार आहेत, जो कुठल्याही प्रसंगी अभंग राहतो, असा धैर्यवंत मनुष्य ब्राह्मणच समजावा. तुकोबा सांगतात की, षडविकार ज्याने सांडिले आहेत, तो कुठल्याही जातीत जन्मलेला असला तरी साक्षात ब्रह्मरूप आहे.
# अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड ।
काय त्यासी रांड प्रसवली ।।१।।
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ।
शुद्ध उभयता कूळ याती ।।ध्रु।।
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी ।
नव्हे माझी वाणी पदरींची ।।२।।
तुका म्हणे आगी लागो थोरपणा ।
दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ।।३।।
(अभंग क्रमांक : १३४४)
अर्थ - ब्राह्मण जातीत जन्म घेऊनही जो मनुष्य भक्ती करीत नाही, त्याचे तोंड जळू दे. असा ब्राह्मण रांडेच्या पोटी जन्मला आहे का? चांभार कुळात जन्मलेला मनुष्य वृत्तीने वैष्णव असेल, तर त्याची माता खरोखरच धन्य होय. अशा मनुष्याच्या माता आणि पिता अशा दोन्हीकडची कुळे शुद्ध समजावी. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, पुराणांनीच हा नियम केला आहे. तुकोबा म्हणतात की, अभक्त असलेला माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या मोठेपणाला आग लागो, तो माझ्या दृष्टीलाही पडू नये.
# ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी ।
पाहा श्रुतीमधी विचारूनि ।।१।।
जयासी नावडे हरिनाम कीर्तन ।
आणीक नृत्य न वैष्णवांचे ।।ध्रु।।
सत्य त्याचे वेळे घडला व्याभिचार ।
मातेशी वेव्हार अंत्यजाचा ।।२।।
तुका म्हणे येथे मानी आनसारिखे ।
तात्काळ तो मुखे कुष्ट होय ।।३।।
(अभंग क्रमांक : १२२९)
अर्थ - ज्याला हरिनाम, कीर्तन आणि वैष्णवांचे नृत्य आवडत नाही, तो ब्राह्मणच नाही. श्रुतीमध्ये म्हणजेच वेदांमध्येच हे लिहिले आहे. हरीनाम, कीर्तन न आवडणारा मनुष्य ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो खरोखर ब्राह्मण असणे शक्य नाही. त्याच्या मातेने अंत्यजाशी व्याभिचार करूनच त्याल जन्माला घातले असले पाहिजे. तुकोबा म्हणतात की, तोंडाने हरीनाम घेणा-या अशा माणसाच्या मुख तात्काळ कुष्टाचे होईल.