सोमवार, १९ डिसेंबर, २०११

डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या पुराणात दशावताराच्या रुपात खूप आगोदर सांगितला गेला आहे

मित्रानो
आपण सर्वानीन शाळेत असताना डार्विन च्या उत्क्रांतीचा सिद्धांत वाचलाच असेल ना??
डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या पुराणात दशावताराच्या रुपात खूप आगोदर सांगितला गेला आहे, हे आपणास माहित आहे का?? कै. अनंतशास्त्री दातार ह्यांनी हा सिद्धांत आपल्या विष्णुपुराणात कसा सांगितलं आहे ते सिद्ध केले आहे. तेच खालील प्रमाणे जमेल तसे मी देत आहे.
१. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला जीव जलचर होता. आणि भगवान विष्णूंचा पहिला अवतार मत्स्यावतार होता.
२. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार दुसरा जीव हा उभयचर होता. आणि भगवान विष्णू यांचा दुसरा अवतार हा कूर्म म्हणजेच कासव हा होता. जो उभयचर प्राणी आहे.
३. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार जीवसृष्टीचा तिसऱ्या टप्प्यात भूचर जन्मास आले. आणि दशावतारातला तिसरा अवतार हा वराह म्हणजेच डुक्कर या उभयचर प्राण्याचा होता.
४. विश्नुपुरानानुसार चौथा अवतार हा नृसिहांचा आहे. म्हणजेच अर्धा हिंस्र प्राणी आणि अर्धा मानव. ज्याला आपण माणसाची सुरुवातीची अवस्था म्हणतो तो माणूस सुद्धा हिंस्र पशुन्प्रमाणे शिकार करायचा.
५. भगवान विष्णूंचा पाचवा अवतार हा वामन स्वरूपातला होता. वामन किवा ज्यास बटू म्हणतात तो. हि माणसाची माणूस म्हणून उत्क्रांतीची दुसरी पायरी आहे. जिथे माणूस बुद्धीने लहान होता. म्हणजेच बटू होता. बळीची कथा इथे रूपकात्मक मानली तर तर बटू अवस्थेतला माणसाने जगावर राज्य करण्याच्या दृष्टीने आपले तिसरे पाऊल म्हणजेच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्यास सुरुवात केली असे म्हणता येईल.
६. सहावा अवतार हा परशुरामांचा होता. जी माणसाची शिकारी अवस्था होती. येथे सहस्त्रार्जुनाची कथा रूपकात्मक मानली तर गाय हे निमित्त होत. माणूस शिकारी बरोबर जनावार्पालन पण करू लागला होता. आणि एका शिकारी समाजाच रुपांतर हळूहळू सुसंस्कृत समाजात होत गेले अस प्रतीत होत. परशुरामांनी शिकारी लोकांचा नाश करून सुसास्न्कृत समाजाला म्हजेच ब्राम्हणांना हि भूमी दान केली.
७. सातवा अवतार हा प्रभू श्रीरामचंद्राचा होता. जी माणसाची सुसंस्कृत अवस्था होती.
या अवतारात माणूस एक समाज म्हणून आकार घेत होता. तो सुसंकृत बनत चालला होता.
८. आठवा अवतार हा भगवान श्री कृष्णाचा होता. हि माणसाची पूर्ण सुसंस्कृत अवस्था.
९. नववा अवतार हा बौद्ध म्हणून समजला जातो. परंतु काही जणांचे असे म्हणणे आहे कि हा अवतार पंढरपूरच्या पांडुरंगाचा आहे. आणि बुध हा शब्द नसून बद्ध हा शब्द आहे. कारण पंढरपूरचा पांडुरंग त्याच्या भक्ताच्या शब्दात बद्ध असून तो विटेवर गेली २८ युगे उभा आहे. अर्थात हाच संदर्भ योग्य आहे, असे मला वाटते.
१०. दहावा अवतार हा अजून अज्ञात आहे असे मानले जाते. परंतु काही धार्मिक ग्रंथात अशी भविष्यवाणी आहे कि हा दहावा अवतार भाताच्या पश्चिम किनाऱ्यावर जन्माला येईल
असो. तर मित्रानो पुराणांना गावगप्पा म्हणून हिणवनार्यांचे दात त्यांच्या घशात जातील इतकी आपली वैदिक संस्कृती श्रेष्ठ आहे. फक्त गरज आहे ती तिचा कालानुरूप योग्य अर्थ समजून घेण्याची. पण हे काम फक्त पूर्ण श्रद्धा ठेवूनच करता येईल. केवळ टीका करायची म्हणून टीका करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.
प्रसाद राऊत.