!! श्री !!
November 17, 2011
मित्रानो
आज शिवप्रताप सप्ताहाचा शेवटचा दिवस. माझी एक मैत्रीण मला म्हणाली होती कि मी आणखी काही दिवस असेच लेख लिहावे. राजांबद्दल नेहमी ऐकत रहावस वाटत...आणि खरं आहे मित्रानो...राजांबद्दल कितीही ऐका...कमीच वाटत ते......आजही आपण शिवाजी राजांबद्दल बोलताना "माझा राजा"....असंच बोलतो...............येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांचा लाडका राजा असा एकमेव शिवाजी राजाच होऊन गेला या जगात.....जनमानसाच इतकं प्रेम ज्याला मिळाल किवा जनमानसात ज्याला अढळ स्थान मिळालं असा शिवाजी राजांसारखा राजा जगाच्या पाठीवर कोणी झालाच नाही..........
शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांनी शिव छत्रपतींच अगदी सार्थ वर्णन प्रश्नार्थक रुपात ज्या कवितेत केलं आहे...ती कविता अशी...
कोण तूं रे, कोण तूं ?
कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ?
जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ?
खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ?
वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ?
भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ?
मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ?
अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ?
कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ?
वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ?
शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ?
की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ?
शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ?
की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ?
कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ?
चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ?
तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ?
मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ?
द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ?
गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं !
संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं !
(महाराज या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रंथातून साभार :-)
शिवाजी राजे कोण होते??? ते इतिहासाच्या कच्च्या दुव्यांवरून आपल्याला उमगणं कठीण आहे....पण एक नक्की कि त्यांचं स्थान आपल्या सर्वांच्या मनात ध्रुव ता-यासारखं अढळ आहे........
शिवाजी राजे आपल्या सर्वांच्याच मनात किती घर करून बसलेत ते मी माझ्याच एका अनुभवावरून सांगतो.....एस. वाय. बी.कॉम. ला असताना मी कोलेजच्या कल्चरल कमिटीचा सदस्य होतो....कोलेजच्या वार्षिक उत्सवाला ज्या अनेक स्पर्धा झाल्या होत्या त्यात टाकाऊ पासून टिकाऊ अशीहि एक स्पर्धा झाली होती...त्यात माझ्या एका मैत्रिणीने रेश्मा जिचं नाव...तिने टाकाऊ लाकडांपासून एक फ्रेम बनवून त्यात शिवाजी राजांचा फोटो लावला होता...तिला पहिला क्रमांक मिळाला......कार्यक्रम संपताच मी तिथे गेलो आणि कल्चरल्च्या बाकी सदस्यांशी पुढच्या स्पर्धेची चर्चा करत असताना अचानक रेश्माच्या काही मित्रांनी जय भवानी ! अशी घोषणा दिली...मला आठवत नाही कि नेमकं त्यावेळी काय झालं मला........ पण अचानक मी प्रतिसाद म्हणून जय शिवाजी!! अशी घोषणा देऊन मोकळा झालो....माझे इतर सदस्य मित्र माझ्याकडे बघतच राहिले....मग मला कळलं कि ती एक उत्स्फूर्त घोषणा होती....इतके शिवाजी राजे आपल्या मनामनात घर करून बसलेत......अहो साधा उदाहरण घ्या ना ...शिवाजी राजांबद्दल व्याख्यानं..... त्यांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकताना आपलं मन कसं तल्लीन होऊन जातं.....जणू ब्रम्हानंदी टाळी लागते ......सर्व सामान्यांना सुद्धा ज्याच्या पराक्रमाचे गुणगान गाताना.... ऐकताना...समाधी अवस्था प्राप्त होते असा हा एकमेव श्रीमान योगी....शिवाजी राजा....
पण.....
पण मित्रानो ,
सहस्त्र रश्मी सूर्य जसा हजार हातानी देतो तसंच या हिंदू प्रतापसुर्याने आपल्याला हजार हातानी खूप काही दिलं..........पण...पण...आपण त्यातून काय घेतलं???? काल माझे मित्र प्रणव शिंदे यांनी हाच विषय माझ्या "शिवाजी राजांनी आम्हाला काय दिले??" या लेखावर मांडला...मी मुद्दाम हा विषय शेवटी ठेवला...कारण आपण शिवाजी राजांबद्दल ऐकतो, बोलतो...पण कृतीत.... आचरणात आणत नाही.....
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ सारे आहे !
आपण फक्त शिवाजी राजाचं नाव घेणार....जय भवानी !! जय शिवाजी !! जय जिजाऊ !! अश्या आणखी ब-याच घोषणा देणार...पण आपलं आचरण मात्र शून्य....
याचा विचार करा.....मी आधीच म्हटल्या प्रमाणे सूर्याकडे उघड्या डोळ्याने बघन शक्य नसतं...पण त्याने दाखवलेल्या प्रकशात मार्गक्रमण करणं आपल्या हातात असतं.....तेच आपल्याला करायचं आहे...आणि हा १२० कोटींचा देश सुजलाम सुफलाम करून दाखवायचा आहे...तरच आपण शिवाजी राजाचं नाव घेण्यास लायक आहोत.....
जय भवानी !! जाऊ शिवाजी !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा