शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

शिवाजी राजांना संकुचित वृत्तीने बघणे सोडून द्या.


November 24, 2011


महावीर सांगलीकर यांचा 'शिवाजी राजे हिंदू होते काय?' हा लेख वाचला. आणि काही प्रश्न मनात उभे राहिले ते असे.......................


१.) त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजी राजांच्या काळात हिंदू हा धर्मच अस्तित्वात नव्हता. शिवाजी राजे शैव धर्मीय होते. वारकरी, शैव, वैदिक आणि मुस्लीम हे दक्खानेतील त्याकाळी अस्तित्वात असलेले धर्म होते. 


नुकतंच कोर्टाने दिलेल्या निकालानुसार प्रत्येक धर्माला एक संस्थापक असतो. हिंदू ह्या धर्माचा कोणी संस्थापक नाही. हिंदू एक जीवनपद्धती आहे. त्यामुळे तो धर्म होऊ शकत नाही. 


पण - तसा बघायला गेला तर इस्लाम सोडला तर कोणत्याच धर्माला संस्थापक नाही. कारण ख्रिश्चन धर्म हा येशू ख्रिस्ताच्या निर्वाणा नंतर त्याच्या नावाने अस्तित्वात आला. तसा उल्लेख कोठेही सापडत नाही कि येशू ख्रिस्ताच्या काळात ख्रिश्चन धर्म अस्तित्वात होता. तीच गत बुद्ध धर्माची सुद्धा. मग हे धर्म सुद्धा धर्म नाहीत असे म्हणायचे का?? कारण यांच्या धर्माचे संस्थापक नाहीत. ज्यांना संस्थापक म्हटले जाते त्यांनी आपला एक वेगळा विचारप्रवाह बनवला. आणि त्याचेच आचरण इतरांनी केले. त्यांनी हा बुद्ध धर्म आहे किवा ख्रिस्चन धर्म आहे असे म्हटले नाही. किवा मी या धर्माचा संस्थापक आहे असे म्हटलेच नाही.  त्यामुळे ते संस्थापक होऊच शकत नाही. 


हिंदू हि आचरण पद्धती आहे. त्यामुळेती धर्म होऊ शकत नाही. पण मला हे कळत नाही  कि एखाद्या प्रेषिताचे वाक्य प्रमाण मानणे म्हणजे धर्म आहे का?? मग आज काही बुद्धिवादी म्हणतात कि माणुसकी हाच खरा धर्म आहे. मग माणुसकी या धर्माचा संस्थापक कोण??? 


मुळात धर्म म्हणजे काय??? तर ती एक आचरण पद्धतीच असते. धारयति सः धर्म ! धारणेनुसार जो बदलत जातो तो धर्म! धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय प्यावे, काय खावे, काय नेसावे, कसे वागावे, कसे वागू नये ह्या गोष्टी धर्म शिकवतो. म्हणजे हि एक प्रकारची आचारसंहिताच असते. 


इस्लाम धर्मियांचेच घ्या ना?? टोपी घालावी, दाढी ठेवावी, गुढग्यावर बसून ईश्वराची प्रार्थना करावी, ईद आणि मोहरम हे सन साजरे करावेत ह्या गोष्टी आचरनाचाच भाग आहेत ना?? बौद्ध धम्मात सांगितले जाते कि प्राण्यावर दया करावी, हिंसा करू नये, दारू पिऊ नये, शिवीगाळ करू नये.... हे सगळे आचारविषयक नियमच आहेत ना?? मग जर ह्या गोष्टी सांगणारे विचारप्रवाह धर्म असू शकतात तर हिंदू हि आचरण पद्धती आहे हे मान्य असताना ती आचरण पद्धती धर्म का असू शकत नाही?? 


२) दुसरी गोष्ट कायद्याने हिंदू या शब्दाची व्याख्या अशी केली आहे कि जैन, शीख, बुद्ध आणि वैदिक मत मानणारे आणि त्यानुसार आचरण करणारे हिंदू आहेत. म्हणजेच ह्या सर्वांचा मिळून एक हिंदू धर्म म्हणा किवा आचरण पद्धती म्हणा..... ह्या सर्व धर्मांना समान मानणारा आणि त्यांना अभय देणारा एक शिवाजी राजा होऊन गेला............. तर तो शिवाजी राजा सर्व धर्माचा ( भारताच्या मातीतील धर्म) असताना त्याला एका शैव धर्माचा राजा म्हणणे हे योग्य कि या सर्व धर्मांसाठी मिळून एक हिंदू हा शब्द योजून त्या हिंदू धर्माचा राजा - शिवाजी राजा म्हणणं जास्त योग्य??? शिवाजी राजांना ते हिंदू राजे होते असे न म्हणता त्यांना ते शैव धर्मीय होते असे म्हणत एका विशिष्ट समाजापुरते त्यांना मर्यादित ठेवणे हे  संकुचित मनाचे लक्षण नाही का??

आज आपण समतापूर्ण भाव मनात ठेऊन विश्व जिंकण्याची उर्मी असलेल्या एका विशाल समाजाकडे वाटचाल करत आहोत कि आपापसात फुटलेल्या आणि एका नवीन जातीव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या समाजाची मुहूर्तमेढ रोवत आहोत याचा विचार या लोकांनी अवश्य करावा. 



( वरील लेखातील शेवटच्या मुद्द्यातील युक्तिवाद हा शिवाजी राजे शैव धर्मीय होते असे मानून केला आहे. ते हिंदू होते याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. )



प्रसाद म. राऊत. 


३ टिप्पण्या:

  1. प्रसादजी मी आपल्याशी सहमत आहे...हे लोके आपला अति शहाणपणा दाखवून शिवरायांचा वापर करून हिंदू धर्म खिळखिळा करू पाहत आहे... हि लोके शेन खाऊन जगतात कि काय?... यांच्या पूर्वजांनी हिंदू धर्म जोपासला आणि वाढविला,.. त्याच धर्मास हे मातीमोल करू पाहत आहे..... यात यांचा फायदा तरी काय देव जाने,... इकडे एक पिढी भविष्यातील संभाव्य असा धोका लक्ष्यात घेऊन,...अखंड हिंदुराष्ट्र करू पाहत आहे,..आणि हे करण्टके विपरीत असा शोध लावत आहे,.. आणि हे कायदे त्यांस जोड घालून, मतांचे राजकारण खेळू पाहत आहे,....
    अहो जसे हे विश्व संथापकविना निर्माण झाले, तसेच हिंदू-धर्मही उदयास आला,...
    भगवंत यांस सद्बुद्धी देओ.....
    जयतु हिंदुराष्ट्रम!..

    उत्तर द्याहटवा
  2. शेवटच महाराजांबद्दल काय ते नीट समजल नाही

    उत्तर द्याहटवा