शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

वाघ्या या कुत्र्याबद्दल काही माहिती - एक सामाजिक लेखक श्री. संजय सोनवणी सर यांच्या ब्लॉगवरून.


हा घ्या वाघ्याचा शिवकालीन पुरावा!

... इ.स.१६७८ साली शिवाजी महाराजांनी दक्षीण दिग्विजय केला, परततांना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गढीला वेढा घातला होता. हे काम त्यांनी सखोजी गायकवाड या आपल्या सरदारावर सोपवले होते. बेलव
डीचा ठाणेदार येसाजी प्रभु देसाई मारला गेला. तथापि त्याची पत्नी मल्लाबाई हिने लढाई सुरुच ठेवली. तिने पुढे शिवरायांसोबत तह केला. शिवरायांनी तिचे राज्य तिला परत दिल
े आणि तिला सावित्रीबाई या किताबाने गौरवले. शिवरायांच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण कायम स्वरुपी कोरून ठेवण्यासाठी सावित्रीबाईने अनेक गावांच्या दरवाज्यांत व मंदिरांसमोर शिवरायांची पाषाणशिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प धारवाडच्या उत्तरेस असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षीनाभिमुख देवळाच्या पस्चिमेस असून त्याची उंची ३ फुट व रुंदी अडीच फुट आहे. शिल्पाचे दोन भाग असून खालच्या भागात शिवरायांनी मांडीवर बसवले आहे. शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार असलेली शिवरायांची प्रतिमा आहे. या शिल्पात शिवरायांसोबत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे. हे शिल्प शिवरायांच्याच हयातीत बनवले असल्याने शिवरायांच्या जीवनात कुत्रानव्हता हे म्हनने निराधार ठरते. एवढेच नव्हे तर शिवरायांच्या कुत्र्याची महती त्यांच्या हयातीतच कर्नाटकापर्यंत पोहोचली होती हे यावरून सिद्ध होते.

२. छत्रपती शिवरायांचे नातू शाहु महाराज (सातारा) यांच्या संगम माहुली येथील त्यांच्या खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे आणि ती जवळपास शिवरायांच्या वाघ्या सारखीच आहे. आणि हे स्मारक शिवरायांच्या निधनानंतरच सुमारे ४०-ते ५० वर्षांनी बनवले गेले होते. याचाच अर्थ असा होतो कि तत्कालीन सुस्थीतीत असलेल्या वाघ्या स्मारकाचीच प्रेरणा या स्मारकामागे असावी. खंड्याने एकदा शाहु महाराजांचे प्राण वाचवले होते याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांत आहे. यावरुन असे अनुमान निघते कि रायगडावरील वाघ्याचे स्मारक हे शाहु महाराजांच्या खंड्याचे स्मारक बनण्याची प्रेरणा ठरले आणि कालौघात नश्ट झालेल्या वाघ्याचे स्मारक बनायला शाहूंचा खंड्याचे स्मारक प्रेरणादायी ठरले. याचाच दुसरा अर्थ असा कि कुत्रयाचे स्थान शिवेतिहासात जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्यांच्याही वंशजांत होते.

याचाच अर्थ असा आहे कि प्रस्तूत वाद हा शिवरायांना, होळकरांना आणि तमाम मराठी मानसांना फसवण्याचा आणि आपले पोट जाळण्याचा धंदा आहे. वाघ्या इतिहासात होता. शाहू महाराजांचा खंड्याही इतिहासात होता. वाघ्या आणि खंड्या हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचीच रुपे आहेत. कर्नाटकातील शिल्प तर शिवरायांच्याच हयातीतील आहे...तेथे गडकरींचा संबंध कोठे येतो? गदकरींच्या"राजसन्यास"च्या ही आधी चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकातही (१९०५)वाघ्याचा उल्लेख यावा याला योगायोग म्हणता येत नाही. याचाच अर्थ असा निघतो कि वाघ्या हे शिवजीवनातील एक अविभाज्य असे पात्र होते आणि त्याचा यथोचित सन्मान राखला गेला पाहिजे.

http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_2060.html



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा