गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

आपल्या उद्याच्या पिढीला काय द्यायचं आहे?? एक अखंड देश कि कोणाच्यातरी भिकेवर मिळालेला जमिनीचा तुकडा?????


एक विनोद आहे. एकदा चित्रकलेच्या तासाला शिक्षक मुलांना " माझा आवडता प्राणी" या विषयावर चित्र काढायला सांगतात. तास संपायला १० मिनिटे बाकी असताना ते सर्वांच्या वह्या तपासतात. एका विद्यार्थ्याची वही कोरीच दिसते. ते त्याला विचारतात,

शिक्षक - काय रे? चित्र का काढल नाहीस??
विद्यार्थी - नाही सर!! मी चित्र काढलं होतं.
शिक्षक - कसलं चित्र काढलं होतंस??
विद्यार्थी - चारा खात असलेल्या गायीचं.
शिक्षक - अरे ह्या पानावर गाय तर सोड चारा पण दिसत नाहीये.
विद्यार्थी - सर चारा गायीने खाल्ला ना??
शिक्षक - ठीक आहे. मग गाय कुठे आहे??
विद्यार्थी - सर, चारा खाल्ल्यावर गाय कशाला थांबेल?? ती निघून गेली.

ह्यातला विनोदाचा भाग सोडला तर आजची आपल्या देशाची स्थिती वेगळी नाही आहे. कागदोपत्री आपल्यासमोर सर्व काही व्यवस्थित चालू असल्याचा चित्र उभा केला जात आहे. पण प्रत्यक्षात तसा काहीच नाही.

कधी कधी सत्य खूप भयानक असतं. आज आपल्या देशात सर्व काही आलबेल असल्याचे आपल्याला एक भारतीय म्हणून जाणवते का??

नुकतीच आसाम मध्ये बांगलादेशी घुसखोरांनी दंगल घडवून आणली. पण आपल्या प्रसार माध्यमांना ती बातमी महत्वाची वाटली नाही. पण जेव्हा हि दंगल बांगलादेशी मुस्लिमांचे बळी घेऊ लागली तेव्हा आपल्या मिडीयाला हि बातमी महत्वाची वाटू लागली. कारण काय ते तुम्ही सर्व जाणताच. त्यामुळे मी वेगळे असे मत मांडायला नकोच.

याच्या आसपासच पाकिस्तानमधून काश्मीर मध्ये बाहेर येणारा बोगदा खोदल्याचे आपण ऐकले असेलच. ह्या गोष्ठी काय सूचित करतात??

आज आपण सर्व बाजूने घेरले गेलो आहोत माझ्या बांधवानो.

एकीकडे पाकिस्तान, त्याच्या थोडेसे वर अफगाणिस्तान, उत्तरेला चीन, आपला शेजारी आणि जगातला एकेकाळचा एकमेव हिंदू देश नेपाळ सुद्धा आपल्या बाजूने नाही. कारण तिथली हिंदू राजवट संपली आहे. तिबेट तर केव्हाच चीनने गिळंकृत केला आहे,. ब्राम्हदेशाशी आपले फार चांगले संबंध आहेत अशातला भाग नाही. त्याच्या खाली बांगलादेशी अतिरेकी आहेतच. ईशान्य भारतात एक कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत. श्रीलंकेने चीनला भारताविरुद्ध कारवाई करायची असल्यास त्यांचा हवाई तळ वापरण्याची मुभा दिली आहे. अंदमान आणि निकोबार या बेटांवर हवाई हल्ले करता येईल अशा प्रकारे चीनने श्रीलंकेच्या हद्दीत हवाईतळ उभारले आहेत.

आणि या परिस्थितीशी आपले नेतृत्व अनभिज्ञ आहे अशातला भाग नाही. पण त्यांना काही करायचेच नाही.

आज काश्मीर मधले सैन्य काढून घेतले. तिथे सैनिकांचे अशा पद्धतीने विकेंद्रीकरण केले आहे कि पाकिस्तानने स्थानिक कट्टरपंथीयांना हाताशी धरून काही करायचे म्हटले तर सहज ते त्या सैन्याला गारद करू शकतात. आसाम मध्ये माओवादी, फुटीरतावादी संघटनांचे बळ वाढत आहे. आणि हि आजची परिस्थिती नाही तर फार पूर्वीपासूनचा हा रंगलेला डाव आहे. ईशान्य भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर उणेपुरे ३००० किलो मीटरचे कुंपण घालायचे होते. त्यापैकी फक्त १०००-१५०० किलो मीटरचे फक्त कुंपण घातले गेले आहे. तेही इतके हलक्या दर्जाचे आहे कि सहज तुटेल. ब्रम्हदेशाच्या हद्दीवर तर सुरक्षा व्यवस्था इतकी कमजोर आहे कि तिथून खुलेआम अमली पदार्थांची तस्करी केली जाते.



आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण २६.११ ला जो मुंबई हल्ला झाला त्याचे नियोजन करण्यासाठी मुंबईचे जे फोटो काढले गेले....... ते आणि ते फोटो काढणारा हा ईशान्य भारतातून नेपाळ मार्गे पाकिस्तानात गेला होता. आणि त्याला स्थानिक दहशतवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली होती. हे कोण होते मी सांगायला नकोच.

दक्षिणेकडे आपल्या सागरी हद्दीत प्रवेश सुलभ व्हावा म्हणून रामसेतू तोडण्याचा कट रचला जात आहे. कारण रामसेतुमुळे आपल्या सागरी हद्दीत आलेला शत्रू अडकून पडतो. एकदा का त्याने दक्षिणेकडील आपल्या सागरी हद्दीत प्रवेश केला कि राम सेतूमुळे त्यास पुढे सरकता येत नाही आणि अशावेळी मागून आपण हल्ला करून त्यांना जलसमाधी देऊ शकतो. शिवाय या रामसेतूच्या हद्दीत एक असे खनिज आहे जे युरेनियमला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. युरेनियमचा वापर अणुप्रकलापांमध्ये केला जातो हे आपल्याला ठाऊक असेलच.


एका संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार भारतविरोधी करणा-या अंतर्गत आणि बाहेरील अशा १७८ संगठना आज अस्तित्वात आहेत.
आज केवळ ईशान्य भारतात ११५ विविध देश विघातक संगठना कार्यरत आहेत.  जम्मू आणि काश्मीर मध्येच जवळ पास ३२ संघटना कार्यरत आहेत. याशिवाय इतर दहशतवादी संघटना आहेतच.


मी फक्त आपल्या समोर जी संकटे आहेत ती मांडली आहेत. मला माझे काही विचार मांडायचे नाहीत. कारण मी किवा इतर कोणी काही सांगितले तरी विचार करणे तुमच्या हातात आहे.

पण एक सांगू शकतो कि, "जर आज आपण काही केले नाही तर उद्याची येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करू शकणार नाही. कारण आपण त्यांच्यासाठी देश म्हणून ठेऊ तो कोणाच्यातरी भिकेवर मिळालेला एक जमिनीचा तुकडा असेल. तोही त्यांना मिळेल कि नाही माहित नाही."

आपला प्रसाद राऊत.