शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५

रामनगर पेठ वसवण्यासाठी शिवरायांनी दिलेला कौलनामा !!

समर्थ रामदास स्वामी शिवथर (मौजे पारमाची कोड नलवडा) येथे रहावयास आले. त्यांनी रामनगर पेठ वसवण्याची आज्ञा केली व १२ वर्षे दिवाणास हासील माफ म्हणून कौल दिला. त्याबरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७६ मध्ये उदमी, व्यापारी मंडळींना रामनगर पेठ वसविण्यासंदर्भात व या ठिकाणी १२ वर्षे दिवाणास हासील माफ म्हणुन कौल दिल्याचे पत्र.
                
!!शिवरायांची अष्ठकोणी राजमुद्रा!!
                                                            १५९७ भाद्रपद व. ८

                                          श्रीरामदास



कौलनामा अजरख्तखाने राजश्री शिवाजी राजे साहेब दामदौलतहू ता। मोकदमानी उदमीयानी व बाजे लोकानी पेठ रामनगर दरवास कोड नलवडा मौजे पारमाची ता। सिवतर सुहुरा सन सीत सबैन व अलफ बादे कौलनामा ऐसा जे कोडमजकुरी श्री                येउनु राहीलियाउपरी पेठ    
                वसवयाची आज्ञा केली आणि बारा वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून कौल
                देवीला त्यावरून तुम्हास कौल दिधला असे हरकोण्ही मानेल ते पेठे मजकुरास                   येउनु राहणे व आमदरफ्त करीत जाणे उदीम वेवसाउ सौदागरी जे करणे असेली ते करीत जाणे दिवानास हासील बारा वरसे इ॥ सालमजकुरा पासूनु होत तोवरी माफ असे काही घेणार नाही व आजार व तसवीस लागणार नाही बारा वर्षाउपरी दिवान हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजुर मोर्तब सुद. 

                                                         मर्यादेयं विराजते 
                                                        ही समाप्ती मुद्रा 


तेरीख २१                                               एकविसावा माहे जमादिलाखर
जमादिलाखर                                                         सुरु सुद बार


शुक्रवार, १४ जून, २०१३

अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! ( खोटा इतिहास कोण लिहित आहे?? भाग 5)

दोन भिन्न जातीचे असूनही  या दोन संतांचे अंतर्यामी एकच असलेले विचार आपण मागच्या लेखात पहिले. लोकांच्या उद्धारासाठी झटत ईश्वरप्राप्ती साधणारे हे दोन्ही संत होते. परंतु सध्या काही लोक या दोन संताना ब्राम्हण आणि मराठा या दोन जातीपुरता मर्यादित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी संत तुकाराम ब्राम्हणद्वेष्ठे आणि रामदास स्वामी कर्मठ ब्राम्हण म्हणून प्रोजेक्ट केले जात आहेत. या विकृतीकरणात बामसेफ आणि संभाजी बिग्रेड या संघटना अग्रेसर आहेत. “हे असे का?” याचा मी मला जमेल तसा उलगडा या लेखमालेच्या शेवटी करणार आहे. तत्पूर्वी या लोकांच्या या खोट्या प्रयत्नांचे पुरावे पाहू. यावरूनच वाचकांना कल्पना येईल कि  स्वतःचा शुल्लक स्वार्थ साधण्यासाठी या संघटना संताना कसे विकृत स्वरुपात समाजासमोर सादर करत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या भक्तीपर अभंगांना देखील हे लोक ब्राम्हण द्वेषाची पुटे चढवून ब्राम्हण द्वेषाची शिकवण बहुजन समाजाला आणि त्यातही तरुण वर्गाला देत आहेत हे खालील काही उदाहरनांवरून आपल्या लक्षात येईल.


पुढे सरकण्यापुर्वी मी येथे  स्पष्ठ करतो कि  तुकाराम महाराजांच्या अभंगांचा ज्या गाथा आहेत - त्यात देहू येथील प्रत मी संदर्भ म्हणून येथे वापरत आहे. कारण तीच प्रत अनेक जन प्रमाण मानतात.


तर तुकोबारायांच्या एका अभंगाचा अभंगाचा अर्धाच चरण - त्यातही त्याच्या अर्थाचा विपर्यास करून लोकांना कसा विकृत स्वरुपात सांगितला जातो याचे हा अभंग एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. बिग्रेडचे अनेक कार्यकर्ते वादविवाद करताना खालील श्लोकाचा उल्लेख करून तुकोबाराय ब्राम्हणांना कसे शिव्या द्यायचे हे सांगत असतात. पण संत म्हणजे समभाव. मग ते फक्त एकाच समाजाला शिव्या देतील असे होईल का?? या अशा वागण्याला विचारी संत समभाव म्हणतील का? याचा विचार या बिग्रेडी कार्यकर्त्यांनी करायला हवा होता. पण या कार्यकर्त्यांच्या मनात बिग्रेडने ब्राम्हणद्वेष इतका कि भिनवला आहे कि, ब्राम्हणांच्या विरोधात काहीही आधारहीन सांगितले तरी हे कार्यकर्ते डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवतात.

तुकोबारायांच्या ज्या अभंगाचा हे बिग्रेडी ब्राम्हण विरोधी म्हणून वापर करतात त्या  १३१४  अभंगाचा पहिला चरण असा आहे.


अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!१!!
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!

या पहिल्या चरणातील "अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!" या पदाचा अर्थ सांगताना  बिग्रेडी सांगतात कि, "तुकाराम महाराज ब्राम्हणांचे तोंड जळो असे सांगत आहेत. त्याच्याकडून वेश्या सुद्धा गर्भवती होऊ शकत नाही असे सांगून तुकाराम महाराज सुद्धा ब्राम्हण नपुंसक असल्याचे सांगत आहेत. "
तुकाराम महाराजांच्या भक्तीचा महिमा सांगणा-या या अभंगाचा असा विकृत अर्थ फक्त बिग्रेडीच सांगू शकतात. मुळात जर तुकाराम महाराजांच्या मनात ब्राम्हणांना शिव्याच द्यायच्या असत्या तर त्यांनी "जळो ब्राम्हणाचे तोंड" असेही लिहिले असते. तसे लिहिण्यास ते कोणाला भिणारे नव्हते.  त्यांनी  'ब्राम्हणाचे तोंड जळो" असे म्हटले हे जरी मानले तरी ते "कोणत्या ब्राम्हणाचे तोंड जळो?" हा प्रश्न येतोच. कारण कोणत्याही कारणाशिवाय तुकाराम महाराज असे कोणाबद्दल काही बोलणार नाहीत. सर्वाभूती ईश्वर पाहणारे संत कोणत्याही समाजाला किवा व्यक्तीला कारणाशिवाय दुषणे देणार नाहीत.
तर या प्रश्नाचे उत्तर स्वतः तुकाराम महाराजांनीच चरणाच्या सुरुवातीलाच "अभक्त ब्राम्हण" हे सांगुन दिले आहे.  कारण हा अभंग भक्तीचा महिमा वर्णन करणारा आहे. काय त्यासी रांड प्रसविली, चा अर्थ असा अभक्त रांडेच्या पोटी जन्माला आला काय? असं प्रश्नार्थक आहे...


तुकाराम महाराजांच्या मनात येथे ब्राम्हणांना शिव्या देण्याचा हेतू नाही तर भक्तीचा महिमा सांगायचा आहे. कारण या अभंगाच्या आधी १२२९ क्रमांकाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज ब्राम्हण कसा असावा ते सांगतात,

ब्राम्हण तो  नव्हे ऐसी ज्यासी बुद्धि ! पाहा श्रुतीमधी विचारुनी !! ध्रु!!
जयासी नावडे हरीनामकिर्तन ! आणीक नृत्य वैष्णवांचे !! १!!

याचा स्पष्ठ अर्थ हा आहे कि, तुकाराम महाराज जो ब्राम्हण हरिभक्त नाही त्याचे तोंड जळो असे म्हनत आहेत. कारण त्याच्यापुढच्याच पदात महाराज सांगतात कि,”

वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!

येथेही त्यांनी चांभाराची माता धन्य म्हटली आहे. पन कोणत्या चांभाराची तेही सुरुवातीलाच सांगुन ठेवले आहे. जो चांभार वैष्णव आहे त्याची माता धन्य आहे. कारण तिचा पुत्र हरिभक्त म्हणजेच वैष्णव आहे. आणि त्याच्या हरीभक्तीमुळेच त्याचे कुळ आणि जात उभयता धन्य होतात. हा अभंग शुद्ध हरीभक्तीचा महिमा वर्णन करनारा आहे. हरीभक्तीचा महिमा वर्णावा तेवढा कमीच आहे.  असो. सद्या तरी तो आपला विषय नव्हे.

तर हे बिग्रेडी कार्यकर्ते आणि लेखक उपरोक्त अभंगातील वर अर्थ सांगीतलेली  दोनच पदे सांगुन बहुजन तरुनांची फसवणुक करत आहेत. पुर्ण अभंग बिग्रेडची लेखक आपल्या कार्यकर्त्यांना कधीच सांगत नाहीत. कारण पुढची दोन पदे सांगीतली तर बिग्रेडी लेखकांचा आणखी एक मुद्दा खोटा पडेल याची या धुर्त लेखक व अधिकारी यांना पुर्ण जानीव आहे. कारण पुढचा चरण आहे तो असा,

ऐसा हा निवाडा जालासे पुराणी ! नव्हे माझी वाणी पदरीची !!२!!
तुका म्हणे आगी लागो थोरपण ! दृष्ठी त्या दुर्जना न पडो माझी !!३!!

या चरणात तुकाराम महाराज स्पष्ठ करतात कि, हा निवाडा ( अभक्त ब्राम्हणापेक्षा वैष्णव चांभार श्रेष्ट असल्याचा ) पुराणातच सांगीतलेला असुन मी माझ्या पदरीचे काही सांगत नाही. त्यापुढे जावुन तुकाराम महाराज  सांगतात कि, भक्तीचा गंध नसलेल्या केवळ जन्मामुळे असलेल्या थोरपनाला आग  लागो. अशा दुर्जनावर माझी दृष्टी सुद्धा पडु नये.

पहील्या  चरणाचा  मोडुन तोडुन विपर्यास करुन आपला स्वार्थ  साधन्यासाठी आवश्यक  तेवढाच  अर्थ आपल्या कार्यकर्त्याना  सांगने बिग्रेडच्या नेत्यांना शक्या आहे. पन तिस-या ओळीचा अर्थ बदलने त्यांना शक्य  नाही. जे त्यांच्यासाठी पंचाइत ठरु शकते. कारण इथे तुकाराम   महाराज  स्वताः  आपले म्हाणने हे पुराणांत  जे सांगीतले आहे तेच आहे असे सांगत आहेत. याऊलट बिग्रेडचे नेते “पुराणे ब्रांम्हणांनी इतरांवर गुलामी लादन्यासाठी व पोटापान्याचा धंदा म्हणुन निर्माण केली आहेत.” असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत. जर पुराणे ब्राम्हणांनी पोटापाण्यासाठी  निर्माण केली आहेत तर ब्रांम्हाणांचे शत्रु असलेले तुकाराम महाराज ब्राम्हणांनीच रचलेल्या ग्रंथामधले  पुरावे का देतील?? असा प्रश्न  सहज बिग्रेडी  कार्यकत्यांच्या  मनात येवु शकतो.  तो प्रश्न येवुच नये म्हणन बिग्रेडचे  नेते  कधीही हा पुर्ण अभंग  आपल्या  सांगनार नाहीत. पुढच्या एका अभंगावर  भाष्य करण्यापुर्वी  पुन्हा एकदा तो पुर्ण  अभंग  नजरेखालुन  घालुया.

अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!१!!
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी ! नव्हे माझी वाणी पदरीची !!२!!
तुका म्हणे आगी लागो थोरपण ! दृष्ठी त्या दुर्जना न पडो माझी !!३!!

अर्थाचा अनर्थ करुन बिग्रेड कशाप्रकारे संत तुकाराम महाराजांच्या  अभंगाचा स्वताःचा स्वार्थ साधण्यासाठी वापर करत आहे हे आपण  वर पाहीले. आता अशाच आणखी एका कुटील प्रयत्नाचा आपन समाचार घेवुया. संत रामदास स्वामी यांना कर्मठ ब्राम्हण ठरवण्यासाठी बिग्रेड कुठच्या खालच्या थराला उतरु शकते याचा प्रत्यय येथे येतो.
जरी तो ब्राम्हण झाला कर्मभ्रष्ट ! तरी तिन्ही लोकी श्रेष्ट !! .

उपरोक्त  श्लोक रामदास स्वामींचा  आहे असे सांगत रामदास स्वामींना जातीयवादी ब्राम्हण असे ठरवण्याचा बिग्रेडचा प्रयत्न आहे. आम्हीहि सुरुवातीला हा श्लोक रामदास स्वांमींचाच समजत होतो.परंतु मध्यंतरी आमचे एक मित्र श्री. मधुसुदन चेरेकर यांनी हा श्लोक नसुन  तुकाराम महाराजांचा अभंग असल्याचे सांगीतले. त्यांनी या अभंगाचा क्रमांक देखिल सांगीतला. आम्ही तो तपासला असता चेरेकरांचे म्हणने खरे असल्याचे कळले. तो अभंग खाली देत आहे.
अभंग क्र.३०४०,तुकाराम गाथा:-

दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥1॥ 
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥ 
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥2॥ 
जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥ 

तर असे आहे हे बिग्रेडी विकृतीकरण !

बुधवार, २९ मे, २०१३

सती प्रथा बंद करण्यासाठी पुण्याच्या शास्त्रींच्या बैठकीत इंग्रज अधिका-याचे पत्र !!


. टि. भा. ले. २२.
सेप्टेबर १८१९.
!! श्री !!
वेदशास्त्रसंपन्न समस्तशास्त्री याचे मजलसीतक्याप्टन  हेनरी इडास रॉबर्टसन साहेब बहादुर म्याजिस्ट्रेट सुभा पुणे याचे बोलणे कि
जी सती भाद्रपद वद्य शनीवारी गेली, त्या सतीचे  हाल झाले ते हाल ह्या मजलसीत जितके आहेत त्यानी पाहीले असते तरी त्याचे मनात येते कि, असे पुन्हा कोणासही होऊ नये येविषयी आम्हास मदत करते  त्यास हल्ली आमचे दिलात येते कि, सती जावयाचा दस्तुर फार खराब, आणि तुमचे शास्त्रात असे लिहिले नाही, गेल्यास चिता नाही, इतकेच मात्र आहे. ऐसियास ही गोष्ट पुन्हा होऊ नये यास्तव शास्त्रात जी रीत लिहिली आहे, कि सती मुकरर जावी असेही नाही त्या रीतीने जावे.
हल्ली शास्त्राची उलट रीत करुन जातात त्यास आम्ही गैर रीतीने जाऊ देणार नाही याजकरीता येविशी आम्ही सरकारात लिहुन बंदोबस्त करुं यात तुम्हास वाईट लागु नये तुमचे मनात येईल कि, सरकार मना करुं लागल्यास निरुपाय   त्यास  येविशी सरकार बंदोबस्त  करु लागल्यास त्यास का अवघड नाही?  परंतु सरकार मनात आणिते कि, ज्या जातीचा जो धर्म आहे, तो मना करण्याचे कारण नाही. परंतु सती जाते, तिचे असे हाल होतात हे काही चांगले नाही. हल्ली या मजलसीत वृद्ध आहेत, त्यांच्याही दिलात आले असेल कि, ऐसा दुर्लौकिक होतो, त्यापेक्षा बंद जाहल्यास बहुत चांगले, ऐसे आले असेल. ऐसियास या गोष्टिचा बंदोबस्त सरकारांतुन जाहल्यास आम्हास काही वाईट लागणार नाही


ऐसी सल्ला तुम्ही सगळ्यांनी दिल्यास  तुमची अब्रु सारे हिंदुस्तानात बहुत होईल, आणि ब्राम्हण धर्म वरकड सारे गोष्टिंत दयाधर्म आहे, आणि सती जाण्याविषयीच मात्र बहुत सक्ती आहे, ऐसे इतर जातीचे लोक याचे दिलात येते; आणि तुमचे शास्त्रात असे लिहिले नाही कि, सती गेली नाही तरी  तीची बेअब्रु आहे बेदस्तुर होते असेही नाही, हल्ली लोकातही सती गेली नाही तरी तिची अब्रु गेली असे कोणी बोलत नाही.
असे असता हल्ली बायको सती जाते याची सबब तीन प्रकारची आहे एक, त्या बायकोचा भ्रतार मृत्यु पावतो, तो वेळेस त्या स्त्रीस अत्यंत दुःख होऊन तीचा दिल बहुत कठीण होऊन ती जात्ये, दुसरी सबब कि, घरामध्ये स्त्रीचा भ्रतार नित्य म्हणत असतो कि, माझी मातुश्री सती गेली, तिचि बहुत अब्रु आणि लौकिक फार चांगला जाहला, असे म्हणत असतो तेणे करुन त्या स्त्रीच्या मनात येते कि, कदाचीत मी अशीच गेले   तरी माझाही  असाच अब्रु लौकिक फार होईल. असे चित्तात येऊन ती सती जाते तिसरी सबब कि, आपला पति मृत्यू पावला, आता आपणास काही आधार नाही, सती जावे तरी धैर्य नाही. परंतु चिंता नाही. माडव अथवा खोप करून वरती लाकडे बहुत घालतात. तो माडव तोडल्यानंतर राहावयाचा नाही, कदाचित मन फिरल्यास बाहेर निघू शकत नाही मग काही तरी होवो ऐशा तीन सबबीने  बायका आपला दिल सक्त करून जातात.
ऐसियास सती जातेवेळेस तिजला माडव करून त्याजवर फार लाकडे मोठमोठी  घालून, तो माडव तिच्या अगावर एकदा तोडून पाडावा, असे तुमचे कोणतेही शास्त्रात निघणार नाही शास्त्रात इतकेच कि, तृणाची पर्णकुटिका करून त्यात प्रवेश करावा असे असेल आणि कदाचित त्यातून बाहेर निघाली असता, त्यास थोडे प्रयश्चित्त पुन्हा शुद्ध करून जातीत घ्यावी असेही शास्त्रात आहे


हल्ली राधाबाई सती गेली, तिने आपले पतीचे लोभाने त्याजबरोबर सती जावे म्हणून निश्चयेकरुन सती गेली   ते वेळेस आपल्या हाताने आत जाऊन अग्नी लावून घेतला. तेव्हा अग्निज्वाळा अंगास लागू लागल्या ती आच सोसवेना, सबब बाहेर निघाली ते वेळेस तिने पुन्हा हिमत बाधून  पुन्हा त्या अग्नीजवळ आली, परंतु आत जाण्याची हिमत जाहली नाही असे समजून त्या बाईचे दीर जवळ होते, त्यांनी तिला जबरदस्तीने पुनः आत टाकली त्यास तुमचे शास्त्रात असे काही लिहिले नाही कि, सती बाहेर निघाली तरी पुन्हा जबरदस्तीने टाकावी. असे नसता ते केले हे शास्त्राच्या उलट होते.

याजकरिता आमच्या दिलात असे मुकरर येते कि, हा दस्तूर बहुत खराब आहे. तेव्हा अशी गोष्ठ पुन्हा होऊ, आम्हास मंजूर आहे कि  अशी खराब चाल पुन्हा होऊ देऊ नये  यास्तव पुन्हा आम्ही असे होऊ देणार नाही राधाबाईस तिचे दिराने अग्नीत   लोटल्यावर पुन्हाही निघाली. ते वेळेस तिचे हाल असे झाले कि, तिचे अंगाची कातडी जळून, मासाचे गोळे बाहेर निघुन पायातूनही रक्त चालले. हे तुमचे पाहिल्यात आले असते, तरी तुमचेही दिलात येते कि, ब्राह्यणाचा दयाधर्म आहे, त्याचा हा फार उलटा प्रकार होतो.
असे समजून तेच वेळेस तुम्ही सर्वत्रांनी म्हटले असते कि, हे झाले असे कदापि होऊ नये आता हल्ली जे मजलसीत बसले आहेत, त्यांनी तिचे हाल पाहून ऐकून दिलात आणीत असतील कि, जर करिता आपलिया बायको, तिची माया आपल्यावर जरी बहुत आहे, तत्रापि मुलालेकराची आई ती, असे हाल करून घेऊन सती जावयाची हिमत तिला होईल असे क्षणभर देखील कोणाचे दिलात येणार नाही. राधाबाईस जळते वेळेस तिजला हिमत झाली, तशी हिमत या पाठीमागे कोणासही जाहली नसेल पुढेही कोणास होणार नाही. कारण कि, अर्धी जळाली असता पुन्हा अग्नीजवळ कापत कापत आली यास हल्ली या मजलसित कोण शक्स आहे कि इतकी हिमत करू शकेल?
साराश हाच कि, शास्त्रामध्ये सती मुकरर जावी असे निघणार नाही, सती जाऊन माघारी पुन्हा निघाली असता, तिजला जबरदस्तीने आत टाकून द्यावी अगर तोडून टाकावी असे नाही तुम्ही म्हणाल कि, शास्त्र नाही परंतु आचार बहुत दिवसी आहे, कि पुन्हा माघारी निघू देऊ नये त्यास आचार बहुत खराब आहे. कारण कि, तुमचे शास्त्रात दुसरे आचार किती सांगितले आहेत? ते आचार हल्ली सोडून देऊन मनस्वी अनाचार करितात, त्यास कोणी पाहात नाही त्याचा बंदोबस्त करावा याविषयी फिकीर कोणीही करीत नाही, सतीविषयी शास्त्रार्थ असता त्याप्रमाणे वहिवाट करीत नाही दुसरे, सती गेल्याने स्वर्गप्राप्ती आहेअसे शास्त्रात लिहिले आहे, असे तुम्ही म्हणाल, तरी निश्चयेकरून जी जाते आणि इमान शाबूत राखते ती स्वर्गास जाते पारान्तु अशी कोणी नाही कि, अग्निस्पर्श अंगास जाहलीयावर, तेच इमान शाबूत राहते असे नाही. अग्निस्पर्शीसमयी बुद्धीस भ्रंश होऊन, नंतर इहलोकही नाही परलोकही नाही असे होते ऐशियास कोणतेही माणसाचे दिलात नाही कि, आपले खुशीने अग्नीत ठरून जाळून घ्यावे. असे कदापि कोणतेही काळी घडणार नाही. कोणतेही दयावंत माणसास जळण्याचे दुःख खुद्दास अनुभव आल्याशिवाय विचार करू शकत नाही. ऐशियास तुमचे दिलात या गोष्ठीचा विचार काय आला असेल?

आम्हावर मेहेरबानी करून, तुम्ही सर्वांनी मिळून असा बंदोबस्त करावा कि, अशी गोष्ठ पुन्हा आमचे दृष्ठीस पडू नये त्या बायकोस पुन्हा ज्याने टाकिलीत्यास दया आहे असे कोणी बोलणार नाही, शास्त्रातही टाकावी असे नाही त्यास ज्या शक्साने के काम केले, त्यास मुकरर सजा व्हावी, आम्हास मंजूर आहे आहे कि त्यास सजा द्यावी शास्त्राकर्ते मोठमोठे होऊन गेले, त्यास बहुत दया  होती त्यांनी सर्व गोष्ठीचा विचार करून, त्यास असा बंदोबस्त केला असेल कि, सतीच्या मनात बाहेर निघावयाचे जाहल्यास तिला बाहेर निघण्याविषयी फुरसत असावी कारण कि, जिचे इमान शाबूत राहत नाही, तिने बाहेर निघावे हे चांगले. असे जाणून तृणाच्या पर्णकुटीकेचा कायदा त्यानी केला

 परंतु तुम्ही आता शास्त्राची आज्ञा उलट करून आपले मगरूरीने दया सोडून देऊन त्या सतीस त्यास तुमचे शास्त्रात असेही आहे कि, सती बाहेर निघाली असता तिला जो वाचवील त्यास बहुत पुण्य आहे हा शास्त्रार्थ तुम्हास माहित आहे काय? आम्हास ठाऊक नाही आम्हास मंजूर नाही कि, आम्ही तुम्हास समजवावे परंतु आम्हास मुनासब आहे कि, हा खराब दस्तूर मना केल्याने तुमचे शास्त्राचे उलट होत नाही तेव्हा आम्ही हि गोष्ठ होऊ देणार नाही. पण तुम्ही क्षमावंत आहा, आणि सा-याचे दिलातही  आहे कि हा दस्तूर बहुत खराब आहे, हा मोडावा. परंतु तुम्हास या गोष्ठीची शरम आहे याजकरीता तुम्ही आमची अर्जी ऐकून घेऊन, हा दस्तूर खराब आहे, हा मोडल्यास आम्हास वाईट लागणार नाही अशी खात्री करावी म्हणजे येविषयीचे बंदोबस्ताविषयी सरकारांत लिहून पाठवू. अशी खातरी तुम्ही केलीयास तुमची अब्रू, दया धर्माविषयी फार होईल परंतु सती कोणतेही -हेने जावी याविषयीची खातरी करनेही तुमचे मर्जीची गोष्ठ आहे आता इतके तुम्ही समजावे कि, आजपासून जी सती जाणार, तिने शास्त्राचा जो कायदा तृणाची पर्णकुटिका करून जावे असे आहे, त्याप्रमाणे जावे. ते होता शास्त्राच्या उलट होऊ लागल्यास आम्ही होऊ देणार नाही कदाचित शास्त्रमार्गाप्रमाणे एकादी सती गेली आणि पुन्हा अग्नीतून बाहेर निघाली, तर जो कोणी जबरदस्ती करून आत टाकील किवा तोडून टाकीलत्या शक्सास आम्ही खुनी असा जाणून त्याचे परिपत्य मुनासब आहे त्याप्रमाणे केले जाईल.