शनिवार, ३ मार्च, २०१२

शिवाजी महाराज हिंदूंचे राज्य का स्थापू शकले???


माझे एक मित्र निलेश नलावडे यांनी गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकातला एक संदर्भ मध्यंतरी दिला होता...तो असा...

``शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असं म्हणावं, तर मग राणा प्रताप वा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाहीत?... शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते... मग असं का व्हावं?...''

त्याचा उत्तर असं आहे....

महाराणा प्रताप हे निसंशय श्रेष्ठ होते...त्यांनी हिंदू धर्माची सार्वभौम सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता...परंतु त्यांच्या अपयशामागे काही करणे आहेत...अर्थात महाराणा प्रताप यांना अपयशी ठरवण्याचा माझा हेतू नाही आणि तेवढा माझा अधिकारही नाही....ते एक सिंहपुरुष होते....पराक्रमाचा सूर्य होते....आणि आम्ही तर त्यांच्याच पराक्रमाचे गोडवे गाणारे परप्रकाशित काजवे आहोत.....

महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्यातला जर एक निश्चित फरक कोणता असेल तर तो असा कि महाराणा प्रताप हे धनुष्यातून सुटलेल्या आणि सरळ जाना-या बाणासारखे होते तर शिवाजी महाराज वाकडा तिकडा मार्ग क्रमणारे तरीही नेमके लक्षावर आदळणारे बाण होते.....शिवाजी महाराज आणि राणा प्रताप या दोघांना सामान्यजणांचा पूर्ण पाठंबा होता...तरीही राजकारणात एक गोष्ठ निश्चित लागते ती म्हणजे अनुभवी आणि मुरब्बी सहकारी....महाराणा प्रताप यांच्याकडे अशा सहका-यांची कमी होती.........महाराजांकडे असे सहकारी खूप होते...बाजी पासलकर, कान्होजी जेधे, माणकोजी दहातोंडे, शामराज पंत रांझेकर आणि महत्वाचे म्हणजे मासाहेब जिजाऊ.....अशी ..........ज्याला आपण टीम म्हणू शकतो......... ती अक्खी टीम होती......महाराज वेळ प्रसंग पाहून लवते आणि बदलते राजकीय निर्णय घेण्यात पटाईत....तर राणा प्रताप हे एकमार्गी....सरळवचनी.....

स्वराज्य स्थापनेत महाराजांना सर्वात जास्त मदत झाली ती म्हणजे सह्याद्रीची.....या उलट राजस्थानात सपाट प्रदेश जास्त......महाराजांनी स्वराज्यासाठी लढायांचे एक स्वतंत्र गनिमी काव्याचे तंत्र विकसित केले.....वेळ पाहून त्यात आवश्यक ते बदल केले....अंगावर चालून आलेली माणसे आपल्याकडे वळवून घेतली......महाराजांचे साथी-सोबती यांच्यामध्ये आदिलशाही, मुघलशाही यांची अन्यायी सत्तेविरुद्ध बंड करून उठण्याची मानसिकता होती.....महाराजांनी ती अधिक प्रज्वलित केली......या दोन्ही महापुरुषांमध्ये तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही कारण दोघांना प्राप्त परिस्थिती पूर्णतः भिन्न होती....

अर्थात्त या दोन्ही महापुरुषांमध्ये तुलना होणे शक्य नाही....ज्याप्रमाणे आज आप सुनील गावस्कर आणि सचिन तेंडूलकर यांच्यात तुलना करू शकत नाही...कारण दोन्ही वेळची परिस्थिती वेगळी होती......


आता राहिला प्रश्न ...पृथ्वीराज चौहानचा....तर पृथ्वीराज चौहान म्हणजे पराक्रमाचा अविष्कार होताच....परंतु काही गोष्ठी त्याच्या हातून चुकल्या.....एक म्हणजे मोहम्मद घोरीला जीवदान देणे...मोहम्मद घोरी १३ वेळा पृथ्विराजावर चाल करून आला....त्यातल्या ८ वेळा त्याचा सपाटून पराभव झाला....४ वेळा पृथ्विराजाने त्याला सोडून दिले.....इथेच आहे महाराजांचे वेगळेपण.....

महाराजांनी हाती आलेला शत्रू कधी परत जाऊ दिला नाही.....अफझल खानाचा वध हे त्याचेच प्रतिक आहे...आज काही जन म्हणतात कि अफझल खानाने महाराजांवर वार केला म्हणून महाराजांनी त्याला मारले...जसे काही अफझल खान महाराजांशी बुद्धिबळ खेळायला आला होता.....अफझल खानाने जरी वार केला नसता तरी महाराज त्याला मारणारच होते....तसे नसते तर महाराजांनी त्याला जावळीच्या दुर्गम प्रदेशात बोलावून घेतलेच नसते......स्वतः त्याला भेटायला त्याच्या छावणीत गेले असते...जावळीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पेरून ठेवलेले सैन्य, जीवा महालासारखे दांडपट्ट्यामध्ये पारंगत मावळे स्वतःबरोबर ठेवणे.... तोफेचे तीन बार झाले कि मराठा सैन्याने अफझल खानाच्या सैन्यावर तुटून पडणे...या सा-या गोष्ठी महाराज अफझल खानाला मारणारच होते....हे सिद्ध करतात....त्याने दगा केला हे फक्त निमित्त मात्र झाले.....त्यानंतर आला तो कृष्णाजी भास्कर...पण तो का चालून आला त्यामागे एक कारण आहे....जे माझ्या पुढील लेखात वाचावयास मिळेल.....महाराजांनी त्यालाहि दया माया दाखवली नाही.....

सरसेनापती प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला जिवंत सोडला तेव्हा महाराजांनी त्यांना लिहिलेले पत्र आपल्या सर्वाना माहित आहे......त्या पत्रात महाराजांनी स्पष्ठ लिहिले आहे कि "करार मदार करणे हे सेनापतीचे काम नाही....ते आमचे काम आहे.....तूम्ही त्याला का सोडला....आता त्याला मातीस मिळावा आणि मगच आम्हाला तोंड दाखवायला या".......या गोष्ठी काय सूचित करतात?? 

हाती आलेला शत्रू जिवंत सोडायचा नसतो हे शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात...पृथ्वीराज चौहान हि चूक एकवेळा नाही तर ४ वेळा करून बसला....

दुसरी गोष्ठ बदलते युद्ध तंत्र......पृथ्विराजाने जयचंद राठोडची मुलगी पळवली म्हणून जयचंद राठोडने स्वतः मोहम्मद घोरीला पाचारण केले...आणि एवढेच नाही तर बलाढ्य समजल्या जाना-या राजपूत सैन्याचा पराभव कसा करायचा हे सुद्धा सांगितले...राजपूत सैन्यात हत्ती असायचे.... टोकावर गुंगी आणणारे बाण या हत्तींच्या गंडस्थळावर मारायचे..याने काय होईल तर हत्ती उलटे होऊन पळत सुटतील....अश्या पिसाळलेल्या हत्तींचं काय करायचं हे राजपूत सैन्याला माहित नसल्याने ते पळत सुटतील...हे मोहम्मद घोरीने केले....त्यातही पृथ्वीराज लढत होता..तेव्हा मोहम्मद घोरीला दुसरा उपाय जयचन्दाने सुचवला तो म्हणजे हिंदु सैन्य हे ध्येयासाठी लढत नसते तर राजासाठी, स्वमिनिश्ठेसाठी लढत असतं....तेव्हा आधी पृथ्विराजाला कैद कर.....हे सगळे उपाय जयचंद राठोडने सुचवले....

पण यात चूक पृथ्विराजाचीसुद्धा आहे...शत्रू येतोय...त्याचे युद्धाचे तंत्रज्ञान बदलले आहे ....त्याचे ध्येय काय आहे..... ह्याकडे पृथ्विराजाने लक्ष दिले नाही.....शेवटी पृथ्वीराजा कैद झाला...तेव्हा तो घोरीला म्हणाला कि, 'मी तुला या आधी सोडला होता...आता तू मला सोड'....त्यावर घोरी म्हणाला...."मूर्ख आहेस...तुझा धर्म शिकवतो कि हाती आलेल्या शत्रूला क्षमा करायची असते....माझा धर्म ते शिकवत नाही....कारण आज मी तुला सोडला तर उद्या तू परत तू चाल करून येशील......"

महाराजांनी या सर्व गोष्ठी टाळल्या.....गनिमी काव्याचे नवे तंत्र महाराजांनी विकसित केले.....त्याचबरोबर नवे तंत्र सतत वापारात आणले....स्वतःचे आरमार उभारले....तोफा गाळण्याचा स्वतःचा कारखाना भगवती दुर्गावर काढला...महाराजांचे हेरखाते शत्रूच्या अंतःपुरापर्यंत पर्यंत पसरले होते....शत्रूची प्रत्येक चाल आणि त्याचे परिणाम राजे ओळखून होते.............आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राजांनी स्वामी निष्ठा याच्या पलीकडे जाऊन ध्येयनिष्ठा शिकवली.....तानाजी पडल्यावर कोंढाणा जिंकायचा राहिला का?? मुरारबाजी पडले म्हणून पुरंदर पडला का??? शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या निर्वाणा नंतर मराठ्यांनी शस्त्रे खाली ठेवली का??? 

अर्थातच नाही...

हेच कारण आहे कि महाराज हिंदूंचे सर्वभौम छत्र स्थापू शकले...कारण महाराज हे सगे सोय-यांसाठी प्रभू श्री राम होते तर रणांगणात शत्रूसाठी स्वतःच अर्जुन आणि स्वतःच श्रीकृष्ण होते.....


जय भवानी !! जय शिवराय !!