गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

गुढी पाडवा आणि संभाजी महाराजांची हत्या याचा काही संबंध आहे का?? ( खोटा इतिहास कोण लिहित आहे??? भाग १ )


गुढीपाडवा जवळ आला तसे बिग्रेडींचे विषारी विचारांचे प्रदर्शन सुरु झाले आहे. संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतिच्या कायद्याप्रमाने ब्राह्यणांनी केली आणि त्याचा बहुजनांना विसर पडावा म्हणुन गुढिपाडवा हा सन सुरु केला हा  तर त्यांचा आवड्ता सिद्धांत आहे. अर्थात हा सिद्धांत देखिल त्यांच्या तथाकथित विचारवंतांच्या रद्दि पुस्तकातले आहेत. ज्याला कसलाही अस्सल पुरावा नसुन केवळ कल्पनाविलास आहे. या अशाप्रकारच्या विषारी विचारांचे हिंदु समाजात प्रक्षेपन करण्यामागील विषारी हेतुचा आधी परीचय करुन घेउया.

उत्सवप्रियता  ही हिंदु संस्कृतीची ओळख आहे. आणि हिंदु संस्कृतीचे बलस्थान देखील. या दोन्ही गोष्ठी नष्ठ करायच्या असतील तर त्या त्या सणाचा संबंध महापुरुषांच्या हत्येशी किंवा म्रूत्युशी जोडुन द्यायचा. कारण दलीत मागासवर्गीय तरुनांची माथी त्यांच्या पुर्वजांवर सवर्ण किवा उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारांची वर्णने सांगुन त्यांना भडकावता येते  आणि  सवर्ण किंवा उच्चवर्णीयांच्या विरोधात उभे करने सोपे असते. पन पिढ्या पिढ्या सत्ता उपभोगनारा किंवा सवर्णांमध्ये मोड्ना-या बहुजन वर्गातील तरुणांना त्याच समाजातील काही घटकांविरोधात उभे करने सोपे नसते. अशा वेळी त्या समाजातील महापुरुषांच्या आयुष्यातील खलनायक म्हनुन एखाद्या जातीला उभे करने सोपे असते. 
असो. या सा-या कारस्थानांची चिकित्सा मी माझ्या पुढील लेखमालेत करनार आहे. तेव्हा विषयाचे गांभीर्य समजावे म्हणुन येथे थोडी चर्चा केली आहे.
बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास या आपल्या टुकार पुस्तकात लेखक खेडेकर पान क्रमांक २४ वर  लिहितो कि,
" शंभू राजांची हत्या बामणांनी मनुस्मृतीच्या कायद्यानुसार केली. सर्व शिक्षा एकाच वेळी अमलात आणल्या. त्यामुळे शंभू राजांची घोर विटंबना बामणांनी केलॆ. वेदाभ्यास संस्कृत पंडित होण्याचा बामनांचाच अधिकार असताना शंभूराजे स्वतः जगातील अत्यंत  हुशार थोर सांस्कृतिक पंडित होते. बहुजन समाजास संस्कृत भाषेचा अधिकार नसतानाही शंभूराजे संस्कृत पंडित होऊन बामणांचाही  पराभव करतात, त्यामुळे शंभूराजे बामणांच्या हाती पडताच बामणांनी शंभूराजांचे डोळे फ़ोडले, कानात तेल ओतले, जीभ कापली, शिरच्छेद केला, शरीराचे तुकडे तुकडे केले, चामडे काढले, शंभूराजांचे शीर म्हणजेच डोके उंच बांबूवर लटकावून तुळापुर, वढू, आपटी परिसरात फ़िरवले. "

कोणताही इतिहासका किवा इतिहास अभ्यासक इतिहासाशी संबंधित विधान करतो तेव्हा त्याने त्यास आधारभूत संदर्भ द्यायचे असतात. तसा अलिखित नियमच आहे. पण आम्ही सांगतो तोच इतिहास आहे या गर्वाने पुस्तके लिहिणा-या खेडेकरआदी मंडळीना इतिहासातील "" -हस्व कि दीर्घ हे देखील माहित नसताना त्यांच्याकडून अशा नियमांची किवा तत्वांची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा होय. आणि त्यापेक्षा मूर्ख ते लोक जे या अशा बिन आधाराच्या गोष्ठींवर विश्वास ठेवून आपले डोके खराब करून घेतात.

संभाजी महाराजांची हत्या जर मनुस्मृतीप्रमाने झाली असेल तर देवगीरीच्या कृष्णदेवरायाची हत्या कोणत्या ग्रंथाच्या आधारे झाली हे देखिल खेडेकर यांनी सांगीतले पाहीजे.  

कारण कृष्णदेवरायांची हत्या मुस्लिम आक्रमकांनी केलीच पन मृत्युपरांत त्यांचे शीर कापुन ते न्हाणीघराच्या पाणी वाहुन नेणा-या नालीच्या तोंडावर बसवले.  

राजा हरपाल देवाचे शरीरावरील चामडी सोलुन त्यांचे उघडे शरीर वेशीवर सोललेल्या बोकडासारखे टांगुन  ठेवले होते.


पन खेडेकर हे सांगनार नाही. कारण हे सांगण्याचे पैसे खेडेकरला मिळत नाहीत. आणि वर सांगीतलेले राजे हे बहुजन तरुणांना माहीत असतातच असे नाही. पन शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आजच्या बहुजन तरुणांना देवतांप्रमाने आहेत.  शिवराय आणी शंभुराजे हे आम्हा बहुजन तरुणांच्या भावनांशी निगडीत आहेत. त्यामुळे खेडेकर हे आमच्या बहुजन तरुणाच्या भावनांना हात घालुन आम्हाला आमच्या हिंदु  धर्माच्याच विरोधात उभे करु पाहत आहेत.

त्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाच्या आडुन ते बिनबुडाची विधाने करुन मराठा तरुणांची माथी भडकावत आहेत. त्यांच्या पुस्तकातील वरिल उतारा हे त्याचेच एक उदाहरन होय. वरील उता-यात खेडेकर समस्त मराठा तरुणांची कशी दिशाभुल करीत आहेत हे आपण पुढे पाहुच. खेडेकर यांनी वर केलेल्या बिधानाला कोंणताही संदर्भ दिलेला नाही

पुढे याच विधानाचा संबंध काही जनांनी गुढीपाडव्याशी जोडुन गुढीपाडवा या हिंदुंच्या सनाला विरोध करायला सुरुवात केले आहे. त्यांच्या म्हणन्यानुसार वढु-बुद्रुक येथे संभाजी महाराजाची ब्राम्हणांनी मनुस्मृतिच्या  कायद्याप्रमाने हत्या केली. आणि त्याचा आनंद म्हणुन गुढी उभारली. या संपुर्न कल्पनाविलासाचा पाया उध्वस्त  करन्र गर्जेचे आहे म्हनुन प्रथम संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतिच्या काह्यद्याप्रमाने झली कि नाही ते पाहु…………………   

खेडेकरांनी जरी त्यांच्या  विधानाला पुष्ठी देणारा  पुरावा दिला नसला तरी ते खोटे बोलत असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे.   

औरंगजेबाच्या दरबारातील आणि शंभूराजांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ईश्वरदास या गुजराथी माणसाने लिहिलेल्या "आलमगीर विजय" या ग्रंथातील संदर्भ पाहु. मूळ फारसी भाषेत असलेल्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर सेतू माधव पगडी यांनी केले आहे

बहादूरखान आणि इखलास खान हे आपले सैन्य तयार करून युद्धास तयार झाले. त्यांनी त्वरा करून चहूकडून संभाजीला घेरले त्यावेळी उभय पक्षांत मारामारी झाली. संभाजीच्या बरोबर असलेले चारशे सैनिक मारले गेले. मोगलांचे जवळजवळ अडीचशे सैनिक मृत्युमुखी पडले. हे पाहून मराठे पळाले. संभाजीनेही पळून जाण्याचा बेत केला, पण त्याचा बेत सिद्धीस गेला नाही. तो मोगलांच्या हाती कैद झाला. वाईट कर्मांची फळे वाईटच होतात. कविकलश यास त्याच्या कृत्याची फळे मिळाली. संभाजी बरोबर तो पण कैद होऊन  मोगलांच्या तावडीत सापडला.
संभाजीला कैद केल्याची बातमी बादशाहाला शाहजादा आजम याच्या पत्रावरून समजली. इखलास खानाचा हरकारा खंडूजी याने बादशाहा पाशी येउन सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर हि बातमी सगळीकडे जाहीर झाली. यानिमित्त लष्करात आनंद निदर्शक अशी वाद्ये वाजवण्यात यावीत अशी आज्ञा बादशाहने केली.
बादशहा बरोबर असलेल्या मोठमोठ्या अमीर उमरावानी बादशाहाला नजराणा देऊन या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. खंडूजी हरकारा यास खूप बक्षीस देण्यात आले.
इखालास खान आणि बहादूर खान यांस  मनसबिची बढती, बहुमानाचे पोशाख, जडावाचे खंजीर, हत्ती घोडे इत्यादी देण्यात येउन त्यांचा मानसन्मान करण्यात आला. संभाजीला तरतुदीने आणि बंदोबस्ताने दरबारात घेऊन यावे अशी त्यांना आज्ञा करण्यात आली. बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखालास खान आणि बहादूर खान हे संभाजी, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेऊन बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशाहने आज्ञा केल्यावरून इखालास खान आणि हमिदुद्दीनखान यांनी संभाजी, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची उंटावरून धिंड काढली.
त्यांची हजार प्रकारे फजिती करण्यात येत होती. अशाप्रकारे त्यांना छावणीत आणण्यात आले. दिवाणखान्याच्याप्रवेश द्वारापर्यंत ते येउन पोहोचल्यावर बादशहाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयाजवळ उभे करण्यात आले. बादशहाने संभाजीकडे पहिले. त्याची दुर्दशा पाहून  बादशहाच्या मनावर परिणाम झाला. यानंतर बादशाहा सिंहासनावरून उतरला आणि त्याने प्रार्थना करून परमेश्वराचे आभार मानले.

पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवविली नाही. इखलास खान आणि हमिदुद्दिन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशाहने आज्ञा केली कि सिकंदरखानाच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे. कवी कलश आणि त्याचे साथीदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात याव्या.
यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रुहुल्लाखन यास खालीलप्रमाणे आज्ञा केली.
" तुम्ही जाउन संभाजीपाशी चौकशी करावी कि तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे?? तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते."
पण माणसाची जीविताची आशा सुटली कि तो मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहा संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्यांची निंदानालस्ती  केली. त्याने जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादसहाला सांगितले नाही. पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा त्याने बादशाहाला इशारा दिला. यावर बादशाहने आज्ञा केली कि,  संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून ( त्याला आंधळा करून) त्याला नवी दृष्ठी द्यावी ( वठ्नीला आणावे.).
त्याप्रमाणे करण्यात आले. पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासून जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेक-यांनी त्याला अन्नसेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले. शेवटी हि बातमी बादशाहाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशाहाच्या आज्ञेने त्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले.

तेथे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके औरंगाबादेहून बु-हानपुरापर्यंत फिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येउन शहराच्या द्वारावर लटकावण्यात आले. ( मोघल मराठा संघर्ष पान ३० ते ३१ )


मला वाटत नाही कि या भरभक्कम पुराव्यानंतर आणखी पुरावे देन्याची गरज आहे.
संभाजी महाराजांच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी ब्राम्हणांनी गुढ्या उभारल्या….”  या खोट्या प्रचारामागील पाया ज्या विधानावर आधरित होता तो पाया म्हणजेसंभाजी राजांची हत्या ब्राम्हणांनी मनुस्मृतीप्रमाणे केलीहा होय. आणि तो पायाच भुसभुशीत असुन केवळ कल्पनाविलासावर आधारीत आहे.

तो पायाच आलमगीर विजय या ग्रंथातील वर ऊल्लेख केलेल्या संदर्भाने नष्ठ केला आहे. त्यामुळे त्यावर उभारलेली आणि गुढीपाडवा या हिंदु सणाला विरोध करण्यासाठी रचलेली खोटी कहाणी आपोआप खोटी सिद्ध होते.

 माझी माझ्या बहुजन बांधवांना एवढीच विनंती आहे कि अशा फालतु लोकांच्या तोंडुन इतिहास ऐकण्यापेक्षा आणि त्यांचीदर्जाची पुस्तके वाचण्यापेक्षा जाणकारांचे पुस्तके वाचा. इतिहास अभ्यासा. जे वाचले असेल त्याची सत्यता पडताळुन पहा. खेडेकर आदी मंडली फार तर द्वेश करने शिकवु शकतात. इतिहास नाही.

धन्यवाद !!

गुढीपाडव्याच्या आणि हिंदु नबवर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

नविन वर्ष सर्वांना सुख समृद्धिचे जावो !!