सोमवार, २८ जानेवारी, २०१३

देवळाच्या पैश्यांवर डोळा का??


सध्या बरेच जन श्रद्धेच्या दुनियेत जो बाजार मांडला गेला आहे त्याबद्दल भरभरून बोलतात...... पण समाजाच्या कोणत्या क्षेत्रात बाजार मांडलेला नाही ते कोणी सांगेल का??  

देवळात देव धर्माच्या नावाखाली लुट होते... मान्य!! पण लोक का स्वतःची लुट करून घेतात?? लोकांनी कुठे अक्कल गहान ठेवलेली असते??   

मंदिराच्या बाहेर भिकारी असतात... त्यांना कोणी विचारीत नाही...पण देवाला दुधाचा अभिषेक घातला जातो.... हे चुकीचे आहे हे मान्य........ पण आज खरच पोटासाठी भिक मागणारे किती आहेत?? जर नीट डोळे उघडून बघितले तर भिक मागणे हा देखील एक धंदा झालेला दिसून येईल.... चेंबूरच्या स्टेशन परिसरात एक भिकारी स्त्री आहे.... तिच्या दोन रिक्षा आज चेंबूर मध्ये धावतायत.... दोन खोल्या आहेत....... मागे कॉटन ग्रीन येथे रेल्वे अपघातात एक भिकारी मेला ... पोलिसांनी त्याच्या सामानाची झडती घेतली तेव्हा त्यात ७५ हजाराची चील्लर सापडली......... आज मुंबईत अनेक कुटुंबे, लहान मुले भिक मागताना दिसतात... आमच्या वाशीत अनेक जन एक वडापाव खायचाय म्हणून पैसे मागतात... पण जेव्हा एखादा व्यक्ती पैसे देतो तेव्हा लगेच दुस-या व्यक्तीकडे वडापाव साठी पैसे मागितले जातात....... जर हि परिस्थिती असेल तर कशाच्या आधारावर दान करायचे???


चला हेही सोडू.... आमचे डोळे उघडे ठेऊन... ज्याला खरच भूक लागली आहे त्याला आम्ही देवाला वाहायचे पदार्थ देवू.... पण हे एकदा करता येईल.... रोज रोज त्याला कोण देईल?? त्याच्या पोटापाण्याची जबाबदारी रोज रोज कोण घेईल?? आणि तरीही समजा दररोज त्याला कोणी ना कोणी काही ना काही अन्न दिले तर तो काम कशाला करेल???  त्याला भिक मागण्याची वेळ पडू नये हि जबाबदारी कोणाची??? आज देशात रोजगार निर्मितीची जबाबदारी कोणाची आहे?? सरकारची कि धार्मिक संस्थांची??? आणि जर धार्मिक संस्थांनी हे काम करावे असे जर बुद्धीजीवी लोकांना वाटत असेल तर जनतेने या कामासाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी भगवी वस्त्रे धारण करून हिमालयात चालू पडावे.... फुकटच्या खुर्च्या कशाला उबवतायत हि मंडळी ??? माझा भिक मागणा-यांना विरोध नाही आहे.... त्यामागच्या आयतखाऊ वृत्तीला विरोध आहे..........

देवळात जमा होणारा पैसा समाजासाठीच वापरला पाहिजे.. पण तो अशा -हेने वापरला पाहिजे जेणेकरून त्यातून समाजाला परत काही तरी मिळेल... हा पैसा अनाथ आश्रामांसाठी वापरा... अजाणत्या वयात एखादा गुन्हा करून गुन्हेगाराचा शिक्का माथी घेऊन वावरणा-या मुलांच्या पुनर्वसनासाठी वापरा .... त्याचे रिटर्न मिळतील....... पण हा पैसा आयतखाऊ लोकांसाठी कधीच वापरला जाऊ नये.... कारण त्यांची भूक कधीच शमणार नाही..... उलट त्यांची संख्या वाढत जाइल....

आता राहिला प्रश्न सरकारने हि मंदिरे ताब्यात घेऊन हे आर्थिक व्यवहार नियंत्रित करायचा... तर त्यासाठी सरकार पात्र आहे का?? हिंदूंच्या मंदिरातून मिळणारे उत्पन्न हिंदूंच्या विरुद्ध कार्य करणा-या धर्मांसाठी वापरले जाणार नाही याची खात्री सरकार देऊ शकते काय?? कॉंग्रेस सोडा... भाजपचे सरकार तरी हि खात्री देईल काय?? उत्तर नकारार्थीच असेल........  

आज आपले नेते इतके भ्रष्ठ आहेत कि त्यांच्या हाती मंदिराचे आर्थिक व्यवहार देणे म्हणजे चोराच्या हाती खजिन्याच्या किल्ल्या देण्यासारखे आहे.....  

काही वर्षापुर्वी एक अहवाल ऐकला होता.. केरळ कि कर्नाटक मध्ये एका वर्षात छोट्या मोठ्या मंदिरातून मिळालेल्या ८४ कोटी रुपयांच्या उत्पन्नापैकी ४० कोटी मुस्लिमांच्या मशिदी आणि दर्ग्याना स्थानिक सरकारने दिले.... १०-२० कोटी चर्चना दिले.... हिंदूंच्या हाती काय उरले??? मंदिरातली घंटा........  

मंदिरातून जमा होणारा पैसा सरकार हिंदूंच्याच हितासाठी वापरेल हा जर विश्वास सरकार निर्माण करू शकले तर मी म्हणतो आमच्यासारखे कित्येक हिंदुत्ववादी स्वताहून सरकारला या कार्यी पाठींबा देतील.............. पण आधी सरकारने तो विश्वास निर्माण करावा............  



आता एका मुलभूत प्रश्नाकडे वळतो.... मंदिरातली हि संपत्ती आजची नाही तर गेल्या कित्येक शतकांमधली आहे... गेल्या कित्येक दशकात भारतावर कॉंग्रेसचे राज्य असताना हा मंदिरातील संपत्तीचा मुद्दा का ऐरणीवर आला नाही.?? आजच हा मुद्दा सर्वच बुद्धीजीविना इतका महत्वाचा का वाटू लागला आहे??? कुठे सध्याच्या  लोकशाही मार्गाने चाललेल्या राज्यव्यवस्थेवरील सामान्य माणसाचा उडत चाललेला विश्वास आणि धर्माधिष्ठित राज्याकडे वाढत चाललेला कल यामुळे तर हा मुद्दा सरकार ऐरणीवर आणत नाहीये ना?? जेणेकरून सामान्य माणसाचा धर्मावरील देखील विश्वास उडवा???