बुधवार, २४ एप्रिल, २०१३

शंभूराजांना पकडून देणारे फितूर कोण होते??? ( खोटा इतिहास कोण लिहित आहे??? भाग २ )


सध्या महाराष्ट्रात विद्रोही चळवळीच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण करण्याची चढाओढ सुरु आहे. ब्राम्हणांनी लिहिलेला इतिहास खोटा आहे आणि आम्ही सांगतो तोच इतिहास खरा ह्या मानसिकतेतून इतिहासाचे किती नुकसान हि मंडळी करणार आहेत देव जाणे??


खोटा इतिहास लिहिण्यात सध्या आघाडीवर असलेले खेडेकर आणि कोकाटे यांच्या खोट्या इतिहासाचे वस्त्रहरण आम्ही आमच्या पुढील लेखांतून करणार आहोत. यात आम्ही आमच्या मनाचे असे काही सांगणार नसून केवळ अस्सल दस्तावेजांच्या आधारे हि वस्त्रहरण मालिका चालवणार आहोत. असो.

तर  मराठा सेवा संघाचे खेडेकर हे आपल्या पुस्तकातून किती खोटा इतिहास पसरवत आहेत हे आपण पाहूया.

खेडेकर यांना समर्थ रामदास स्वामी यांचा खूप तिटकारा असल्याचे त्यांच्या लेखनातून जाणवते. तो इतका कि,  समर्थ रामदास स्वामी यांच्यावर चिखलफेक करण्याची एकही संधी खेडेकर सोडत नाहीत. समर्थ द्वेषापोटी खेडेकर किती खोटे बोलत आहेत याचा परिचय आपल्याला या लेखात होईल.

शंभूराजेना पकडून देण्यासाठी फितूरी केली म्हणून इतिहास शंभू राजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांना फितूर म्हणून ओळखतो. इतिहासकार या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यामागे काही पुरावे आहेत. पण ऐतिहासिक पुरावे काय असतात हे ऐकून देखील माहित नसलेले खेडेकर कोणताही पुरावा न देता शंभूराजाना पकडून देण्याचा आणि दगाबाजी करण्याचा संबंध समर्थ शिष्यांशी जोडतात.

 आपल्या साहीत्यीक युवराज संभाजीराजे.” या पुस्तकात पान क्रमांक १५ वर खेडेकर लिहितात
"शंभुराजांना गणोजी शिर्के या येसुबाईंच्या भावाने फितुरीने पकडुन दिले हे चुक खोटे आहे. रामदासी ब्राम्हण रामदास शिष्य रंगानाथ स्वामी या ३०० ब्राम्हण रामदासींनी खरा विश्वासघात केला. त्यांची हरामखोरी झाकण्यासाठी कनौज ब्राम्हण कवी कलश गणोजी शिर्के यांना ब्राम्हणांनी बदनाम केले."



परंतु इतिहास हा पुराव्यांनी बोलत असतो. बहुदा हे खेडेकराना माहित नसावे. पण खेडेकर खोटे बोलत आहेत याचा पुरावा आमच्याकडे आहे. संभाजी राजे आणि गणोजी शिर्के यांच्यामध्ये दाभोळच्या वतनावरून वाद झाला होता.

मुळात दाभोळचे वतन हे एका ब्राम्हणाचे होते. पुढे त्या ब्राम्हणास आदिलशहाने बलात्कारे मुसलमान केले. दरम्यान सूर्यराव सुर्व्यांच्या पदरी असलेले पिलाजी शिर्के यांच्याशी आपली कन्या सुर्व्यानी विवाह करून दिली. आणि दाभोळच्या वतन शिर्क्यांना मिळावे म्हणून सुर्वे आदिलशहाकडे बोलणी लावणार होते. पण त्या आधीच शिवरायांनी दाभोळ मिळवले. पिलाजी शिर्के शिवरायांकडे चाकरीला गेले पण दाभोळचे वतन मिळवण्याचा अंतस्थ हेतू ठेवून. पुढे शिवाजी महाराज यांच्या निर्वाणानंतर पिलाजी शिर्के यांनी संभाजी महाराजांकडे दाभोळच्या वतनासाठी बोलणी चालू केली. परंतु शंभूराजांनी शिवाजी महाराजांनी बंद केलेली वतनदारी पद्धत परत सुरु करण्यास नकार दिला. त्यापुढे पिलाजी शिर्के काही न बोलता काल कंठत राहिले. पण त्यांच्या मृत्युनंतर गणोजी शिर्के मोगलांना सामील झाला.

आमच्या या कथनाला पुरावे खाली देत आहे.

 दाभोळ येथील देशमुखी वतन पुर्वी ब्राह्यणाचे होते. ----आदीलशाही बादशाहाने त्या ब्राह्यण  देशमुखास मुसलमान केले. दाभोळचे देशमुखी वतन अमानत केले. ते कित्येक  वर्षे अमानत असतां  शृंगारपुरी रा!. सुर्याजीराजे सुर्वे प्रभानवलीकर होते.  त्यांनी आपली लेक  रा!. पिलाजीराऊ  शिर्के ह्यांस देऊन सोयरीक केली. तेव्हा बादशाहास विजापुरी  अर्ज  पोहोचवुन पिलाजीराव ह्यांस दाभोळ मामल्याची देशमुखी सांगीतली. बादशाहा मेहरबान  होऊन (दाभोळ )  मामल्याची देशमुखी  वतन  ( पिलाजीरावांस ) महामत केले.  वतनाचा भोगवटा  व्हावा  तो कैलासवासी  ( शिवाजी महाराज ) छत्रपती थोरले स्वामीस तळकोकण कबज जाले. त्या प्रसंगी वतनाचा भोगवटा झाला. ( शिव चरित्र  सहित्य खंड -

आता गणोजी शिर्के फितूर झाल्याचे जे पुरावे मिळतात ते पाहू. 

पुरावा क्रमांक -
पिलाजी शिर्के तानाजी शिर्के. गणोजी शिर्के हे महाराजांचे आप्त. ह्यांनी राजा वेडा झाला. कबजीने वश केले. राज्य बुडते. त्याअर्थी हिय्या करुन शिवाजीराजे ( संभाजी राजांचे पुत्र ) शिर्के यांचे भाचे ह्यास घेऊन राज्यावर बसवावे. राजाराम काढुन त्यांचे हातून कारभार चालवून राज्य रक्षावे. ऐसे राजकारण केले. फुटले ------ एक दोन शिर्के सापडले. ते (संभाजीराजांनी ) मरिले. शिर्के जेथे असतील तितके मारावे. ऐसी आज्ञा (संभाजीराजांनी ) करुण शिरकाण करविले. ते समयी दौलतराव शिर्के, गणोजी देवजी शिर्के वगैरे पळोन सर्व शिर्के तितके कुटुंबसुद्धा हबसाणात गेले. चहुकडे  चार जाऊन मोगलाईत जाऊन चाक-या करु लागले.
 ( संदर्भमल्हार रामराव बखर)
 

पुरावा क्रमांक  -  
शिरके ह्याणी विचार केला की, ह्या कलशाने राज्यास बुडविले. ह्यास नेऊन मारावे. म्हणोन २५ हजार इसम मेळविले. हे वर्तमान  कोन्हेरपंत कबजीकडील कारभारी ह्याणी  कबजीस श्रुत केले. त्याने महाराजांस लिहून  शिरके  ह्याजवर  हल्ला  करविला.  लोक बहुत मारिले. त्याजवर पिलाजी  खिजमतगार गणुजी शिरके मोगलाईत गेले. ( संदर्भमराठी  साम्राज्याचे छोटी बखर )

पुरावा क्रमांक -
मोर्चाचे साधन करुन (छत्रपती राजराम ) महाराजांस ( जिंजी किल्ल्यातुन ) काढावे हे चांगले. त्याजवरुन मोर्चेबंदास मराठे कोणकोणत्या ठिकाणी आहेत, त्याचा शोध केला. (जिंजी ) किल्ल्याचे नैॠत्येस शिर्के ह्यांचे मोर्चे आहेत. त्यांत मुख्य  गणोजी राणोजी शिर्के आप्त. 
शिर्के ह्याणी आपल्या आप्तांचे  कबिले म्हणोन ( राजाराम) महाराजांच्या  तिघी स्त्रिया पुत्र दोघे (?) इष्टमित्रांच्या स्त्रिया वगैरे मंडळीसुद्धा आपल्या गोटास नेले. शके १६१८ घातानाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा ( २१ मार्च) दिवसीं  झुल्फिकारखान ह्याणी चंदीचा किल्ला घेतला.
संदर्भचिटणीस बखर.  


पुरावा क्रमांक  -
१० जुन १६९८. राजाराम छत्रपती ह्याणी खंडो बल्लाळ निळो बल्लाळ  महादजी रुद्राजी शामजी प्रभु सरदेशमुख मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल ह्यासी  वृत्तीपत्र ऐसे जे ------ तो चंदीच्या प्रसंगी विज्वर जाहाला. ते प्रसंगी राजश्री गणोजी शिरके  रामजी शिरके  ह्याणी विनंती केली कि, मामले दाभोळचे  देशमुखीचे  वतनाचे फर्माने आदिलशाहा पादशाहा ह्याणी आपल्या वडिलास करुन दिल्हे होते.  ते वतन आपले आपणास करुन दिल्हे पहिजे. ह्याजवरुन  स्वामीनी ते वतन शिरके ह्यास दिले. ( संदर्भचि. सं. मा. . पत्रे)   
जिजीच्या वेढ्यातुन राजाराम महाराजांना बाहेर काढ्ण्यासाठी मोजलेली किंमत.

पुरावा क्रमांक  -
कवि कलश ह्याजवरी शिरके पारखे जाले. कवि कलश पळोन खिळण्यावर गेला. संभाजी राजे रायगडाहून कलशाचे  मदतीस आले. समागमे स्वारी (जाउन) सिरकीयांसी युद्ध करून त्यास पलउन खेळणीयास आणले. ( जेधे शकावली)
ह्याची साक्ष देताना राजारामराजे  राज्ञी ताराबाई साहेब कालीन कागादपत्रांतील एक  कागद सांगतो कि,
त्याउपरी सिरकियाचे धामधुमीकरता  कबजीबाबा खिलणियास शके १६१० कार्तिक मासी ( ऑक्टोबर १६८८) गेले. सेवेच राजश्री स्वामी (छत्रपती संभाजीराजे) तेथे आले. 
 

पुरावा क्रमांक -
२८ मार्च १७३४. श्रीराजाशाहु छत्रपतीविसाजी खंडेराव चिटणीस ह्यांना लिहितात ---- “त्यानंतर ( छत्रपती राजारामराजे ) चंदीस जाऊन ( आपले  पिताश्री  खंडो  बल्लाळ  ( बाळाजी) ह्यांनी तेथेही सेवानष्ठे  केली. तेथे संकटाचा प्रसंग प्राप्त होऊन  निघ्स्णे दुर्घट पडले असतां झुलपकारखान गणोजी शिर्के  ह्यांस ( प्रंमाण  ) देऊन त्यांचे मोर्चातुन ( छत्रपती राजाराम राजे) ह्यांस पाळण्यात बसवुन काढुन घेऊन देशीची सेवा केली.” ( संदर्भमहाराष्ट्र  इतिहासाची साधने, विभाग )

पुरावा क्रमांक -
राजारामराजे  - राज्ञी ताराबाई कालीन एका पत्रांत उल्लेख येतो. तो असाराजाराममहाराजांनी राजश्री नरसो सुरा देशाधिकारी तर्फ खेळणा ह्यांस १० एप्रिल १६८९ रोजी लिहिलेल्या पत्रांत मजकुर येतो कि,
मौजे पाडळी तर्फ देवळे  ह्या गांवची खोती विठ्ठल नारायण ह्यास बहुत दिवस होती. सांप्रत ( गणोजी) शिर्के ह्यांची सोबत केली. ह्याप्रसंगी कवि कलश येऊन त्यावरी निमित्य ठेऊन त्यासी धरून विषाळगडी बदीत ठेवले. घरदार लुटुन गुरे शेत आदी करुन सर्वहि दिवाणात नेले.

 


आता आमच्या मराठा समाजाने ठरवायचे आहे कि अस्सल दस्तावेज आणि पुराव्यांच्या आधारे आपला इतिहास शोधायचा कि कोणताही आधार नसलेला आणि ब्राम्हण द्वेषाने माखलेला खोटा इतिहास आपला इतिहास म्हणून डोक्यावर घ्यायचा???

माझी माझ्या मराठा समाजातील तरुणांना एवढीच विनंती आहे कि, कोणत्याही उपटसुंभावर डोळे झाकून विश्वास ठेवण्या पेक्षा स्वतः अभ्यास करून आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधूया.

आणि बिग्रेडीना आव्हान आहे कि, " असेल हिम्मत तरच आडवे या…….