शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

प्रशांतभाऊ वाडेकर यांस पत्र


                                                                                                                                                                             Friday, December 16, 2011

प्रीय बंधु प्रशांत वाडेकर,


पत्रास कारण की,


आपली भगवान श्री कृष्णांवरील प्रतिक्रीया वाचली. वाटले नव्हते आपन सुद्धा बिनबुडाचे आरोप कराल असे........ आपन हे करु शकलात कारण आपन हिंदु धर्माच्या एका आराध्य दैवतावर आरोप करत होतात. हाच आरोप  आरोप जर मुस्लीम, ख्रीश्चन किंवा स्वतःला आधूनिकतेचे पुतळे समजना-या आंबेडकरी छाप असलेल्या बौद्धमताच्या आराध्य व्यक्तींवर केला असतात तर आज मला तुमच्या ऐवजी तुमच्या घरच्यांना सांत्वनपर पत्र लिहावं लागलं असतं. भगवान श्री कृष्ण करो आणी ती वेळ आमच्यावर कधीही न येवो. असो.



तर आपन आरोप केला आहे की भगवान श्री कृष्ण हे कामूकवृत्तीचे, व्यभिचारी होते......... आपन जर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचा अभ्यास केला असता किंवा फक्त वाचलं जरी असतं तरी आपल्याला जाणवलं असतं की जिवनाचा प्रत्येक टप्पा पुर्णपने जगलेले आणी एवढच नाही तर जिवन पुर्णार्थाने कसे जगावे याचा वस्तुपाठच घालुन देणारे एकटे भगवान श्रीकृष्ण आहेत.....


भगवान श्रीकृष्ण तूम्हाला पाहीजे त्या स्वरुपात प्रतीत होतील......... फक्त त्यासाठी मन स्वच्छ असावे.............


आता आपन जो भगवंतांवर व्याभीचारी असण्याचा आरोप केलात त्याबद्दल बोलूया.............भगवंत जेव्हा गोकुळात रासक्रिडा करत होते तेव्हा त्यांचे वय होते सात वर्षांच्या आसपास....... आता तुम्हीच सांगा की सात वर्षाचा मुलगा हजारो स्रियांची कामवासना शमवू शकेल का? भगवंतांवर गोपिका प्रेम करायच्या याचा अर्थ आपल्या लोकांनी खुप चुकीचा घेतला आहे....... प्रेम ही भावना फक्त काय प्रेमीयुगुलांपुरताच मर्यादित आहे का?......... आईचं आपल्या मुलावरचं प्रेम, भावाचं बहिणीसाठी असलेलं प्रेम किंवा मित्रांचं एकमेकांवर असलेलं प्रेम ह्या भावना प्रेमाच्या व्याख्येत येत नाहीत का? मग गोपिकांच्या भगवंतांवरील प्रेमाला नेहमी प्रेमीयुगुलांचं प्रेम म्हनुन का सादर केलं जातं?


आजच्या काळातलंच उदाहरण घ्या नां? कित्येक मुलींच्या फेसबुक प्रोफाईल वर गोंडस अशा लहान मुलांचे फोटो मीळतील. ते का? कारण स्री हि प्रेम, वात्सल्य यांनी काठोकाठ भरलेली असते. शेजारी एखादं गोंडस लहान मुल असेल तर आसपासच्या सर्व वयोगटातील स्रिया त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात अशावेळी गोकूळात बालरुपात आपल्या लीला दाखवना-या .... नव्हे....  साक्षात भगवंत असलेल्या बालकावर गोपिकांनी प्रेमाचा वर्षाव केला नाही....... तर त्यांच्या जगन्याला अर्थच नाही उरत...........
भगवंतांवर स्रिया प्रेम करू लागल्या तर त्यात नवल कोणते? 


श्रीकृष्णांनी  एकदा गोकुळ सोडल्यानंतर ते परत गोकुळात गेले नाहीत?? जर ते व्यभिचारी असते तर परत परत गोकुळात गेले नसते का?? मुळात गोपिकांचे वस्त्रहरण    ह्याचा एक अर्थ वेगळा असाही आहे कि 'गो म्हणजे इंद्रिये.....इंद्रियांना नाना वृत्तींची वस्त्रे असतात.....अश्या नाना वृत्तींचे हरण करून तो भगवंतापाशी आपल्याला घेऊन जातो..... म्हणून त्याने गोपिकांचे वस्त्रहरण केले....जरी ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तरी यातून काही ठोस निष्पन्न होत नाही...कारण ज्या गोपिकांशी श्रीकृष्ण रास क्रीडा करत होते याचा अर्थ कामवासना असा का घेतला जातो?? आज ज्यास आपण गरबा म्हणतो त्यास रास म्हणतात....ज्या राधेचा श्रीकृष्णांची प्रेमिका म्हणून उल्लेख केला जातो ती श्रीकृष्णांची प्रेमिका असेलही पण त्यांचे प्रेम हे शारीरिक पातळीवरच नक्कीच नव्हतं...आणि तसं असतं तर राधेचा पती जो सुत त्याने तिला का नाही सोडून दिलं??? राधा हि श्रीकृष्णांच सखी होती...आजच्या भाषेत सांगायचं झालं तर more than best friend but less than girlfriend ..  राधेने श्रीकृष्णांच्या आयुष्यात सखीची भूमिका निभावली.....त्यांच्या प्रेमात मिलनाची आस नव्हती....प्रेमी युगुलांच्या प्रेमात मिलनाची आस असते....


दुसरे असे कि......भगवान श्रीकृष्ण हे एक कुशल मल्ल होते....त्यांची झोप त्यांच्या अधीन होती.....जर ते व्यभिचारी असते तर त्यांना कंसाच्या दोन बलदंड आणि त्यांच्यापेक्षा शक्तीने जास्त असलेल्या मल्लांना ठार मारता आले असते का?? झोप त्यांच्या अधीन राहिली असती का??? श्री कृष्ण जर व्यभिचारी असते तर सांदिपनी मुनींकडे शिक्षणासाठी गेले असते काय?? सांदिपनी मुनींनी त्यांना अनुग्रह दिला असता काय??? 


श्रीकृष्ण जर व्यभिचारी असते तर साक्षात धर्मराज युधिष्ठीर...... जे यमाचे पुत्र मानले जातात...... ते लाक्षागृहाच्या आगीतून जिवंत परत आले आणि राज्याची मागणी करू लागले तेव्हा मध्यस्थ म्हणून श्रीकृष्ण होते ....आणि अश्यावेळी आम्ही श्रीकृष्णाच्या आज्ञेबाहेर जाणार नाहीत असे धर्मराज युधिष्ठीर कसे म्हणू शकले....धर्मापारायण राजा एका व्यभिचारी पुरुषाच्या आज्ञेबाहेर जाऊ इच्छित नाही हे कसे होऊ शकते???


रुक्मिणी......... जिच्या सौंदर्याचा सगळ्या आर्यावर्तात गवगवा होता ......... तुम्ही म्हणता तसे श्रीकृष्ण जर व्यभिचारी असते ...तर ती श्रीकृष्णा सारख्या एका व्यभिचारी पुरुषाच्या प्रेमात कशी पडू शकते?? रुक्मिणीचा नियोजित वर शिशुपाल पांडवाच्या राजसूय यज्ञात श्रीकृष्णाबद्दल नको नको ते बोलला....पण त्याने सुद्धा त्यांच्यावर व्यभिचाराचा आरोप केला नाही...उलट श्रीकृष्ण त्यास म्हणाले कि " तू अधम आहेस...ब्राम्हण कन्या पळवून नेऊन त्यांचा उपभोग घेतोस..." तेव्हा शिशुपाल खाल मानेने ऐकत होता.....का नाही तो बोलला श्रीकृष्णांना व्यभिचारी????...........


द्रौपदी........... जिच्यामुळे महाभारत घडलं...ती द्रौपदी राजसभेत वस्त्रहरण होताना श्रीकृष्णांचा धावा कशाला करेल?? जर तुम्ही म्हणता तसे ते व्यभिचारी असतील तर अश्या व्यभिचारी पुरुषाला कोणती स्त्री स्वतःच्या लज्जा रक्षणासाठी साकडे घालेल??? 


श्रीकृष्णाने १६१०८ बायका केल्या...पण ते का?? त्यांची पहिली आठ लग्न हि राजकीय कारणास्तव झाली.....पण नंतरची १६१०० लागणे हि थोर समाजकार्याचा सर्वात पहिला प्रयोग होता...नरकासुराने आजू बाजूच्या राज्यातील हजारो स्त्रियांना कैद करून ठेवले होते...त्या स्त्रियांची नरकासुराला वधून श्रीकृष्णांनी सुटका केली...आणि त्या आपल्या घरी गेला होत्या...पण समाज त्यांना स्वीकारायला तयार नव्हता...अश्यावेळी त्यांचेसमोर दोन पर्याय होते...आत्महत्या किवा वेश्याव्यवसाय....पण आत्म्हत्या करण्यासाठी लागणारे मनोबल सर्वच स्त्रियांकडे नव्हतं.....त्यांच्यासमोर एकच पर्याय होता...वेश्याव्यवसाय करणं...अश्यावेळी जर श्रीकृष्णांनी त्यांना तसच सोडून दिलं असतं तर काय अनर्थ ओढवला असता????.... याचा विचार करा...त्यांना श्रीकृष्णांनी पत्नीचा दर्जा दिला यातच त्यांच्या सामाजिक स्थानाची निश्चिती झाली.....त्यांना अपशब्द बोलायची कोणाची हिम्मत झाली नाही.....या दृष्टीने श्रीकृष्ण हे जगातले पहिले समाजसुधारक होते.....


श्रीकृष्ण जर व्यभिचारी असते तर हजारो वर्ष शेकडो पिढ्यांना पुरून उरणारी भगवद्गीता सांगू शकले असते काय?? 



आता आपण म्हणाल कि हे सगळ माझ्या डोक्यावरून गेल...पण हे सगळ खूप व्यवहारी भाषेत सांगितल आहे...खरे श्रीकृष्ण १२ -१२ वर्ष तपश्चर्या करूनही कळत नाहीत....पण आपल्याकडे जोपर्यंत गोरा साहेब सांगत नाही तोपर्यंत खर मानायचे नाही हि प्रथा रूढ झाली आहे...म्हणूनच Herison  या Apple Co. ltd. मध्ये उच्च पदावर काम कारण-या व्यक्तीचे श्रीकृष्णा बद्दल  काय मत आहे ते उद्या आपल्या भेटीस आणेन....

कळावे,


आपलाच बंधू.


प्रसाद राउत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा