!! श्री !!
November 11, 2011
जिजाऊ मासाहेब, शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांना वंदन करून मी आजच्या लेखाची सुरुवात करत आहेत. माझ्या आजच्या लेखाचा विषय आहे,
"हिंदवी स्वराज्यातील स्त्री चे स्थान"..
मित्रानो, खरं बाघायला गेलं तर हिंदवी स्वराज्याची माता हीच एक स्त्री होती....होय....संपूर्ण महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ साहेब...... सिंध्खेद्च्या लखुजी जाधवांची हि कन्या वेरुळच्या भोसल्यांचे प्रतापी पुत्र शहाजी राजे यांची धर्मपत्नी झाली....हा केवळ योगायोग नसून माझ्या मते तो दुग्धशर्करा योग होता. स्वतंत्र बाण्याच्या शहाजी राजांनी अनेकदा स्वराज्य स्थापनेचे असफल प्रयत्न केले होते हे आपल्या सर्वाना माहित आहे...पण जबाबदारीचा भान ठेवून मी म्हणेन शिवाजी राजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती त्या हिंदवी स्वराज्याचा संकल्प मासाहेबानीच केला होता. आणि आईची आज्ञा शिरोधार्य मानून थोरल्या महाराजांनी तो पूर्ण केला. हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीची परिस्थिती बघून मासाहेबांच्या संवेदनशील मनाला वेदना झाल्या नसतील तरच नवल! सुलतानशाहीचा सगळ्यात वाईट अनुभव त्यांना संपूर्ण आयुष्यभर येत राहिला. मासाहेबांचे पिताश्री लखुजी जाधवांचा आदिलशहाने करवलेला खून..... शहाजी राजांना करावी लागलेली धावपळ....मासाहेबंच्याच जाऊबाईना एका मुसलमान सरदाराने पळवून नेणे...देवळांची आया बहिणींची चाललेली विटंबना आणि हे सगळा घडत असताना हातात सत्ता असूनही काही करू न शकणे......... ह्या वेदना मासाहेबानी कश्या सोसल्या असतील??..... खरं म्हणजे मागे एका ग्रुपवर एकाने म्हटल्याप्रमाणे शिवाजी राजांची आई होणे हे कार्य फक्त जिजाऊ मासाहेबच करू शकत होत्या. कारण राजे उभे आयुष्य मृत्यूला पुढे घालून चालत राहिले. प्रत्येक वेळी नवीन संकट.....एका संकटातून बाहेर पडतात न पडतात तोच दुसरे संकट समोर उभे राही. राजे प्रत्येकवेळी संकटात असताना मासाहेबांना प्रसूती वेदनेपेक्षा कमी वेदना झाल्या असतील का??? दुःख आणि सुख यांचा संमिश्र अनुभव मासाहेब संपूर्ण आयुष्यभर घेत आल्या होत्या. त्यांच्या या वेदना मी शब्दांत मांडू शकत नाही....कोंढाणा घेण्यासाठी राजांना मासाहेबानी केलेली आज्ञा आणि त्यावेळी उदय्भानाने पळवून आणलेल्या एका राजपूत स्त्री बद्दलचे उद्गारच मासाहेबांच्या संवेदनशील मनाची...त्यांच्या तळमळीची साक्ष देतात......मासाहेबांबद्दल बोलणे म्हणजे माझ्या मते धरित्रीला शब्दांची बंधने लावण्यासारखे आहे. ते माझ्याच्याने शक्य नाही.....
मासाहेबांच्या हिंदवी स्वराज्यात स्त्रीला नेहमीच आदराचे स्थान होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग तर आपल्या सर्वाना माहित आहे. पण अशीच एक गोष्ट..जी मी मागे एकदा सांगितली होती ती परत एकदा सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही आहे. शिवाजी राजांवरील एका व्याख्यानात श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. श्री. अविनाश धर्माधिकारी यांनीच म्हटल्याप्रमाणे आपल्या पैकी ब-याच जणांना हि गोष्ट माहित नाही आहे.
शाहिस्तेखानावर ज्यावेळी शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात छापा घातला त्यावेळी बरेच लोक मारले गेले आणि बरेच बेपत्ता झाले. त्या बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये औरंगजेबाच्या बहिणीची मुलगी सुद्धा होती. औरंगजेबाची बहिण आपल्या भावाला नेहमी सांगत असे कि त्या तिच्या मुलीला शिवाजीने पळवून नेला आहे. पण औरंगजेब दुर्लक्ष करत होता. शेवटी जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत अडकले तेव्हा त्या औरंगजेबाच्या बहिणीने औरंगजेबाच्या मागे सारखी सारखी भूनभून लावली कि, "लाल महालातल्या छाप्यात तुझ्या भाचीला (म्हणजे औरंगजेबाच्या भाचीला) शिवाजीने पळवून नेलं. आणि तो शिवाजी आता तुझ्या तावडीत सापडला आहे. तेव्हा तू त्याला ठार मार." आणि ह्या प्रत्येक वेळी औरंगजेब तिला एकच सांगत होता कि, " शिवाजी बाकी काही करेल पण स्त्री च्या अब्रूवर कधी हात नाही घालणार"..
मित्रानो...मला वाटतं...जर आज साडेतीनशे वर्षानंतर शिवाजी राजे स्मरणात आहेत ते याच कारणास्तव.....शत्रूच्याही मनात आदराचे स्थान मिळवणारे राजे आज प्रत्येक मराठी मनाला दैवातासारखे वाटतात ते याच कारणामुळे. ....
राजांबद्दल आज आणखी एक नवीन माहिती जी श्री. अविनाश कुलकर्णी यांनीच सांगितली आहे...ती आपल्या सर्वाना सांगत आहे...कदाचित आपल्याला हे माहिती असेलही........... राज्याभिषेका नंतर काही दिवसात मासाहेबानी देह ठेवला. राज्याभिषेकाच्या आधी गडावरची हवा मासाहेबाना मानवत नव्हती आणि आईला सारखी चढ उतार करावी लागू नये म्हणून राजांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी मासाहेबांसाठी एक वाडा बांधून घेतला....त्याठिकाणी एक विहीर आहे...या विहिरीवर शिवाजी राजांच्या काळात गावातील सावर्णाबरोबर..दलित स्त्रिया सुद्धा पाणी भारत असत.... त्या विहिरीला तक्क्याची विहीर म्हणतात....कारण वेळ मिळताच राजे मासाहेबांची विचार पूस करायला या वाड्यात येत असत त्यावेळी या विहिरीवर लोड आणि तक्के टाकून बसत...आणि गावातील आया बहिणीशी बोलत असत.......... त्यांच्याशी सुख दुःखाच्या गोष्टी करत असत.........मित्रानो केवढी हि क्रांतिकारी घटना....भोसले कुळातील राजा..जो काही दिवसांनी छत्रपती होणार होता.....तो गावातील एका विहिरीवर लोड आणि तक्के टाकून बसत होता...गावातील आया बहिणींशी सुख दुःखाच्या गोष्टी करत होता.....मध्ययुगातील आद्य समाजसुधारक शिवाजी राजे होते.....त्यावेळी हिंदवी स्वराज्य लोकांना आपलं वाटत होतं...लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.....हि भावना जनमानसात तयार झाली......त्यामागे जी अनेक करणे होती त्यापैकी एक कारण होते हि तक्क्याची विहीर....
शिवाजी राजांनी आया बहिणींना मनाचे स्थान दिले....समाजातला भेदाभेद दूर केला....इतिहासात जर डोकावून बघितले तर असा राजा परत निर्माण झालाच नाही......कारण हा राजा फक्त भोसल्यांचा किवा महाराष्ट्रातील एका मराठा जातीचा नव्हता.....तर तो जनतेचा राजा होता................जाणता राजा होता......
जय भवानी !! जय शिवाजी !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा