सोमवार, २८ मे, २०१२

हिंदू शब्दाचा उगम !!


सध्या काही संघटना आणि त्यांच्या तर्फे खरेदी केलेल्या व्यक्ती ह्या हिंदू धर्मावर सतत आरोप करत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे कि "हिंदू हा शब्द मुस्लिमांनी कुत्रा, नीच, गुलाम या अर्थी वापरला." त्या मूर्ख लोकांना उत्तर देण्यासाठी हा माझा आजचा लेख नसून माझ्या हिंदू बंधूना 'हिंदू' या शब्दाचा उगम कोठे आहे हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे. कारण कोणी कितीही सांगितले तरी हे लोक हि गोष्ठ मान्य करणार नाहीत कारण त्यांचे पोट हिंदू द्वेषावर अवलंबून आहे. आणि आपण हिंदू एखादवेळेस एखाद्याच्या पाठीवर मारू पण पोटावर नाही. त्यामुळे माझे म्हणणे त्यांनी मान्य करावे हि माझी इच्छा नाही आणि ते मान्य करतील अशी अपेक्षा सुद्धा नाही. कारण वर दिलेच आहे. असो.

तर 'हिंदू' या शब्दाबद्दल आपल्या धर्मग्रंथात कोणते पुरावे मिळतात ते प्रथम पाहू.

शब्द कल्पद्रुम" जो दुसर्या शतकात रचला आहे,त्यात एक मंत्र आहे..

||"हीनं दुष्यति इतिहिंदू जाती विशेष:"||अर्थात हीन कामाचा त्याग करणार्याला हिंदू म्हणतात.

असाच"अदभुत कोष" मध्ये एक मंत्र येतो .........................

||"हिंदू: हिन्दुश्च प्रसिद्धौ दुशतानाम च विघर्षने"|| अर्थात हिंदू चा अर्थ दृष्टांचा नाश करणारा असा होतो..

"वृद्ध स्म्रति (सहावी शतक)" मध्ये एक मंत्र आहे ,........................... ||हिंसया दूयते यश्च सदाचरण तत्पर: वेद्.........हिंदु मुख शब्द भाक् ||

अर्थात जो सदाचारी वैदिक मार्गावरून चालतो, हिंसे मुळे ज्याला दुख होते, तो हिंदू आहे..

"ब्रहस्पति आगम"(हा कधीच आहे माहित नाही)

||"हिमालय समारभ्य यवाद इंदु सरोवं। तं देव निर्वितं देशम हिंदुस्थानम प्रच्क्षेत ||म्हणजे हिमालय पर्वतापासून इंदू(हिंद) महासागर पर्यंत जो प्रदेश देव-पुरुष ह्यांनी तयार केला त्याला हिंदुस्तान म्हणतात.

अर्थात हे पुरावे आपल्या धर्मग्रंथात आहेत. त्यामुळे ते विशिष्ठ समाजद्वेशी मंडळी हा पुरावा मान्य करतील अशी तिळमात्र आशा नाही. म्हणून त्यांचे जे म्हणणे आहे कि 'हिंदू हा शब्द मुस्लीम आक्रमकांनी येथील लोकांसाठी तुच्छ म्हणून वापरला आहे.' तर मुस्लीम ज्या पर्शिया मधून भारतात आले तेथे हिंदू हा शब्द कधीपासून वापरात होता आणि तो कशासाठी म्हणून वापरला जात होता हे सांगण्याचा हा प्रयत्न.

प्राचीन काळी म्हणजे वेदांच्या निर्मितीच्या काळी भारतात आर्य आणि अनार्य असे राहत होते. आर्य भारतातलेच कि भारताबाहेरचे ह्या वादात मला पडायचे नाही. कारण जागतिक पातळीवरील विद्वान जे या प्रश्नावर संशोधन करत आहेत ते अजूनहि या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर शोधू शकले नाहीत. आणि या प्रश्नावर अनेक आतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे झाली असून त्यातूनही विद्वान या प्रश्नांचे उत्तर शोधू शकले नाहीत. काहींच्या मते आर्य भारतातूनच बाहेर गेलेत. तर काहींच्या मते आर्य भारतात बाहेरून आलेत. आणि या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्वान हमरीतुमरीवर आलेले आहेत. आणि सरतेशेवटी असे ठरले आहे कि " काही निर्णायक पुरावा मिळेपर्यंत आर्यांचा प्रश्न बासनात गुंडाळून ठेवावा."

तर आर्यांच्या या अशा यक्षप्रश्नात जिथे मोठेमोठे विद्वान काही निर्णायक उत्तर शोधू शकले नाहीत तिथे तुमच्या माझ्यासारख्या अल्पमती माणसाने आपले शहाणपण न दाखवलेलेच बरे!!

तर दास, पणी आणि दस्यू हे अनार्य होते आणि त्यांचे वास्तव्य वायव्य सरहद्द प्रांतात होते. आर्यांचे आणि त्यांचे वैर पुरातन काळापासून होते. ते अश्रद्ध, लिंगपूजक, यज्ञ न करणारे होते. परंतु विशेष म्हणजे दास हे विश्वामित्राचे वंशज असल्याचे सांगितले आहे. यदु आणि तुर्वश यांचाही काहीवेळा दास म्हणून उल्लेख येतो. या संदर्भात दिवोदास, सुदास, त्रसदस्यु या नावातील 'दास' हे उपन्त्यापद लक्षणीय आहे. यदु आणि तुर्वश हि जमात भारतात बाहेरून आल्याचा उल्लेख त्रुग्वेदात आहे. दास, दस्यू आणि आर्य यांच्यात सदैव वैर होते अशातला भाग नाही. किवा आर्य आणि अनार्य हे वेगवेगळे होते अशातला भाग नाही. एखादेवेळेस आर्य आणि दास यांना समान शत्रू मिळाला कि यांची एकी होत असे. काहीवेळा दास आर्यांच्या देवता पूजित असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.(८.५.३१.) इंद्र हा आर्यांचा आणि दासांचाही देव होता. ( भरतांबरोबर इंद्राने यमुना पार केली).ते सुवास्तु (हल्लीची स्वात) नदीच्या खो-यात राहत असत. इंद्राने दासांची ९९ पुरे फोडली म्हणून त्याला पुरंदर हे पद मिळाले. दास आणि आर्यांच्या शत्रुत्वाचे कारण नंतर एक सविस्तर लेख लिहून मांडेन.

काहीकाळाने प्रतिकूल पर्यावरणामुळे दासानी भारतातून स्थलांतर केले. हे दास म्हणजे इराणमधील दाह आणि ग्रीकमधील दाहे हे आता पुरातत्व संशोधक मान्य करू लागले आहेत. आणि यांची संस्कृती हि प्राचीन पर्शिया आणि सध्याच्या इराणमधील झोरोऑस्ट्रियन संस्कृती होय. आणि हे झोरोऑस्ट्रियन म्हणजे सध्याचे भारतातील पारसी होत. तर दासांचा प्रमुख अहुरा माझदा (वैदिक असुर - 'स' चा उच्चार इराणमध्ये 'ह' असा केला जातो. ) याने आपल्या जमातीला घेऊन इराणमध्ये स्थलांतर केले. एकंदर या स्थलांतरात त्यांनी सोळा भागात वास्तव्य केले. ते सोळा भाग झोरोऑस्ट्रियन लीकांच्या झेंड अवेस्ता या धर्मग्रंथात सांगितले आहेत. झेंड अवेस्ता हा ग्रंथ भाषेच्या दृष्ठीने त्रुग्वेदाला अगदी जवळचा ग्रंथ मानला जातो. तो त्यांचा वेदच म्हणावा लागेल. त्याचा काळ इ.पु.१००० असा आहे. परंतु काही संशोधक तो इ.पु. १४०० असा मागे नेतात. कसेही असले तरी तो त्रुग्वेदानंतरचा आहे यात दुमत नाही. त्यांच्या आणि आर्यांच्या धार्मिक समजुतीत खूपच फरक आहे. त्यांची दैवते असुर असून ते देवांना दैत्य मानीत. परंतु ज्याप्रमाणे हिंदूमध्ये ३३ कोटी देव हि संकल्पना आहे तसेच त्यांच्या ग्रंथात ३३ देवांचे एक मिथक आढळते. अवेस्ताचे वेदीदांद आणि विस्पराद व यास्न हे दोन मुख्य भाग आहेत. वेदिदांद मध्ये त्यांच्या धार्मिक समजुती आणि मिथकांची माहिती आहे. याशिवाय त्यात आहुर माझदा याने इंडो-इराणी(झोरोऑस्ट्रियन) लोकांच्या नेत्याने त्यांना घेऊन जी स्थलांतरे केली त्यांची माहिती दिली आहे. (फरगर्द-१-१). प्रतिकूल पर्यावरणामुळे त्यांना ती करावी लागली होती. ती सोळा स्थाने खालील प्रमाणे आहेत.

क्रमांक अवेस्तामधील नाव ग्रीक नाव हल्लीचे नाव

१. ऐर्यानाम वेजो -- अफगाणिस्तानातील अरीयाना

२. सुग्धा सोग्डीयाना समरकंद

३ मौरू मार्गीयाना मेरू

४. बखडी (संस्कृत - वाल्हीक) बेकट्रीया बाल्ख

५. बिसाया न्यासा ---

६. हरोयू (संस्कृत - शरयू) ऐरीया हेरत

७. वेकरेता -- काबुल

८. उर्व -- काबुल

९. ख्नेता हिरकांनीया कंदाहार

१०. हरैवती (संस्कृत - सरस्वती) अराकोसिया हरुत

११. हेतुमंत एतुमेंद्रोस हेलमंड

१२. रघा रगै राय

१३. चाखारा (संस्कृत - चक्र) --- खोरासान(?)

१४. वरेन (संस्कृत - वरून) -- --

१५. हप्तहिंदू (संस्कृत - सप्तसिंधू) इंदोई पंजाब

१६. रंघा -- केस्पियान समुद्राच्या आसपासचा प्रदेश

यावरून आपण पाहू शकता कि हिंदू शब्द हा इस्लामपूर्व काळापासून वापरत होता. एवढेच नव्हे तर तो भूभाग म्हणून वापरत होता. मोहम्मद पैगंबरांची एक शिष्य तिचे नावही हिंद असे होते आणि ती पूर्वाश्रमी एक मूर्तिपूजक होती आणि इस्लामची कट्टर विरोधकही होती. नंतरचत मोहम्मद पैगाम्बारशी एका भेटीच्या वेळी तिचे मतपरिवर्तन झाले. आणि तिने इस्लाम स्वीकारला.

हिंदू हा शब्द हा साप्तसिंधुंच्या भूभागास दिलेले नाव होते. नंतरच्या काळात या भागात राहणारे लोक हे हिंदू म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि मुस्लिमांनी हे नाव आम्हास दिले नसून आमचेच एक बांधव जे त्यांचे पूर्वज होते त्यांनीच हे ह्या भूभागाला दिले आहे. आणि त्यांच्या वंशजांनी हेच नाव पुढेही वापरले.

हिंदू हा धर्म नाही..तर ती एक संस्कृती आहे. वेगवेगळे विचारप्रवाह आणि धर्ममत असणारे तरी एकाच भूभागात गुण्या गोविंदाने नांदणारी हि एक संस्कृती आहे.

जय हिंदुराष्ट्र !!



६ टिप्पण्या:

  1. काही प्रमाणात ठीक आहे. पण तरी आणखी पुरावे हवेत

    उत्तर द्याहटवा
  2. शरीया च हरीया व मुसलमानाच मुहलमान ईस्लाम च ईह्लाम का नाही झाल, सिंधु चच हिंदु का झाल.... अन दुसर्या शतकात हिंदु हा शब्द असताना सिंधुचा अपभ्रंश होऊन हिंदु शब्द तयार झाला अस म्हणून स्वतःच्याच लेखात असा विरोधाभास का दाखवतायत...

    उत्तर द्याहटवा
  3. हिंदू शब्द जर सिंधू शब्दाचा अपभ्रंश असेल तर सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे व्यक्ती पंजाबी अथवा सिंधी असे म्हटले जातात, त्यांना हिंदू हे नाव का प्राप्त झालेले नाही? पर्शियन लोकांना सिंधू उच्चारण्यात अडचण येत होती हे प्रमेय आधारहीन व हास्यास्पद आहे. उदा. पर्शियन जे शिया मुस्लिम आहेत ते शिया, सुन्नी व शरियत हे शब्द कसे उच्चारतात? पंजाबी भाषेत बरेच पर्शियन शब्द आहेत ते ज्यांची सुरुवात 'स' किंवा 'श' पासून होते. उदा. सरदार, शहीद, शेर इ. पंजाब हा शब्द सुद्धा पर्शियन शब्द पांच आणि आबा (पाच पाणी) पासून तयार झाला आहे.
    याच बाबीचा पुनरुच्चार मुद्रारक्षक यांनी धर्मग्रंथोन्का पुनर्रपाठ या ग्रंथात याप्रकारे केला, "इतिहासकारोंने कहा की चूंकि फारस के लोग 'स' को 'ह' बोलते थे, इसलिये उन्होंने सिंधू को हिंदू कहा और यहां रहने वालोंको हिंदू कहना सुरू कर दिया. यह विचित्र तर्क था. ईराण के लोग अपनी भाषा को फारसी कहते रहे, फारही कभी नहीं कहा, सुलतान बोलते थे हुलतान नहीं, पर सिंध को उच्चारित नहीं कर शकते थे, यह अविश्वसनीय हैं. विजेता अक्सर विजित समुदाय को निंदनीय मानता हैं और घोषित करता हैं. मुसलमान ने भी भारत को जीतकर यही किया. हर विजेता की तरह वह भी भारत के विजित लोगों को हेच समजता और बताता था. उसने भारत में रहने वालों को इसीलिये हिंदू कहा. फारसी में हिंदू का अर्थ होता हैं काला, माशूक के चेहरे का तिल, चोर, लुटेरा या गुलाम. ये अर्थ फीरोजुल्लगात नामक विख्यात शब्दकोश में हैं. पर यह विचित्र इत्तफाक है और ऐसा शायद ही किसी दूसरी संस्कृति में हुआ हो कि पराजित कौम ने अपने लिये विजेताओ दवारा प्रयुक्त की गई एक अपमानजनक संज्ञा को गौरव के साथ स्वीकार कर लिया हो. भारत में यह हो गया."

    उत्तर द्याहटवा
  4. आर्य बाहेरुन आले हे निखालस खोटं आहे. आर्य म्हणजे श्रेष्ठ.

    उत्तर द्याहटवा
  5. माणूस हा प्राणी एकच आहे इतर प्राण्याप्रमाणे.जस इतर प्राण्याना धर्म,जात नाहीतच माणसाला पण नाही.हे सर्व ग्रंथ,लेख, लोकांना येड्यात काढण्यासाठी तसेच लोकांना भेदाभेद करण्यासाठी लावणे हे मुख्य कारण आहे.अस माझं मत आहे.श्रीमंत असला की उच्च.गरीब असला की तुच्छ समजणारी माणसं आहेत.सगळ स्वताच्या फायद्यासाठी करणारी लोकं आहेत ,असं माझं मत आहे.

    उत्तर द्याहटवा