शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

"औकात"


 Monday, November


आज जेव्हा ऑफिसला येत होतो तेव्हा नाहूर पुलावर इंदिरा गांधी यांना जन्मदिनानिमित्त  अभिवादन करणारा कॉंग्रेस पक्षातर्फे लावलेला बोर्ड दिसला. आणि सहज काही गोष्टी आठवून गेल्या. काश्मीर आणि पाकिस्तान याबाबत गांधी, नेहरू आणि परत गांधी घराण्याचे चुकलेले धोरण आठवले. 


                       खान अब्दुल गफार खान...... ज्यांना सरहद्द गांधी म्हटले जायचे....... त्यांनी पाकिस्तान निर्मिती नंतर खेदाने उद्गार काढले होते, "बापू,  तुम्ही आम्हाल लांडग्यांच्या पुढ्यात टाकले." आजही सिंध प्रांत आणि बलुचिस्तान प्रांतातले लोक गांधीना मानतात. पण स्वतः प्रतीगांधी यांनी काढलेले उद्गार गांधींच्या चुकीच्या धोरणाबद्दल जास्त समर्पकपणे भाष्य करतात. असो.


                     त्यानंतर जेव्हा काश्मीरसाठी लढाई चालू होती तेव्हा २/३ काश्मीर आपल्या सैन्याने  जिंकला असताना नेहरूंनी मोठेपणा करत हा प्रश्न युनो मध्ये नेला. आणि युद्ध बंद करत काश्मीर प्रश्न भिजत ठेवला. हि नेहरूंची चूक.


                     त्यानंतर परत आपल्या नशिबाने काश्मीरचा प्रश्न निकालात काढायची संधी दिली होती............ इंदिरा गांधीना. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे ७९,७०० सैनिक आणि १२,५०० नागरिक आपल्या हातात होते......... त्या बदल्यात काश्मीरचा १/३ भाग मागायचा अशी साधी वूहरचना होती......... आणि तशी तयारी सुद्धा झाली............ पण नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा नाजायाज बाप अमेरिकेने इंदिरा गांधीना युनोच्या अध्यक्ष्यपदाची पदाची लालूच दाखवून त्या ९०००० पकड्याना सोडवून घेतले. आणि आमच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या पकड्यांच्या हातात कुराण देऊन त्यांना सोडून दिले....... ठरल्याप्रमाणे अमेरिकेने इंदिरा गांधी यांना युनोचे अध्यक्ष्य बनवले. आणि एका महिन्या नंतर "YOU ARE NOT SUITABLE FOR THE POST OF UNO PRESIDENT." असं म्हणत पदावरून इंदिराजींची गच्छंती करवली. खरं तर काहीजण याला अमेरिकेचा दुटप्पीपणा म्हणतील.

                  'पण मी म्हणेन कि अमेरिकेने इंदिराजींना त्यांची "औकात" दाखवली.' कारण ज्या व्यक्तीला देशाच्या अतिमहत्वाच्या प्रश्नापेक्षा युनोचे अध्याक्ष्यपद महत्वाचे वाटले त्या व्यक्तीकडे युनोसारख्या शेकडो देशांच्या संघटनेच प्रतिनिधित्व देणं मूर्खपणा आहे. 



                 आता काही जन अस म्हणतील कि, "प्रसाद, त्या आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या.  त्यांच्या बद्दल आपणच असं बोललो तर परकीय लोक बोलणारच."


                   पण मित्रानो लक्षात ठेवा देशापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही.

                  संभाजी राजाना पुढे घालून जेव्हा दिलेरखान स्वराज्याच्या किल्ल्यावर चाल करून जात होता. तेव्हा शिवाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदारांना हुकुम धाडला होता कि, "स्वतः युवराज समोर दिसले तरी तोफा डागायला कमी करू नका."


                  आम्ही त्या शिवाजी राजांचे मावळे आहोत. चुकत असेल तर बोलणारच. मग तो आमचा बाप का असेना???


जयतु हिंदुराष्ट्राम !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा