गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

गुढी पाडवा आणि संभाजी महाराजांची हत्या याचा काही संबंध आहे का?? ( खोटा इतिहास कोण लिहित आहे??? भाग १ )


गुढीपाडवा जवळ आला तसे बिग्रेडींचे विषारी विचारांचे प्रदर्शन सुरु झाले आहे. संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतिच्या कायद्याप्रमाने ब्राह्यणांनी केली आणि त्याचा बहुजनांना विसर पडावा म्हणुन गुढिपाडवा हा सन सुरु केला हा  तर त्यांचा आवड्ता सिद्धांत आहे. अर्थात हा सिद्धांत देखिल त्यांच्या तथाकथित विचारवंतांच्या रद्दि पुस्तकातले आहेत. ज्याला कसलाही अस्सल पुरावा नसुन केवळ कल्पनाविलास आहे. या अशाप्रकारच्या विषारी विचारांचे हिंदु समाजात प्रक्षेपन करण्यामागील विषारी हेतुचा आधी परीचय करुन घेउया.

उत्सवप्रियता  ही हिंदु संस्कृतीची ओळख आहे. आणि हिंदु संस्कृतीचे बलस्थान देखील. या दोन्ही गोष्ठी नष्ठ करायच्या असतील तर त्या त्या सणाचा संबंध महापुरुषांच्या हत्येशी किंवा म्रूत्युशी जोडुन द्यायचा. कारण दलीत मागासवर्गीय तरुनांची माथी त्यांच्या पुर्वजांवर सवर्ण किवा उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारांची वर्णने सांगुन त्यांना भडकावता येते  आणि  सवर्ण किंवा उच्चवर्णीयांच्या विरोधात उभे करने सोपे असते. पन पिढ्या पिढ्या सत्ता उपभोगनारा किंवा सवर्णांमध्ये मोड्ना-या बहुजन वर्गातील तरुणांना त्याच समाजातील काही घटकांविरोधात उभे करने सोपे नसते. अशा वेळी त्या समाजातील महापुरुषांच्या आयुष्यातील खलनायक म्हनुन एखाद्या जातीला उभे करने सोपे असते. 
असो. या सा-या कारस्थानांची चिकित्सा मी माझ्या पुढील लेखमालेत करनार आहे. तेव्हा विषयाचे गांभीर्य समजावे म्हणुन येथे थोडी चर्चा केली आहे.
बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास या आपल्या टुकार पुस्तकात लेखक खेडेकर पान क्रमांक २४ वर  लिहितो कि,
" शंभू राजांची हत्या बामणांनी मनुस्मृतीच्या कायद्यानुसार केली. सर्व शिक्षा एकाच वेळी अमलात आणल्या. त्यामुळे शंभू राजांची घोर विटंबना बामणांनी केलॆ. वेदाभ्यास संस्कृत पंडित होण्याचा बामनांचाच अधिकार असताना शंभूराजे स्वतः जगातील अत्यंत  हुशार थोर सांस्कृतिक पंडित होते. बहुजन समाजास संस्कृत भाषेचा अधिकार नसतानाही शंभूराजे संस्कृत पंडित होऊन बामणांचाही  पराभव करतात, त्यामुळे शंभूराजे बामणांच्या हाती पडताच बामणांनी शंभूराजांचे डोळे फ़ोडले, कानात तेल ओतले, जीभ कापली, शिरच्छेद केला, शरीराचे तुकडे तुकडे केले, चामडे काढले, शंभूराजांचे शीर म्हणजेच डोके उंच बांबूवर लटकावून तुळापुर, वढू, आपटी परिसरात फ़िरवले. "

कोणताही इतिहासका किवा इतिहास अभ्यासक इतिहासाशी संबंधित विधान करतो तेव्हा त्याने त्यास आधारभूत संदर्भ द्यायचे असतात. तसा अलिखित नियमच आहे. पण आम्ही सांगतो तोच इतिहास आहे या गर्वाने पुस्तके लिहिणा-या खेडेकरआदी मंडळीना इतिहासातील "" -हस्व कि दीर्घ हे देखील माहित नसताना त्यांच्याकडून अशा नियमांची किवा तत्वांची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा होय. आणि त्यापेक्षा मूर्ख ते लोक जे या अशा बिन आधाराच्या गोष्ठींवर विश्वास ठेवून आपले डोके खराब करून घेतात.

संभाजी महाराजांची हत्या जर मनुस्मृतीप्रमाने झाली असेल तर देवगीरीच्या कृष्णदेवरायाची हत्या कोणत्या ग्रंथाच्या आधारे झाली हे देखिल खेडेकर यांनी सांगीतले पाहीजे.  

कारण कृष्णदेवरायांची हत्या मुस्लिम आक्रमकांनी केलीच पन मृत्युपरांत त्यांचे शीर कापुन ते न्हाणीघराच्या पाणी वाहुन नेणा-या नालीच्या तोंडावर बसवले.  

राजा हरपाल देवाचे शरीरावरील चामडी सोलुन त्यांचे उघडे शरीर वेशीवर सोललेल्या बोकडासारखे टांगुन  ठेवले होते.


पन खेडेकर हे सांगनार नाही. कारण हे सांगण्याचे पैसे खेडेकरला मिळत नाहीत. आणि वर सांगीतलेले राजे हे बहुजन तरुणांना माहीत असतातच असे नाही. पन शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आजच्या बहुजन तरुणांना देवतांप्रमाने आहेत.  शिवराय आणी शंभुराजे हे आम्हा बहुजन तरुणांच्या भावनांशी निगडीत आहेत. त्यामुळे खेडेकर हे आमच्या बहुजन तरुणाच्या भावनांना हात घालुन आम्हाला आमच्या हिंदु  धर्माच्याच विरोधात उभे करु पाहत आहेत.

त्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाच्या आडुन ते बिनबुडाची विधाने करुन मराठा तरुणांची माथी भडकावत आहेत. त्यांच्या पुस्तकातील वरिल उतारा हे त्याचेच एक उदाहरन होय. वरील उता-यात खेडेकर समस्त मराठा तरुणांची कशी दिशाभुल करीत आहेत हे आपण पुढे पाहुच. खेडेकर यांनी वर केलेल्या बिधानाला कोंणताही संदर्भ दिलेला नाही

पुढे याच विधानाचा संबंध काही जनांनी गुढीपाडव्याशी जोडुन गुढीपाडवा या हिंदुंच्या सनाला विरोध करायला सुरुवात केले आहे. त्यांच्या म्हणन्यानुसार वढु-बुद्रुक येथे संभाजी महाराजाची ब्राम्हणांनी मनुस्मृतिच्या  कायद्याप्रमाने हत्या केली. आणि त्याचा आनंद म्हणुन गुढी उभारली. या संपुर्न कल्पनाविलासाचा पाया उध्वस्त  करन्र गर्जेचे आहे म्हनुन प्रथम संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतिच्या काह्यद्याप्रमाने झली कि नाही ते पाहु…………………   

खेडेकरांनी जरी त्यांच्या  विधानाला पुष्ठी देणारा  पुरावा दिला नसला तरी ते खोटे बोलत असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे.   

औरंगजेबाच्या दरबारातील आणि शंभूराजांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ईश्वरदास या गुजराथी माणसाने लिहिलेल्या "आलमगीर विजय" या ग्रंथातील संदर्भ पाहु. मूळ फारसी भाषेत असलेल्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर सेतू माधव पगडी यांनी केले आहे

बहादूरखान आणि इखलास खान हे आपले सैन्य तयार करून युद्धास तयार झाले. त्यांनी त्वरा करून चहूकडून संभाजीला घेरले त्यावेळी उभय पक्षांत मारामारी झाली. संभाजीच्या बरोबर असलेले चारशे सैनिक मारले गेले. मोगलांचे जवळजवळ अडीचशे सैनिक मृत्युमुखी पडले. हे पाहून मराठे पळाले. संभाजीनेही पळून जाण्याचा बेत केला, पण त्याचा बेत सिद्धीस गेला नाही. तो मोगलांच्या हाती कैद झाला. वाईट कर्मांची फळे वाईटच होतात. कविकलश यास त्याच्या कृत्याची फळे मिळाली. संभाजी बरोबर तो पण कैद होऊन  मोगलांच्या तावडीत सापडला.
संभाजीला कैद केल्याची बातमी बादशाहाला शाहजादा आजम याच्या पत्रावरून समजली. इखलास खानाचा हरकारा खंडूजी याने बादशाहा पाशी येउन सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर हि बातमी सगळीकडे जाहीर झाली. यानिमित्त लष्करात आनंद निदर्शक अशी वाद्ये वाजवण्यात यावीत अशी आज्ञा बादशाहने केली.
बादशहा बरोबर असलेल्या मोठमोठ्या अमीर उमरावानी बादशाहाला नजराणा देऊन या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. खंडूजी हरकारा यास खूप बक्षीस देण्यात आले.
इखालास खान आणि बहादूर खान यांस  मनसबिची बढती, बहुमानाचे पोशाख, जडावाचे खंजीर, हत्ती घोडे इत्यादी देण्यात येउन त्यांचा मानसन्मान करण्यात आला. संभाजीला तरतुदीने आणि बंदोबस्ताने दरबारात घेऊन यावे अशी त्यांना आज्ञा करण्यात आली. बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखालास खान आणि बहादूर खान हे संभाजी, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेऊन बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशाहने आज्ञा केल्यावरून इखालास खान आणि हमिदुद्दीनखान यांनी संभाजी, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची उंटावरून धिंड काढली.
त्यांची हजार प्रकारे फजिती करण्यात येत होती. अशाप्रकारे त्यांना छावणीत आणण्यात आले. दिवाणखान्याच्याप्रवेश द्वारापर्यंत ते येउन पोहोचल्यावर बादशहाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयाजवळ उभे करण्यात आले. बादशहाने संभाजीकडे पहिले. त्याची दुर्दशा पाहून  बादशहाच्या मनावर परिणाम झाला. यानंतर बादशाहा सिंहासनावरून उतरला आणि त्याने प्रार्थना करून परमेश्वराचे आभार मानले.

पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवविली नाही. इखलास खान आणि हमिदुद्दिन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशाहने आज्ञा केली कि सिकंदरखानाच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे. कवी कलश आणि त्याचे साथीदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात याव्या.
यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रुहुल्लाखन यास खालीलप्रमाणे आज्ञा केली.
" तुम्ही जाउन संभाजीपाशी चौकशी करावी कि तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे?? तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते."
पण माणसाची जीविताची आशा सुटली कि तो मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहा संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्यांची निंदानालस्ती  केली. त्याने जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादसहाला सांगितले नाही. पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा त्याने बादशाहाला इशारा दिला. यावर बादशाहने आज्ञा केली कि,  संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून ( त्याला आंधळा करून) त्याला नवी दृष्ठी द्यावी ( वठ्नीला आणावे.).
त्याप्रमाणे करण्यात आले. पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासून जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेक-यांनी त्याला अन्नसेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले. शेवटी हि बातमी बादशाहाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशाहाच्या आज्ञेने त्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले.

तेथे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके औरंगाबादेहून बु-हानपुरापर्यंत फिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येउन शहराच्या द्वारावर लटकावण्यात आले. ( मोघल मराठा संघर्ष पान ३० ते ३१ )


मला वाटत नाही कि या भरभक्कम पुराव्यानंतर आणखी पुरावे देन्याची गरज आहे.
संभाजी महाराजांच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी ब्राम्हणांनी गुढ्या उभारल्या….”  या खोट्या प्रचारामागील पाया ज्या विधानावर आधरित होता तो पाया म्हणजेसंभाजी राजांची हत्या ब्राम्हणांनी मनुस्मृतीप्रमाणे केलीहा होय. आणि तो पायाच भुसभुशीत असुन केवळ कल्पनाविलासावर आधारीत आहे.

तो पायाच आलमगीर विजय या ग्रंथातील वर ऊल्लेख केलेल्या संदर्भाने नष्ठ केला आहे. त्यामुळे त्यावर उभारलेली आणि गुढीपाडवा या हिंदु सणाला विरोध करण्यासाठी रचलेली खोटी कहाणी आपोआप खोटी सिद्ध होते.

 माझी माझ्या बहुजन बांधवांना एवढीच विनंती आहे कि अशा फालतु लोकांच्या तोंडुन इतिहास ऐकण्यापेक्षा आणि त्यांचीदर्जाची पुस्तके वाचण्यापेक्षा जाणकारांचे पुस्तके वाचा. इतिहास अभ्यासा. जे वाचले असेल त्याची सत्यता पडताळुन पहा. खेडेकर आदी मंडली फार तर द्वेश करने शिकवु शकतात. इतिहास नाही.

धन्यवाद !!

गुढीपाडव्याच्या आणि हिंदु नबवर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

नविन वर्ष सर्वांना सुख समृद्धिचे जावो !!


 

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

जोपर्यंत मला उचलून कत्तलखाण्यात नेले जाणार नाही तो पर्यंत मी आवाज करणार नाही.........


सध्या देशात काय चालले आहे कळत नाहीये..........

प्रचंड उलथापालथी तितक्याच प्रचंड वेगाने होत आहेत.......

अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि इतर एखाद्या मालिकेचे एपिसोड लिहावे तसे दरदिवशी भ्रष्टाचाराची  प्रकरणे बाहेर काढत होते... मध्येच ते गायब झाले...... लोकपाल विधेयकाची हवा गाढवाच्या डोक्यावरून शिंगे गायब व्हावीत तशी कुठे गायब झाली कळत नाहीये............

बाळासाहेब ठाकरे निवर्तले आणि त्याच्या काही दिवसानंतर कसाबला फाशी दिले गेले.... बाळासाहेबांच्या निर्वाणाने शिवसेनेला सहानुभूती मिळतेय असे वाटल्याने कदाचित कसाबला फाशी दिली गेली असेल..........आता अफझल गुरूला फाशी दिली....... त्याचे पडसाद उमटतच आहेत.........

मध्येच गुजरातची निवडणूक अपेक्षित विजय घेऊन मोदींकडे सत्तेची चावी देती झाली................

महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय.... आणि नेत्याची झोप उडालीय.... कदाचित आयातीमध्ये कसा घोटाळा करता येईल या विचाराने असेल........

सुशील कुमार शिंदे देशातल्या हिंदूंच्या नाकावर टिच्चून हिंदू दहशतवाद जाहीर करून मोकळे झाले... त्या गडबडीत पाकिस्तानी सैन्याने आपल्या दोन सैनिकांची निर्घृण हत्या केली हे सगळेच विसरले....

दिग्विजय सिंग यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको.......... भारताच्या राजकारणात इतका उतावळा नेता कोणी झाला नसेल आत्तापर्यंत..........

सोनिया आणि राहुल... हि माता-पुत्र सध्या कुठे आहेत या गदारोळात तेच कळत नाहीये.......

ओवेसी नावाच्या एका फुटीरवादी मुस्लिम नेत्याने हिंदुना कापून टाकण्याची भाषा केली.... औरंगजेबाच्या कबरीवर नमाज अदा केली....

नुकतेच हैदराबाद मध्ये बॉंबस्फोट झाले....

या सगळ्यात आम्ही कुठे आहोत?? आम्ही म्हणजे सामान्य माणसे.........

तर कोठेही नाही....... कारण आमच्या या गोष्ठी इतक्या पचनी पडल्यात... कि एखादा नेता भ्रष्टाचारात सापडू दे नाहीतर १००-१५० लोक बॉंबस्फोटात मरू देत.... आम्हाला काही नवीन असे वाटत नाही..... आम्ही या गोष्ठी या देशात नेहमीच घडत असतात या अविर्भावात वावरतो......जणू काही मालिकांचे एपिसोड बघत असतो....... नाहीतर एखादा क्रिकेटच्या सामन्यांची मालिका....

किती पद्धतशीरपने आम्हाला एकदेशीय, एकजिनसी राष्ट्रीय समाज म्हणून विकसित होण्यापासून अलिप्त ठेवलेय ना?? आम्ही आज जातींच्या, राजकीय पक्षांच्या शाखांसारखे विभागले गेलोय.... आणि जो पर्यंत या शाखा आहेत तोपर्यंत आम्ही असेच राहणार.... एका देशात राहूनही विभक्त....

फक्त कागदोपत्री आम्ही या देशाचे नागरिक आहोत.... शाळेत "म्हणावी लागते" म्हणून आम्ही प्रतिज्ञा म्हणतो.... बाकी देश काय असतो हे आम्हाला कळलेच नाही किवा कळू तरी दिले नाही........

शाळेत प्रतिज्ञा जी म्हणतो तिचे पहिले वाक्य आहे.... "भारत माझा देश आहे.......".... पण आम्ही कधी विचारच केला नाही कि या वाक्यात "माझा" हा शब्द का वापरलाय??? का "भारत 'आमचा' देश आहे." असे म्हटले नाहि???

कारण माझा म्हटला कि आत्मीयता येते.... देश माझा आहे हि भावना जेवढी तीव्र असते तेवढी देश आमचा आहे हि नसते....

असो... आम्ही का विचार करावा.............???

आमचे घर चालतेय ना??  जेव्हा आमच्या घराजवळ येईल  तेव्हा बघेन............ लष्कराच्या भाक-या कोण भाजेल??

हा आमचा देश आहे............ खरच गर्व आहे मला माझ्या देशावर......... जिथे जगातली सगळ्यात जास्त माणसे... माणूस म्हणून नाही तर कळपातल्या शेळ्या मेंढ्यासारखी जगतात............. राखणदार कोणीही असो... मालक कोणीही असो.... जोपर्यंत मला उचलून कत्तल खाण्यात नेले जाणार नाही तो पर्यंत मी आवाज करणार नाही.........



सोमवार, २८ जानेवारी, २०१३

देवळाच्या पैश्यांवर डोळा का??


सध्या बरेच जन श्रद्धेच्या दुनियेत जो बाजार मांडला गेला आहे त्याबद्दल भरभरून बोलतात...... पण समाजाच्या कोणत्या क्षेत्रात बाजार मांडलेला नाही ते कोणी सांगेल का??  

देवळात देव धर्माच्या नावाखाली लुट होते... मान्य!! पण लोक का स्वतःची लुट करून घेतात?? लोकांनी कुठे अक्कल गहान ठेवलेली असते??   

मंदिराच्या बाहेर भिकारी असतात... त्यांना कोणी विचारीत नाही...पण देवाला दुधाचा अभिषेक घातला जातो.... हे चुकीचे आहे हे मान्य........ पण आज खरच पोटासाठी भिक मागणारे किती आहेत?? जर नीट डोळे उघडून बघितले तर भिक मागणे हा देखील एक धंदा झालेला दिसून येईल.... चेंबूरच्या स्टेशन परिसरात एक भिकारी स्त्री आहे.... तिच्या दोन रिक्षा आज चेंबूर मध्ये धावतायत.... दोन खोल्या आहेत....... मागे कॉटन ग्रीन येथे रेल्वे अपघातात एक भिकारी मेला ... पोलिसांनी त्याच्या सामानाची झडती घेतली तेव्हा त्यात ७५ हजाराची चील्लर सापडली......... आज मुंबईत अनेक कुटुंबे, लहान मुले भिक मागताना दिसतात... आमच्या वाशीत अनेक जन एक वडापाव खायचाय म्हणून पैसे मागतात... पण जेव्हा एखादा व्यक्ती पैसे देतो तेव्हा लगेच दुस-या व्यक्तीकडे वडापाव साठी पैसे मागितले जातात....... जर हि परिस्थिती असेल तर कशाच्या आधारावर दान करायचे???


चला हेही सोडू.... आमचे डोळे उघडे ठेऊन... ज्याला खरच भूक लागली आहे त्याला आम्ही देवाला वाहायचे पदार्थ देवू.... पण हे एकदा करता येईल.... रोज रोज त्याला कोण देईल?? त्याच्या पोटापाण्याची जबाबदारी रोज रोज कोण घेईल?? आणि तरीही समजा दररोज त्याला कोणी ना कोणी काही ना काही अन्न दिले तर तो काम कशाला करेल???  त्याला भिक मागण्याची वेळ पडू नये हि जबाबदारी कोणाची??? आज देशात रोजगार निर्मितीची जबाबदारी कोणाची आहे?? सरकारची कि धार्मिक संस्थांची??? आणि जर धार्मिक संस्थांनी हे काम करावे असे जर बुद्धीजीवी लोकांना वाटत असेल तर जनतेने या कामासाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी भगवी वस्त्रे धारण करून हिमालयात चालू पडावे.... फुकटच्या खुर्च्या कशाला उबवतायत हि मंडळी ??? माझा भिक मागणा-यांना विरोध नाही आहे.... त्यामागच्या आयतखाऊ वृत्तीला विरोध आहे..........

देवळात जमा होणारा पैसा समाजासाठीच वापरला पाहिजे.. पण तो अशा -हेने वापरला पाहिजे जेणेकरून त्यातून समाजाला परत काही तरी मिळेल... हा पैसा अनाथ आश्रामांसाठी वापरा... अजाणत्या वयात एखादा गुन्हा करून गुन्हेगाराचा शिक्का माथी घेऊन वावरणा-या मुलांच्या पुनर्वसनासाठी वापरा .... त्याचे रिटर्न मिळतील....... पण हा पैसा आयतखाऊ लोकांसाठी कधीच वापरला जाऊ नये.... कारण त्यांची भूक कधीच शमणार नाही..... उलट त्यांची संख्या वाढत जाइल....

आता राहिला प्रश्न सरकारने हि मंदिरे ताब्यात घेऊन हे आर्थिक व्यवहार नियंत्रित करायचा... तर त्यासाठी सरकार पात्र आहे का?? हिंदूंच्या मंदिरातून मिळणारे उत्पन्न हिंदूंच्या विरुद्ध कार्य करणा-या धर्मांसाठी वापरले जाणार नाही याची खात्री सरकार देऊ शकते काय?? कॉंग्रेस सोडा... भाजपचे सरकार तरी हि खात्री देईल काय?? उत्तर नकारार्थीच असेल........  

आज आपले नेते इतके भ्रष्ठ आहेत कि त्यांच्या हाती मंदिराचे आर्थिक व्यवहार देणे म्हणजे चोराच्या हाती खजिन्याच्या किल्ल्या देण्यासारखे आहे.....  

काही वर्षापुर्वी एक अहवाल ऐकला होता.. केरळ कि कर्नाटक मध्ये एका वर्षात छोट्या मोठ्या मंदिरातून मिळालेल्या ८४ कोटी रुपयांच्या उत्पन्नापैकी ४० कोटी मुस्लिमांच्या मशिदी आणि दर्ग्याना स्थानिक सरकारने दिले.... १०-२० कोटी चर्चना दिले.... हिंदूंच्या हाती काय उरले??? मंदिरातली घंटा........  

मंदिरातून जमा होणारा पैसा सरकार हिंदूंच्याच हितासाठी वापरेल हा जर विश्वास सरकार निर्माण करू शकले तर मी म्हणतो आमच्यासारखे कित्येक हिंदुत्ववादी स्वताहून सरकारला या कार्यी पाठींबा देतील.............. पण आधी सरकारने तो विश्वास निर्माण करावा............  



आता एका मुलभूत प्रश्नाकडे वळतो.... मंदिरातली हि संपत्ती आजची नाही तर गेल्या कित्येक शतकांमधली आहे... गेल्या कित्येक दशकात भारतावर कॉंग्रेसचे राज्य असताना हा मंदिरातील संपत्तीचा मुद्दा का ऐरणीवर आला नाही.?? आजच हा मुद्दा सर्वच बुद्धीजीविना इतका महत्वाचा का वाटू लागला आहे??? कुठे सध्याच्या  लोकशाही मार्गाने चाललेल्या राज्यव्यवस्थेवरील सामान्य माणसाचा उडत चाललेला विश्वास आणि धर्माधिष्ठित राज्याकडे वाढत चाललेला कल यामुळे तर हा मुद्दा सरकार ऐरणीवर आणत नाहीये ना?? जेणेकरून सामान्य माणसाचा धर्मावरील देखील विश्वास उडवा???

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

तुळशीच्या विवाहाबद्दल !!

ले काही दिवस....तुळशीच्या लग्नावरून काही हिंदू धर्म विरोधकांनी उच्छाद मांडला आहे.

माझ्या माहितीनुसार तुळशीच्या लग्नाची कथा हि पुराणातली आहे. आणि पुराणात अनेक अतिशयोक्ती असलेल्या गोष्ठी आहेत हे मी नाकारत नाही. काहीवेळा भक्ताची परीक्षा घेण्यासाठी किवा एखादे उद्धिष्ठ समोर ठेऊन देव विविध रूपे घेत असतो हा विचार पुराणांचा आधार आहे.

पण जर शांतपणे विचार केला तर एकीकडे देवाला सर्व शक्तिमान म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच्या शक्ती सीमित करायच्या हा प्रकार पुराणात जाणवतो. जर देव सामर्थ्यवान आहे तर त्याला परीक्षा घेण्याची गरज नाही. तसे केल्यास त्याचे सामर्थ्य दिसत नसून त्याची कमकुवत बाजू दिसते. जसे कि एखाद्या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शिक्षकांना कोणत्या विद्यार्थ्याने कितपत ज्ञान ग्रहण केले आहे हे कळण्यासाठी अन्य कोणताही मार्ग उपलब्ध असल्याने परीक्षा घ्यावी लागते. इथे शिक्षकांची हतबलता प्रकट होते. आता काही जन म्हणतील कि देव आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी आपल्या शक्तींवर बंधने घालून घेतो आणि त्याची परीक्षा घेतो. पण शेवटी प्रश्न हा उरतोच कि भक्ताची परीक्षा घेण्यासाठी देवाला आपल्या शक्तींव बंधने घालून घ्यावी लागतात ....याचा अर्थ देव बंधनात राहतो. आणि बंधनात राहील तो देव कसला?? कारण सर्व बंधनांच्या पलीकडे असलेली एक निरामय शक्ती म्हणजे देव........


मग पुराण खोटे आहे का?? नाही....पुराणातल्या अनेक गोष्ठींचे संदर्भ आज आपण लाऊ शकतो. पुराणाचे संदर्भ आर्यांच्या शोधासाठी काही पुरातत्व संशोधक वापरतात. याचाच अर्थ पुरण खोटे नक्कीच नाही. फक्त त्यात आपल्या उपास्य देवतेचे गुणगान गाताना अनेक अतर्क्य गोष्ठींचा समावेश करण्यात आला आहे. माझे मित्र श्री. अमित खोत यांनी अवतार या संकल्पनेबद्दल बोलताना एकदा सांगितले होते कि, राम, श्रीकृष्ण, परशुराम आणि इतर अवतार हि सामान्य माणसेच होती. पण त्यांच्या उत्तुंग कर्तुत्वामुळे त्यांचा संदर्भ परात्पर शक्तीशी जोडला गेला. जसे कि विष्णू हा सृष्ठीच्या तीन शाश्वत नियमांपैकी (उत्पत्ती, सरंक्षण आणि पालन, लय) एक नियम सरंक्षण आणि पालन - याचे प्रातिनिधिक रूप. या विष्णूचे जे पुराणातील नऊ अवतार आपण पहिले तर त्यांनी त्या -त्यावेळी जीवनाचे रक्षण केलेले आढळते. जीवसृष्ठीची सुरुवात जलचर प्राण्यांपासून झालेली आढळते. पहिला अवतार मत्स्यावतार......... इथून पुढे जे अवतार आहेत त्यांचे जीव उत्क्रांतीशी प्रचंड साम्य आढळून येते. अर्थात यातही परत त्या त्या टप्प्यातील सर्वोत्कृष्ठ जीवाला विष्णूचा अवतार मानले गेले. काही अवतार तत्कालीन समाजाने नाकारले देखील आहेत. जसे कि समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूने धारण केलेला मोहिनी अवतार. जरी पुराणांनी मोहिनीला विष्णूचा अवतार मानले असले तरी त्यास समाजाने मान्यता दिली नाही.नाहीतर आज मोहिनीची देखील मंदिरे उभी राहिली असती.

तर अशी हि अवतार कथा. आपल्या उपास्य देवतेचे महात्म्य वर्णन करताना अनेक भक्तांनी अनेक पुराने रचली. त्यात थोडासाच भाग वास्तवाचा आणि बराचसा भाग अतर्क्य गोष्ठी आणि कल्पनांनी भरलेला आहे. याचबरोबर पुराणातल्या अनेक कथा या रूपके आणि अलंकारिक भाषेत सांगितलेल्या आहेत. यामुळे मूळ कथा शोधणे बरेच अवघड होऊन बसते. थोडेसे विषयांतर झाले आहे पण विषयाच्या ओघाने ते आवश्यक होते.

तर तुलसी विवाहाबद्दल जे प्रश्न उपस्थित केले जातात काहीसे असे आहेत.

एखाद्या पर पुरुषाने त्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून तिने स्वत:ला जाळुन घेतले तर त्या बलात्कारी पुरुषाचे परत त्याच स्त्रीशी लग्न का लावले जाते ?


कशाचे प्रतीक आहे हे ?


अस करण्यात त्या महारानी वृंदेचा अपमान नाही का ?


आणी विजय प्राप्त करण्यासाठी एका स्त्रिशी व्यभिचार करण्यात कसला आला पुरुषार्थ ?


तर काहीजण असे विचारतात कि
प्रश्न तुळशी महात्म्यचे नसून. बलात्कार सारखे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला देवत्व बहाल करण्याबाबत आहे. समाज बलात्कार करणाऱ्याला देवत्व कसे काय बहाल करू शकतो?

तुम्ही अशा व्यक्तीला देव म्हणणार का? हाच प्रश्न आहे. हो किंवा नाही. एका शब्दात उत्तर द्या.

याआधी तुळशीच्या कथेबद्दल जरा वाचूया...सर्वसामान्यपने कथा अशी आहे कि, जालंधर नावाचा राजा जो कि दैत्य होता तो आपल्या पराक्रमाने अजेय झाला होता. त्याच्या विजयाचे कारण त्याची पत्नी वृंदा हिचे पातिव्रत्य होय. जालंधर राजाला पराभुत करण्यासाठी त्याच्या पत्नीचे म्हणजेच वृंदेचे शिल भ्रष्ट करणे गरजेच होत आणी तिच शील विष्णूनी वेंशातर करुन केल , हे जेव्हा तिला समजल तेव्हा जगाला तोंड दाखवन्या पेक्षा महाराणी वृंदेने स्वत:ला जाळुन घेतल व त्या राखेतुन जे रोप आले ती म्हणजे "तुळशी"

मी जी कथा वाचली होती ती अशीच होती पण त्याचा अंत काहीसा वेगळा होता. त्यात म्हटले होते कि, त्या पतिव्रतेला जेव्हा खरा प्रकार कळला तेव्हा ती सती गेली. आपल्या हातून कोणते पाप घडले हे विष्णुला कळल्यामुले तो तिच्या चितेसमोर बसून रडत होता. तेव्हा लक्ष्मिने त्या चितेच्या ठिकाणी काही झाडे लावली. त्यातली एक तुळस. ती विष्णुला प्रिय झाली.

तरीपण एखाद्या राजाला हरवण्यासाठी देवाला वेषांतर करून जावे लागते हि कल्पनाच देवाच्या शक्ती सीमित करते. शिवाय जगाचा पालनहार असलेला देव एखाद्या स्त्रीचे पावित्र्य भ्रष्ठ करतो. मग तो देव कसला???

याच्यावर उत्तर म्हणून परत एक कथा मिळते ती अशी कि.

तुलसीच्या पूर्ण कथेच मूळ तिच्या पूर्व जन्मापासून सुरु होत जेव्हा ती ब्राह्मणांची मुलगी होती . तिचे वडील तिला घेवून विष्णूंच्या दर्शनाला जातात . तिच्या निरागस वृत्तीला न समजून घेता लक्ष्मीदेवी तिला दैत्य पती मिळेल हा शाप देते तेव्हा विष्णू लक्ष्मीवर क्रोधीत होवून म्हणतात तू या निरागस मुलीला दैत्य पती होण्याचा शाप दिलास मी हिला वरदान देतो कि यावद भूमंडळ आहे तो पर्यंत हि माझी पत्नी म्हणून ओळखली जाईल .
जालंदर हा लक्ष्मीचा भावू , तो पुढ वृदेंशी लग्न करतो आणि जगाला त्रास देतो , शिवाच आणि त्याच युद्ध चालू असताना वृदेंच्या शीला मूळ त्याचा पराभव होत नाही . तेव्हा विष्णू रूप बदलून तीच शील जगाच्या कल्याणासाठी भंग करतात . पुढे सत्य बाहेर आल्यावर ती विष्णूंना दगड होण्याचा शाप देते .तेव्हा विष्णू जे शाप आणि वरदान याच्यातून मुक्त आहे तो शाप धर्माचा मान राखण्यासाठी ग्रहण करतात .

परत प्रश्न कि कि, जगाच्या कल्याणासाठी केवळ एका स्त्रीचे शील भंग करणे हाच केवळ आणि केवळ एक  उपाय देवापुढे उरत असेल तर तो देव नक्की सीमित शक्तीवाला असेल. पण जगाचा पालनहार देव सीमित शक्तीचा कसा असू शकेल??? तो तर सर्व बंधनांच्या पलीकडे असतो.

या आणि अनेक प्रश्नांनी तुलसी विवाहाची कथा प्रश्नांच्या फैरी समोर उभी आहे.

मध्यंतरी मी एक संदर्भ वाचला होता तो असा कि,

वृंद हा शब्द समूह म्हणून वापरला गेला असावा जसे कि, ब्राम्हव्रुंद, वाद्यवृंद. जालंधरच्या जवळ अशा योद्ध्यांचा वृंद होता कि ज्यांची जालंधरावर पत्नीसारखीच  अभेद्य निष्ठा होती. विष्णूने ती निष्ठा भंग केली. आणि त्यामुळे जालंधराचा पराभव झाला. नंतर त्या योद्ध्यांच्या निष्ठेमुळे त्यांना कळून चुकले कि त्यांनी काय केले आहे आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी अग्निसमर्पण केले असावे. या कृत्यामुळे दुखी झालेल्या विष्णूने त्याठिकाणी तुळशीचे रोप लावले असावे. हळू हळू वृंदचे वृंदा झाले असावे. आणि त्यातून आजची कथा तयार झाली असावी. पण काही गोष्ठींचा विचार केल्यास हा तर्क योग्य वाटत नाही.

म्हणजे एवढे फिरून परत हाती काही लागत नाही. शेवटी मला एक गोष्ठ आठवते. रमाबाई रानडे यांना त्यांचा घरगडी त्यांच्या समाजात प्रचलित असलेल्या देवाच्या गोष्ठी सांगायचा त्यात हिराण्याकाश्यापुच्या पोटी प्रल्हादाचा जन्म झाला हे सांगताना तो सांगायचा कि, "हरण -कासवाच्या पोटी परळादाचा जन्म झाला." त्याला विचारले कि, "विष्णूचे नऊच अवतार झालेत..." तर तो म्हणायचा कि " देवाला जगाच कल्याण करण्यासाठी असे असंख्य जन्म घ्यावे लागतात."

पुराणातल्या कथांच्या मुळाशी देखील अशाच दंतकथा असण्याची शक्यता वाटते. या विषयावर जितके बोलावे तितके कमीच आहे.

तेव्हा माझा याबाबतीत एक साधा तर्क आहे.

श्रीकृष्णाच्या गोकुळाला देखील वृंदावन म्हणत असत. तुळशीचे देखील वृंदावन असते. गोकुळातील म्हणजेच वृंदावनातील कुमारिका या श्रीकृष्णावर प्रेम करायच्या. तुळस देखील कुमारिका समजली जाते. पण तिला कुमारिका ठेवल्यामुळे तिला पूर्णत्व प्राप्त होत नाही. त्यासाठी मग तिचे श्री कृष्णाशी लग्न लावले गेले असावे. पुढे तुळशीचे महात्म्य वाढवण्यासाठी वृन्देची कथा निर्माण करून या सर्व गोष्ठीना आधार देण्याचा प्रयत्न केला गेला असावा. त्यासाठी हिंदू विचारधारा आणि बौद्ध विचारधारेचा सुंदर मिलाप करणारे श्री. मधुसूदन चेरेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे एका जातक कथेचा आधार घेतला गेला असावा. बौद्ध जातकात एका कथेत बोधिसत्व हा जुगारी असतो.त्याचा प्रतिस्पर्धी आपल्या पत्नीच्या पातिव्रत्याची शपथ घेवून सोंगट्या टाकत असतो आणि नेहमीच जिंकत असतो.तेव्हा बोधिसत्व एका पुजार्यास प्रतिस्पर्ध्याच्या पत्नीकडे पाठवून तिचे पातिव्रत्य भंग करवतो आणि मग जुगार जिंकतो अशी कथा आहे.

चेरकर सरांनी म्हटल्याप्रमाणे वृंदेची पुराणकथा या जातककथेचेच रूपांतर असावे. किवा वृन्देची कथा हि झाली असावी आणि त्यात देवांना विजय मिळवण्यासाठी जो छल केला गेला त्याला तुळशीच्या लग्नाचा आधार देऊन आणि विष्णूचे महात्म्य वापरून लपवण्याचा देखिल प्रयत्न केला गेला असावा.

अर्थात हे आपण आजच्या काळात हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांचा अर्थ लावायचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे काही गोष्ठी चुकीच्या वाटू शकतील पण त्यासाठी देव नाकारण्याची गरज नाही.

ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी हि कथा खरी मानून वाद घालण्यात अर्थ नाही. आणि ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांनी देवाला आपण कोठे नेऊन ठेवत आहोत याचा विचार करावा.

मला विचाराल तर श्री कृष्णाचा आणि विष्णूचा संबंध पुराणांनी अवताराच्या माध्यमातून जोडल्यामुळे ह्या कथा आकारास आल्या असाव्यात. पण म्हणून तुळशीचे लग्न लावण्यासाठी देवाला आरोपीच्या पिंज-यात उभे करणे योग्य नव्हे. ह्या गोष्ठी सामान्य माणसांच्या कल्पनेतून जन्माला आल्या आहेत. त्यांना या अशा कथांच्या माध्यमातून देवाला आपन व्यभिचारी ठरवत आहोत याची जाणीव करून दिली तरी पुरेसे आहे.

शिवाय या कारणासाठी तुळशीचे लग्न लाऊ नये म्हणे देखील चुकीचे ठरू शकते. कारण माझ्या माहितीनुसार वर्षात तुळशीचे लग्न आधी लागते मग आपल्या घरात लग्नकार्ये करण्यास सुरुवात केली जाते. कदाचित असेही असेल कि आधी देवाचे लग्न लावावे मग आपल्या घरातले लग्न कार्य करावे अश्या विचारधारेतून हि कथा उगमास आली असेल. देवाचे लग्न लावायचे कोणाशी तर???....पूर्वीपासून घरचीच एक सदस्य असलेली तुळस जिला वर्षभर कुमारिका म्हणून ठेवलेले असते तिच्याशी लग्न लाऊन द्यायचे. म्हणजे तुळशीला पूर्णत्व प्राप्त होईल. स्वार्थातून परमार्थ साधण्याचा विचार या मागे असावा.

असो. मी काही धर्मज्ञ नाही. एक हिंदू म्हणून जे मला वाटले....ते मी मांडले. अर्थात यासाठी माझा धर्म मला इशद्रोही, ईश्वरी ग्रंथाला न मानणारा ठरवून दगडांनी ठेचून मारण्याची आज्ञा नक्कीच देणार नाही.

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१२

चिकित्सा एका जावई शोधाची !!


आत्ताच एक लेख वाचला. त्यात एका तथाकथित लेखकाने (?) सदाशिव राव भाऊ हेच स्वामी समर्थ असल्याचे मांडले आहे. वाचकांच्या सोयीसाठी त्या लेखातील तो मुख्य गाभा अधोरेखित करून देत आहे.

हा लेख वाचल्यानंतर या लेखकाच्या बुद्धीवर हसू तर आलेच. पण अश्या मूर्खाना लेखक म्हणून आमचा समाज डोक्यावर कसा घेतो हेच काळात नाही.

तर आता लेखाची थोडी चिकित्सा करूया,

या लेखात लेखक म्हणतो कि,

१३ फेब्रुवारी १७६० रोजी सदाशिवराव भाऊ यांना पानिपत मोहिमेवर पाठवण्याचे निश्चित झाले.
३० मे १७६० रोजी सदाशिवराव भाऊ ग्वाल्हेर मार्गे पानिपतावर प्रयाण करते झाले.
१४ जानेवारी १७६० रोजी पानिपतावर लढाई झाली.

आता मला एक काळात नाही कि १३ फेब्रुवारी रोजी पानिपतावर जाण्याचे निश्चित झाल्यावर त्यानंतर साधारण २.५ ते ३ महिन्यांनी पानिपातासाठी मार्गस्थ झालेले सदाशिवराव १४ जानेवारी १७६० रोजी म्हणजे मोहिमेचा बेत ठरण्याच्या आधी एक महिना आणि प्रत्यक्ष प्रयाण करण्याच्या ४ महिने आधी पानिपतावर जाऊन कसे लढू शकतील???
कारण आम्हाला शाळेत शिकवल्याप्रमाणे मे महिना हा जानेवारीनंतर येतो.

काहीजण म्हणतील कि प्रिंटींग मिस्टेक असू शकेल. पण हा लेख किवा या लेखाचा आशय मी गेल्या एक वर्षापासून ऐकतोय. मुळात या लेखाचा काळ हा त्या आधीपासूनचा असू शकतो.  पण या एका वर्षात देखील सदर लेखकास एकदाही वाटले नाही कि सदर चूक सुधारून  घ्यावी?? अर्थात तशी चूक सुधारून लेखक दुसरी चूक करू इच्छित नाही. कारण त्याच्या या स्वनिर्मित शोधाचा पायाच मुळात या एका चुकीवर उभारलेला आहे.


कारण या त्यापुढील परिच्छेदात लेखक म्हणतो कि, स्वामी समर्थ नेमके मंगळवेढ्याला १७६०/६१ च्या दरम्यान आले.

स्वामी समर्थांचे मंगळवेढ्यातील  आगमन आणि सदाशिव राव भाऊ यांना पानिपतावर वीरगती प्राप्त होणे या दोन्ही घटनांत १७६० हा सामान्य दुवा दाखवून लेखक हे सिद्ध करू पाहत आहे कि, स्वामी समर्थ हेच सदाशिवराव भाऊ होत.

कसे असते ना, सामान्य लोकांना इतिहासातील घटनांच्या तारखांशी काही देणे घेणे नसते. त्यांना त्या त्या घटनेशी मतलब असते. आणि लोकांच्या या मानसिकतेशी खूप चांगला परिचय असल्याने लेखकाने मुद्दाम तारखांचा हा घोळ घातला आहे.

सदाशिव राव भाऊ यांना १४ जानेवारी १७६१ साली पानिपतावर वीरगती प्राप्त झाली. त्यांचे शरीर शोधून अयोध्येचा  नवाब शुजा उद्दौलाच्या मदतीने शुजाचा सल्लागार काशीराज पंडित याने अंत्यविधी केला होता. माधवराव पेशवे यांनी त्याची हकीकत जाणून घेऊन मगच सदाशिव राव भाऊ म्हणून आलेल्या तोतयाचे न्यायदान केले होते.

तरीसुद्धा वादासाठी लेखकाकडून किवा प्रिंटींग मिस्टेकमुळे १७६१ ऐवजी १७६० असे लिहिले गेले हे मान्य केले तरी पुढे काही प्रश्न निर्माण होतात.

पानिपातावरील लढाई झाली तेव्हा सदाशिव राव भाऊ ह्यांनी तिशी ओलांडली होती.
स्वामी समर्थ यांनी आपले अवतार कार्य इसवी सन १८७८ मध्ये संपवले.

म्हणजे सदाशिवराव भाऊ हेच स्वामी समर्थ आहेत हे मान्य केले तर सदाशिवराव भाऊ १४८ वर्षे जगले.

आता हा चमत्कारच म्हणावा लागेल.

कारण युद्धभूमीवर सतत लढाया करणारे खूप कमी योद्धे आपल्या आयुष्याची पंच्याहत्तरी गाठू शकले आहेत.

आता मला प्रश्न हा पडला आहे कि, आम्ही ब्राम्हणी खोट्या इतिहासाला भुलणार नाही म्हणणारे आमचे बहुजन बांधव या अशा खोट्या आणि सकाळी लहान मुलांच्या  प्रातःविधीसाठी वापरता येईल अशा पुस्तकातील लेख वाचून त्यावर विश्वास कसे ठेऊ शकतात??

(टीप - आपले मत विचार करून मांडावे.)




संदर्भ - http://en.wikipedia.org/wiki/Sadashivrao_Bhau
http://en.wikipedia.org/wiki/Shri_Swami_Samarth
http://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Panipat_%281761%29

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

शिवाजी महाराज हे सेक्युलर विचारांचे होते??


सध्या काही लोक शिवरायांच्या चरित्राचा आणि कर्तुत्वाचा वापर हिंदू धर्म विरोधासाठी आणि भविष्यातील इस्लामचा संभाव्य धोका लक्षात घेऊन एकत्र होऊ पाहणा-या हिंदुना जाती-पातीत विभाजित करू पाहण्यासाठी करत आहेत. मुळात शिवरायांच्या कर्तुत्वाचे यांना इतक्या वर्षांनी का कौतुक वाटावे हा प्रश्न आहे. अर्थात या मागे काही राजकीय नेत्यांचा डाव आहे हे मी वेगळे सांगायला नको. आता थोडी कारण मीमांसा करूया. सध्या आपल्या देशात कायदा सुव्यवस्था फक्त नावालाच उरली आहे. कायदा हवा तसा काही लोकांसाठी वाकवला जातो. त्यातही हे प्रमाण अल्पसंख्यांकासाठी जास्त आहे. कारण त्यांची एकगठ्ठा मतपेटी.  आजच्या घडीला कोणतेही सरकार बहुमताने निवडून येऊ शकत नाही हि वस्तुस्थिती आहे. अनेक पक्षांनी मिळून देशाच्या राजकारणाचा बाजार मांडला आहे. अशावेळी कोणा एका समाजाची एकगठ्ठा मते मिळत असतील तर कोणत्या पक्षाला नको असतील. पण त्याबदल्यात त्यांना काही द्यावे लागते. त्यासाठी नेहमी कायदा बाजूने असेल असे नाही. कधी कधी कायदा आणि शासनाला त्यासाठी वाकवावे किवा वाळवावे लागते. मग यातून बहुसंख्यांक समाजाच्या मनात सरकार बद्दल राग निर्माण होतो. तो राग निववायचा असतोच शिवाय अल्पसंख्यांक समाज दुखावला जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची असते. मग अशावेळी काय करता येते?? लोकांच्या मनात ज्या सुराज्याची अपेक्षा असते ते कसे आपल्या सरकारच्या धोरणांशी मिळते जुळते होते हे बहुसंख्यांक अर्थात हिंदू समाजाच्या मनात बींबवायचे.

आता लोकांच्या मनात सध्याच्या काळास निकट अश्या कोणत्या सुराज्याची छबी असते??  तर ती शिवशाहीची. मग शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते, ते कसे अल्पसंख्यांकांचे लाड करायचे याचा रसभरीत खोटा इतिहास तयार करून घ्यायचा. यासाठी जास्त लांब जायची गरज नसते. आधीच बेरोजगारीने त्रस्त आणि बदनाम असलेल्या काही लोकांना हाताशी धरायचे. त्यानिमित्ताने त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था होते आणि त्यांची बदनामी देखील लोक विसरतात. तर असा हा सारा मामला. त्यात परत काही लोक असेही असतात ज्यांचे लेख, कविता आणि इतर साहित्य अनेक प्रकाशन संस्थांकडून साभार परत आलेले असते. त्यांना हे व्यासपीठ मिळते. त्यांच्या प्रसिद्धीची आणि झालीच तर पोटा पाण्याची सोय देखील होते. अशा उपेक्षित लेखकांसाठी हे सरकारचे दलाल पायघड्या घालून उभे असतात. हळूहळू तेसुद्धा या सर्व कटात सामील होतात. पण नंतर त्यांना परतीचा मार्ग बंद झालेला असतो. कारण त्यांनी या अशा लोकांच्या नादी लागून हिंदू समाजाच्या भावना दुखावलेल्या असतात. त्यामुळे इच्छा असो वा नसो त्यांना त्या मेंढरांच्या कळपात राहणे भाग असते. कारण बाहेर पडले तर एखादा हिंदू वाघ त्या मेंढराची शिकार करू शकतो.


आता या लोकांचे खोटे इतिहास देखावे कसे असतात याचे थोडेसेच दर्शन घेऊया.

पहिला भाग - शिवाजी महाराज हे सेक्युलर विचारांचे होते??

मुळात सेक्युलर या शब्दाची व्याख्या काय ते जाणून घेऊ. सेक्युलर या शब्दाचा एक आय. ए. एस ऑफिसर श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितलेला अर्थ बघा.

' राज्य सत्ता, प्रशासन, कायदा आणि व्यवस्था हे धर्माच्या आधारावर प्रजेत भेदभाव करणार नाही. सर्वाना समान अधिकार असतील आणि तशीच कर्तव्ये देखील!"

आता या व्याख्येनुसार आपल्या देशातील सरकार सेक्युलर आहे का?? अर्थातच नाही. कारण इथे निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिमांची मते मिळावीत म्हणून एका रात्रीत कायदा बदलला जातो. अफझल गुरुसाठी फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून राष्ट्रपतींकडे दयेची याचना केली जाते.

तर हि धर्म निरपेक्षता शिवाजी महाराजाच्या राज्यात होती काय?? अर्थातच नाही. तत्कालीन समाजात ब्रम्हा हत्या म्हणजे मोठे पाप समजले जात असताना "हतेर  उचलले तो हरामखोर!' या न्यायाने राजांनी कृष्णाजी भास्कराचा वध देखील अफझल खानाच्या वधाच्या वेळीच केला. त्यानंतर शत्रूस मिळून स्वराज्यावर चालून येणा-या खंडोजी खोपडेचे हात पाय देखील तोडले होते. हि धर्म निरपेक्षता आजचे राज्य करते दाखवू शकत नाहीत. कारण आजच्या घडीला भारतातील ब-याच मुस्लिमांच्या मनात आजही पाकिस्तानबद्दल सहानुभूती आहे. आणि त्या लोकांच्या हातून जी दहशतवादी कृत्ये होतात त्यासाठी त्यांना शिक्षा दिल्यास त्यांच्या समाजाची मते मिळणार नाहीत. कारण ते त्यांच्या धर्म बंधूंच्या हिताबद्दल बरेच जागरूक आहेत. मग अशा वेळी काय करायचे?? तर या अशा ढोंगी सरकारचा पर्दाफाश करणा-या हिंदू संघटनांमध्ये बुद्धीजीवी वर्ग हा जास्त करून ब्राम्हण समाज आहे. मग त्यालाच इतर हिंदूंचा शत्रू म्हणून उभे करायचे. दिशादर्शक यंत्रच चुकीचे वाटू लागले कि तारू भरकटलेच म्हणून समजा. शिवाय आपल्या बुडाखालची खुर्ची काढू पाहणारा एकत्रित समाज आपापसात विखुरला जाईल आणि आणखी काही काळ आपल्याला त्यांच्यावर राज्य करता येईल. हि साधी अटकळ आहे राजकारण्यांची.

तर या लोकांचा असा दावा असतो कि शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. त्यासाठी अनेक मुस्लीम सरदारांची नावे पुढे केली जातात, अस्तित्वात नसलेल्या सरदारांची आणि पात्रांची निर्मिती केली जाते. केवळ पैश्याच्या आशेने आलेल्या लोकांना निष्ठेचे प्रमाण पत्र दिले जाते. उदाहरण द्यायचेच झाले तर, शिवरायांच्या सैन्यात अनेक सिद्धी नावाचे सरदार दाखवले जातात. पण हे सिद्धी मुळचे इथले नाहीच. ते तर सोमालिया आणि तत्सम बेतान्वारचे निग्रो. ज्यांना मुस्लीम आणि त्यातही अरब व्यापा-यांनी गुलाम केले, त्यांचे धर्मांतरण केले. जर खोटे वाटत असेल तर या प्रती इतिहास कारण यातील एका तरी सिद्धीचे महाराष्ट्रातील गाव दाखवता येते का ते विचार?? आणि दाखवलेच तर त्या गावात जाऊन त्यांच्या वंशाचा मागमूस काढा. शिवरायांच्या काळात किवा त्यानंतर ते इथे स्थायिक झालेलेल आढळतील.

याचाच अर्थ स्पष्ठ आहे कि जे इथले मुस्लीम आहेत त्यांच्या मनात शिवरायांच्या स्वराज्याबद्दल तिळमात्र प्रेम नव्हते. काही सन्माननीय अपवाद वगळता. कारण अफझल खानाच्या वधानंतर संपूर्ण विजापूर शोकग्रस्त झाले होते. 'अल्लाह्तालाने मुसलमानांची पातशाही मराठ्यांच्या हातात दिली कि काय?'  असाच तेथील जनतेचा सूर असल्याचे एका दस्तावेजात वाचायला मिळाले होते. असो. या विषयावर अनेक लेख लिहिता येतील. पण ते माझे उद्धिष्ठ नाही.

तर या लोकांचे असे सांगणे असते कि शिवाजी महाराजांच्या काळात सर्व धर्मांना समान वागणूक होती. बहुतेक यांचा असा समज असतो कि, " जो आपल्या धर्माचा नाही तो आपल्या सोबत राहू शकत नाही" अशा बुरसटलेल्या विचारांचा हिंदू धर्म आहे. पण भारताचा इतिहास पहिला तर आपल्या लक्षात येते कि, " तो हिंदू धर्मच होता ज्यांना जगातील सर्व धर्मांना आपल्या देशात सामावून घेतले."

पारसी समज हा कित्येक शतकांपूर्वी इराण मधून विस्थापित केला मुस्लिमांनी. पण त्यांना या भारताच्या मातीत जगता आले, त्यांच्या धर्माचे पालन करता आले ते हिंदू भूमीत असल्यामुळे. जर हेच विस्थापित अरब राष्ट्रांत गेले असते तर आज कधीकाळी पृथ्वीवर पारसी किवा झोरोऑस्ट्रियन संस्कृतीचे लोक राहत होते हे केवळ जगाच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळाले असते. हीच गोष्ठ ज्यूंची. इस्राईल जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जगभरातले ज्यू इस्राईल मध्ये परत गेले. इस्राईल मध्ये जगभरातून आलेल्या ज्यूंचे अनुभव अत्यंत कटू असेच होते. फक्त भारतातील ज्यूंचे अनुभव मात्र वाईट नव्हते. मी जेव्हा ३ वर्षापूर्वी घाटकोपर मध्ये एका सायबर मध्ये पार्ट टाईम नोकरी करायचो तेव्हा तिथे वर्षातून फक्त तीन महिन्यांसाठी एक ज्यू कुटुंब यायचे. त्यांच्या अनेक पिढ्या इथेच गेल्या. आता त्यांची नवीन पिढी इस्राईल मध्ये वाढते आहे. पण त्यांना तिथे करमत नाही. पण कायद्याने बंधन कारक असल्याने ते तिथे राहतात. पण वर्षातून तीन महिने भारतात येतात. अशी अनेक ज्यू कुटुंबे आहेत. हे कशामुळे शक्य झाले?? जर हिंदू असहिष्णू असतील तर हे शक्य झाले असते का?? जर हा प्रभाव इस्लाम किवा इतर ख्रिश्चनांचा म्हणावा तर जगाच्या इतर देशांत राहिलेल्या ज्यूंचे अनुभव कटू का??

हिंदू असहिष्णू कधीच नव्हता. पण जर आमची सहिष्णुता आमच्या विरुद्ध वापरात असाल तर विसरू नका कि,

 आम्ही त्या शिवरायांचे भक्त आहोत ज्यांनी फोंड्यात हिंदूंची धर्मांतरे करणा-या ख्रिश्चन पाद-यांना रायगडावर आणून हिंदू केले होते आणि उलट निरोप पाठवला होता त्यांच्या राजाला कि,  "तुम्ही तिकडे ते करणार असाल तर मी इकडे हे करेन."


गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

आपल्या उद्याच्या पिढीला काय द्यायचं आहे?? एक अखंड देश कि कोणाच्यातरी भिकेवर मिळालेला जमिनीचा तुकडा?????


एक विनोद आहे. एकदा चित्रकलेच्या तासाला शिक्षक मुलांना " माझा आवडता प्राणी" या विषयावर चित्र काढायला सांगतात. तास संपायला १० मिनिटे बाकी असताना ते सर्वांच्या वह्या तपासतात. एका विद्यार्थ्याची वही कोरीच दिसते. ते त्याला विचारतात,

शिक्षक - काय रे? चित्र का काढल नाहीस??
विद्यार्थी - नाही सर!! मी चित्र काढलं होतं.
शिक्षक - कसलं चित्र काढलं होतंस??
विद्यार्थी - चारा खात असलेल्या गायीचं.
शिक्षक - अरे ह्या पानावर गाय तर सोड चारा पण दिसत नाहीये.
विद्यार्थी - सर चारा गायीने खाल्ला ना??
शिक्षक - ठीक आहे. मग गाय कुठे आहे??
विद्यार्थी - सर, चारा खाल्ल्यावर गाय कशाला थांबेल?? ती निघून गेली.

ह्यातला विनोदाचा भाग सोडला तर आजची आपल्या देशाची स्थिती वेगळी नाही आहे. कागदोपत्री आपल्यासमोर सर्व काही व्यवस्थित चालू असल्याचा चित्र उभा केला जात आहे. पण प्रत्यक्षात तसा काहीच नाही.

कधी कधी सत्य खूप भयानक असतं. आज आपल्या देशात सर्व काही आलबेल असल्याचे आपल्याला एक भारतीय म्हणून जाणवते का??

नुकतीच आसाम मध्ये बांगलादेशी घुसखोरांनी दंगल घडवून आणली. पण आपल्या प्रसार माध्यमांना ती बातमी महत्वाची वाटली नाही. पण जेव्हा हि दंगल बांगलादेशी मुस्लिमांचे बळी घेऊ लागली तेव्हा आपल्या मिडीयाला हि बातमी महत्वाची वाटू लागली. कारण काय ते तुम्ही सर्व जाणताच. त्यामुळे मी वेगळे असे मत मांडायला नकोच.

याच्या आसपासच पाकिस्तानमधून काश्मीर मध्ये बाहेर येणारा बोगदा खोदल्याचे आपण ऐकले असेलच. ह्या गोष्ठी काय सूचित करतात??

आज आपण सर्व बाजूने घेरले गेलो आहोत माझ्या बांधवानो.

एकीकडे पाकिस्तान, त्याच्या थोडेसे वर अफगाणिस्तान, उत्तरेला चीन, आपला शेजारी आणि जगातला एकेकाळचा एकमेव हिंदू देश नेपाळ सुद्धा आपल्या बाजूने नाही. कारण तिथली हिंदू राजवट संपली आहे. तिबेट तर केव्हाच चीनने गिळंकृत केला आहे,. ब्राम्हदेशाशी आपले फार चांगले संबंध आहेत अशातला भाग नाही. त्याच्या खाली बांगलादेशी अतिरेकी आहेतच. ईशान्य भारतात एक कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत. श्रीलंकेने चीनला भारताविरुद्ध कारवाई करायची असल्यास त्यांचा हवाई तळ वापरण्याची मुभा दिली आहे. अंदमान आणि निकोबार या बेटांवर हवाई हल्ले करता येईल अशा प्रकारे चीनने श्रीलंकेच्या हद्दीत हवाईतळ उभारले आहेत.

आणि या परिस्थितीशी आपले नेतृत्व अनभिज्ञ आहे अशातला भाग नाही. पण त्यांना काही करायचेच नाही.

आज काश्मीर मधले सैन्य काढून घेतले. तिथे सैनिकांचे अशा पद्धतीने विकेंद्रीकरण केले आहे कि पाकिस्तानने स्थानिक कट्टरपंथीयांना हाताशी धरून काही करायचे म्हटले तर सहज ते त्या सैन्याला गारद करू शकतात. आसाम मध्ये माओवादी, फुटीरतावादी संघटनांचे बळ वाढत आहे. आणि हि आजची परिस्थिती नाही तर फार पूर्वीपासूनचा हा रंगलेला डाव आहे. ईशान्य भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर उणेपुरे ३००० किलो मीटरचे कुंपण घालायचे होते. त्यापैकी फक्त १०००-१५०० किलो मीटरचे फक्त कुंपण घातले गेले आहे. तेही इतके हलक्या दर्जाचे आहे कि सहज तुटेल. ब्रम्हदेशाच्या हद्दीवर तर सुरक्षा व्यवस्था इतकी कमजोर आहे कि तिथून खुलेआम अमली पदार्थांची तस्करी केली जाते.



आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण २६.११ ला जो मुंबई हल्ला झाला त्याचे नियोजन करण्यासाठी मुंबईचे जे फोटो काढले गेले....... ते आणि ते फोटो काढणारा हा ईशान्य भारतातून नेपाळ मार्गे पाकिस्तानात गेला होता. आणि त्याला स्थानिक दहशतवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली होती. हे कोण होते मी सांगायला नकोच.

दक्षिणेकडे आपल्या सागरी हद्दीत प्रवेश सुलभ व्हावा म्हणून रामसेतू तोडण्याचा कट रचला जात आहे. कारण रामसेतुमुळे आपल्या सागरी हद्दीत आलेला शत्रू अडकून पडतो. एकदा का त्याने दक्षिणेकडील आपल्या सागरी हद्दीत प्रवेश केला कि राम सेतूमुळे त्यास पुढे सरकता येत नाही आणि अशावेळी मागून आपण हल्ला करून त्यांना जलसमाधी देऊ शकतो. शिवाय या रामसेतूच्या हद्दीत एक असे खनिज आहे जे युरेनियमला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. युरेनियमचा वापर अणुप्रकलापांमध्ये केला जातो हे आपल्याला ठाऊक असेलच.


एका संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार भारतविरोधी करणा-या अंतर्गत आणि बाहेरील अशा १७८ संगठना आज अस्तित्वात आहेत.
आज केवळ ईशान्य भारतात ११५ विविध देश विघातक संगठना कार्यरत आहेत.  जम्मू आणि काश्मीर मध्येच जवळ पास ३२ संघटना कार्यरत आहेत. याशिवाय इतर दहशतवादी संघटना आहेतच.


मी फक्त आपल्या समोर जी संकटे आहेत ती मांडली आहेत. मला माझे काही विचार मांडायचे नाहीत. कारण मी किवा इतर कोणी काही सांगितले तरी विचार करणे तुमच्या हातात आहे.

पण एक सांगू शकतो कि, "जर आज आपण काही केले नाही तर उद्याची येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करू शकणार नाही. कारण आपण त्यांच्यासाठी देश म्हणून ठेऊ तो कोणाच्यातरी भिकेवर मिळालेला एक जमिनीचा तुकडा असेल. तोही त्यांना मिळेल कि नाही माहित नाही."

आपला प्रसाद राऊत.