बुधवार, २३ मे, २०१२

संभाजी बिग्रेड आणि बामसेफ - एक चिंतेचा विषय !!!


मागे एकदा सहा महिन्यांपूर्वी काही समविचारी मित्रांना भेटायला गेलो होतो. तिथे एक सरकारी अधिकारी श्री. मयेकर सर बसले होते. त्यांनी एक सत्यघटना सांगितली. ती ऐकून आम्हा सर्वांचेच काळीज हलले. ते सांगत होते - त्यांचा एक मित्र नुकताच काश्मीर मध्ये जाऊन आला. तिथे दाल सरोवर बघत असताना एक भारतीय सैनिक तिथे आला. मयेकर सरांच्या मित्राला भूक होण्याची सवय. तो त्या सैनिकाला जाऊन भेटला. हस्तांदोलन करायला गेला. तर त्या सैनिकाने लगेच स्वतःचा हात त्याच्या हातातून काढून घेतला. तो सैनिक त्याच्याशी बोलायला तयार नव्हता. पण तो मात्र बोलत होताच.- "साहेब तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. तुम्ही जीवाची बाजी लाऊन आपल्या देशाचा रक्षण करता. तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे. इति. इति." हे सगळा तो बोलत असताना एक स्थानिक मुस्लीम रिक्षावाला तिथे येऊन उभा राहिला. आणि मस्त सिगारेट पीत त्यांचं बोलणं ऐकू लागला. त्या सैनिकाला दम धरवेना. शेवटी वैतागून तो त्याला म्हणाला कि "तुम्ही इथून जा नाहीतर मी तरी इथून जातो." आणि वैतागून(?) शेवटी तो तिथून निघून गेला. तो जाताच तो मुस्लीम रिक्षावाला त्या मयेकर सरांच्या मित्राला म्हणाला, " ये झा**** हमारी क्या उखाडेगा??" त्यांना काही कळलेच नाही. ते त्याच्याकडे बघत राहिले. तो परत म्हणाला..." आप को यकीन नाही होता?? तो ये देखो..." असं म्हणत त्याने खिशातून मोबाईल काढला आणि त्यातला एक शूट केलेला व्हीडीओ त्यांना दाखवला. तो व्हीडीओ बघताच त्यांना त्या सैनिकाच्या विचित्र वागण्याचा उलगडा झाला. त्या व्हीडीओत एक जखमी सैनिक हातात स्टेनगण असूनही कुत्र्यासारखा पळत होता. आणि त्याच्या मागे ४०-५० जणांचा जमाव लागला होता. शेवटी विरुद्ध दिशेने येणा-या दुस-या जमावाने त्याला पकडलेच. आणि त्याला बेदम मारला. त्याच्या शरीरातून वाहणारे रक्त सुद्धा त्या व्हीडीओ मध्ये स्पष्ठ दिसत होतं. मयेकर सरांचा तो मित्र सुन्न होऊन परत आला. त्याने आणखी काही अनुभव सांगितले.... काही ठिकाणी भारतीय पर्यटकांच्या बस मध्ये शिरून स्थानिक लोक त्यांच्या तोंडासमोर पाकिस्तानचा झेंडा नाचवत होते.

कश्मीर मधले सैन्य ओमर अब्दुल्ला याच्या सांगण्यावरून सरकारने काढून घेतले. जे सैनिक आहेत ते एकमेकांपासून इतक्या लांब अंतरावर आहेत कि एखाद्या जमावाने एखाद्या सैनिकाला मारायचे ठरवले तर ते सहज मारू शकतात. मुंबईतल्या लोकांना याचा अंदाज यावा म्हणून दोन सैनिकांमधलं अंतर किती असेल ते सांगतो. एक सैनिक दादरला तर दुसरा सैनिक माहीमला अश्या अंतराने सैनिकांचा विकेंद्रीकरण केलं आहे. at the same time चीन भारत पाकिस्तानच्या सीमेवर बंकर्स खोदत आहे. त्यांना विचारलं तर सांगतात कि आम्ही इथे बांधकामासाठी आलो आहोत. मग बांधकामासाठी आले आहेत तर बंकर्स कशासाठी खोदत आहेत?? मध्यंतरी स्टार माझा या न्यूजचेनेल वर ईशान्य भारतातील भारत चीन सीमेवरील एका गावक-यांची मुलाखत दाखवली. त्यात त्या गावक-यांनी स्पष्ठ सांगितले कि 'जर युद्ध सुरु झाले तर चीनचे सैन्य त्यांच्या राजधानी पासून या सीमेवरील गावात अर्ध्या तासात पोहोचेल अशी दळण वळण व्यवस्था उभारली आहे.' हे सगळे धोके सरकारला माहित नाहीत अशातला भाग नाही. आणि सरकार यावर काही ठोस पावले उचलत असेलही. सुरक्षेच्या कारणास्तव ती ठोस पावले जाहीर केली जात नसतील अशी आशा आहे.

आता तुम्ही म्हणाल या सगळ्याचा आणि बामसेफ आणि संभाजी बिग्रेड चा संबंध काय?? तर संबंध सरळ आहे. आज महाराष्ट्रात सरळ सरळ छातीठोकपणे संभाजी बिग्रेड आणि बामसेफवाले सांगतात कि " दहशतवाद हि या देशासमोरील समस्या नसून ब्राम्हनवाद हि या देशासमोरील समस्या आहे." जरी वरकरणी वाचायला आणि ऐकायला हे छान वाटत असले तरी यातच सर्वनाशाची बीजे रोवली आहेत.

लहानपणी एक गोष्ठ ऐकली होती. एका राज्यात एक राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. लोक गुण्या गोविंदाने एकमेकांशी वागत असत. कसलीही भांडणे नाही कि काही नाही. त्यामुळे जनतेची एकी भक्कम होती. आणि पर्यायाने हे राज्य अजिंक्य होते. राज्यात मधेच एखाद्या वेळेस लढाईची वाद्ये वाजवली जात. ती वाजताच लोक आपापली कामे सोडून हातात हत्यारे घेऊन आपल्या राज्याच्याचे रक्षण करण्यसाठी सज्ज होत. हि गोष्ठ लोक सावधान आहेत कि नाही हे पाहण्यासाठी केली जात असे. त्या राजाच्या शत्रू राजाला हे राज्य जिंकायचे होते. त्यासाठी त्याने आपल्या प्रधानाचा सल्ला घेतला आणि कात शिजवला. प्रधानाला स्वतःच्या राज्यातून राजाने हाकलून दिले. तो त्या गुण्या गोविंदाने नांदणा-या राज्यात गेला. तिथल्या लोकांनी त्याचा स्वीकार केला. त्याला एका सरकारी अधिका-याची नोकरी मिळाली. हळूहळू आपल्या कौशल्याने तो राज्याच्या प्रधान बनला. पान हे सगळे करत असताना त्याने राज्यात भांडणे लाऊन द्यायला सुरुवात केली. प्रधान झाल्यावर त्याने एके दिवशी ती रणवाद्ये वाजवण्याची आज्ञा दिली. ठरल्यानुसार रणवाध्ये वाजवली गेली. पण आपापसात भांड्ल्यामुळे दुहीची बीजे पेरली गेली होती. त्यामुळे कोणीही राज्याच्या रक्षणासाठी तयार होऊन बाहेर आले नाही. प्रधानाने हि गोष्ठ हेरली आणि आपल्या मूळ मालकास युद्धाची तयारी करून चालून येण्यास सांगितले. तो राजा चालून आला. पण आपापसात फुटलेला समाज फार काळ प्रतिकार शकला नाही आणि एकेकाळी अजिंक्य असलेले ते राज्य कायमचे पारतंत्र्यात गेले. हे शहर होते पाटलीपुत्र कि वैशाली!!!

आज आपल्यासमोर ब्राम्हनवादाचा बागुलबुवा उभा करून ठेवला जात आहे तो जाणीवपूर्वक असेल किवा अजाणतेपणी असेल. पण याच्यात आपल्या एकसंध समाजाच्या दुहीची बीजे आहेत. महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राम्हण असा संघर्ष पेटवला जात आहे. उत्तरेत सवर्ण विरुद्ध दलित असा संघर्ष पेटवला जात आहे. आसाम मध्ये धनिक विरुद्ध गरीब असा संघर्ष पेटवला जात आहे. ईशान्य भारतात उर्वरित भारत विरुद्ध ईशान्य भारत असा संघर्ष पेटवला जात आहे. हे सगळे या एकसंध भारतीय समाजाला आपसात भांडणे लाऊन फोडण्यासाठी हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. संघावर रागही याच कारणासाठी आहे कारण संघ पहिल्यापासून एकसंध भारतीय समाजासाठी प्रयत्नशील आहे.

असो. मी एक अज्ञानी बालक आहे, माझ्या अल्पबुद्धीला जेवढा जाणवला तेवढा सांगितला. विचार तुमच्या हातात आहे. आपल्याच भावंडांचे गळे कापून परक्यांना या देशावर राज्य करू द्यायचे कि एकमेकांना समजून घेऊन परक्यांच्या नरडीला नख लावायचे ते.............

जय हिंद !! जय भारत !!


१७ टिप्पण्या:

  1. हो. आपण हि पोस्ट आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवून त्यांना ख-या धोक्याची जाणीव करून देऊ शकता.

    उत्तर द्याहटवा
  2. ब्लॉग वर मुस्लीम द्वेष पसरविणे हा या ब्लॉगचा उद्देश दिसतो.
    हे राष्ट्रविघातक आहे.आपल्या देशात सर्व धर्मियांना राहण्याचा अधिकार आहे.
    जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा आदर केला.'
    हे विसरू नका.
    चांगली कामे करा.

    उत्तर द्याहटवा
  3. माय नेम इज़ नॉट खान—–
    एक कश्मीरी पंडित की पीड़ाः

    मेरा दुर्भाग्य है कि मैं हिन्दुस्तान में रहता हूँ और हिन्दू हूँ। मैं खुशनसीब नहीं हूँ क्योंकि कि मेरे नाम के साथ ‘खान’ नहीं जुड़ा है। दुर्भाग्य से मेरे नाम के साथ मेरा उपनाम कौल जुड़ा है। मैं एक हिन्दू परिवार में पैदा हुआ। मुझे अपने परिवार के साथ कश्मीर छोड़ना पड़ा। लेकिन मैं इतना सौभाग्यशाली नहीं हूँ कि करण जौहर मेरे परिवार के साथ हुई ज्यादती को लेकर फिल्म बनाए। आज तो ये फैशन हो गया है कि अगर आपके नाम के साथ खान जुड़ा है और आपके साथ कोई ज्यादती हुई है तो देश भर का मीडिया उसे खबर बनाएगा और सुर्खियों में उछालेगा। फिल्मी दुनिया में बैटे ‘देशभक्त’ फिल्म निर्माता निर्देशक किसी खान पर होने वाले अत्याचारों पर फिल्म तक बना देंगे। अमरीकी एअरपोर्ट पर एक शाहरुख खान के जूते और मौजे उतरवा लिए जाएँ तो पूरे देश का मीडिया छाती कूटने लगता है।

    लेकिन एक बार फिर यही कहना पड़ रहा है कि मैं ‘खान’ नहीं कौल हूँ।

    जरा मेरी आपबीती भी सुन लीजिए!

    मेरी माँ और बहन के साथ बलात्कार के बाद उनकी हत्या कर दी गई। मेरी 6 साल की बच्ची जिसके सामने एक ‘खान’ द्वारा उसके भाई, बहन और पिता की हत्या की गई और उसकी बहन के साथ बलात्कार किया गया, लेकिन इस भयावह और शर्मनक घटना पर न तो कोई मेरे आँसू पोछने आया न ही कोई फिल्म बनाने आया।कश्मीरी हिन्दुओं के साथ कश्मीर में हर दिन हो रही ज्यादतियों के खिलाफ कोई फिल्म नहीं बनाएगा क्योंकि कश्मीरी हिन्दु ‘खान’ नहीं है, दुर्भाग्य से हम कौल हैं। जब हम हमारे हितों की लड़ाई लड़ने वाले नेताओं को देखते हैं तो पाते हैं कि उन्होंने हमारी लड़ाई लड़ने के नाम पर बड़े बड़े बंगले बना लिए हैं। उन्होंने दूसरे राज्यों के स्कूल और कॉलेजों में हमारे लिए आरक्षण भी करवा दिया, लेकिन किसी ने कभी यह कोशिश नहीं की कि हम अपने वतन, अपने कश्मीर में अपने ही घरों में वापस लौट सकें। इन बेचारे नेताओं की प्राथमिकता अलग है, वे तो हमारे पड़ोसी आतंकवादी देश के जिहादियों के कार्यक्रमों पर अपने बयान देते हैं, और हमारी समस्या पर सेमिनारों में उपदेश देते रहते हैं।



    http://kunjeshwari.com/sweetblog/sweet-bharat/arise-awake/#more-3674

    उत्तर द्याहटवा
  4. Anonymous

    भाऊ....... मुस्लिमद्वेष पसरवण्याचा उद्देश नाही. पण आपण कोणत्या धोक्याकडे दुर्लक्ष करत आहोत हे दाखवणे आमचा उद्देश आहे. ब्राम्हणांचा बागुलबुवा उभा करून ख-या धोक्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खेडेकर सिमीच्या अतिरेक्यांबरोबर एकाच व्यासपीठावर उभा राहून "कायदा आमचे काहीही बिघडवू शकत नाही ." असे वक्तव्य करतो. यातूनच काय ते ओळखा.

    उत्तर द्याहटवा
  5. ब्लॉग मधील कथा विसंगत वाटते .एका जागरूक राज्यातील प्रजा शत्रू राज्यातील प्रधानाला आपल्या राज्याचा प्रधान म्हणून कसा स्वीकारेल?आणि एक सैनिक दादरला तर दुसरा सैनिक माहिमला!काहीतरीच काय सांगताय भाऊ!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ब्लॉग मधील कथा विसंगत वाटते .एका जागरूक राज्यातील प्रजा शत्रू राज्यातील प्रधानाला आपल्या राज्याचा प्रधान म्हणून कसा स्वीकारेल?आणि एक सैनिक दादरला तर दुसरा सैनिक माहिमला!काहीतरीच काय सांगताय भाऊ!
      ReplyDelete

      आपण कथा व्यवस्थित वाचलेली दिसत नाही… शत्रू राज्याचा प्रधान हद्दपार केलेला अपराधी म्हणून पाटलीपुत्र / वैशाली नगरीत गेला होता. आणि तेथे त्याने हळू हळू त्या राज्याचा प्रधान हे पद मिळवले.

      दुसरा मुद्दा <<<< एक सैनिक दादरला तर दुसरा सैनिक माहिमला.. >>> हे उदाहरण मी मुंबईतील लोकांना उद्देशून दिले आहे. यात फक्त अंतर काय असेल याचा अंदाज घ्यायचा होता……

      हटवा
  6. भाऊ,खरोखर या सगळ्याचा बामसेफ आणि संभाजी बिग्रेडशी काय संबंध?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. संबध सरळ आहे…. हिंदूमध्ये भांडणे लावून ख-या इस्लामी धोक्याकडे हिंदूंचे दुर्लक्ष होईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे बामसेफ आणि संभाजी बिग्रेडचे काम आहे.

      हटवा
    2. पण मी म्हणतो की इस्लामींना तर सोडायचे नाहीच पण बामनवाद सुद्धा एक घातक आहे भारतास...

      हटवा
  7. ह्या सर्व सांगोवांगी गोष्टी आहेत.याला आधार काय?

    उत्तर द्याहटवा
  8. खरे आहे, सांगोपांगी वडाला वांगी अशी शंका येणे स्वाभाविक आहे, आणि प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घेणे हाच त्यावर इलाज. संभाजी ब्रिगेड आणि बामसेफच्या कृतींविषयी हेच लागू पडते.

    उत्तर द्याहटवा
  9. शत्रूंना अनुल्लेखाने मारा...झोपल्याचे सोंग घेतलेल्यांना जागे करू नका...जाग्यावर ब्लॊक करा...आप्ले ध्येय निद्रिस्त राष्ट्रप्रेमींना जागे करणे हे आहे...राष्ट्रद्रोह्यांना एक शब्दाने उत्तर नको...त्यांना उत्तर येणारा काळच देईल...

    उत्तर द्याहटवा
  10. आपला लेख अप्रतिम आहे सर्वधर्म समभाव चा किडा ज्यांच्या प्रश्वभागात वळवळ करतो असे हिंदू राष्ट्र अधोगती कडे नेणारच.. त्यांना बामसेफ ब्रिगेड
    बद्दल जाणूनच घ्यायचं नाही आहे..

    उत्तर द्याहटवा