सध्या काही लोक शिवरायांच्या चरित्राचा आणि कर्तुत्वाचा वापर हिंदू धर्म विरोधासाठी आणि भविष्यातील इस्लामचा संभाव्य धोका लक्षात घेऊन एकत्र होऊ पाहणा-या हिंदुना जाती-पातीत विभाजित करू पाहण्यासाठी करत आहेत. मुळात शिवरायांच्या कर्तुत्वाचे यांना इतक्या वर्षांनी का कौतुक वाटावे हा प्रश्न आहे. अर्थात या मागे काही राजकीय नेत्यांचा डाव आहे हे मी वेगळे सांगायला नको. आता थोडी कारण मीमांसा करूया. सध्या आपल्या देशात कायदा सुव्यवस्था फक्त नावालाच उरली आहे. कायदा हवा तसा काही लोकांसाठी वाकवला जातो. त्यातही हे प्रमाण अल्पसंख्यांकासाठी जास्त आहे. कारण त्यांची एकगठ्ठा मतपेटी. आजच्या घडीला कोणतेही सरकार बहुमताने निवडून येऊ शकत नाही हि वस्तुस्थिती आहे. अनेक पक्षांनी मिळून देशाच्या राजकारणाचा बाजार मांडला आहे. अशावेळी कोणा एका समाजाची एकगठ्ठा मते मिळत असतील तर कोणत्या पक्षाला नको असतील. पण त्याबदल्यात त्यांना काही द्यावे लागते. त्यासाठी नेहमी कायदा बाजूने असेल असे नाही. कधी कधी कायदा आणि शासनाला त्यासाठी वाकवावे किवा वाळवावे लागते. मग यातून बहुसंख्यांक समाजाच्या मनात सरकार बद्दल राग निर्माण होतो. तो राग निववायचा असतोच शिवाय अल्पसंख्यांक समाज दुखावला जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची असते. मग अशावेळी काय करता येते?? लोकांच्या मनात ज्या सुराज्याची अपेक्षा असते ते कसे आपल्या सरकारच्या धोरणांशी मिळते जुळते होते हे बहुसंख्यांक अर्थात हिंदू समाजाच्या मनात बींबवायचे.
आता लोकांच्या मनात सध्याच्या काळास निकट अश्या कोणत्या सुराज्याची छबी असते?? तर ती शिवशाहीची. मग शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते, ते कसे अल्पसंख्यांकांचे लाड करायचे याचा रसभरीत खोटा इतिहास तयार करून घ्यायचा. यासाठी जास्त लांब जायची गरज नसते. आधीच बेरोजगारीने त्रस्त आणि बदनाम असलेल्या काही लोकांना हाताशी धरायचे. त्यानिमित्ताने त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था होते आणि त्यांची बदनामी देखील लोक विसरतात. तर असा हा सारा मामला. त्यात परत काही लोक असेही असतात ज्यांचे लेख, कविता आणि इतर साहित्य अनेक प्रकाशन संस्थांकडून साभार परत आलेले असते. त्यांना हे व्यासपीठ मिळते. त्यांच्या प्रसिद्धीची आणि झालीच तर पोटा पाण्याची सोय देखील होते. अशा उपेक्षित लेखकांसाठी हे सरकारचे दलाल पायघड्या घालून उभे असतात. हळूहळू तेसुद्धा या सर्व कटात सामील होतात. पण नंतर त्यांना परतीचा मार्ग बंद झालेला असतो. कारण त्यांनी या अशा लोकांच्या नादी लागून हिंदू समाजाच्या भावना दुखावलेल्या असतात. त्यामुळे इच्छा असो वा नसो त्यांना त्या मेंढरांच्या कळपात राहणे भाग असते. कारण बाहेर पडले तर एखादा हिंदू वाघ त्या मेंढराची शिकार करू शकतो.
आता या लोकांचे खोटे इतिहास देखावे कसे असतात याचे थोडेसेच दर्शन घेऊया.
पहिला भाग - शिवाजी महाराज हे सेक्युलर विचारांचे होते??
मुळात सेक्युलर या शब्दाची व्याख्या काय ते जाणून घेऊ. सेक्युलर या शब्दाचा एक आय. ए. एस ऑफिसर श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितलेला अर्थ बघा.
' राज्य सत्ता, प्रशासन, कायदा आणि व्यवस्था हे धर्माच्या आधारावर प्रजेत भेदभाव करणार नाही. सर्वाना समान अधिकार असतील आणि तशीच कर्तव्ये देखील!"
आता या व्याख्येनुसार आपल्या देशातील सरकार सेक्युलर आहे का?? अर्थातच नाही. कारण इथे निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिमांची मते मिळावीत म्हणून एका रात्रीत कायदा बदलला जातो. अफझल गुरुसाठी फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून राष्ट्रपतींकडे दयेची याचना केली जाते.
तर हि धर्म निरपेक्षता शिवाजी महाराजाच्या राज्यात होती काय?? अर्थातच नाही. तत्कालीन समाजात ब्रम्हा हत्या म्हणजे मोठे पाप समजले जात असताना "हतेर उचलले तो हरामखोर!' या न्यायाने राजांनी कृष्णाजी भास्कराचा वध देखील अफझल खानाच्या वधाच्या वेळीच केला. त्यानंतर शत्रूस मिळून स्वराज्यावर चालून येणा-या खंडोजी खोपडेचे हात पाय देखील तोडले होते. हि धर्म निरपेक्षता आजचे राज्य करते दाखवू शकत नाहीत. कारण आजच्या घडीला भारतातील ब-याच मुस्लिमांच्या मनात आजही पाकिस्तानबद्दल सहानुभूती आहे. आणि त्या लोकांच्या हातून जी दहशतवादी कृत्ये होतात त्यासाठी त्यांना शिक्षा दिल्यास त्यांच्या समाजाची मते मिळणार नाहीत. कारण ते त्यांच्या धर्म बंधूंच्या हिताबद्दल बरेच जागरूक आहेत. मग अशा वेळी काय करायचे?? तर या अशा ढोंगी सरकारचा पर्दाफाश करणा-या हिंदू संघटनांमध्ये बुद्धीजीवी वर्ग हा जास्त करून ब्राम्हण समाज आहे. मग त्यालाच इतर हिंदूंचा शत्रू म्हणून उभे करायचे. दिशादर्शक यंत्रच चुकीचे वाटू लागले कि तारू भरकटलेच म्हणून समजा. शिवाय आपल्या बुडाखालची खुर्ची काढू पाहणारा एकत्रित समाज आपापसात विखुरला जाईल आणि आणखी काही काळ आपल्याला त्यांच्यावर राज्य करता येईल. हि साधी अटकळ आहे राजकारण्यांची.
तर या लोकांचा असा दावा असतो कि शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. त्यासाठी अनेक मुस्लीम सरदारांची नावे पुढे केली जातात, अस्तित्वात नसलेल्या सरदारांची आणि पात्रांची निर्मिती केली जाते. केवळ पैश्याच्या आशेने आलेल्या लोकांना निष्ठेचे प्रमाण पत्र दिले जाते. उदाहरण द्यायचेच झाले तर, शिवरायांच्या सैन्यात अनेक सिद्धी नावाचे सरदार दाखवले जातात. पण हे सिद्धी मुळचे इथले नाहीच. ते तर सोमालिया आणि तत्सम बेतान्वारचे निग्रो. ज्यांना मुस्लीम आणि त्यातही अरब व्यापा-यांनी गुलाम केले, त्यांचे धर्मांतरण केले. जर खोटे वाटत असेल तर या प्रती इतिहास कारण यातील एका तरी सिद्धीचे महाराष्ट्रातील गाव दाखवता येते का ते विचार?? आणि दाखवलेच तर त्या गावात जाऊन त्यांच्या वंशाचा मागमूस काढा. शिवरायांच्या काळात किवा त्यानंतर ते इथे स्थायिक झालेलेल आढळतील.
याचाच अर्थ स्पष्ठ आहे कि जे इथले मुस्लीम आहेत त्यांच्या मनात शिवरायांच्या स्वराज्याबद्दल तिळमात्र प्रेम नव्हते. काही सन्माननीय अपवाद वगळता. कारण अफझल खानाच्या वधानंतर संपूर्ण विजापूर शोकग्रस्त झाले होते. 'अल्लाह्तालाने मुसलमानांची पातशाही मराठ्यांच्या हातात दिली कि काय?' असाच तेथील जनतेचा सूर असल्याचे एका दस्तावेजात वाचायला मिळाले होते. असो. या विषयावर अनेक लेख लिहिता येतील. पण ते माझे उद्धिष्ठ नाही.
तर या लोकांचे असे सांगणे असते कि शिवाजी महाराजांच्या काळात सर्व धर्मांना समान वागणूक होती. बहुतेक यांचा असा समज असतो कि, " जो आपल्या धर्माचा नाही तो आपल्या सोबत राहू शकत नाही" अशा बुरसटलेल्या विचारांचा हिंदू धर्म आहे. पण भारताचा इतिहास पहिला तर आपल्या लक्षात येते कि, " तो हिंदू धर्मच होता ज्यांना जगातील सर्व धर्मांना आपल्या देशात सामावून घेतले."
पारसी समज हा कित्येक शतकांपूर्वी इराण मधून विस्थापित केला मुस्लिमांनी. पण त्यांना या भारताच्या मातीत जगता आले, त्यांच्या धर्माचे पालन करता आले ते हिंदू भूमीत असल्यामुळे. जर हेच विस्थापित अरब राष्ट्रांत गेले असते तर आज कधीकाळी पृथ्वीवर पारसी किवा झोरोऑस्ट्रियन संस्कृतीचे लोक राहत होते हे केवळ जगाच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळाले असते. हीच गोष्ठ ज्यूंची. इस्राईल जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जगभरातले ज्यू इस्राईल मध्ये परत गेले. इस्राईल मध्ये जगभरातून आलेल्या ज्यूंचे अनुभव अत्यंत कटू असेच होते. फक्त भारतातील ज्यूंचे अनुभव मात्र वाईट नव्हते. मी जेव्हा ३ वर्षापूर्वी घाटकोपर मध्ये एका सायबर मध्ये पार्ट टाईम नोकरी करायचो तेव्हा तिथे वर्षातून फक्त तीन महिन्यांसाठी एक ज्यू कुटुंब यायचे. त्यांच्या अनेक पिढ्या इथेच गेल्या. आता त्यांची नवीन पिढी इस्राईल मध्ये वाढते आहे. पण त्यांना तिथे करमत नाही. पण कायद्याने बंधन कारक असल्याने ते तिथे राहतात. पण वर्षातून तीन महिने भारतात येतात. अशी अनेक ज्यू कुटुंबे आहेत. हे कशामुळे शक्य झाले?? जर हिंदू असहिष्णू असतील तर हे शक्य झाले असते का?? जर हा प्रभाव इस्लाम किवा इतर ख्रिश्चनांचा म्हणावा तर जगाच्या इतर देशांत राहिलेल्या ज्यूंचे अनुभव कटू का??
हिंदू असहिष्णू कधीच नव्हता. पण जर आमची सहिष्णुता आमच्या विरुद्ध वापरात असाल तर विसरू नका कि,
आम्ही त्या शिवरायांचे भक्त आहोत ज्यांनी फोंड्यात हिंदूंची धर्मांतरे करणा-या ख्रिश्चन पाद-यांना रायगडावर आणून हिंदू केले होते आणि उलट निरोप पाठवला होता त्यांच्या राजाला कि, "तुम्ही तिकडे ते करणार असाल तर मी इकडे हे करेन."
सुंदर !
उत्तर द्याहटवासुंदरच तरीही अडाणी गाढवे किव्हा हे संविधान वाले सेक्युलर सेक्युलरा चा घोषा लावणारच
उत्तर द्याहटवा