सध्या देशात काय
चालले आहे
कळत नाहीये..........
प्रचंड उलथापालथी तितक्याच प्रचंड वेगाने होत आहेत.......
अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि इतर एखाद्या मालिकेचे एपिसोड लिहावे तसे दरदिवशी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत होते... मध्येच ते गायब झाले...... लोकपाल विधेयकाची हवा गाढवाच्या डोक्यावरून शिंगे गायब व्हावीत तशी कुठे गायब झाली कळत नाहीये............
बाळासाहेब ठाकरे निवर्तले आणि त्याच्या काही दिवसानंतर कसाबला फाशी दिले गेले.... बाळासाहेबांच्या निर्वाणाने शिवसेनेला सहानुभूती मिळतेय असे वाटल्याने कदाचित कसाबला फाशी दिली गेली असेल..........आता अफझल गुरूला फाशी दिली....... त्याचे पडसाद उमटतच आहेत.........
मध्येच गुजरातची निवडणूक अपेक्षित विजय घेऊन मोदींकडे सत्तेची चावी देती झाली................
महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय.... आणि नेत्याची झोप उडालीय.... कदाचित आयातीमध्ये कसा घोटाळा करता येईल या विचाराने असेल........
सुशील कुमार शिंदे देशातल्या हिंदूंच्या नाकावर टिच्चून हिंदू दहशतवाद जाहीर करून मोकळे झाले... त्या गडबडीत पाकिस्तानी सैन्याने आपल्या दोन सैनिकांची निर्घृण हत्या केली हे सगळेच विसरले....
दिग्विजय सिंग यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको.......... भारताच्या राजकारणात इतका उतावळा नेता कोणी झाला नसेल आत्तापर्यंत..........
सोनिया आणि राहुल... हि माता-पुत्र सध्या कुठे आहेत या गदारोळात तेच कळत नाहीये.......
ओवेसी नावाच्या एका फुटीरवादी मुस्लिम नेत्याने हिंदुना कापून टाकण्याची भाषा केली.... औरंगजेबाच्या कबरीवर नमाज अदा केली....
नुकतेच हैदराबाद मध्ये बॉंबस्फोट झाले....
या सगळ्यात आम्ही कुठे आहोत?? आम्ही म्हणजे सामान्य माणसे.........
तर कोठेही नाही....... कारण आमच्या या गोष्ठी इतक्या पचनी पडल्यात... कि एखादा नेता भ्रष्टाचारात सापडू दे नाहीतर १००-१५० लोक बॉंबस्फोटात मरू देत.... आम्हाला काही नवीन असे वाटत नाही..... आम्ही या गोष्ठी या देशात नेहमीच घडत असतात या अविर्भावात वावरतो......जणू काही मालिकांचे एपिसोड बघत असतो....... नाहीतर एखादा क्रिकेटच्या सामन्यांची मालिका....
किती पद्धतशीरपने आम्हाला एकदेशीय, एकजिनसी राष्ट्रीय समाज म्हणून विकसित होण्यापासून अलिप्त ठेवलेय ना?? आम्ही आज जातींच्या, राजकीय पक्षांच्या शाखांसारखे विभागले गेलोय.... आणि जो पर्यंत या शाखा आहेत तोपर्यंत आम्ही असेच राहणार.... एका देशात राहूनही विभक्त....
फक्त कागदोपत्री आम्ही या देशाचे नागरिक आहोत.... शाळेत "म्हणावी लागते" म्हणून आम्ही प्रतिज्ञा म्हणतो.... बाकी देश काय असतो हे आम्हाला कळलेच नाही किवा कळू तरी दिले नाही........
शाळेत प्रतिज्ञा जी म्हणतो तिचे पहिले वाक्य आहे.... "भारत माझा देश आहे.......".... पण आम्ही कधी विचारच केला नाही कि या वाक्यात "माझा" हा शब्द का वापरलाय??? का "भारत 'आमचा' देश आहे." असे म्हटले नाहि???
कारण माझा म्हटला कि आत्मीयता येते.... देश माझा आहे हि भावना जेवढी तीव्र असते तेवढी देश आमचा आहे हि नसते....
असो... आम्ही का विचार करावा.............???

आमचे घर चालतेय
ना?? जेव्हा आमच्या घराजवळ येईल तेव्हा बघेन............ लष्कराच्या भाक-या कोण
भाजेल??
हा आमचा देश आहे............ खरच गर्व आहे मला माझ्या देशावर......... जिथे जगातली सगळ्यात जास्त माणसे... माणूस म्हणून नाही तर कळपातल्या शेळ्या मेंढ्यासारखी जगतात............. राखणदार कोणीही असो... मालक कोणीही असो.... जोपर्यंत मला उचलून कत्तल खाण्यात नेले जाणार नाही तो पर्यंत मी आवाज करणार नाही.........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा