सोमवार, १९ डिसेंबर, २०११

डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या पुराणात दशावताराच्या रुपात खूप आगोदर सांगितला गेला आहे

मित्रानो
आपण सर्वानीन शाळेत असताना डार्विन च्या उत्क्रांतीचा सिद्धांत वाचलाच असेल ना??
डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या पुराणात दशावताराच्या रुपात खूप आगोदर सांगितला गेला आहे, हे आपणास माहित आहे का?? कै. अनंतशास्त्री दातार ह्यांनी हा सिद्धांत आपल्या विष्णुपुराणात कसा सांगितलं आहे ते सिद्ध केले आहे. तेच खालील प्रमाणे जमेल तसे मी देत आहे.
१. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला जीव जलचर होता. आणि भगवान विष्णूंचा पहिला अवतार मत्स्यावतार होता.
२. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार दुसरा जीव हा उभयचर होता. आणि भगवान विष्णू यांचा दुसरा अवतार हा कूर्म म्हणजेच कासव हा होता. जो उभयचर प्राणी आहे.
३. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार जीवसृष्टीचा तिसऱ्या टप्प्यात भूचर जन्मास आले. आणि दशावतारातला तिसरा अवतार हा वराह म्हणजेच डुक्कर या उभयचर प्राण्याचा होता.
४. विश्नुपुरानानुसार चौथा अवतार हा नृसिहांचा आहे. म्हणजेच अर्धा हिंस्र प्राणी आणि अर्धा मानव. ज्याला आपण माणसाची सुरुवातीची अवस्था म्हणतो तो माणूस सुद्धा हिंस्र पशुन्प्रमाणे शिकार करायचा.
५. भगवान विष्णूंचा पाचवा अवतार हा वामन स्वरूपातला होता. वामन किवा ज्यास बटू म्हणतात तो. हि माणसाची माणूस म्हणून उत्क्रांतीची दुसरी पायरी आहे. जिथे माणूस बुद्धीने लहान होता. म्हणजेच बटू होता. बळीची कथा इथे रूपकात्मक मानली तर तर बटू अवस्थेतला माणसाने जगावर राज्य करण्याच्या दृष्टीने आपले तिसरे पाऊल म्हणजेच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्यास सुरुवात केली असे म्हणता येईल.
६. सहावा अवतार हा परशुरामांचा होता. जी माणसाची शिकारी अवस्था होती. येथे सहस्त्रार्जुनाची कथा रूपकात्मक मानली तर गाय हे निमित्त होत. माणूस शिकारी बरोबर जनावार्पालन पण करू लागला होता. आणि एका शिकारी समाजाच रुपांतर हळूहळू सुसंस्कृत समाजात होत गेले अस प्रतीत होत. परशुरामांनी शिकारी लोकांचा नाश करून सुसास्न्कृत समाजाला म्हजेच ब्राम्हणांना हि भूमी दान केली.
७. सातवा अवतार हा प्रभू श्रीरामचंद्राचा होता. जी माणसाची सुसंस्कृत अवस्था होती.
या अवतारात माणूस एक समाज म्हणून आकार घेत होता. तो सुसंकृत बनत चालला होता.
८. आठवा अवतार हा भगवान श्री कृष्णाचा होता. हि माणसाची पूर्ण सुसंस्कृत अवस्था.
९. नववा अवतार हा बौद्ध म्हणून समजला जातो. परंतु काही जणांचे असे म्हणणे आहे कि हा अवतार पंढरपूरच्या पांडुरंगाचा आहे. आणि बुध हा शब्द नसून बद्ध हा शब्द आहे. कारण पंढरपूरचा पांडुरंग त्याच्या भक्ताच्या शब्दात बद्ध असून तो विटेवर गेली २८ युगे उभा आहे. अर्थात हाच संदर्भ योग्य आहे, असे मला वाटते.
१०. दहावा अवतार हा अजून अज्ञात आहे असे मानले जाते. परंतु काही धार्मिक ग्रंथात अशी भविष्यवाणी आहे कि हा दहावा अवतार भाताच्या पश्चिम किनाऱ्यावर जन्माला येईल
असो. तर मित्रानो पुराणांना गावगप्पा म्हणून हिणवनार्यांचे दात त्यांच्या घशात जातील इतकी आपली वैदिक संस्कृती श्रेष्ठ आहे. फक्त गरज आहे ती तिचा कालानुरूप योग्य अर्थ समजून घेण्याची. पण हे काम फक्त पूर्ण श्रद्धा ठेवूनच करता येईल. केवळ टीका करायची म्हणून टीका करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.
प्रसाद राऊत.

१७ टिप्पण्या:

  1. विष्णूने पाचवा वामन अवतार घेऊन समाजाला कपट कारस्थानाचा संदेश दिला आहे,असे आपणास का वाटत नाही?ह्या अवतारात विष्णूने बळीचे राज्य नेमके का बळकावले?बळीची प्रजा सुखी नव्हती का?वामनाने बळीचे राज्य कपटाने,भिक्षा मागून बळकावल्यानंतर कोणती लोकोपयोगी कामे केली ,हे सांगाल तर बरे होईल.आजही आयाबहिणी ओवाळताना "इडापिडा जावो,बळीचे राज्य येवो" असे का म्हणतात.असे म्हणताना त्यांना अपेक्षित इडापिडा कोणती असावी ?वामन तर नसेल ना?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बळीचे राज्य येवो असे प्रजा म्हणते हे जरी खरे असले तरी तो कोणता बळी?? कारण बळीराजा हा राक्षस वंशीय होता. त्यांचा आणि शेतीचा काही संबंध आहे का?? शिवाय बळीने कधी शेती केल्याचा उल्लेख पुराणांत आहे का??? नसेल तर मग कशावरून तो शेतकरी होता?? दुसरी गोष्ठ म्हणजे बळी म्हणजे बलराम असेल काय?? कारण बलरामाच्या हातात नांगर असयचा…. बळीच्या हातात नांगर असायचा ह्याला काही संदर्भ आहे का?? या प्रश्नांची उत्तरे द्या… मग पुढे बोलू

      सध्या स्वतःला विद्रोही म्हनावना-यांचा यज्ञाला विरोध असतो. पण बळी हा यज्ञ करत होता…. त्यामुळे त्यांना यज्ञ मान्य आहे का???

      हटवा
    2. टिका करायचे असेल तर स्वताच्या नावानं करावी नाव लपवून ठेवणं हे भ्याड कृत्य आहे

      हटवा
    3. नवविधा भक्तीपैकी हे "आत्मनिवेदन"भक्ती आहे.शंभर यज्ञानंतर स्वर्ग प्राप्ति होते,पण तो लोक नाशिवंत जाणून एक कल्पपर्यंत सुतल लोकात पाठऊन स्वतः द्वारपाल भगवंत झाले.त्यानंतर स्वर्गाचा अधिपती बनविले.

      हटवा
  2. सहावा अवतार हा परशुरामाचा होता,असे आपण म्हणालात.परशुराम जर सुसंस्कृत होता तर गर्भवती स्त्रियांच्या गर्भातील बाळे त्यांचे पोट फाडून मारणारा ,लहान मुले,वृद्ध यांची केवळ क्षत्रिय आहे म्हणून हत्या करणारा ,स्वत:च्या आईचे मुंडके उडवणाऱ्या परशुरामाची संस्कृती कोणती होती याची कल्पना येते!अशा महान आणि उदात्त कार्यासाठी विष्णूला अवतार घ्यावा लागतो,याचे मला मोठे आश्चर्य वाटते.परशुरामाच्या ह्या जीवित कार्यानंतर सर्व क्षत्रिय वर्ण नष्ट झाला,असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. परशुरामाने स्त्रियांच्या गर्भातील बालकांची हत्या केली याला पुराणातील काही संदर्भ देत येईल का??? आणखी एक परशुरामाने जरी आईचे मुंडके उडवले असले तरी तिला परत जिवंत करून घेण्याचा वर सुद्धा मागितला होता. जे काही बोलताय त्याला पुरावे आहेत का???

      हटवा
  3. आपण आपल्या सहाव्या अवतारातील तथाकथित सुसंस्कृत लोकांनी नंतर परशुरामाला रानटी ,शिकारी ठरवून त्याच्या क्रूरकर्माबद्दल त्याने दान केलेल्या भूमीतून हद्दपार केल्याचे सांगितले नाही?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. परशु रामाला हद्दपार केले हे कोणी सांगितले??? याला काही पुरावा आहे काय???

      हटवा
  4. सातव्या अवतारातील प्रभुने,रामाने सुसंस्कृत माणसाप्रमाणे आपल्या पत्नीने जशी आयुष्यभर साथ दिली,सोबत वनवास भोगला,तशी आपल्या अबला पत्नी सीतेला साथ न देता मरण्यासाठी जंगलात सोडून देऊन कोणता महान संदेश दिला आहे?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण जे सांगताय ते उत्तर कांडातील आहे. मुळात उत्तरकांड हे पक्षेपित असल्याचा जाणकारांचे म्हणणे आहे.

      उत्तरकांड हे मूळ वाल्मिकी रामायणाचा भाग नसून प्रक्षिप्त भाग आहे, याचे पुरावे.
      (न्या. राम केशव रानडे, संध्यानंद दि. २९ डिसें २०१२ ते ०१ जाने २०१३)

      १. युद्धकांडाच्या अखेर वाल्मिकीने म्हटले आहे
      एनं इतिहासं रामायणं इदं कृत्सनं।
      हा इतिहास आहे, हे रामायण आहे. (यात सीता-त्याग नाही, शंबूक-वध नाही.)

      २. युद्धकांडाच्या अखेर वाल्मिकीने म्हटले आहे की रामराज्यात सर्व लोक सद्गुणी व धर्मपरायण होते. त्याने दहा हजार वर्षे (खूप वर्षे) राज्य केले.
      सर्वे लक्षणसंपन्नाः सर्वे धर्मपरायणाः ।
      दशसहस्राणि रामो राज्यमकारयत ।
      या इतक्या वर्षांत सीता-त्यागासारख्या महत्वाच्या घटनेचा उल्लेखही नाही. संबूक-वधाचाही नाही.

      ३. तत्कालिन प्रथेनुसार ग्रंथ समाप्त झाल्यावर फलश्रुती सांगितली जात असे. युद्धकांडाच्या शेवटी फलश्रुती सांगितली आहे. म्हणजे ग्रंथ तेथेच संपला आहे.
      यःशृणोति सदालोके सनरः पापत्प्रमुच्यते।
      पुत्रकामश्च पुत्रान्वै धनकामो धनानि च।

      ४. रावणाचा वध रामाने केला आणि इंद्रजिताचा वध लक्ष्मणाने केला असा स्पष्ट उल्लेख रामायणात आहे. पण उत्तरकांडाच्या आरंभी म्हटले आहे की काही मुनी रामाकडे आले आणि म्हणाले,
      रामा, तू रावणाचा वध केलास त्याबद्दल अभिनंदन करण्याकरिता नव्हे तर तू इंद्रजिताचा वध केलास त्याबद्दल तुझे अभिनंदन करण्यासाठी आम्ही आलो आहोत.
      थोडक्यात, उत्तरकांडाचा आरंभच चुकीचा आहे.

      ५. वाल्मिकी रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे
      अविस्तरं असंदिग्धम् ।
      पाल्हाळ नाही, निश्चित कथन.
      उत्तरकांडात मात्र हे वैशिष्ट्य आढळत नाही. कुंभकर्णाच्या निद्रेचे वर्णन करण्यासाठी संपूर्ण तेरावा सर्ग खर्च केला आहे आणि त्यात अनेक बालिश गोष्टी आहेत. वाल्मिकीच्या शैलीशी हे जुळत नाही.

      ६. शंबूक शूद्र असूनही तप करतो म्हणून रामाने त्याचा वध केला असं उत्तरकांडात म्हटलंय. पण शबरीसुद्धा शूद्र होती. तिने केलेल्या तपाचे रामाने कौतुक केले आहे. मग शंबुकाचा वध कसा करेल?

      ७. राम त्रेतायुगात होऊन गेला. पण उत्तरकांडात म्हटलंय,
      अधर्मो परमो राजन् द्वापरे शूद्रजन्मनः।

      ८. अहल्या इंद्राकडून भ्रष्ट झाली होती. तिचा रामाने उद्धार केला आणि गौतमाने तिचा स्वीकारही केला. मग हाच राम केवळ लोकापवादावरून सीतेचा त्याग करेल?

      ९. वेदांमधील काही रचनांचे कर्ते शूद्रवर्णीय आहेत, काही ऋचा स्त्रियांनी रचल्या आहेत. पुढे स्त्री-शूद्रांना वेदांचा, तपाचा धिकार नाही अशा वेडगळ समजुती रूढ झाल्या. त्याकाळातील एका सामान्य कवीने स्वतःचा कल्पनाविलास वाल्मिकी आणि रामाच्या नावावर खपवला आहे.

      १०. वाल्मिकी रामायणात राम सीता, लक्ष्मण आणि भरत यांच्याशी चर्चा करतो. काहीवेळा चर्चेनंतर स्वतःचे मत बदलतोसुद्धा. उत्तरकांडात मात्र तो हुकूमशहा झाला आहे. लक्ष्मण, भरत यांना काही बोलूच देत नाही. तो म्हणतो की माझ्याविरुद्ध बोलणारा माझा शत्रू आहे.

      ११. राम सत्यवचनी होता. त्याचे ब्रीद होते,
      अनृक्तं नोक्तपूर्वं मे नच वक्ष्ये कथंचन ।
      उत्तरकांडात तो सीतेला चक्क खोटे सांगतो की डोहाळे पुरवण्यासाठी वनात जायचे आहे.

      १२. सामान्य स्त्रीसुद्धा गर्भवती असताना कुठे निघाल्यास तिच्याबरोबर मैत्रिणी, नातेवाईक स्त्रिया जातात. सीता तर सम्राज्ञी होती. ती मात्र एकटीच वनात गेली. हे काही पटत नाही.

      १३. वाल्मिकी रामायणात म्हटले आहे की महत्वाच्या प्रसंगी प्रजाजनांची सभा बोलवावी व त्यांचे मत घ्यावे. दशरथाने अशी सभा घेतल्याचा उल्लेख आहे. उत्तरकांडातील रामाने मात्र सभा वगैरे न घेताच सीता-त्याग केला. आदर्श राजाच्या लक्षणांशी हे जुळत नाही.

      १४. शिक्षा देण्यापूर्वी अपराध्याचे म्हणणे ऐकून जाते. पण सीतेला काहीही संधी न देताच शिक्षा ठोठावली गेली. वाल्मिकी रामायणातील रामाशी उत्तरकांडातील रामाचे वर्णन जुळत नाही.

      १५. लव-कुश मोठे झाल्यावर राम सीतेला म्हणतो की तू दिव्य कर म्हणजे मी तुझा स्वीकार करतो.
      हे अगोदरसुद्धा सांगता आले असते. त्यागाचा खटाटोप करण्याचे कारणच नव्हते.

      १६. वाल्मिकी रामायणाची शैली आणि उत्तरकांडाची शैली भिन्न आहे.

      १७. सीतेचे दागिने ओळखताना लक्ष्मण म्हणतो की बाहुभूषण आणि कुंडलांबद्दल मला सांगता येणार नाही. पण पदभूषणं ओळखतो कारण मी तिला नेहमी वंदन करत असे. असे मर्यादाशील नाते वाल्मिकींनी वर्णिले असताना उत्तरकांडात सीता लक्ष्मणाला म्हणते की माझी पाळी चुकली आहे, मी गर्भवती आहे. माझ्या पोटाकडे निरखून पहा.

      १८. महाभारतातील वनपर्वात २७३ ते २९२ या अध्यायांत रामायण सांगितले आहे. त्यात उत्तरकांड नाही. सीता-त्याग नाही, शंबूक नाही. म्हणजेच, महाभारत लिहिले गेले तोपर्यंत उत्तरकांड अस्तित्वात नव्हते.

      वाल्मिकी रामायणात रामाने स्वतःला मनुष्य म्हटले आहे, देव किंवा देवाचा अवतार नाही.
      आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्।

      हटवा
  5. बुद्ध ,बौद्ध ,बुध आणि बद्ध हे वेगवेगळे शब्द आहेत!तुम्ही लोकांना बुद्धू समजलात काय प्रसाद भाऊ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बुद्ध ,बौद्ध ,बुध आणि बद्ध हे वेगवेगळे शब्द आहेत!तुम्ही लोकांना बुद्धू समजलात काय प्रसाद भाऊ?
      >>>>> अपभ्रंश व्हायला कितीसा वेळ लागतो??? मराठ्यांच्या ९ कुलांपैकी "घोरपडेबहाद्दर" हे बिरुद असणारे भोसले घराणे नंतर घोरपडे याच नावाने ओळखले जाऊ लागले हे आपणास माहित आहे का???

      हटवा
  6. कालानुरूप योग्य(?) अर्थ समजून सांगण्याचा आपण चांगला प्रयत्न केलात! पण हे काम फक्त पूर्ण श्रद्धा(?)(की अंधश्रद्धा) ठेवूनच करता येईल. केवळ टीका करायची म्हणून टीका करणे हा खरेच शुद्ध मूर्खपणा आहे!

    उत्तर द्याहटवा
  7. videshi ureshian bamhananni ammhala sanskruti shikau naye! obc,sc,st,nt,vjnt,mbc,sbc yancha vaidik dharmashi kuthalahi sambandha nahi.

    उत्तर द्याहटवा
  8. अश्या भाकड कथा मनोरंजन म्हणून चांगल्या वाटतात । एखांदा अवतार अरेबिया आफ्रिका कोरिया अमेरिका सारख्या देशात घ्यावा म्हणजे हिंदुराष्ट्रच नाही तर हिंदू विश्व होईल । सगळी कडे मंदिर बांधून पुजारी व धर्माचे ठेकेदार होण्यासाठी आम्ही आहोतच ।

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हा कालंखड प्राचीन आहे. जवळपास ६ ते ८ हजार वर्षे जुना. देव संकल्पना सर्वच संस्कृतीत आहेत आणि त्यांच्या कथा थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत.

      हटवा