!! श्री !!
November 12, 2011
मित्रांनो आजचा विशय आहे " शिवाजी राजांचा जनसंग्रह !"
आपन सर्वच जानतो की राजांभोवती असलेले मावळे आणी त्यांचे सल्लागार हे फक्त एका दिव्य ध्येयासाठी राजांबरोबर लढत होते...... इतिहासाचा जर बारकाईने अभ्यास केला. तर आपनास असे आढळुन येईल की शिवाजी राजांच्या प्रत्येक मावळ्याला एक स्वतंत्र ईतिहास आहे......... राजांचा प्रत्येक मावळा हा एखाद्या गडापेक्षा कमी नव्हता....... त्यांची राजांवरील आणी राजांनी त्यांना दिलेल्या त्या दिव्य ध्येयावरील निष्ठा ही एखाद्या गडाच्या अभेद्य तटापेक्षा कमी नव्हती............ त्यांच्या त्या असामान्य निष्ठेने आणि त्या निष्ठेला साजेश्या पराक्रमाने इतिहासाला त्यांची दखल घेने भाग पडले............
माझ्या मते हिंदुंच्या इतिहासात पवनपुत्र हनुमाना नंतर स्वामिभक्तीचे सर्वात प्रभावी दर्शन भारतवर्षाला घडले आहे ते शिवकाळातच!
राजांच्या अवती भवती दिसणारी हि मंडळी एका दिव्या ध्येयासाठी लढत होती...मुसलमानांचे म्हणा किवा सध्याच्या काळात मुस्लीम तुष्टीकरणासाठी भ्रष्ट राज्यसत्तेचे अत्याचार म्हणा..... ते येणाऱ्या पिढीला भोगावे लागू नयेत म्हणून स्वतःचा असा हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे हे होते ते दिव्या ध्येय. या सर्वानी त्या त्या वेळी काही न काही अत्याचार भोगले होते. आणि आपल्या परीने त्या अन्यायाचा सामना केला होता...पण त्यांच्या या वैयक्तिक लढ्याला शिवाजी राजांनी सामान्य जनमानसाच्या लढ्याचे स्वरूप दिले....आणि याच अखंड लढ्यातूनच साडेतीनशे वर्षाच्या गुलामगीरीनंतर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला.....
जसे मी म्हटले कि राजांच्या भोवती असलेल्या प्रत्येक मावळ्याला एक इतिहास आहे.....तर अश्याच काही मोजक्या मावळ्यांचा इतिहास थोडक्यात आज सांगणार आहे.......जर सर्वच मावळ्यांच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा झाला........ तर मला वाटतं ....त्यासाठी विश्वकोश सुद्धा कमी पडेल.....असो....
बाजी पासलकर स्वराज्याचे पहिले सेनापती होते हे आपल्याला सर्वाना माहित आहे....हे बाजी मुसे खोर्याचे वतनदार....काहीसे स्वतंत्र बाण्याचे.....लोकांच्या भल्यासाठी झटणारे....भीम पराक्रमी............बाजी पासलकरांचा पराक्रम तर सर्वश्रुत होताच.....शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यापूर्वी कोंकणात घड्श्या कोळी नावाचा एक जबदस्त पराक्रमी पण तितकाच जुलमी राजा मातला होता...घाटावरच्या मराठ्यांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याला आणि त्याच्या पूर्ण सैन्याचा बाजींनी बिलालपूर गावी पराभव केला......बाजी पासलकरांचे मावळातले वाढते वजन बघून चंद्रराव मोऱ्याने त्यांना पकडून आणीन अशी आदिलशाही दरबारात शपथ घेतली होती...आणि विश्राम गडावर हल्ला करायचा असफल प्रयत्न केला होता..चंद्रराव मोऱ्याची त्या हल्ल्यात बाजी पासलकरांनी दाणादाण उडवून दिली होती......तीच गत बाजींनी तवच्या खिंडीत आदिलशाही सैन्याची केली..............तर असे हे बाजी स्वराज्याच्या फतेहखानाशी खळदबेलसर या गावी झालेल्या पहिल्या लढाईत धारातीर्थी पडले.....स्वराज्यासाठी झटणारा पहिला खांब या पहिल्या लढाईतच पडला...
स्वराज्याचे दुसरे सेनापती नेताजी पालकर तर आपल्या अजोड पराक्रमाने प्रतिशिवाजी म्हणवले जात होते....ह्या नेताजी पालकरांचा इतिहास असा कि त्यांनी साधारण १६-२० वर्षाच्या दरम्यान जेव्हा त्यांच्या बहिणीची वरात निघाली तेव्हा काही आदिलशाही स्वारांनी त्यांच्या बहिणीला पळवून नेले...त्यावेळी आपले बहिणेचे रक्षण करताना नेताजींनी विजापूरच्या एका बड्या अधिकार्याला ठार केले....पण लढत असताना ते जखमी होऊन बेशुद्ध पडले...आणि दुसर्या एका अधिकार्याने त्यांना ते मेले असे समजून सोडून दिले....नेताजींना नंतर काही वर्ष आदिलशहा पासून वाचण्यासाठी माथेरान च्या शिखरावर राहणाऱ्या त्यांच्याच एका नातेवाईकाकडे - जो आता साधू म्हणून आयुष्य कंठत होता - त्यांच्याकडे ठेवण्यात आले...ह्या साधूने पूर्वाश्रमी योद्धा म्हणून बरीच वर्षे लढाया केल्या होत्या....लोकांची दयनीय अवस्था बघून त्यांना वाईट वाटे......त्यांनीच नेताजींना सर्व हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण दिले....... हा पराक्रमी योद्धा घडवला......आणि समाधी घेण्यापूर्वी नेताजी पालकरांनी शिवाजी राजांना जाऊन मिळावे अशी आज्ञा केली.....नंतरचा इतिहास तर सर्वज्ञात आहेच....
बाळाजी आवजी चिटणीस.... होय मित्रानो....बाळाजी आवजी चिटणीस...ज्याला संभाजी राजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते....त्यांच्या त्या एका दुष्कृत्यामुळे उभ्या आयुष्यातल्या पुण्याईला कलंक लागला....पण म्हणून त्यांनी आपल्या मुलाला स्वराज्याशी बेईमानी करायला शिकवले नाही.....गोव्याच्या पोर्तुगीजांवर जेव्हा संभाजी राजांनी हल्ला केला आणि ऐन युद्ध धुमाळीत राजे नदीच्या पत्रात वाहून जात होते..तेव्हा ह्याच खंडोजी बाळाजीने स्वतःचा जीव धोक्यात घालून राजांना वाचवले...तर ह्या बाळाजी आवजीना तर मुसलमानी रीयासतीचा सगळ्यात वाईट अनुभव आला होता.........त्यांचे पिताजी हे जंजिर्याच्या सिद्धीकडे एक अधिकारी होते.....पण काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांच्याविरुद्ध सिद्धी कडे कागाळी केली आणि मग मुसलमानी अत्याचाराच्या परंपरेला जागत सिद्धीने त्यांना पोत्यात बांधून भर समुद्रात फेकून दिले...तेही लहानग्या बाळाजीच्या समोर....नंतर बाळाजीना त्यांच्या आईसकट गुलामाच्या बाजारात विकायला पाठवले...पण राजापुरात एका हिंदू व्यक्तीने त्या मायलेकरांची खरेदी केली....ती व्यक्ती बाळाजीचे मामा होते..त्यांनीच मग बाळाजीचे पुढील शिक्षण केले....आणि बाळाजी तिथल्या एका मोठ्या व्यक्तीकडे मुन्शी किवा दिवाण म्हणून काम करू लागले....पण आपल्यावर आणि आपल्या इतर हिंदू बांधवांवर झालेल्या अत्याचाराची बोच त्यांच्या मनात सलत होती.....त्यातच एकदा त्यांनी त्या मोठ्या व्यक्तीकडून शिवाजी राजांना जाणार्या एका पत्राच्या थैलीतून स्वतः तर्फे एक पत्र पाठवले...आणि त्यात राजापुरातील परकीयांचे अत्याचारांचे वर्णन करून राजांना लवकर बोलावून घेतले...त्यांचे सुंदर हस्ताक्षर बघून राजांनी त्यांना आपल्या पदरी ठेऊन घेतले....
मुरारबाजी देशपांडे कोण होते आणि त्यांना राजांनी कुठून उचलले किवा आपल्या पक्षात घेतले...हे तर सर्वाना माहीतच आहे....
तर मित्रानो असे हे मावळे...ज्यांच्या आयुष्याला अनेक पदर आहेत....पण ह्या अनेक पदारानीच मिळून हिंदवी स्वराज्याचा सुंदर आणि तीतकच भक्कम वस्त्र विणलं....
मित्रानो आपण सर्वानीच कधी विचार केला असेल का कि शिवाजी राजांनी या अनेक स्वभावाच्या, भिन्न भिन्न परिस्थितीतून मार्ग काढत उभ्या राहिलेल्या मावळ्यांना एका उत्तुंग ध्येयाची जाणीव कशी करून दिली असेल?? त्यांची भिन्न स्वभावांची मने कशी सांभाळली असतील?? खरं तर या प्रश्नांची उत्तरे मिळणे खरच कठीण आहे...कारण राजे करू शकत नव्हते असे या जगांत काही नव्हते....
समर्थांनी म्हटल्याप्रमाणे
शिवरायांचे कैसे चालणे ! शिवरायांचे कैसे बोलणे !
शिवरायांची सलगी देणे ! कैसी असे !!
खरच शिवराय समजणे खूप मुश्कील आहे.....ज्यांना ते समजतील..त्यांनी अमृत योग साधलाच म्हणून समजा...........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा