शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

शिवप्रताप साप्ताह - "छत्रपती शिवाजी राजे एक द्रष्टे राज्यकर्ते !!" ( ५वा दिवस )


                                                                                                !! श्री !!

                                                                                                                                                                                    November 15, 2011
शुभ प्रभात मित्रानो,


आजचा आपला विषय आहे "छत्रपती शिवाजी राजे.... एक द्रष्टे राज्यकर्ते !!" 


मित्रानो,


                         आज हा विषय घेण्यामागे एक कारण आहे. नुकतीच मित्राने एक बातमी सांगितली  कि सरकारने  जम्मू काश्मीर मध्ये सैन्य कमी केलं आहे आणि त्याचे परिणाम म्हणून तिथल्या सध्या हजर असलेल्या सैन्यावर प्रचंड मानसिक ताण येत आहे.....सोबत पाकिस्तान जवळ असल्यामुळे आणि त्यातही पाकी अतिरेकी आधीच काश्मीरमध्ये घुसले असल्याने सैन्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे.............. आणि आता तिथे चीनचे ४००० सैन्य सीमेवर आलंय. ते चीनी सैनिक सांगतात कि ते कुठल्यातरी रस्तेबांधणी किवा तत्सम बांधकामासाठी तिथे आले आहेत...पण त्यांची कार्यवाही मात्र लढाईच्या तयारीची आहे. जर ते रस्तेबांधणी किवा तत्सम कामासाठी आले आहेत तर बंकर्स बांधायची गरज काय?? चीनच्या दगलबाजीचा अनुभव आपण यापूर्वीही अनेकदा घेतला आहे........तरीही आपले राज्यकर्ते त्याकडे गंभीरपने बघायला तयार नाहीत ...........


                       हीच गोष्ट कन्याकुमारी आणि श्रीलंकेला जोडणा-या सेतू समुद्रमची....एक वेळ तो सेतू प्रभू रामचंद्राने बांधलाय हे विसरून जाऊ...पण म्हणून त्या सेतूचे भौगोलिक महत्व कमी होत नाही....हा सेतू श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान आहे. मागे जेव्हा त्सुनामी आल्या मुळे काही देशांना आणि आपल्याही काही राज्यांना त्याची झळ बसली तेव्हा हा सेतू समुद्रम होता म्हणून त्या त्सुनामी लाटा भारताच्या पश्चिम किना-या पर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. हे झाले एक कारण....दुसरे कारण असे कि त्या भागात बर्याच प्रमाणात एका खनिजाचा साठा आहे. ज्याचा उपयोग अणु उर्जेसाठी लागणारे युरेनियम बनवण्यासाठी होतो............ तर आपले भारतीय सरकार अमेरिकेच्या सांगण्यावरून हा सेतू तोडण्याच्या बेतात आहे........... जर असे झाले तर आपल्या अंतर्गत सागरी हद्दीत परकीय जहाजांचा सर्रास वावर सुरु होईल...जे आपल्या सामरिक संरक्षणासाठी घातक आहेच....नैसर्गिक आपत्तीपासून हा सेतू आपले कसे रक्षण करू शकतो हे मी वर त्सुनामीचे उदाहरण देऊन सांगितलेच आहे....तसेच आपल्याकडे मी वर सांगितल्या प्रमाणे ज्या खनिजाचा साठा आहे त्याची तस्करी सुरु होण्याची शक्यता आहे............हे झाले दक्षिण भारतातले...........


                   ईशान्य आणि पूर्व भारतात काही वेगळी परिस्थिती नाही....... तिथे आधीच माओवादी आणि बांगलादेशी मुस्लिमांनी अस्थिरतेच वातावरण निर्माण केले आहे....स्वतंत्र नागालेंड च्या चळवळीतून त्याचा अनुभव आपण घेतला आहे............


                 तर देश एवढा अस्थीर असताना आपले सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो....तिकडे दुर्लक्ष कसे करू शकते????? 

                                          उत्तर साधे आहे मित्रानो....दूरदृष्टीचा अभाव !!!!.................


                  म्हणूनच या अश्या परिस्थितीत शिवाजी राजांची प्रकर्षाने आठवण येते.....राजांसारखा द्रष्ठा नेता आपल्या भूमीला स्वातंत्र्या नंतर मिळालाच नाही. आणि जे नेते असे होते त्यांना काही स्वार्थी लोकांमुळे उपेक्षा सहन करावी लागली.......


                  इंग्रजांना भारतात राज्य करायचे होते कि ते व्यापार करायला इथे आले होते आणि मग भारतीय राजकारणात जी पोकळी निर्माण झाली ती बघून त्यांनी त्यात शिरकाव केला??? हा प्रश्न आजही अनेक विचारवंताना पडतो..........पण इंग्रजांची भविष्यातील रणनीती ओळखलेले आद्य गुरु शिवराय होते..........नुसता व्यापार त्यांना करायचा नाही तर इथे राज्यच त्यांना करायचे आहे........ हे शिवाजी राजांनी अचूक ओळखले होते...म्हणून तर वेळो वेळी इंग्रजांवर छापे घालून त्यांच्या व्यापाराला खीळ बसवली होती...जेणेकरून इंग्रजांचे जेवढे जास्त नुकसान  होईल तेवढा त्यांच्या इथे राज्य करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल.........आणि हि गोष्ट इंग्रजही जाणून होते म्हणून तर राजे जेव्हा पन्हाळयाला अडकले तेव्हा राजांना संपवण्यासाठी लांब पल्ल्याच्या तोफा इंग्रजांनी मुघलांना पुरवल्या होत्या.............आणि ह्या गोष्टीची जान ठेऊन राजांनी इंग्रजांची राजापूरची वखार लुटली होती..........राज्याभिषेकाच्या वेळी राजांकडे इंग्रज कंपनीने हिंदवी स्वराज्यात इस्ट इंडिया कंपनीची नाणी चालवीत असे एक कलम मागितले होते...ते राजांनी नाकारले...........यातच राजांची दूरदृष्टी दिसून येते.........नाहीतर आपले नेते..........मागे एकदा व्हिक्टोरिया राणीच्या कसल्यातरी कार्यक्रमाला स्वतंत्र भारतातर्फे सोन्याने मडवलेल छत्र दिलं गेलं होतं....त्याचा सरळ सरळ अर्थ होतो कि आम्ही तुमचे मांडलिक आहोत...कारण छत्र हे सार्वभौमतेच प्रतिक असतं........ आणि हि गोष्ट जर आपल्या राज्यकर्त्यांना कळत नसेल तर त्यांनी हार्बर लाईन वरील रेल्वे पटरीत जीव द्यावा.......


                 शिवाजी राजांच्या द्रष्टेपणाची उदाहरणे इतिहासाच्या पानोपानो सापडतात......राजगडावरून कोणासही अजिंक्य अश्या रायगड वर स्वराज्याची राजधानी हलवणे...........भविष्यात औरंगजेब आपल्या सर्व सैन्यानिशी दक्षिणेत उतरणार हे हेरून आपल्या सैन्याच्या तीन फळ्या करणे..... जेणे करून औरंगजेबाचे सैन्य विखरून जाईल...आणि अश्या विखुरलेल्या सैन्याचा पूर्ण पराभव करता येईल.........


               .पण याच बरोबर राजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आणून देणारी  इतिहासातली सर्वात मोठी खेळी म्हणजे हिंदवी स्वराज्याचे आरमार.......एक तर आरमार उभारले पाहिजे हे ओळखलेला मध्ययुगातला हा एकमेव राजा..... शिवाजी राजांचे आरमार हे भारतातले सर्वात बलाढ्य आरमार होते.......त्यांच्या आरमाराने आखाती देशात सुद्धा छापे घातले होते.....काही वर्षापूर्वी कोकणात एका ठिकाणी समुद्रात खूप मोठी भिंत सापडली होती.........हि परकीय जहाजे बुडवण्यासाठी केलेली एक योजना होती हे आता सिद्ध झाले आहे......जी गोष्ट आरमाराची तीच शस्त्रास्त्राची ....भगवती किल्ल्यावर तोफा गाळण्याचा कारखाना राजांनी सुरु केला होता..... परक्यांनी पुरवलेल्या शस्त्रांवर हिंदवी स्वराज्य कधीच विसंबून राहू शकत नाही हे राजांना पुरते कळले होते.........


               राजांच्या दूरदृष्टीच्या कथा सांगायला गेलं तर आपल्याला ते कोणालाच झेपणार नाही........कारण राजांच्या प्रत्येक कृतीत भविष्याची चाहूल घेऊन आधीच उपाय योजना केलेली दृष्टीस पडते.....................तर असे हे राजे....ख-या अर्थाने जाणता राजा होते.....


राजे !........................ पुन्हा एकदा जन्म घ्या...........महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतवर्ष तुमची वाट बघत आहे.......... . 


जय भवानी !! जय शिवाजी !!





1 टिप्पणी:

  1. आज आपला देश अस्थिर आहे हे खरे,परंतु तो का अस्थिर आहे याची कारणमीमांसा करणारा लेखप्रपंच आपण करावा,अशी आपणास विनंती आहे,धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा