शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

शिवप्रताप सप्ताह - "नियोजन गुरु शिवराय ।" ( ४था दिवस )

                                                                       !! श्री !!

                                                                                                                                                                                     November 14, 2011

मित्रांनो आजचा आपला विषय आहे "नियोजन गुरु शिवराय ।"


मित्रांनो,

                  शिवरायांच्या प्रत्येक कृतीत अचुक नियोजन नेहमीच दिसुन येते. मग ते प्रतापगडावरील अफझल खानाचा वध असो, सिद्दि जौहरच्या हातावर दिलेली तुरी असो नाहि तर आग्र्याच्या कैदेतुन सुटका असो........ या प्रत्येक प्रसंगातुन राजांचं अत्युच्च प्रतीचं नियोजन कौशल्यच दिसुन येतं.


                 तोरणा घेण्यापुर्वी राजांनी बारा मावळात फिरुन लोकांची मने, तिथला परिसर जाणुन घेणे, डोंगर जंगले त्यातील वाटा पायवाटा जाणुन घेणे........... हे त्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचे पुर्वनियोजनच नव्हते काय? गनिमी कावा हे युद्धतंत्रच असे आहे की त्यात प्रचंड शिस्तीची आणि नियोजनाची गरज असते........ बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करने किंवा स्वतःला सोयीस्कर मैदानात शत्रुला घेउन येणे आणी तसा तो येताच त्याच्यावर अशा प्रकारे हल्ला करने की शरण येन्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय ऊरु नये......... या गोष्टी अचुक नियोजन आणि त्या नियोजनाला पुरक अशी शिस्त सेनेत असल्याशिवाय शक्य होत नाहित. शिवरायांचे अचुक नियोजन त्यांच्या प्रत्येक अलौकीक कृत्यातुन दिसुन येते. खरं तर शिवरायांच्या नियोजन कौशल्यावर विस्तृतपने लिहायला गेलं तर एक स्वतंत्र प्रबंधच लिहावा लागेल. असो.......


             आज काहि तथाकथित सत्यशोधक सांगतात कि अफजल खान भेटिच्या वेळी राजांना दगाफटका करनार हि गोष्ट जाणुन राजांच्या बालपनीच्या एका मुसलमान मित्राने राजांना खबरदारी घ्यायला सांगुन वाघनखं आणुन दिली............एकविसाव्या शतकातल्या सर्वोत्कृष्ट विनोदाचं श्रेय या विधानाला जातं........  या लोकांच्या मुर्खपनावर हसावं......... की अतिशहाणपना बद्दल चार शिव्या द्याव्यात तेच कळत नाही.......... अफजलखानाचा वध आणि त्यावेळच्या घटना आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता अफजलखानाचा वध हा पुर्वनियोजीतच होता. आज काही सोवळे इतिहासकार असेही सांगतात की अफजल खानाने आधी कट्यार चालवली म्हनुन  राजांनी त्याला मारला ।। चूक आहे मित्रानो..........राजांनी अफजल भेटिच्यावेळी केलेली पुर्वतयारी बघीतली तर सहज कळुन येतं की राजांनी अफजलखान जिवंत जाउ नये याच दृष्टीने तयारी केली होती. अफजलखान स्वराज्यावर चालुन येताच राजांनी प्रताप गडावर जाने, शरणागतीची लालुच दाखवुन त्याला प्रतापगडावर बोलावुन घेणे, भेटिच्या वेळी सय्यद बंडा तिथे हजर असणार हे जाणुन त्याला तोडिस तोड जीवा महाला याला अंगरक्षक म्हनुन नेणे, तोफेचा आवाज होताच मराठ्यांनी अफजलच्या सैन्यावर तुटून पडने, त्यासाठी आधीच मराठ्यांच्या तुकड्या प्रतापगडाच्या परिसरात पेरुण ठेवने या गोष्टी काय सुचीत करतात? राजांना अफजलखानाला मारायचं नसतं तर एवढ़या मोठ्या प्रमानात सैन्य राजांनी प्रतापगडाच्या परीसरात कशाला एकत्रीत केलं असतं? दुसरी गोष्ट अशी की हिंदवी स्वराज्याचा आदिलशाहीतला सर्वात मोठा शत्रू होता अफजल खान !!!!  तो  स्वतःहून मृत्युच्या दाढेत आला होता आणि त्याला जर रजनी तसाच जाऊ दिला असता तर ती इतिहासातली सर्वात मोठी घोडचूक ठरली असती......कारण अफजल खान म्हणजे स्वराज्यावर असलेली टांगती तलवार. राजना ती तलवारच नामशेष करायची होई....म्हणूनच राजांनी अफजलखानाचा वध केला................


              जी गोष्ट अफजलखानाच्या वधाच्या वेळच्या नियोजनाची........तीच गोष्ट शाहिस्ते खानावरच्या छाप्याची.........तीच गोष्ट सुरतेवर छाप्याची...........तीच गोष्ट आग्र्याच्या कैदेतून सुटण्याची.......या सर्व प्रसंगात राजांचा अत्युच्च प्रतीचं नियोजनच दिसत....या पुढेही जाऊन...आज ना उद्या औरंगजेब सर्व सैन्याशी दक्षिणेत उतरणार या गोष्टीची राजांना पूर्वकल्पना होती...आणि त्याच अनुषंगाने औरंगजेबाच्या सैन्याला विखरवण्यासाठी राजांनी आपल्या सैन्याच्या तीन फळ्या केल्या होत्या....औरंगजेबाचे सैन्य जितके जास्त विखुरले जाईल तितके विखरवण्यासाठी राजांनी योग्य असं नियोजन  केलं होतं............


             पण एवढ्यावरच राजाचं नियोजन संपत नाही  मित्रानो......  राजांच्या  सैन्याच्या आणि लढायांच्या नियोजनावर फक्त जाऊ नका....राजांनी आपल्या प्रशासनाचे नियोजनहि अश्याच उत्कृष्टपणे केलेले आढळेल..........आज जी आपली प्रशासन व्यवस्था आहे ...जिच्यात जिल्हाधिकारी किवा प्रत्येक जिल्ह्याचा एक प्रशासक अधिकारी असतो......... हि व्यवस्था राजानीच निर्माण केली होती ...आणि इंग्रजांनी तिचाच अभ्यास करून तीच पुढे लागू केली............


           वेळेच्या मर्यादेमुळे जास्त काही लिहिता येत नाही आहे.....


            पण मित्रानो......श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटल्याप्रमाणे जगाच्या इतिहासाच्या पानांचा अभ्यास केला तर  असा राजा पुन्हा झाला नाही...........


जय भवानी !! जय शिवाजी !!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा