12.01.2012
मित्रानो,
संकल्प हा नेमीच मानवी जीवनाला नवीन वळण देत आला आहे. शहाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा, हिंदूपदपादशाहीचा जो संकल्प मनी धरला....... तो संकल्प अर्धांगिनी या नात्याने मासाहेब जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांच्या रूपाने जतन केला....वाढवला....
आज मासाहेब जिजाऊ यांची जयंती.....
मागे एका ग्रुपवर एकाने म्हटल्याप्रमाणे शिवाजी राजांची आई होणे हे कार्य फक्त जिजाऊ मासाहेबच करू शकत होत्या. कारण राजे उभे आयुष्य मृत्यूला पुढे घालून चालत राहिले. प्रत्येक वेळी नवीन संकट.....एका संकटातून बाहेर पडतात न पडतात तोच दुसरे संकट समोर उभे राही. राजे प्रत्येकवेळी संकटात असताना मासाहेबांना प्रसूती वेदनेपेक्षा कमी वेदना झाल्या असतील का??? दुःख आणि सुख यांचा संमिश्र अनुभव मासाहेब संपूर्ण आयुष्यभर घेत आल्या होत्या. त्यांच्या या वेदना मी शब्दांत मांडू शकत नाही..............मासाहेबांबद्
हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान असलेल्या मासाहेब जिजाऊ यांना मनाचा त्रिवार मुजरा....................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा